सई
माझी सई तशी समजूतदार
किती थकलो आहे ते पाहून
किती गोड हसायचं
ते निट ठरवता येतं तिला
---
माझी सई तशी शहाणी
आई आजारी असेल तर
आईची आई होणं जमतं तिला
---
माझी सई तशी डँबिस
बाबा आईचे ऐकत नसेल तर
बाबाची सासू होणंही
जमतं तिला
---
माझी सई तशी लब्बाड
किती अन् कोणाला लोणी लावल
तर किती अन् काय मिळेल
हे पक्क ठावूक तिला
---
माझी सई तशी बदमाष
कोण रागावल्यावर किती
भोकांड पसरायचे हे
व्यवस्थित माहीतीये तिला
---
माझी सई तशी निरागस
शुभ्र केकवरची लालचुटुक चेरी
मिळवायला किती रुसायचं
हे कळतं तिला
---
माझी सई तशी हुशार
बाबा रागवला तरी
बाबाचं प्रेम
समजतं तिला
---
माझी सई आज आठ वर्षांची झाली....
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१२/०५/२०१५)
आवडली!
+१
खूपच गोड कविता :)
+11111111111111
+११
माझी सई तशी हुशार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामतसईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
गोग्गोड सईला वाढदिवसांच्या
+१
मुलगी म्हणजे बापाचा जीव की
मस्त जियो
एकदम मिकास्टाईल... अतिशय
मस्तच
मस्तच!
छान कविता, सईला वादिहाशु!!
:)
माझी सई तशी निरागस
किती गोड!
मस्त लिहिलीय
सर्वांचे
छान
मिका
मस्त लिहिलंय, छानच.माझी सई
फारच छान लिहिलय. खूप गोड
अरे! ही कविता नजरेतून सुटलीच