✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आयुर्वेद रुग्णालय सुरु करणे बाबत....

ब
बाबा पाटील यांनी
Sat, 02/28/2015 - 20:07  ·  लेख
लेख
पुण्यामध्ये आयुर्वेद रुग्णालय सुरु करण्याचा विचार करतो आहे,अंदाजे ३००० चौ.मी.जागा उपल्बद्ध होइल असे वाटते आहे. यात पंचकर्माचे दोन सेट अप,फिजिओथेरपी,अक्युपंकचर सेट अप,योगा हॉल्,सहा ते आठ स्पेशल रुम,असा सगळा विचार आहे. आजपर्यंत पुण्यात खासगी असे एकच आयुर्वेद रुग्नालय आहे,बाकी जी आहेत ती वेगवेगळ्या महाविद्यालयांना सल्लग्न आहेत. ज्यांच्या पिढ्यान पिढ्या आयुर्वेदात गेल्या आहेत अश्या लोकांनीही आजपर्यंत हा विचार केला नाही पण अंगात थोडे सुलेमानी किडे असल्याने हे धाडस करतो आहे,तरी यात काय काय सुधारणा करता येतिल ? किंवा ज्यांनी देशाबाहेर अथवा आपल्या केरळात आयुर्वेद रुग्नालये पाहिली आहेत त्यांनी त्यात काय काय करता येइल हे सुचवावे ही विनंती. कृपया धाग्याचा काश्मिर करु नये ही कळकळीची विनंती.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15422 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

"दंबूक" इतके लिहून मी हा

टवाळ कार्टा
Mon, 03/02/2015 - 15:13 नवीन
"दंबूक" इतके लिहून मी हा प्रतिसाद संपव्तो :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

डॉ. नी धाग्याचं काश्मीर करू

काळा पहाड
Mon, 03/02/2015 - 15:35 नवीन
डॉ. नी धाग्याचं काश्मीर करू नका असं सांगितलं होतं. तुम्ही धाग्याचा पार 'अजय माकन' करताहात. दंबून नाही काढणार ते तर काय मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टकाशेट...

बाबा पाटील
Mon, 03/02/2015 - 19:54 नवीन
दंबुकवर कधीतरी निवांत धागा काढतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मला शेटवगैरे नका हो करु..

टवाळ कार्टा
Mon, 03/02/2015 - 22:36 नवीन
:) मला शेटवगैरे नका हो करु...तुम्च्यासमोर मी पर्वतासमोर मुंगी असावी तितका छोटा आहे पण तुम्हाला भेटायला आवडेल...तुमच्या अंगातले किडे माझ्या फक्त स्वप्नात येतात...त्यांना बाहेर काढायला मदतच होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

अगदी अगदी!

बॅटमॅन
Mon, 03/02/2015 - 15:35 नवीन
अगदी अगदी! तदुपरि डागदरसाह्यबांना दवाखाण्याच्या शुभेच्चा! शुभं भवतु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

अहो काय गर्भसंस्कार? कीती ती

काळा पहाड
Mon, 03/02/2015 - 14:44 नवीन
अहो काय गर्भसंस्कार? कीती ती संस्कार करायची घाई? त्या मुलाला आधी जन्म तर घेवू द्या. बाकी संस्कार म्हणजे काय हो? तुमच्या अवताली भवताली असणार्‍या जीवनव्यवस्थेतल्या चांगल्या अंशाबद्दल शिकवणे व घडवणे म्हणजे संस्कार. त्या बाळाला ना दिसतं ना कळतं. कसले संस्कार करणार? घाबरून जाईल ते. काय तर उगाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

ते सगळे मान्य...

ब़जरबट्टू
Mon, 03/02/2015 - 15:01 नवीन
आपले काम आहे बाबासाहेबांना मदत करायचे, म्हणून गर्भसंस्कार.. लोक्स देतात हो पैसे.. कमवू द्या की त्यांना.. झाले संस्कार तर बरेच की.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

अस्संय होय? मग बिझनेसच कराचा

काळा पहाड
Mon, 03/02/2015 - 15:26 नवीन
अस्संय होय? मग बिझनेसच कराचा तर आमच्याकडे खूप क्लृप्त्या आहेत. पहिल्यांदा म्हणजे दहापैकी दोनच रूम ऑर्डीनरी ठेवायच्या आणि त्या कायम बुक ठेवायच्या. ४ डिलक्स आणि ४ सुपर डिलक्स. पैशातला फरक 'लय' पाहिजे. लोकांना आज काल ऑर्डीनरी काहीही आवडेनासं झालंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

भरघोस शुभेच्छा !!

नाखु
Mon, 03/02/2015 - 09:33 नवीन
काहीच अनुभव घेतला नाही आणि माहीतीही नाही *sorry2* उद्घाटन कधी आहे ते मिपावर यथावकाश जाहीर करा !!
  • Log in or register to post comments

रुग्णालयाला शुभेच्छा.

अनुप ढेरे
Mon, 03/02/2015 - 10:37 नवीन
रुग्णालयाला शुभेच्छा. फक्त रुग्ण्यालय उघडल्यावर बाबाजी तांबे म्हणून टीव्हीवर झळकू नका.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

सुनील
Mon, 03/02/2015 - 15:59 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

वैद्यराज, खूप खूप शुभेच्छा!

सन्जय गन्धे
Mon, 03/02/2015 - 17:39 नवीन
वैद्यराज, खूप खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

बाबासाहेब

सुबोध खरे
Mon, 03/02/2015 - 17:52 नवीन
बाबासाहेब काही अनुभवाचे बोल -- स्वस्तात सेवा मिळेल असे चुकुनही म्हणू नका किंवा लिहू नका. वाजवी दरात उत्तम सेवा मिळेल हेच ब्रीद वाक्य असावे लागते. धर्मार्थ रुग्णालय असेल तरी त्याच्या सेवक वर्गाला बाजारभावाप्रमाणेच पगार द्यावा लागतो. उत्तम दर्जाच्या औषधांसाठी पैसा मोजावाच लागतो. सरकार दरबारी पैसा हा मोजावाच लागतो. रुग्णालय चालवण्यासाठी लागणारा पैसा हा निरंतर स्वरूपाचा निधी असावा लागतो. एकदा देणग्या देऊन मोकळे होणारे बरेच भेटतात. समाजसेवी रुग्णालयाला सुद्धा एक व्यावसायिक तर्हेनेच चालवावे लागते अन्यथा डबघाईला येण्यास वेळ लागत नाही. वैद्यकीय सेवेसाठी दिलेला पैसा हा फुकट जातो हि आपल्या समाजाची मनोवृत्ती आहे आणी ती बदलणे टाटा किंवा बिर्लाना सुद्धा शक्य नाही. पहिल्या दिवसापासून चौरस फुटाला बाजार भावाप्रमाणे परतावा मिळेल या तर्हेने जे व्यवसाय चालवितात तेच येथे टिकतात. वैद्यकीय महाविद्यालयात शिकवलेले उदात्त विचार व्यवहारात कामास येत नाहीत हा स्वानुभव लष्करात, कोर्पोरेट धर्मादाय रुग्णालयात आणी स्वतःच्या दवाखान्यात घेतलेला आहे. आज रोख आणी उद्या उधार हेच ब्रीद वाक्य. असो. सध्या इतकेच पुरे
  • Log in or register to post comments

हम्म

आजानुकर्ण
Mon, 03/02/2015 - 20:08 नवीन
वैद्यकीय सेवेसाठी दिलेला पैसा हा फुकट जातो हि आपल्या समाजाची मनोवृत्ती आहे आणी ती बदलणे टाटा किंवा बिर्लाना सुद्धा शक्य नाही.
ही मनोवृत्ती नसून डॉक्टरांच्या भेटीनंतरच्या अनुभवानंतर आलेले शहाणपण असावे असे वाटते. मिपावरील रुग्णांचे अनुभव वाचावेत. हे बदलणे टाटा-बिर्लाँऐवजी पैसा घेऊन योग्य उपचार केला तरच वैद्यकउद्योगाला शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सर्वांना धन्यवाद .

बाबा पाटील
Mon, 03/02/2015 - 19:53 नवीन
सुबोधसर तुम्ही सांगताय तो अनुभव चांगलाच आहे.आणी तोही उच्चशिक्षितांकडुन जास्तच प्रमाणात.
  • Log in or register to post comments

मेरठ जवळ पांचाली खुर्द गावात

विवेकपटाईत
Mon, 03/02/2015 - 20:22 नवीन
मेरठ जवळ पांचाली खुर्द गावात जगदीश्वरानंद आरोग्याश्रम आहे, तिथे आयुर्वेदिक आणि प्राकृतिक चिकित्सेची व्यवस्था आहे. मी स्वत: एक आठवड्या करता तिथे जाऊन आलो होतो. या चिकित्सालयाचे संचालक डॉक्टर काशिनाथ किरणापुरे हे मराठी भाषिक आहे शिवाय अधिकांश कर्मचारी ही मराठी भाषिक आहेत (गेल्या ३० वर्षांपासून डॉक्टर किरणापुरे हे कार्य पाहतात). आश्रमात कमीत कमी १५ दिवस राहावे लागते. खर्च अगदी वाजवी ३०० हाल मध्ये आणि ५०० रुपये (एका खोलीत २ लोक) शिवाय aC रूम ही आहेत. यात उपचार (औषधी वगळता), जेवण सर्व काही (उपचारात- सकाळी एक तास व्यायाम, मग नेती-धौती कर्म, माती पासून उपचार, अनिमा, वाष्प स्नान, धूप स्नान, मालिश, इत्यादी गरजेनुसार उपचार. सकाळी १२ वाजता जेवण, संध्याकाळी ६ वाजता. (रोगानुसार). त्यांचा फोन न. ०९८९७१४६४३५ , ०१२१-३२५६९५५. निश्चित चांगले मार्ग दर्शन मिळेल.
  • Log in or register to post comments

सर्वप्रथम तुमच्या या

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/02/2015 - 20:56 नवीन
सर्वप्रथम तुमच्या या प्रकल्पासाठी अनेकानेक हार्दीक शुभेच्छा ! तुमच्या विषयाची तुम्हाला पूर्ण माहिती आहेच त्यामुळे ते तुम्ही उत्तमप्रकारे कराय याची खात्री आहेच. पण काही गोष्टींकडे भारतात नेहमीच दुर्लक्ष होते (तुम्ही करत असाल असे म्हणणे नाही) तिकडे तुमचे लक्ष वेधतो. १. सर्व कार्याची शास्त्रिय पद्धतीने बनवलेल्या फॉर्मॅट्मध्ये नोंद ठेवा (डोक्युमेंटेशन). २. योग्य असणार्‍या कालखंडान त्या सर्व डेटाचे विष्लेषण करा... हे दोन प्रकारे उपयोगी पडेल २.अ. भविष्यात (शास्त्रीय आणि कार्यपद्धतीत) सुधारणा करण्यासाठी दिशादर्शन २.आ. आधुनिक पद्धतीने शास्त्रीय संशोधन होऊ शकेल इतका डेटा सहजपणे गोळा होईल... ही सद्याच्या काळातील सर्वात शास्त्रीय आणि व्यावसायीक यशाकरिता मोठी गरज आहे. यामुळे आयुर्वेदीय उपचार अधिक विश्वासार्ह होऊन त्यावरील होणारी टीका कमी होईल. शिवाय तिचा "मेडिकल टूरिझम" सारख्या व्यावसायीकदृष्ट्या फायदेशीर गोष्टींकरताही वैध वापर करता येईल.
  • Log in or register to post comments

३००० चौ.मी.

रामदास
Mon, 03/02/2015 - 21:27 नवीन
जागा फारच मोठी आहे. सुरुवातीला इतकी मोठी जागा लागेल का ?
  • Log in or register to post comments

रामदास काका...

बाबा पाटील
Mon, 03/02/2015 - 21:29 नवीन
खर तर हीपण जागा कमीच पडेल. पण पुण्यात सध्यातरी त्यावर पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

येस एक्का काका

बाबा पाटील
Mon, 03/02/2015 - 21:28 नवीन
डॉक्युमेंटेशन सुरुवातीपासुनच आहे म्हणजे अगदी ११ वर्षा पासुनचे बर्‍यापैकी रेकॉर्ड ठेवलेले आहे. त्यावरच पुण्यातल्या एका आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या रुग्नालयातील कार्डियो ने संयुक्तरित्या लिपिड क्लिनिक सुरु करु म्हणुन सुचवले आहे पण येथे ही कन्सेप्ट किती लोकांच्या पचनी पडेल हे कळत नाही,बघुयात पुढे कधीतरी तोही प्रयोग करण्याचा विचार आहे.
  • Log in or register to post comments

बाबा पाटील,

डँबिस००७
Mon, 03/02/2015 - 21:41 नवीन
बाबा पाटील, प्रकल्पासाठी अनेकानेक हार्दीक शुभेच्छा,!! आयुर्वेदीक ईस्पितळात जाउन उपचार होऊ शकतात हे आपल्या मराठी लोकांच्या मनावर बिंबवण्यापासुन सुरुवात करावी लागेल. केरळप्रमाणे , १. गरम तेलाचे औषधी पोटली वापरुन मालिशचे प्रकार !! ( मलयाळममध्ये "कीळ्ळी") २. धान्य पोटली वापरुन मालिश (मलयाळममध्ये "न्यावरा कीळ्ळी") ३. शिरोधारा याचा अवश्य विचार करावा !! तयार आयुर्वेदीक औषधे केरळच्या सुप्रसिद्ध "वासुदेव विलासम" ह्या ब्रांडची औषधे रेकमेंड करता येईल व उपचारात वापरता येतील, पुण्यात बरेच परदेशी रहायला असतात त्यांना योग शिकव ण्यासाठी छोटे कोर्स तुम्ही आयोजीत करु शकाल. त्यासाठी योग हॉलचा वापर करता येईल. मी स्वता: केरळ मध्ये जाउन बरेच वेळा उपचार घेतला आहे, त्या अनुभवातुन वरच सांगत आहे.
  • Log in or register to post comments

अनेक शुभेच्छा.

यसवायजी
Mon, 03/02/2015 - 22:12 नवीन
अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

कपिलमुनी
Tue, 03/03/2015 - 15:22 नवीन
तुमच्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा ! पुण्यातच असल्याने नक्की भेट देणार !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा