Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एलियनायटीसेलिया - भाग १० (अंतिम)

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
गुरुवार, 11/13/2008 - 15:42  ·  लेख
लेख

Book traversal links for एलियनायटीसेलिया - भाग १० (अंतिम)

  • ‹ एलियनायटीसेलिया - भाग ९
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10617 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/13/2008 - 15:52 नवीन

छान ! हा भाग

छान ! हा भाग सर्वात उत्तम भाग आहे ! जवळ जवळ आपली पृथ्वी वाचवा नाय तर मरा हाच एक संदेश मला तरी व्यवस्थीत दिसला ! अभिनंदन ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री गुरुवार, 11/13/2008 - 15:58 नवीन

खुप छान....जबरदस्त!!!!

अदिती शेवटचा भाग पण सॉलिड होता . खरच निसर्गाच संरक्षण करायची आपली जबाबदारी आहे. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/13/2008 - 15:57 नवीन

हाहाहा...

सॉलिड. =)) =)) =)) सास-बहू इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत हे माहित नव्हतं. जबरी आयडिया. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 11/13/2008 - 16:16 नवीन

सही

सास-बहूच्या मालिका अखिल विश्वात लोकप्रिय आहेत म्हणजे. बाकी इतके वर्षे जगणारी 'बा' ही सुद्धा एलियन असेल काय? :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 11/13/2008 - 17:48 नवीन

असेच म्हणतो

बा नक्कीच एलियन असेल अन तुळशीला ते लोक नक्की व्हिलनेस्स समजत असतील !! या भागात पर्यावरणवाला संदेश आवड्ला. प्रगत ? असे म्हणुन हसणार्‍या लीलाला पाहुन वास्तव मधला इंजिनिअरला हसणारा संजय दत्त आठवला. मी आजपासनं आहारात पाणीच जास्त घ्यायला सुरुवात करणार आहे. - [प्रगत] आनंद राजविर सिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/13/2008 - 17:52 नवीन

आनंद राजविर सिंग

[प्रगत] आनंद राजविर सिंग आयला, म्हणजे तो आनंद राजविर सिंग तूच की काय? =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री गुरुवार, 11/13/2008 - 17:55 नवीन

नाहीतर काय

नाहीतर काय हो. आमचे आंतरजालिय दुश्मन आमचा अपमान करण्यासाठी आख्खी विज्ञानकादंबरी लिहतात !! बाकी टंच एलियनी काही आल्याच नाहीत शेवटपर्यंत !! - [भुकेल्यांना उपाशी न ठेवणारा] आंद्या गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/13/2008 - 17:58 नवीन

हाहाहा...

बाकी टंच एलियनी काही आल्याच नाहीत शेवटपर्यंत !! हो ना राव!!! मी पण हेच म्हणतो. - [भुकेल्यांना उपाशी न ठेवणारा] आंद्या गटणे =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/13/2008 - 17:59 नवीन

नाहीतर काय

नाहीतर काय हो. आमचे आंतरजालिय दुश्मन आमचा अपमान करण्यासाठी आख्खी विज्ञानकादंबरी लिहतात !! आणि काही स्नेही इच्छेचा मान राखून एक गोष्ट लिहितात, त्यात आपल्याला प्रसिद्धी देतात. [भुकेल्यांना उपाशी न ठेवणारा] म्हणजे काय पाणी पाजणार काय रे तू? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
छ
छोटा डॉन गुरुवार, 11/13/2008 - 16:17 नवीन

मस्तच ...

हा भाग सर्वात जास्त आवडला ... एकंदरीत आख्खी मालिका वाचायला मजा येतच होती पण काहीतरी "घेण्यासारखे" असल्याने हा भाग विषेश भावला ... "पॄथ्वीवासियांनो पृथ्वीला वाचवा" हे पटले .. बाकी ते "सास - बहु" इफेक्ट वाचुन अंमळ करमणुक झाली ... =)) =)) बाकी थोडा अपेक्षाभंग झाला, आम्हाला वाटलं की "ईलियन" मस्त हाणामार्‍या करेल, जादु दाखवेल, डास्न करुन गाणी म्हणेल .... वगैरे वगैरे असो. उत्तम लेखमालिका !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 11/13/2008 - 16:19 नवीन

छान!

शेवटचा भाग एकदम मस्त झालाय अदिती, पर्यावरणाचा संदेशही छान दिलाएस. >त्या मालिकेतलं मेलेलं पात्र, जे परत नंतर म्हणे जिवंत झालं, पण आम्ही तेव्हा निघालो होतो, म्हणून आम्ही आलो इथे. Image removed. वेगळ्या विषयावरची कथा आणि सगळे भाग रोचक आणि यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल Image removed.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/13/2008 - 16:23 नवीन

'सास-बहु इफेक्ट'बद्दल थोडे

हल्लीच वाचनात आल्याप्रमाणे 'क्यूं की...' या मालिकेचे प्रक्षेपण थांबवलेले आहे आणि ही मालिका मेल्यातच जमा आहे. मेलेल्याला काय मारायचं, पण या मालिकेचा शेवट आधीच ठरवला होता त्याप्रमाणे केला आहे. (पुराव्यादाखल त्या एलियनचं नाव आहेच!) बाकी नंदन, ती बा शेवटपर्यंत होती का जिवंत? मी सुरुवातीचे काही भाग कधीमधी दुसर्‍यांकडे बघितले होते, त्यापुढची माझी माहिती (उदा: मिहीर मेला, नंतर जिवंत झाला वगैरे) मुंबईच्या लोकल ट्रेन्समधे (इलाज नसल्यामुळे) गोळा केलेली होती. >> बाकी थोडा अपेक्षाभंग झाला, आम्हाला वाटलं की "ईलियन" मस्त हाणामार्‍या करेल, जादु दाखवेल, डास्न करुन गाणी म्हणेल .... वगैरे वगैरे डानराव, पिच्चर आणि नेहेमीच्या कादंबर्‍यात ते एलियन्स जे करतात तेच इथे केलं तर माझ्या 'विक्षिप्तपणाला' बट्टा नाही का लागणार? म्हणून हे असं काहीतरी! आपल्या अपेक्षाभंगाबद्दल दिलगिरी. (अजूनही विक्षिप्त असलेली) अदिती
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 11/13/2008 - 16:32 नवीन

असं काही नाही ...

डानराव, पिच्चर आणि नेहेमीच्या कादंबर्‍यात ते एलियन्स जे करतात तेच इथे केलं तर माझ्या 'विक्षिप्तपणाला' बट्टा नाही का लागणार? म्हणून हे असं काहीतरी! आपल्या अपेक्षाभंगाबद्दल दिलगिरी.
छ्या !!! त्यात कसली दिलगिरी ? मी ते मजेने लिहले होते ... हे असेच भारी आहे. अवांतर : ह्या कथेचा शेवट वाचुन आम्हाला जयंत नारळीकरांच्या "प्रेषित कादंबरीमधली शेवटचा पर्याय (बहुतेक हेच नाव आहे ) " ही कथा आठवली. कथा अशीच आहे फक्त शेवट मस्त आहे जरासा, पॄथ्वीवर आलेले "इलियन्स कम २०० वर्ष जुने मानव" शेवटचा पर्याय म्हणुन त्या काळातल्या मानवी जीवनाचे प्राण असलेली उर्जाकेंद्रे बंद करुन माणसाचे पुर्ण यांत्रिकीकरण व पर्यायाने नाश होण्यापासुन वाचवतात ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
भ
भाग्यश्री गुरुवार, 11/13/2008 - 22:41 नवीन

डॉनराव,

डॉनराव, माझ्यामते प्रेषित ही आख्खी सलग कादंबरी आहे.. आलोक हिरो असलेली.. तुम्ही म्हणताय ते हे पुस्तक नसावं असं वाटतंय.. अदिती, मस्त झालाय हा ही भाग.. पर्यावरणवादी संदेश छान.. क्यु की त्यांना माहीती आहे म्हणजे टु मच आहे !! :))) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Fri, 11/14/2008 - 19:42 नवीन

बरोबर ...

पुस्तकाचे नाव टाकताना चुक झाली ... हे पुस्तक कदाचित "यक्षाची देणगी" असावे, अजुन सुद्धा नक्की सांगता येत नाहीये मला, कथा आठवते आहे (शेवटचा /अखेरचा पर्याय ) पण पुस्तकाचे नाव सध्या विसरलो आहे. पण हे "यक्षाची देगणीच" असावे ... विसाव्या शतकातल्या काही निवडक हुशार माणसांना २०० वर्षे गोठवलेल्या स्थेतीत अंतराळात पाठवण्यात येते, ते २०० वर्षांनी पुन्हा जागॄत अवस्थेत येऊन त्या काळच्या मानवांना मदत करणार असतात. पण त्यांना नवे जीवन पुर्णपणे "यंत्रांवर अवलंबुन" असल्याचे आढळते व यातुनच मनुष्यजातीचा विनाश अटळ आहे हे जाणवते. म्हणुन मग ते पॄथ्वीला शक्ती देणारी प्रमुख "शक्तीकेंद्रे" बंद पाडतात व नव्या मानवांवर पुन्हा कष्टाने जगण्याचा, पुर्णपणे यंत्रावर अवलंबुन न राहण्याचा व पर्यायाने विनाश टाळण्याचा उपाय जबदस्तीने आमलात आणतात ... हाच तो "शेवटचा /अखेरचा पर्याय" ... असो, कुणाला पुस्तकाचे नाव असल्यास कॄपया द्यावे. माझ्या मते "यक्षाची देणगी" ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/14/2008 - 19:54 नवीन

हं, साम्य आहे खरं ...

पण डान्या (आणि इतर लोक्स), आइच्यान सांगते मी एकही मराठी विज्ञानकथा, कादंबरी वाचलेली नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Sat, 11/15/2008 - 00:32 नवीन

तसे नाही अदिती ...

पण डान्या (आणि इतर लोक्स), आइच्यान सांगते मी एकही मराठी विज्ञानकथा, कादंबरी वाचलेली नाही आहे.
छ्या, कोण करतो असा आरोप ? काय संबंध ह्याचा ? तु पण प्लीजच आहेस बाई ... आम्ही फक्त विषय निघाला म्हणु पुस्तकाची चर्चा करत होतो. काहीच मनाला लाऊन नको घेऊ बाई, आम्ही काय वेडे आहोत का असा आरोप करायला / संशय घ्यायला ? तु जे १० भाग मनापासुन लिहलेस त्याची कदर आहेच ना आम्हाला. सो, तुझी कथा मस्तच अस्ती, टेन्शन / मनात काही वेगळे घेऊ नकोच. आजकाल म्हणतात तसे "थंड घे" .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
भ
भाग्यश्री Sat, 11/15/2008 - 00:23 नवीन

ह्म्म

ह्म्म कथासूत्र ओळखीचे वाटतेय. बहुधा यक्षांची देणगीच असेल.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Fri, 11/14/2008 - 19:44 नवीन

प्रकाटाआ ..

पुन्हा तेच .... प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
स
सुनील गुरुवार, 11/13/2008 - 16:26 नवीन

कलाटणी

शेवट रोचक झाला आहे. आणि जाता जाता "आनंद परत डोकावून गेल्यामुळे अंमळ बरे वाटले! शेवटच्या भागात कलाटणी मात्र छान आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 11/13/2008 - 16:36 नवीन

क लाट्णी

शेवट्च्या भागात क लाट्णी आहे.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 11/13/2008 - 17:23 नवीन

चांगला संदेश

चांगला संदेश दिला आहे या भागातुन. त्यामुळे मालिकेतील सर्वात चांगला भाग असे म्हणायला हरकत नाही. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. असेच काही चांगले वाचायला मिळावे अशी अपेक्षा. नाना
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 11/14/2008 - 08:45 नवीन

+१

असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
स्वाती दिनेश गुरुवार, 11/13/2008 - 17:39 नवीन

छान..

शेवटही चांगला केला आहेस अदिती, गोष्ट आवडली. अजून विज्ञानकथा लिहायला हरकत नाही तुला.. स्वाती
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 11/13/2008 - 20:35 नवीन

मस्तच.

आदिती, मस्त लिहिले आहेस. :)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 11/14/2008 - 14:45 नवीन

अल्टीमेट!!!!

सलग १० भाग वाचले !! आणी खरच अजिबात कंटाळा नाय आला ,हेच लेखिकेचे यश आहे ... विक्षिप्तदेवी कडून अजुनही कथा वाचायला मिळतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.... (धुमकेतू) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 11/14/2008 - 20:09 नवीन

मॅडम,

पर्यावरणाच्या संरक्षणाचा मौलिक सल्ला मिळाला.:) सगळे भाग आवडले. भाग संपवताना मात्र ते सांस बहू की काय ते जरा .... म्हणजे ते आपल्या लेखमालेच्या मूडला जरा.... रेवती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/14/2008 - 20:13 नवीन

भाग

भाग संपवताना मात्र ते सांस बहू की काय ते जरा .... म्हणजे ते आपल्या लेखमालेच्या मूडला जरा.... तो माझा मूड होता! ;-) मला आंद्या म्हणत होता म्हणून मी हे लिहायला सुरुवात केली. आता लिहितच आहे गोष्ट, आणि आहेच स्वातंत्र्य तर मी माझी टवाळी करण्याची हौस भागवून घेतली; बाकी काही नाही. आणि माझी अपेक्षा होती की ते वाचून मला फटके पडतील आणि पुन्हा कोणी "गोष्ट लिही" असं सांगणार नाही. पण काय सांगू रेवतीताई, माझा प्लॅन उधळून लावला गेला. :-( (टवाळखोर) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ऋ
ऋषिकेश Sat, 11/15/2008 - 10:43 नवीन

भहन्नाहाट!!!!

भहन्नाहाट!!!! हा भाग मस्तच.. शेवट तर ठ्ठोऽऽऽ होता :) संपूर्ण गोष्ट आवडली.. शैली तर मस्तच आहे.. अजून विज्ञानकथा लिहि या स्वातीताईच्या सुचवणीशी १००००% सहमत -(पृथ्वीवासी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Fri, 09/16/2011 - 03:53 नवीन

चांगले लेखन.

मिपावरची एक 'वन ऑफ द बेस्ट' म्हणता येईल अशी लेखमाला.
  • Log in or register to post comments
श
शहराजाद Sat, 09/17/2011 - 05:01 नवीन

मस्तच

छान मालिका. आधी वाचली नव्हती. @ इंटरनेटस्नेही चांगली मालिका वर काढल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा