✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राजला मारायला आलेल्या बिहारीचे एन्काउंटर

इ
इनोबा म्हणे यांनी
Mon, 10/27/2008 - 19:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11036 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

स
सुक्या Wed, 10/29/2008 - 01:58 नवीन

मुळीच नाही. . .

अस्मिता म्हणजे दुसर्‍या प्रांताचा तेथील लोकांचा द्वेष मुळीच नाही. अस्मिता म्हणजे अभिमान, संस्क्रुतीचा अभिमान. तो सर्वांनाच असतो. बंगाली , बिहारी, तेलुगु, तमीळ, गुजराथी कुनालाही विचार. मराठी माणसाला ही तो अभिमान असतो. अस्मितेच्या नावाखाली लोकांचा द्वेष करा असे कुनीही सांगत नाही. परंतु तुम्ही परप्रांतीय आहात म्हणुन दुर्गापुजा करु नका किवा दांडीया करु नका असं कुनी म्हटलं आहे का? अस्मितेच्या नावाखाली कुनी आपाली ताकत दाखवु लागाला तर त्याला विरोध जरुर असावा. दक्षिण भारतीय लोकांचा द्वेष आपण करतो का? नाही ना मग या बिहार्‍यांचा का करतो ? विचार करा. त्याचे कारणही लगेच सापडेल. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
व
विकि गुरुवार, 10/30/2008 - 13:16 नवीन

सुक्या सेठ

द.भारती्य लोकांचा द्वेष तु करत नसशील पण आमचा सिमाप्रश्न याच द.भारतातत्या कर्नाटक राज्यात पडून,झडुन ,मारूनमुटकून आहे.आमच्या मर्‍हाटी महापौराला(बेळगावच्या) याच कानडी लोकांनी बेदम मारहाण केली होती. याच लोकांचे बहुसंख्य लेडीज बार,हॉटेल्स मुंबईत आहेत त्यात काम करनारा वेटर मराठी आहे का?त्यांच्याच प्रांतातील आहे. रस्त्यावर अनधिकृत नारळपाण्याची,इडलीडोसाची विक्री करणारे कोण आहेत सांग ना.विरोध करायचा तर सर्वांना नाही तर नाही.त्याच काय बोलतेस ते बोल आधी. शिवसेनेने सर्वात आधी यांच्याविरोधात आंदोलन केले होते. अरे सुक्या अस्मिता जागी झाली म्हणजे दुसर्‍या प्रांताचा द्वेष करणे हे आलेच. त्यात काय मोठे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
इ
इनोबा म्हणे Wed, 10/29/2008 - 02:05 नवीन

विकी महाशय

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रोजगार नाही म्हणुन हे लोक महाराष्ट्रात किंवा आसपासच्या राज्यात जातता ना? पण मला सांगा गेली कित्येक वर्षे त्या राज्यांचा विकास झाला नाही ,लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार निर्माण केला गेला नाही याला जबाबदार कोण आहे? उत्तर प्रदेश-बिहारच्या राजकीय नेत्यांची काय लायकी आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.पण सामान्य नागरीक ही या बेरोजगारीला काही प्रमाणात जबाबदार आहेच ना! तिथे रोजगार नाही म्हणून हे लोक आसपासच्या राज्यात पसरत गेले. पण मग त्यांच्या राज्याचे काय? तिथे विकास कसा होणार? मानवतेच्या-भारतीयत्वाच्या मुद्द्यावर जरी यांना आपल्या राज्यात थारा दिला तरी आणखी किती वर्षे या लोंढ्यांचा भार इतर राज्यांनी सहन करायचा? बरे हे लोक रोजगारासाठी महाराष्ट्रात आल्यानंतर यांची मते खाण्यासाठी त्यांच्या राज्यातील राजकीय पक्ष ही यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. यांना स्वतःचे राज्य सांभाळता येत नसताना यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ढवळाढवळ करण्याची गरज काय? महाराष्ट्राला/महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना दोष देण्यापेक्षा उत्तर भारतीय नेत्यांनी जर स्वतःच्या राज्याचा विकास केला तर त्या राज्यातील लोकांना तरी इतर राज्यात जाण्याची गरज भासेल का? मात्र या गोष्टीकडे कुणाचे लक्ष जाऊ नये म्हणून उत्तर प्रदेश आणि बिहारचे नेते महाराष्ट्राला घटनेने दिलेल्या अधिकाराचे दाखले देत आहेत. आणि सामान्य उत्तर भारतीय माणूस सुद्धा त्यांनाच साथ देतोय. आज महाराष्ट्रात परप्रांतिय नगरसेवक जितक्या प्रमाणात आहेत तितके देशातील इतर कुठल्याही राज्यात नाहीत. आणि हेच चालू राहीलं तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला फार वेळ लागणार नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
व
विकि गुरुवार, 10/30/2008 - 13:45 नवीन

इनोबा सेठ

तुमच्या हून अधिक जास्त आक्रमक भुमिका मी परप्रांतियांबाबत या आधी मांडली आहे(मनोगत ,उपक्रमावर) पण दोन वेळच्या अन्नासाठी जेव्हा मारामार होते तेव्हा तो परप्रांतीय (स्वतंत्र भारताचा रहिवासी) काय करणार,तेथील राज्याचा विकास(आर्थिक,सामाजिक) नाही झाला तर ते काय करणार.त्यांच्या येथील न झालेल्या विकासाबाबत राज ठाकरेंनी आंदोलने करायला हवी होती. तुम्हाला तेथील किंवा येथील राजकरण्यांनि केलेले राजकारण महत्वाचे आहे काय? नेते येतात बोलून जातात पण सामान्यांचे काय . नेत्यांचे कामच आहे भाषण ठोकणे. विरोध करायच तर सर्वांना करा.उ.प्र.,बिहार घेऊन बसू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
व
विकि गुरुवार, 10/30/2008 - 13:45 नवीन

इनोबा सेठ

तुमच्या हून अधिक जास्त आक्रमक भुमिका मी परप्रांतियांबाबत या आधी मांडली आहे(मनोगत ,उपक्रमावर) पण दोन वेळच्या अन्नासाठी जेव्हा मारामार होते तेव्हा तो परप्रांतीय (स्वतंत्र भारताचा रहिवासी) काय करणार,तेथील राज्याचा विकास(आर्थिक,सामाजिक) नाही झाला तर ते काय करणार.त्यांच्या येथील न झालेल्या विकासाबाबत राज ठाकरेंनी आंदोलने करायला हवी होती. तुम्हाला तेथील किंवा येथील राजकरण्यांनि केलेले राजकारण महत्वाचे आहे काय? नेते येतात बोलून जातात पण सामान्यांचे काय . नेत्यांचे कामच आहे भाषण ठोकणे. विरोध करायच तर सर्वांना करा.उ.प्र.,बिहार घेऊन बसू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प
प्रभाकर पेठकर Wed, 10/29/2008 - 14:05 नवीन

विकि साहेब...

अस्मिता जागी झाली म्हणजे दुसर्‍या प्रांताचा तेथील लोकांचा द्वेष करणे. अजिबात नाही. 'अस्मिता' जागृत होणे म्हणजे दुसर्‍या प्रांताचा द्वेष करणे नाही. स्वतःच्या प्रांताचा 'रास्त' अभिमान बाळगणे. 'स्वत्त्वा'वर होणार्‍या आक्रमणाचा प्रतिकार करणे. 'समानते'च्या नांवाखाली 'कणाहीन' समाज निर्माण करणे म्हणजे इतरांवर प्रेम करणे नाही. स्वतःच्या आजारी मुलाकडे दुर्लक्ष्य करून कर्तृत्वहीन शेजार्‍याच्या मुलाची देखभाल करणे म्हणजे 'समानता' नाही. मी तर म्हणतो, देशांतर्गत प्रांतवादाइतकी संकुचित भुमिका का ठेवा? देशांच्या सीमेवरून सैन्य काढून टाका. पाकिस्तान्यांना काश्मिरच का? आख्खा भारत घेऊ द्या. अमेरिकेला रशिया देऊन टाका. चीनला अमेरिका देऊन टाका. कुठल्याही देशाच्या सीमा रेषा न आखता कोणालाही कुठेही जाऊन राहण्याची, नोकरी/व्यवसाय करण्याची मुभा द्या. 'व्हीसा' ही असमानता निर्माण करणारी पद्धत बंद करा. मग येऊ द्या 'बिहारीं'ना, नाहीतर कोणालाही, मुंबईत्त. मी हसत हसत स्वागत करीन त्यांचे. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
व
विकि गुरुवार, 10/30/2008 - 13:25 नवीन

पेठकर साहेब

अशी अचानक अस्मिता कशी जागी होते. ते सांगाल का? विद्वेशातूनच अस्मिता जागी होते.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 11/02/2008 - 22:37 नवीन

मारून टाका अस्मितेला....

काय करायची आहे अस्मिता? माझ्या प्रतिसादातील शेवटचा परिच्छेद पाहा. अस्मितेला गाडून टाका. सर्व सीमा रेषा पुसून टाका. सर्व जग, सर्व देश, सर्व प्रांत सर्वासाठी खुले करा. जगात शांतताच शांतता नांदेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
स
सातारकर Mon, 11/03/2008 - 09:57 नवीन

साहेबांची प्रतिक्रीया आली

शाब्दीक नाही, क्रूती आहे. वाचा
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Mon, 11/03/2008 - 13:32 नवीन

आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ

उत्तरभारतियांचे रक्षण राष्ट्रवादी करणार.इथे पहा याला म्हणतात "घर का भेदी लंका ढाए" मराठीत "आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ" "अनामिका" अनुदिनी- http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा