Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चला मंडळी "पॅरीस" पाहुयात ... पॅरीस : एक प्रेमनगरी

छ
छोटा डॉन यांनी
Fri, 11/14/2008 - 02:26  ·  लेख
लेख
  • चला मंडळी "पॅरीस" पाहुयात ... पॅरीस : एक प्रेमनगरी - भाग २

Book traversal links for चला मंडळी "पॅरीस" पाहुयात ... पॅरीस : एक प्रेमनगरी

  • चला मंडळी "पॅरीस" पाहुयात ... पॅरीस : एक प्रेमनगरी - भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16990 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

न
नंदन Fri, 11/14/2008 - 02:31 नवीन

फोह्मिदाब्ल :)

झकास फोटोज. पॅरिस हे घुटक्याघुटक्याने प्यायचे शहर आहे हे खरं असलं, तरी धावती भेटही तितकीच मोहून टाकणारी असणार, यात शंका नाही. पुढच्या भागांची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 11/14/2008 - 02:44 नवीन

सुंदर..

मस्त रे डॉन्या.. पारीच्या आठवणी ताज्या केल्यास..इतक्यांदा गेले आहे तरी अजून कितीही वेळा जायला तयार आहे पारीला.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 11/14/2008 - 02:57 नवीन

तू ज्या

तू ज्या पद्धतीने पॅरिस पाहिलेस.. त्याच पद्धतीने इथे वर्णन लिहिलेस.. म्हणजे धावत पळत. तरिही वाट पहाते आहे पुढच्या भागांची. मोनालिसाचं पेंटींग पाहून छान वाटलं. सगळीच चित्रे मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 11/14/2008 - 03:11 नवीन

अगं असे काही नाही ....

खरे सांगु का प्राजुताई, मी आधी नुसते फोटो टाकणार होतो व म्हणुन लेख आधी मी "कलादालन" मध्ये टाकला होता. मग नुसते फोटो मला तर्कसंगत वाटले नाही म्हणुन ४-४ वाक्ये लिहली प्रत्येकाबरोबर ... बघता बघता लेखच तयार झाला ... मी जेव्हा प्रकाशीत केला तेव्हा तो गेला होता "कलादालनात" असा आहे माझा वेंधळेपणा एकंदरीत ... मग चतुरंगशेठ व केसुशेठशी बोलुन तो योग्य ठिकाणी हलवला ... :) असो पुढचा भाग आता सविस्तर, परफेक्ट, तब्येतीत व खास माझ्या स्टायलीत ... अपेक्षा भंग होणार नाही ही माझी ग्वाही ... बाकी खाली भाग्यश्रीताई म्हणते तसे मला पण क्रेज होती बॉ "लुव्र आणि मोनालिसा" पहायची ते "दा विंची कोड " वाचल्यावर व पाहिल्यावर ... सारखे तो "काचेचा त्रिकोण" डोळ्यासमोर यायचा व त्याखालची "मेरी मॅक्लडेन" दिसायची ... :) छोटा डॉन दा विंची [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
भ
भाग्यश्री Fri, 11/14/2008 - 02:58 नवीन

वॉव!!

वॉव!! पॅरीस,लुव्र.. सहीच.. थोडीफार का होईना लुव्रची सहल घडवल्याबद्दल थँक्स.. दा विन्ची कोड वाचताना नेहमी वाटायचे आधी फिरून येऊ ते.. वाचकांची इच्छा काय अरे.. आग्रह समज.. लवकर येऊदे वर्णन्,फोटोज! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 11/14/2008 - 03:07 नवीन

मस्तं डॉन

मस्तं डॉन भौ... लवकर लवकर येऊ दे पुढचे भाग....
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 11/14/2008 - 03:11 नवीन

मस्तच रे.

डॊन्या, फोटो क्लास काढले आहेस. पॆरिस खुपच सुंदर शहर आहे असे ऐकुन आहोत, लवकरच पुढचा भाग लिहि आणि जगप्रसिध्द आयफेल टॊवरच्या फोटोची ही वाट पहात आहे. :)
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Fri, 11/14/2008 - 03:13 नवीन

मिस्टर मोनालिसा

डॉन साहेब, सहल मस्त चालली आहे. पुढचा भाग येऊ द्यात. निवडक चित्रे आवडली. पण एक मनातलं सांगू का साहेब... या मोनालिसाचे फोटो लहानपणा पासून पहात आलेलो आहे. प्रत्येक वेळी तो फोटो पाहिला की मला तर बॉ ती मिस्टर मोना वाटतो. ;) कदाचित कलेची जाण नाही :P अथवा ती कला प्रत्यक्ष पहावी लागणार. पुढील सहलीसाठी शुभेच्छा! आपला, (भटका) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 11/14/2008 - 03:24 नवीन

डाण्याच्या डोक्याला शॉट झालाय

डाण्या भैताडा .... इथं तरी नक्की ठेवणार ना लेख ? का पुन्हा इकडून उचलून तिकडं ?
आम्ही काय नुसते वखवखल्यासारखे पाहुन घेतले व पुढच्या प्रवासासाठी बाहेर पडलो ...
वा !! तुम्ही वखवखलेल्या नजरेने कोणतं सौंदर्य पाहिलं असावं याची अंमळ कल्पना आलीच .. =)) =)) =)) बाकी तो काचेचा पिरॅमिड कोणत्या तरी प्रसिद्ध हॉलिवूडपटात पाहिल्यासारखा वाटतोय .. नक्की आठवत नाहीय. डॉणेश .. जरा फ्रेंच संस्कृत्ती बद्दल लिवा राव .... प्रभु सरांची दिक्षा मिळाल्याने आपल्यात थोड तरी सामर्थ्य आलं असेल अशी अपेक्षा करतो .. -- टारझिनेदिन टारझिदान आम्ही सर्व संस्कृत्यांपासून चांगल्या गोष्टी शिकतो .
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 11/14/2008 - 04:25 नवीन

मस्त

मस्त झालेली दिसतीये सहल. पुढचा भाग लवकर टाका...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/14/2008 - 04:56 नवीन

मस्त..

मस्त रे डॉन्या ....पुढच्या भागाची वाट पाहत आहे... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Fri, 11/14/2008 - 05:51 नवीन

पण

फोटु चांगले आहेत. पण... पाहुयात हे क्रियापदाचे कोणते रुप ? हल्ली ह्या पाहुयात, जाउयात, करुयात , बसुयात अश्या रुपांचा सुळसुळाट वाढला आहे. आय.बी.एन लोकमत, स्टार माझा, झी चोवीस तास अश्या वाहिन्यांवरचे मराठी तर एकवत नाही. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 11/14/2008 - 12:16 नवीन

??

>>पाहुयात हे क्रियापदाचे कोणते रुप ? तो शब्द वापरतांना लेखकाला काय म्हणायचे आहे ते कळले ना ?? >>हल्ली ह्या पाहुयात, जाउयात, करुयात , बसुयात अश्या रुपांचा सुळसुळाट वाढला आहे. ते शब्द म्हणजे काय खिसेकापु आहेत का भुरटे चोर आहेत त्यांचा सुळसुळाट वाढायला !! तुम्ही मराठी शुद्ध्लेखनावर लेख लिहा हवा तर एक !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
स
सुनील Fri, 11/14/2008 - 13:51 नवीन

छंदशात्र

तुम्ही मराठी शुद्ध्लेखनावर लेख लिहा हवा तर एक !! लिहा पण तो छंदशात्र विभागात टाकायला विसरू नका नाहीतर अप्रकाशित होईल! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Fri, 11/14/2008 - 13:56 नवीन

ठ्ठो

ठ्ठो ... ठ्ठो ... ठ्ठो !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
क
कपिल काळे Fri, 11/14/2008 - 19:47 नवीन

आनंदयात्र

आनंदयात्रींना मी लिहिलेले उत्तर वाचावे http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
क
कपिल काळे Fri, 11/14/2008 - 19:46 नवीन

जे चूक

जे चूक आहे ते आहेच की. त्यात ज्याला दाखवून दिलं त्याला न दुखता तुम्हाला कसला त्रास झाला? जे सांगायचे ते समजलं म्हणजे झालं...... हे ही बरोबरच कारण उसाला व्याकरण शुद्ध "पाणी" घाला किंवा गावरान " पानी" उस मरणार नाही. मग विचार करा एखाद्या भाजीत ठराविक क्रमानेच का बरं घालतात मसाले. शेवटी ते एकत्रच होतात तर सगळे भस्स्कन घालून का नाही टाकायचे बरं? काही नियम पाळल्यास त्याच गोष्टीची चव अजून चांगली लागते. भाषेचेही असेच आहे. काही नियम पाळल्यास ती अजूनही चांगली वाटते. त्यालाच शुद्धलेखनाचे नियम म्हणतात. आता राहिला सुळसुळाटाचा मुद्दा... मी सांगितलेल्या वाहिन्या तर दिवसाढवळ्या भयंकर मराठी स्पीक करुन मराठीला स्टॅब करत आहेत. त्यांच्या इम्पॅक्टखाली येउन रिमेनिंग मराठी स्पिकींग पॉप्युलेशनच्या लॅन्ग्वेजवर बॅड इफेक्ट होत आहे. आणि ही "करुयात" जमातीची क्रियापदे वापरणे ही हल्ली फॅशन होउन बसली आहे. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
छ
छोटा डॉन Fri, 11/14/2008 - 20:17 नवीन

बॉस , मी काय म्हणतो ...

मुळात अशा लेखावर "ह्या प्रकारच्या प्रतिक्रीया" टाकणेच प्रचंड खटकले. असो, सकाळीच मी पाहिले होते पण वाद नको म्हनुन सोडुन दिले, यात्रीने पण "योग्यच" लिहले ना ? आता तुम्ही अजुन एक लंबीचौडी प्रतिक्रीया टाकुन "वाद" घालायला उद्युक्त करत आहात ... असो. हरकत नाही .... मुळात खुप दिवसांनी मला " पान पान भर मोठ्ठे वाद घालणारे प्रतिसाद " लिहायला मिळणार हीच आनंदाची गोष्ट आहे व त्याबद्दल मी आपले आभार मानायला हवेत, मी अशी संधी कधीच सोडत नाही. पण ..... ती जागा ही नव्हे, आपण वेगळा धागा काढा किंवा माझ्या "खरडवहीत" या, तिथे आपण मनसोक्त "बोलु /भांडु/वाद घालु", कसे ??? कधीही या, आपले स्वागतच असेल, मला तर लै आवडते असले, येताय का मग ? उगाच "अशा" प्रतिसादाने "माझ्या लेखाचा तोल" ढासळु नका ही नम्र विनंती. उगाच चांगल्या धाग्याचा इस्कोटा होऊन पुढेचे लिहायचा माझा मुड जाईल. मी मनापासुन लिहीत असलेल्या "सिरीअस धाग्याचे" अशा प्रकारे " वाट्टोळे" करण्याचा अधिकार कुणालाही नाही ... याउप्पर जे काही असेल ते "खरडवहीत किंवा नव्या धाग्यावर" .... धन्यवाद !!! ( लेखक )छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
भ
भाग्यश्री Fri, 11/14/2008 - 23:52 नवीन

बापरे,

बापरे, नविन दिसताय इथे.. नाही, मिपावर येऊन शुद्धलेखनावर बोलायचं म्हणजे अवघडच आहे! हे असे , मूळ लेखनाशी संबंध नसलेले, शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या चुका काढणारे प्रतिसाद आत्ता पर्यंत 'तिथे'च पाहीले होते.. आणि हो, मूळ लेखाच्या विषयाला वगैरे काही प्रतिसाद न देता.. मिपावर, शुद्धलेखनाचं अवडंबर न माजवता, भावाला(भाऊ नव्हे!) महत्व देणारी लोकं जास्त आहेत.. माणूस उत्स्फुर्तपणे लिहीत असतो.. असा खडा टाकून काय आनंद मिळतो!? इथे 'लेख/फोटोज'ना प्रतिसाद देऊन , ती व्याकरणाची सूचना ख.व. मधे नसती का टाकता आली? जाता-जाता, माझा नवराही पाहुयात-जाऊयात म्हणत असतो. ज्यांना सवय नसते त्यांना वेगळं वाटेल कानाला इतकंच. पाहुयात म्हणणं म्हणजे काही शब्दाचा अर्थ बदलत नाही की काही नाही. प्रत्येक ठीकाणची बोलीभाषा वेगळी असते एव्हढंच ! .. एखादी गोष्ट छान झाली याला, मी 'जबरी होतं ते', किंवा 'सह्ही होतं ते' वगैरे म्हणीन.. माझे बाबा 'झक्कास!' असं म्हणतील.. एखादा गावातला माणूस 'लई ब्येस झालं बगा', म्हणेल.. अर्थ एकच नं ? अवांतर : छोटा डॉन, तुझ्यालेखात हे लंबेचौडे प्रतिसाद द्यायचे नव्हते खरंतर.. राहवलं नाही म्हणून दिला.. सॉरी! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
ब
बॅटमॅन गुरुवार, 06/07/2012 - 14:32 नवीन

पाहूया आणि पाहूयात ही दोन्ही

पाहूया आणि पाहूयात ही दोन्ही रूपे समानार्थी आहेत. कुठलेही एक रूप चूक नाही. व्याकरणाचा असा कुठलाही नियम नाही जो यातील एका रूपाला चूक ठरवतो. निव्वळ प्रमाण बोलीपेक्षा किं ऽचित वेगळे असलेल्या रूपाची चूक म्हणून संभावना करणे हे अतिशय चूक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
अ
अनिल हटेला Fri, 11/14/2008 - 07:31 नवीन

पॅरीस ची

पॅरीस ची सहल झोकात झालीये... आंदे और भी ...... (एन एवीनींग इन पॅरीस चा चाहता) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 11/14/2008 - 08:20 नवीन

डॉन्या

खरे आहे पॅरीस जादुनगरी दोन दिवसात, एका लेखात म्हणजे अशक्य. वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 11/14/2008 - 09:59 नवीन

फॅन्टॅब्युलस!!

डॉण भौ लैच म्हन्जी लैच भारी :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 11/14/2008 - 13:58 नवीन

अल्टी!

>"दाखवणार्‍याचे हजातो हात, फाटका माझा कॅमेरा" तिथे म्युझिअममध्ये कॅमेरा घेउन जायला चक्क चक्क परवानगी आहे??!! सही! डान्या धावते वर्णन आवडले. पुढचाभागलवकरटाक.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 11/14/2008 - 11:28 नवीन

मस्त फोटू

मस्त फोटू आणि वर्णन! पटपट 'लिहूयात' असा नियम कर बरं!! :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 11/14/2008 - 11:52 नवीन

>>"दाखवणार्

>>"दाखवणार्‍याचे हजातो हात, फाटका माझा कॅमेरा" सही !! मोप मजा केलेली दिसतीये भाउ !! फोटो लै भारी... वर्णन अजुनच भारी !! औ भी आन दो !! अवांतरः पॅरिसचा फोनवर झालेला तह आठवतोय का ? पॅरिस लकी म्हणायचे तुमच्यासाठी ;) >> "हाव्र कॉमार्टीनी ( हा माझा देशी उच्चार, ह्याचा अस्सल फ्रेंचशी दुरचा सुद्धा संबंध नाही ) " हा तुमचा अस्सल भारतीय उच्चार .. फ्रेंच लोक वेगळ्या पद्धतीने करतात. वरचे वाक्य असे बदलुन घ्या. अस्सल बिस्सल काही नसते हो ! फ्रेंच,लंडनचे झालेच तर गेलाबाजार अमेरिकेचे तेवढे अस्सल आन आपले गावठी का ?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/14/2008 - 11:54 नवीन

मस्त फोटू

आहेत. धन्यवाद पारीची सफर घडवून आणल्याबद्दल. एक प्रश्न जे जे कोणी पश्चिम युरोपात फिरले आहेत त्यांच्यासाठी: सगळा पश्चिम युरोप (युके, फ्रॉन्स, जर्मनी, नेदरलंड्स्, डेन्मार्कसुद्धा इत्यादी) सारखंच दिसतं का? मलातरी या सगळ्या बिल्डींग्स पाहून असंच वाटलं. मी एका आंग्ल-डॉईश माणसाला हाच प्रश्न कोपनहेगनच्या रस्त्यांवरुन चालताना विचारला होता. माणूस शेवटी ब्रिटीशच, त्याने आपल्या मूळ देशाच्या परंपरेला जागून उत्तर दिलं, "आत्ता एकच बिअर घेतलेली आहे तरीही मला क्षणभर बॉनच्या रस्त्यावरुन चालत मी घरीच निघालेलो आहे असं वाटलं. तू बाहेरून आलेली आहेस म्हणूनच तुला असं वाटतंय असं माझं तरी मत नाही, मलाही तसेच भास होत आहेत." बाकी डान्या, आयफेल टावर नाही रे दिसला का तुला? का तो पुढच्या भागात??
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 11/14/2008 - 13:57 नवीन

बिल्डिंगी

भाषा आणि वाहतुकीची दिशा (फक्त इंग्लंड्-आयर्लंडात भारता प्रमाणे, इतरत्र त्या उलट) सोडली तर फारसा बाह्य फरक नाही. ७०-८० वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती गॉथिक का कुठल्या शैलीत (चित्राताई सांगू शकतील) असल्यामुळे सारख्याच दिसतात. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
छ
छोटा डॉन Fri, 11/14/2008 - 14:04 नवीन

बरोबर ...

अदिती, अगदी अचुक निरीक्षण आहे . मी आत्तापर्यंत जो काही युरोप पाहिला आहे त्यात मला सगळीकडे "इमारतींच्या बांधकामांची शैली" थोड्याफार फरकाने एकच आढळली. इमारती आणि वसाहतींची रचना अगदी जवळपास सारखीच म्हणता येईल, कदाचित तिथल्या देशाप्रमाणे व संस्कॄतीप्रमाणे रंगात फरक असु शकतो पण "बेसीक इन्फ्रास्ट्र्क्चर" अगदी तंतोतंत सारखे म्हणायला हरकत नाही ... ह्याला आपण खास "युरोपीअन शैली" म्हणु ... पण फ्रान्स मध्ये जरा सजवणुकीकडे जास्त कल आहे, कमीत कमी पॅरीसमध्ये तरी मला "रंग, धातु, कलाकुसर" यांचा वापर अगदी सढळ हाताने केलेला दिसला. हाच प्रकार दक्षिण भारतातल्या "मंदिरांबाबत" आढळतो, सगळी मंदिरे जवळपास सारखीच, हेमाडपंथी का काहीशी अशीच शैली आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सुनील Fri, 11/14/2008 - 13:49 नवीन

छान

येउदे अजून घुटक्या-घुटक्याने. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
म
मैत्र Fri, 11/14/2008 - 14:05 नवीन

झकास

डॉन भाऊ, मस्त लेख आणि फोटो... मलाही पॅरिस भेटीचे वर्णन लिहिण्यास उद्युक्त करतो आहेस... अजून एक लेख लिहिला तर चालेल का मंडळी पॅरिस वर ? तेवढं फोटो कसे चढवायचे ते सांगेल का कोणी ... मला काही केल्या ते नीट जमत नाही...
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Fri, 11/14/2008 - 15:16 नवीन

जबरि.

डॉन्या, मस्तच लिहिले आहेस. छायाचित्रे फारच छान आलीत. ती ५०० छायाचित्रे देखील पहायची जाम उत्सुकता आहे. लवकर त्याचा दुवा देणे. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
आ
आनंद Fri, 11/14/2008 - 15:58 नवीन

डॉन भाऊ

डॉन भाऊ पॅरिस ची सफर चांगली झालेली दिसतेय. पण "प्रेक्षणीय" स्थळांचे फोटु कुठे आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 11/14/2008 - 16:08 नवीन

५००!!!!!!!!!

दोन दिवसात ५०० फोटो? डॉन्या, पारी एकदम 'फॉर्मिदाब्लं' आहे रे... आणि फोटो जरा जास्त टाक ना... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 11/14/2008 - 16:30 नवीन

अरे वा वा

अरे वा वा ! पॅरिस सफर उत्तमपैकी झालेली दिसते ! मस्त ! खरं आहे पॅरिस घाइगडबडीत पाहायचे शहर नाही. पण आपल्या सारख्यांना दोन-चार पेक्षा अधिक दिवस कसे मिळणार ! 'फाटका कॅमेरा' हे आवडले :) तशीच गत होते.. तिथली भिंत भरुन मोठी चित्रे पाहिली की आवक व्हायला होते.. फोटो छान आहेत. पुढचा भाग अजून सविस्तर लिही... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
म
मिसळ Fri, 11/14/2008 - 20:59 नवीन

रंगीन शाम

डॉन, छान लिहिले आहेस. पु. भा. प्र. - मिसळ
  • Log in or register to post comments
स
सोनम Sun, 12/07/2008 - 14:22 नवीन

अतिउत्तम

तुम्ही जो प्रवासाचा आ॑नद घेतला तो मिपाबरोबर शेअर केला त्याबद्द्ल आपले आभारी आहोत्.तुम्ही पॅरीसची सफर खूप छान लिहिली आहे.आणि फोटो ही छान आहे. न॑तर ही अशीच माहिती मिळो अशी आहे. :)] :)] :)] (पुण्याची सोनम) राम राम मिपा
  • Log in or register to post comments
न
नाना चेंगट Wed, 06/06/2012 - 18:57 नवीन

हल्ली फिरणे बंद केले की काय

हल्ली फिरणे बंद केले की काय डान्रावांनी ??? ;)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 06/06/2012 - 20:51 नवीन

प्रेमनगरी ....

हम्म...... प्रेमनगरी पॅरिस ... कला नगरी पॅरिस...... संग्रहालय नगरी पॅरिस.... आपले फोटो अतिशय दर्जेदार आलेत. पण पॅरिसचे वर्णन नोत्र देम ...लुव्हर,,, कॉनकॉर्ड चौक....शांजे लीस रस्ता..द गॉल प्लेस... आयफेल टॉवर अशा क्रमाने आले असते तर मला अधिक आवडले असते. पण धागा मस्त आहे यात शंकाच नाही.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Wed, 06/06/2012 - 20:52 नवीन

झकास व तजेलदार सचित्र लेख

झकास व तजेलदार सचित्र लेख अवांतर खूप दिवसांनी भेटलेल्या नंदा प्रधान युरोपात भटकून आल्यावर कळल्यावर भाई त्याला " पेरीस पहिले असशील ना ? असा प्रश्न विचारतात त्यातील भोटपणा नंदाला कळला नव्हता. पण डॉन्या तुला लेका कळलाच असेल. कलासक्त ह्या शब्दाचा आम्ही हवा तसा अर्थ घ्यावा का ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/07/2012 - 00:03 नवीन

आवडला लेख.

मिपावर आपले स्वागत आहे. लेख चाळला. धन्यवाद. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
भ
भरत कुलकर्णी गुरुवार, 06/07/2012 - 00:40 नवीन

14/11/2008 सालचा लेख आहे हा

14/11/2008 सालचा लेख आहे हा डॉ साहेब. स्वागत कशापायी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्यारे१ गुरुवार, 06/07/2012 - 10:56 नवीन

२-३ दिवसात पुढचा भाग देणारेत

२-३ दिवसात पुढचा भाग देणारेत साहेब...! लवकर टाका लवकर टाका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पियुशा गुरुवार, 06/07/2012 - 13:25 नवीन

मस्त !!!पुढिल फोटो अन

मस्त !!!पुढिल फोटो अन वर्णनाच्या प्रतिक्षेत :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा