✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दर्शन भारत मातेचे

भ
भास्कर केन्डे यांनी
Wed, 11/12/2008 - 01:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17660 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Sun, 11/16/2008 - 11:36 नवीन

कृपया तुलना नको!

भारत आणि परदेश ह्यांची तुलना नको. दोन्ही कडे चांगल्या आणि वाईट अशा गोष्टी असतात. चांगल्या गोष्टींची स्तुती करताना फक्त स्तुतीच करा आणि वाईट गोष्टींना वाईट म्हणतानाही तुलना नको. नेहमी वाद निर्माण होतात ते तुलना केल्याने आणि मग चांगले/वाईट जे मत असते ते बाजूला राहून निष्कारण वाद वाढतात. त्यातून कुणाचाही फायदा होत नाही. अगदी घरगुती उदाहरण द्यायचे झाल्यास...... एखाद्याची आई त्याला उपदेश करताना जेव्हा म्हणते की , "बघ,तो तुझा मित्र कसा शहाणा आहे? नाही तर तू?" इथे तो आपला मित्र खरेच गुणी आहे हे आपल्यालाही माहीत असते पण तरीही अशा वेळी आपल्याला आपल्या मित्राचा आणि त्याला चांगले म्हणणार्‍या आईचाही राग येतोच की नाही? अगदी तसेच परदेशातल्या सुव्यवस्थेबद्दल जर कुणाला चार शब्द सांगायचे असेल तर ते त्याने जरूर सांगावेत. त्यामुळे इथल्या लोकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. आपल्या इथल्या भ्रष्टाचाराबद्दलही मोकळेपणाने बोला. पण कृपया तुलना नको. नाहीतर मग मूळ मुद्दा बाजूला राहून उगाच वाद निर्माण होतील.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 11/16/2008 - 13:29 नवीन

आपण तात्याच्या बरोबर

आमचा भारत हा आहे हा असा आहे.. आणि मला तो खुप आवडतो. एकट दुकट म्हातारं त्याच्या घरात मेल तर दुसरयाच्या भानगडीत नाक खुपसायच्या सवयी मुळे इथे लगेच कळत.वास आल्यावर नाही. शाळेत खेळण्यातली बंदुक मिळायची पंचायत त्यामुळे निदान पोरं तरी सुरक्षित. आणि भ्रष्टाचार काय सगळी कडे चालतोच की आपल्याइथे दिसतो म्हणुन जाणवतो.इतर ठिकाणी दाराआड केल्यामुळे जाणवत नाही. कपिल रावाचे मत पटले .सुधारणा सुरुवात आपल्यापासुन केली पाहिजे.थुंकणे -कुठेही टाळले पाहिजे तात्या.मी मोटारसायकल वरुन जाताना एस-टी जवळुन गाडी कधी नेत नाही.कारण वरुन पिचकारी कधी येईल ते सांगता येत नाही.दोनदा अनुभव आला आहे. अण्णा हजारेनी भ्रष्टाचाराविरोधात खुप चांगले काम केले आहे.लाच देणे बंद केले तर घेणारे ही हळुहळु सत्य स्विकारतील. वेताळ
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Sun, 11/16/2008 - 13:51 नवीन

माझ्या मते..

माझ्या मते तुलना आवश्यकच असते. तुलनेशिवाय स्पर्धा नाही आणि स्पर्धेशिवाय प्रगती नाही. जेव्हा मित्राला शहाणे म्हटले जाते तेव्हा तो मुलगा त्यापुढे जाण्याचा प्रयत्न करतो मग भलेही क्षणिक राग का न येवो. आईलाही याची जाणीव असते पण मुलाच्या भविष्यासाठी तिला तो मान्य असतो. जेथे सुधारणेचा प्रश्न आहे, मला वाटते कि प्रत्येकाने स्वतःपासून सुरूवात करायला हवी. भ्रष्टाचार, सार्वजनिक अस्वच्छता, ई. यांचे मूळ आपल्याच मानसिकतेत आहे. गरज आहे ती आपले दोष मोकळेपणाने स्वीकारण्याची आणि त्यावर उपाय करण्याच्या इच्छाशक्तीची... त्यानंतर आपल्याकडे बोट दाखविण्याची कोणाची हिम्मत होणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sun, 11/16/2008 - 16:25 नवीन

मान्य आहे .. पण....

भ्रष्टाचार सगळी कडे चालतोच हे मला मान्य आहे. जगात असा कुठलाही देश नाही जिथे भ्रष्टाचार नसेल. परंतु आपल्याकडे भ्रष्टाचाराला मिळनारी मान्यता किंवा त्याचा रोजच्या घडामोडीत आपण मान्य केलेला सहभाग अन् "चालाचचं" असे म्हणण्याची आमची व्रुत्ती हे या देशाला पार बुडवायला निघालीत. भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडताना आमची वेळ आली तर मुकाट्याने पैसे देउन काम करुन घेतो. इतर देशातही भ्रष्टाचार आहे, परंतु समोरच्याला ओरबाडुन खाणारे लोक दिसत नाही . कारण तिथे असतो लोकांचा वचक. दुसर्‍याने केला तर भ्रष्टाचार अन् आपण केला तर व्यवहार ही मानसिकता आपण बदलायला हवी. प्रत्येक देशाचे गुण / अवगुण आहेत. त्याची तुलना व्हायलाच हवी. आपले दोष आपल्याला कळायलाच हवे. राहीला प्रश्न आमचा देश सोड्ण्याचा. देश सोडला म्हणजे माझ्या देशात काय चुकते हे सांगण्याचा हक्क नाही हे मला मान्य नाही. आम्ही इथे देहाने असलो तरी मनाने मात्र भारतात असतो. म्हनुनच माझ्या देशात काय चुकते आनी इतर ठिकाणी तसे का होत नाही याची तुलना करने / ते सांगणे हा आम्ही आमचा हक्क समजतो. आहेत दोष माझ्या देशात, अन् तेच मला दुर करायचे आहेत. मार्ग मात्र प्रत्येकाचे वेगळे असतील. कुनी समाजकार्य करेल , कुणी गांधीगिरी करेल. माझ्या सारखा कुनी भ्रष्टाचारी लोकांना चारचौघात "भिकारी" म्हणेल. देश कसाही असला तरी फक्त उदोउदो करण्यापेक्षा त्यातले दोष दाखवुन ते दुर करण्यासाठी प्रयत्न करणेच मी पसंत करीन. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 11/16/2008 - 16:33 नवीन

हम्म.

हम्म. चांगली चर्चा रंगली आहे. काय आहे की भोकरवाडीच्या पलिकडे काही जग असते हेच आपल्याला ठावुक नाही. त्यामुळे दिसणारी गोष्टच मानायची असा आपला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. चंद्र दिसतो तो मानतो. भारत दिसतो तो मानतो. परदेश दिसत नाही अस्तित्व मान्य नाही. त्यामुळे जे अस्तित्वात नाही त्याची चर्चा कशी काय करायची ? एकदम फुल टु वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. बाकी तुमचे चालु द्या... आपण अडाणी, गावंढळ काय बोलणार.. शिकलेलो असतो तर नसतो का गेलो अमेरिकेत आयटीत... चामारी कशाला बसलो असतो या खेड्यात उगा खायला काळ अन भुईला भार... (बाकी काल कोणीतरी बोलत होत त्या अमेरिकेत का कुठशीक म्हणे एक मोठ गाव आहे..तिथल्या मुन्सिपाल्टीकडे पैशेच नाही म्हणून म्हणे तिथला कचराच हल्ली उचलला जात नाही. अन अशीच गत येत्या काही दिवसात अख्या अमेरिकेची होणार म्हणे. खरे खोटे ओबामाच जाणे. ही ही ही... आमच्या भोकरवाडीतली डुकर साली कचरा शिल्लकच ठेवत नाहीत.) नाना
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 11/16/2008 - 19:22 नवीन

चांगले वाईट

भारत सर्वार्थाने उत्तम किंवा परदेश सर्वार्थाने उत्तम असे असूच शकत नाही. दोन्ही कडे चांगले वाईट आहे. फक्त ते डोळसपणे पहावे.मान्य करावे. शक्य असेल तर परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा.निदान तसे करणा-यांना मदत तरी करावी असे मला वाटते. माझा असा अनुभव आहे की अमेरिकन नागरिकत्व स्विकारूनही आतून पूर्णपणे भारतीय आसलेले लोक अमेरिकेत जास्त आहेत.अमेरिकेत राहून भारतासाठी वैयक्तिकपणे, सामुहिक काम करणारेही अनेक आहेत. अर्थात ही आपली मोठी पिठी.इथे जन्मलेली/शिकलेली नाही.त्यांना भारत ख-या अर्थाने माहितच नाही.ते काय गोडवे गाणार किंवा नाव ठेवणार? मीनल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा