बा मस्तच .... नागोबा दिसनेच तसे दुर्मिळ .. तुम्हाला तर जोडी दिसलेली. हाबिणंदण. चांगलं लिवलय ... आणि दोन्ही भाग एकाच रपक्यात वाचले.
अवांतर : आम्हाला विना एफर्ट कुत्रे पहायला मिळालेले, तेवढाच अनुभव, पण तो काय डोळ्यासमोर नाय थांबुन रायला
- टार्स डिस्कवरी
अनुभव आवडला.. तुमच्या बोलिभाषेतिल शब्दांनी लेख अजुनच जिवंत वाटला..
..बाबा
अवांतर - काहि हिंदू लोक पुरुन अंत्यविधी करतात हे प्रथमच कळल. मला वाटत होते कि फक्त लहान मुलांनाच पुरतात..
नाग नुसता दिसणेच दुर्मिळ आणि तुम्हाला चक्क प्रणयी जोडी जंगलात दिसली तीही इतका वेळ. फारच दुर्मिळ दृश्य.
अतिशय देखणे जनावर असते. मी एकदाच जंगलात पाहिलाय वेगाने सळसळत जाताना तेवढेच, पण ते दृश्यसुद्धा मनात घर करुन बसलंय!
एका फार मोठ्या कोब्राचा फोटो जालावर मिळाला तो पहा!
चतुरंग
आयला, हा नाग म्हणायचा का काय म्हणायचं? एवढा मोठा? फोटोत बघून घबरलो मी, अचानक समोर आला तर बहुधा त्या नागाला मला डसायची गरजच पडणार नाही. नुसता त्याला बघूनच खत्तम आपण !!!
बिपिन कार्यकर्ते
अदिती, भट, टारझन्,प्राजु, बाबा, खादाडमाउ,नारायणी, वर्षा, अनिरुद्ध, चतुरंग.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे आभार.
चतुरंग फोटो खतरनाक. लहानपण कोकणात गेल्यामुळे बरेच नागोबा बघितले आहेत. पण फोटोतील भाउ प्रत्यक्षात दिसला तर..... जाउ दे काय होइल ते सांगता येत नाही....
आत्त यू-ट्यूब वर एक विडियो मिळाला- कोब्रा मेटींग असा सर्च टाकला तर मिळेल. त्याचा दुवा इथे देतोय. ६ मिनिटांचा आहे. त्यातील ५ व्या मिनीटांपासून कॅमेरामन जेवढया अंतरावर आहे तेवढया अंतरावरुन मी हे सगळं बघितलं आहे. साधारण ८- १० मिनिटे.
http://www.youtube.com/watch?v=qEtmhK9fXGw&feature=related
http://kalekapil.blogspot.com/
वा वा वा वा ,
अप्रतिम अनुभवकथन. उत्तम लेख झालाय. झकास.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
नागाच्या जुवळाचा अनुभव इतक्या ताकदीने लिहिलायं ..
जनावर तुमच्याकडे बघत असेल तेव्हा काय कापरे भरले असेल ?
तिसरीत पहिल्यांदा पुण्याच्या सर्पोद्यानात सापांना बघितले त्या रात्री मला भिंतीवर पण साप वळवळताना दिसत होते.
आत्ता आठवले की हसू येते.
हे असे मी प्रत्यक्ष पाहिले असते तर काय झाले असते देव जाणे |
पु. ले .शु.
(सापभीरु :$ ) अभिरत
काळेभाऊ, जबरदस्त आणि विलक्षण अनुभव. नक्कीच भारून टाकणारा अनुभव असणार. मला स्वतःला सापांबद्दल लहानपणापासून एक गूढ आकर्षण आहे. आणि नाग तर अतिशय देखणा आणि चपळ.
आणि तुझं कथन खूपच सशक्त आहे रे. मजा आली वाचताना.
अवांतरः काल मी पण तुझा लेख वाचल्यावर 'कोब्रा मेटिंग' असा सर्च मारला. खूप जबरी व्हिडिओ क्लिप्स आहेत.
बिपिन कार्यकर्ते
अस वाटल की दहावी मराठीच्या पुस्तकातला धडा वाचत आहे. आणि खालच्या कठीण शब्दांचे अर्थानी तर अगदी तोच फिल आला.
(दहावीत मराठी सगळ्यात आवाडता विषय असलेला....... आनंद)
कथा छान आहे. वाचताना असे वाटते की आपण जात आहोत. त्यामुळे कथा वाचायला मज्जा येते.
कोब्राचा फोटो ही छान आहे.
भाग्यवान आहात तुम्ही
कपिल =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
(पुण्याची सोनम) राम राम मिपा
प्रतिक्रिया
मस्त अनुभव
असेच म्हणतो
बा मस्तच ....
जिवंत केलास अनुभव..
मस्त
जबरदस्त..
मस्त लिहिलय..
छान
सुंदर!
वा वा! कपिल, तुम्ही खरच सुदैवी आहात! अहो एक
!!!!!!!!!!!!!
नागराज
धन्यवाद
वा वा वा वा
झकास
नागोबा डुलायला लागला!!!
आवडले लेखन
विलक्षण सुंदर
जुवळं..
स्वाती, आनंद, सुमीत, बिपीन,अभिरत
छान