प्रस्तावना :
णमस्कार लोक्स,
पुन्हा नेहमी प्रमाणे शनिवार संध्याकाळचा एक कंटाळवाणा टाईम आला. अशा वेळेस काहीही सुचत नाही. पण काही दिवसांपुर्वी आपल्या शाळेतले दिवस आठवले, आणि पुन्हा 'ते'दिवस आणि 'हे' दिवस सुरू झाले. आठवलं आपलं आयुष्य (माफ करा, लै मोठा शब्द आहे पण आता आर्ध संपलं त्यामुळे संदर्भापुरता वापरायला हरकत नाही) कसं बदलंत गेलं ? विचारचक्र उलटे फिरायला लागतात, मग आठवतात, ..............
* जॉब लागण्यापुर्वीचे दिवस ,त्यावेळी रेझ्युमे बनवने, टेक्निकल , ऍप्टिट्युड प्रिपेयर करणे, इंटरव्युची तयारी करणे हे अजुन ताजंच असतं, आणि जोवर कमवू जॉब चेंज करू तोवर चालत रहाणार.
* त्या आधी कॉलेजचे दिवस , त्यावेळी, प्रोजेक्ट्स, असाइनमेंट्स इत्यादी बरोबर , प्रॅक्टिकल्स/ओरल्स, पि.एल्स. मधला रट्टामारू अभ्यास, मग रिझल्ट लागायच्या आधी वाढणारं अँड्रिनलीन ..
* त्याआधी उच्च माध्यमिक शाळा (१०-११-१२वी) नुकतंच मिसरूड फुटून कॉलेजला जातोय याचा अभिमान, मराठी मिडियम मधून सायंसला असाल तर उचाच बायो-फिजिक्स-केमेस्ट्रीची (त्यावेळी) भलीमोठी वाटणारी इंग्रजी पुस्तकं नाकावर धरून आई-बापाला लै मोठा आय.ए.एस. होणार च्या थाटात केलेली शोबाजी.त्यावेळी सुद्धा एक साचेबद्ध अभ्यास.. रट्टामारूपणा आलाच.
* आता आंगणवाडी पर्यंत नेऊन हाताला शेबूड पुसून किंवा भोकाड पसरून बोर नाही करत. मला आठवतात शाळेतले दिवस.इथ मराठी माध्यमातली बरिच असतील. त्यावेळेस आपला शैक्षणिक अभ्यासक्रम कसा होता? पुस्तकांत मस्त मस्त चित्र असत.बालभारतीच्या पुस्तकात मस्त धडे असत.. आपल्या पुलंचा एक धडा आवर्जुन असे. ज्ञानेश्वरांची कविता असे. आपण आपलं आवडतं मराठीचं पुस्तक शाळा सुरू होण्या आगोदरच वाचून काढत असू. त्यावेळी १०जुनला शाळा सुरू झाली की मस्त नवी कोरी पुस्तकं आणि वह्या मिळायच्या. बाबांबरोबर स्टेशनरी शॉपिंगला जाताना उर का भरून येई कळत नसे. मग पहिला महिना त्या पावसाळ्याच्या सादळलेल्या वातावरणात वह्या-पुस्तकांचा वास घेण्यात कित्ती आनंद मिळे हे अवर्णनिय आहे. आत्ता पुस्तके मिळतील, वासही मिळेल, पण ती बालबुद्धी नाही मिळू शकत .. आपण शहाणे झालो ना !! आता का आपण पुस्तकांचा वास घेऊन प्रफुल्लित होउ ? त्यावेळी आपल्याला १-२री चाचणी, सहामाही, ३-४थी चाचणी ,वार्षीक बरोबरच एक खास दिपावली अभ्यासिका मिळे. त्या अभ्यासिकेत आपल्याला प्रश्न वगैरे सर्व छापिल मिळे फक्त उत्तर लिहीण्यासाठी लाईन्स ठेवलेल्या असतं .. आणि अभ्यासिका पुर्ण करताना लै लै आनंद होत असे, हुरूप येउन अभ्यास होत असे. आणि तुझं किती झालं रे ? माझं संपलं .. असं सागंताना एक वेगळाच आनंद होत असे, तो आनंद आपण आता वयोमानाने विसरलो, आपण मोठे झालो ना.. :)
विषयः
विषय आहे पत्रलेखन.आता काय ? इ-मेल्स चा जमाना, फोन आले, मोबाईलही आले, आता कोण डोंबलाचं पत्र लिहीतो का? आता आपण जी विद्युत-पत्र लिहीतो ति ही इंग्रजाळलेली. प्रोफेशनल पत्रांच ही तेच. तुम्हाला शाळेच्या दिवसंपर्यंत घेउन जाण्याचा एकच हेतू. आपण आज कशी पत्र लिहीतो, आणि बालपणात शाळेत आपणास आठवत असेल तर एक प्रश्न असे, पत्रलेखन.
काहीसे विषय आठवतात, जसे,
१) शाळेची सहल आयोजित करायची आहे, एस.टी.संचालकांस एस.टी.च्या मागणीविषयी पत्र लिहा.
२) मोठा भाऊ नोकरीसाठी बाहेरगावी आहे, त्याला खुशालीचे पत्र लिहा.
३) आजोबांना दिवाळीत गावी येणार आहोत ,असे पत्र लिहा.
४) शाळेच्या मुख्याध्यापकांना (आय'म ग्रेट, आजही हा शब्द आठवला) कसलीशी विनंती करणारे पत्र लिहा, इ.इ.
आवाहन :
त्यावेळी पत्र कसं लिहायचो ते आठवा , आणि एक पत्र इथं ही त्याच शैलीत लिहा. काही विशिष्ट मराठी शॉर्टकट्स असायचे, ते आपण अंमळ विसरलो असू, आपली पत्र लिहीण्याची परंपरा काळाआड गेलिये , जरा हवा आन् दो भाई..
मी आत्ताच पिडा भाउंना अशीच खरड केली, त्यातुन ही कल्पना सुचली आहे.
घोषणा (मराठीत डिक्लेरेशन) :
१.ही कोणतीही स्पर्धा नाही.
२. विषय :विनोदी, गंभीर(अगदी कोणा क्ष च्या दहाव्याची बातमी देणारंही चालेल),व्यवसायिक, आणिक कसलंही चालेल. प्रेमपत्रांना हरकत नाही पण जर त्यातुन काही वाद झाले तर हा धागा,धाग्याचा लेखक आणि मिपा यास जबाबदार असणार नाही. आपण पत्र कोणत्याही मिपाकराला पाठवू शकता.
३. पत्र ज्याला पाठवायचं ती व्यक्ती शक्यतो मिपाकर असावी (हट्ट नाही).
४. उत्तम पत्र लिहीणार्याच्या खरडवहीत आणि याच धाग्याला एडिट करून खाली , कोणतीही डेडलाइन न देता, मोठ्या अक्षरात "आपण उत्तम पत्रलेखक आहात" असा शेरा मारण्यात येइल.
५. कोणीही परिक्षक नाही.
६. कॉपी करू नये , (केली तर मी काही करू शकत नाही :) )
पहिला ट्राय मीच करतो.
माझे पत्र :
प्रिय काकाशिरोमणी पिवळा डांबिस,
पाचवी फांदी,पिंपळझाड कॉलनी,
हाडके कब्रस्तान,कॅलिफॉर्निया,
अमेरिका-१२३४५
विषयः शनिवार संध्याकाळी बोर झाल्यावर आपल्या प्रिय व्यक्तिलाही बोर करणारे पत्र लिहा.
सा.न.वि.वि.
पत्र लिहीण्यास कारण की, शनिवार संध्याकाळी बाहेर जाण्याचा मुड नसल्याने आपल्याला खरड टाकित आहे. आमच्या येथे अंमळ बोर होत आहे. यंदाच्या वर्षी मंडळाने क्लबांत जाणे कटाक्षाने टाळले आहे. आत्ताच गावजेवणाचा कार्यक्रम झाला. सुमारे २५ कोंबड्या, १२ कुकर भात , आणि १५० तंदुरी रोट्यांचा अल्पसा अन्नदान(की भक्षण?) चा कात्यक्रम स्वहस्ते यशस्वी पार पाडला . आपले काय कुशल? दारूगोळा घरी आणून ठेवल्याचे कळाले. शिवास (की शिवा'ज) रिगल घरी आणून ठेवली आहे, ती शिळी होऊन विषारी तर होणार नाही ना? आणि कट्टारी लोकांना विषबाधा तर होणार नाही ना ? आपणास कट्ट्याच्या टारझन मित्र मंडळातर्फे शुभेच्छा! आपला कट्टा यशस्वी होतो आणि सगळं पब्लिक शुद्धीत आणि सुखरूप घरी जाओ अशा आशयाचे पत्र सोमरसेश्वराला पाठवलं आहे.
अजुन काय लिहू ? दामण्णाच्या गायीला वासरू झालेलं आहे, ते अंमळ येडझवं दिसतंय, मोराक्काच्या म्हशीचं दुध प्यायला पळतं.. आपला शेर्या कुत्रा पिसाळला आहे, गावातील गुरांच्या डॉक्टरला चावून फरार आहे, अचानक रात्री कोणालाही चावतो म्हणून कोणी बाहेर झोपत नाहीये. आपल्याकडे हिवाळ्याची फारच थंडी पडते आहे, आम्ही सगळे काड्या न कागदं गोळा करून शेकोटी करतो.आईने जाळासाठी लागणार्या कचर्यासाठी उकिरडे चाळतो म्हणून थंडीत कान गरम केला. नारायण सरपंच सकाळी ओढ्याकडे तुळस लावायला जाताना पाय घसरून पडले, आता बरे आहे.
छोट्या डांबिसला गोड पापा, डांबिस काकुंना साष्टांग दंडवत.
कळावे ,
लोभ असावा,
आपला पुतण्या,
पिवळा टारझन
मौजे कंपाला, युगांडा खुर्द,
अफ्रिका-९८७६५ (पुर्व)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
नविन चोच्यांसाठी सुचना : माहित नसेल तर नाक खुपसू नका, पिवळा डांबिस एक आदरणिय मिपाकर आहेत.
उत्तम पत्र लेखक :
१. विजुभाउ सातारवी
प्रतिक्रिया
2 Nov 2008 - 4:51 am | निमीत्त मात्र
हा हा हा! पत्रलेखन प्रकार आवडला.
>>छोट्या डांबिसला गोड पापा, डांबिस(पहिली) काकुंना साष्टांग दंडवत.
डांबीस पहिली काकू म्हणजे काय ते समजले नाही. सुरुवातीला तर मी चुकुन डांबीसकाकूंना गोड पापा आणि छोट्या डांबीसला साष्टांग दंडवत असे वाचले.. कै च्या कै.. :))
2 Nov 2008 - 4:54 am | मदनबाण
टार्या पत्र अगदी झकास माडी लिहले आहेस....
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
2 Nov 2008 - 6:48 am | विसोबा खेचर
हा हा हा! पैलवाना, मस्त पत्र रे! :)
तात्या.
2 Nov 2008 - 10:02 am | झकासराव
हा हा हा टार्झ
चांगल पत्र लिवलस.
आपल्या मिपा शाळेत सुद्धलेकनाचे मार्क कापत नाहीत मह्णुन मी पन नाय कापणार.
फक्त पत्र जरा मोठ पायजेल हुत.
ह्या पत्रात एकच चुक आहे. डांबिस काकांच्या पत्त्यामध्ये अमेरिका १२३४५ च्या ऐवजी अमेरिका ५४३२१ अस पायजेल.
(आपल्या भुतधर्माच्या उलट्या पायांचा अपमान होतो त्या पत्त्यात.)
माझं तुला १० पैकी ८ मार्क.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
2 Nov 2008 - 10:10 am | यशोधरा
टार्या, तुला अंमळ येड लागलेलं दिसतय!! :)
3 Nov 2008 - 2:25 am | पिवळा डांबिस
अंमळ नव्हे निश्चित!!!!
आफ्रिकन त्से त्से माशी चावलेली दिसतेय त्याला!!!!
:)
3 Nov 2008 - 2:36 am | ब्रिटिश टिंग्या
>>आफ्रिकन त्से त्से माशी चावलेली दिसतेय त्याला!!!!
=))
माशी काय, माशांची कंप्लिट झुंड चावलेली दिसतेय! तरीच असा वागायला लागलाय ;)
3 Nov 2008 - 3:06 am | टारझन
आफ्रिकन त्से त्से माशी चावलेली दिसतेय त्याला!!!!
सहमत ... +१ .... असेच म्हंटले ..
बाकी त्से त्से माशी माणसाला येड लावते असा केमिकल शोध लावल्याबद्सल केमिकलनरेशांच हाबिणंदण. :)
बाकी यशोभाइंनी नेमीप्रणाने अवांतर दिलेल्या कमेंट बद्दलही हाबिणंदण , आणि टिंग्याचं हसून हसून का होइणा पोटातले गॅस मोकळे झाले त्याचंही हाबिणंदण,,,, बाकी लोकांना सुचना, आमच्या येडाबरोबरच ,एखाद झकास पत्र टाकून आपलं काळाआड गेलेली पत्रसाहित्यकला पुन्हा वर आणावी. आत्तापर्यंत २ पत्रे आली , मला दुप्पट यश मिळाल्यासारखे आहे. बाकी टिकाकार आम्ही फाट्यावर मारतोच .. चालू द्या
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा
3 Nov 2008 - 4:01 am | पिवळा डांबिस
बाकी त्से त्से माशी माणसाला येड लावते असा केमिकल शोध लावल्याबद्सल केमिकलनरेशांच हाबिणंदण.
आता आमाला तरी काय म्हायती? आमी थोडेच आफ्रिकेला जाउन र्हायलोय?
तू आता जी काय काय लक्षणं (मराठीत सिम्प्टम्स!!) दाखवशील त्यावरून तर आम्ही ठरवणार ना!!!:)
3 Nov 2008 - 4:09 am | टारझन
आता आमाला तरी काय म्हायती? आमी थोडेच आफ्रिकेला जाउन र्हायलोय?
कल्ला नाय बॉ .. तुम्हीच म्हणाले ना, मला त्से त्से माशी चावली म्हणून ? मला तर इथ राहून पण ही माहीती नव्हती.
तू आता जी काय काय लक्षणं (मराठीत सिम्प्टम्स!!) दाखवशील त्यावरून तर आम्ही ठरवणार ना!!!
पत्रलेखणाचा धागा एक करमणूक म्हणून काढणे हे जर येड लागल्याचं लक्षण असेल तर आम्ही जन्मापासून असे येडे आहोत, आणि सत्तरीत गेलो तर .. (अजुनच येडे होऊ म्हणा :))
-- येडा टारझन
2 Nov 2008 - 2:03 pm | विनायक प्रभू
तू खराच मोठा झाला आहेस का? मला नाही वाट्त.
अंदरकी बातः मी पण अजून लहानच आहे.
2 Nov 2008 - 2:29 pm | विजुभाऊ
माझेही एक पत्र
प्रिय धमाल मुलगा
मु पो शनिवार पेठ
शाळे शेजारी
पुणे ३०
विषय: मिपावर अनुपस्थिती बाबत चौकशी
पत्रास कारणकी
गेले दोन आठवडे झाले दिवाळी निमित्त आपण दिवाळी अगोदरच मिपाचरु न्गायब झाला आहात.
जास्त चौकशी अन्ती असे समजले की आपण दुसर्या शाळेत कुर्ठेतरी गुर्रे चळायला जाता असे कलाले.
ही गुरे हाकलताना थिर्र हल्या हैक हैक या ऐवजी तुम्ही ठ्यॉ असा शब्द वापरता.
तुम्हाला ही गुरे हाकलण्यासाठी वेगळा शब्द शोधावा लागत नाही.
तुमची इकडील सर्व मित्र मंडळी सुखरुप आहेत. नाही म्हणायला छोटा डॉन आता रांगायला लागला आहे. हॅप्पी ट्रव्हलर ने आता बर्यापैकी बाळसे धरले आहे. इनोबाचा पाय आणि जबडा बरा आहे. अधुन मधुन त्याला जरा मॉलीश लागते.
तुम्ही पुण्यास का थांबला आहात याचीच सर्वत्र चर्चा आहे.लोक म्हनतात की तुम्ही पुण्यात घरोबा केला आहे,तेथेच रममाण होता.
असो जे होते ते जगाच्या भल्यासाठीच होते असे बाबा महाराज बारामतीकर म्हणतात.
तुम्ही नेहमी जे लाळेरे वापरायचा ते इथेच विसरुन गेला आहात . तरी लोकांच्व्या कळफलकावर कॉफी साम्डत जाउ नका.
बाकी सर्व क्षेम.
ता क : तुमचा लायटर ब्रीटीशकाकानी अजून परत दिलेला नाही.
पुन्हा ता. क. :तुम्ही सध्या मिपावर बरेचदा गैरहजर असता. त्यामुळे ल्लोकाना वातते की घरातुन तुम्हाला इकदे फिरकु न देण्याचा हुकुम /दटावणी मिळाली आहे. उगच गैरसमज आणि अफवा याना सध्या ऊत आलेला आहे.
तरी हे पत्र मिळताच त्वरीत खुलासा करावा.
चोट्यास धम्मकलाडु ,मोठ्यांस गोड आलींगन
कळावे
तुमचा मित्र
विजुभौ सातारवी.
( तुम्ही नसल्यामुळे कवितांचा रतीब हॅप्पी ट्रॅव्हलरकडे घालत आहोत)
विलेपारळे (पुर्व)
मम्हई
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
3 Nov 2008 - 2:33 am | पिवळा डांबिस
चोट्यास धम्मकलाडु ,मोठ्यांस गोड आलींगन
काय हो विजुभाऊ, दुनियेला इतकं म्हणजे इतकं फाट्यावर मारायचं?:)
"झोंबणार्या थंडीने गारठले जाऊ नका, एक चपटी क्वार्टर खिशात बाळगा"
2 Nov 2008 - 8:04 pm | नोहिद सागलीकर
श्री आयाराम गयाराम बडबडे,
मु.पो.-इकडे,
ता.-तिकडे,
जि.- सगळीकडे,
विषयः- रमाकाकुंचि म्हैस व्यायलिय बाळ व बाळंतिन सुखरुप आहेत...............
आयाराम काकांस सा. न. वि. वि.
आता पत्र लिहीण्यास कारण की, (आई ने सांगितले)
आमच्या कडे रमाकाकूंचि म्हैस व्यायलिय बाळ व बाळंतिन सुखरुप आहेत,असो मला कळ्ले कि तुमच्या कडे दिवाळी नंतर म्हणे रेड्यां च्या टक्करी लावतात म्हणे आम्च्या इते सगळे भय्ये लागले ............ होते रेड्यां सारखे नाचायला,
.. रमाककुंनि दोन तांबे चिक दिल होत .
बाकि कस काय हाय तब्येत पाणी ईकदे सर्व खुशाल आहे ,
गव्हाचि शेत तयार होतायत , थंडि वाढल्या वर पेरन्या होतिल तुमच कसकस?
थांबतो आता......
कळावे आपला ,
नो. वेडे,
मू. पो. येडेनिपाणी,
तालुका- खुळ्याचि चावडि.,
जुन्या पुरान्या वीभुतिंना नमस्कार
3 Nov 2008 - 3:20 am | पिवळा डांबिस
प्रिय टारूबाळास,
गोड गोड (आणि करकच्चून!!!) पापा
तुझे पत्र अलिकडेच मिळाले. मजकूर वाचला (पण काही मुद्द्याचं समजेल तर शपथ!!!:))
तू गावजेवणात केलेल्या अन्नभक्षणाचे वर्णन वाचून बकासुराच्या कथेची आठवण झाली. अरे टारूबाळा, आपला महाराष्ट्र गरीब आहे रे! तू भक्षण केलेल्या अन्नात आपले किती मिपाकर जेवले असते (आणि वाद घालायला ताजेतवाने झाले असते!!!!) याचा विचार कर....
कट्ट्याला दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. सध्या कट्ट्याची तयारी जोरात चालू आहे. कट्ट्यानंतर शुद्धित असणारे लोक सुखरूप घरी जातील, काळजी नसावी. (शुद्धित नसणार्या लोकांसाठी घरातच त्या रात्रीपुरत्या स्पेशल खाटा टाकल्या आहेत!!!!:))
गावाकडच्या बातम्या वाचून बरं वाटलं. सरपंच आता व्यवस्थित तुळस लावतात ना? की आपलं ते तुळस लावतात पण बाहेर मात्र येतं सब्जाचं रोप?:) असो.
बाकी सर्व ठीक. शेर्या कुत्र्यापासून सावध रहा. ..
सोबत (तुझ्या यशोधराताईच्या सल्ल्यानुसार) बडिशेपेचा मधातला अर्क पाठवत आहे. बुद्धिवर्धक असतो असे म्हणतात, काही फरक पडला वापरून तर बघ (असे ती म्हणते!!:))
तुझ्या (सध्याच्या) गर्ल-फ्रेंड्ला आशीर्वाद.
तुझा,
डांबिसकाका
3 Nov 2008 - 3:43 am | टारझन
पण काही मुद्द्याचं समजेल तर शपथ!!
पत्राचा विषय वाचावा काका:श्री , और जहातक हमारा सवाल हय, पत्र का विषय और हेतू सफल हूआ लगता हय.
प्रस्तावनेत मुद्देसुद , व्याकरणाला अनुसरून (शुद्धलेखण नव्हे) पत्र लिवा असं काळ्या शाईत म्हंटलंय. काकांच्या पत्रात पाठवणार्याचा /ज्याला पाठवायचा त्याच्या पत्त्याचा पत्ताच नाही. तसेच विषयही लिवला नाही. शाळेत अशा पत्रास प्रतिसाद म्हणन्यात येउन पत्र बाद केले जात आहे याचा खेद वाटतो. पत्राचा गाभारा लेखकाच्या लौकिकास साजेसा आहे यात वाद नाही. फक्त व्याकरणाच्या चुकांनी पत्र वाया गेलं आहे.
अवांतर : काकांचं शिक्षण नक्की कोणत्या माध्यमातुन झालेलं आहे ?
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा
3 Nov 2008 - 3:55 am | पिवळा डांबिस
काकांच्या पत्रात पाठवणार्याचा /ज्याला पाठवायचा त्याच्या पत्त्याचा पत्ताच नाही. तसेच विषयही लिवला नाही. शाळेत अशा पत्रास प्रतिसाद म्हणन्यात येउन पत्र बाद केले जात आहे याचा खेद वाटतो.
जाऊद्या, आपलं काइ म्हननं न्हाई. आपण उगाच खेद वाटून घेऊ नका...
पत्राचा गाभारा लेखकाच्या लौकिकास साजेसा आहे यात वाद नाही.
काका कुणाचा?
फक्त व्याकरणाच्या चुकांनी पत्र वाया गेलं आहे.
कोण रे तो इथे मिपावर व्याकरणाच्या चुकांमुळे लिखाण बाद करतोय? ठाण्याच्या खाडीपुलावरून ढकलून द्या त्याला!!!!
अवांतर : काकांचं शिक्षण नक्की कोणत्या माध्यमातुन झालेलं आहे ?
फटक्यांच्या आनि छड्यांच्या माध्यमातून!!
3 Nov 2008 - 4:14 am | टारझन
आपण उगाच खेद वाटून घेऊ नका...
छ्या .. खेद कुठे .. आम्ही फक्त धागाप्रमुख यानात्याने विश्लेषण केलं ..
कोण रे तो इथे मिपावर व्याकरणाच्या चुकांमुळे लिखाण बाद करतोय?
आम्ही शुद्धलेखणाला मिपा नियमांप्रमाणे सुट दिली होती. पत्रलेखण हा व्याकरण प्रकार असल्याने व्याकरण पाळले जाणे जरूरी आहे, आता तुमचं बिना पत्त्याचं पत्र जर पोष्टात टाकलं तर ते इच्छित व्यक्तिला पोचल का ? मग ? आन् पत्रात इशय कुडय? मंग मंग ?
ठाण्याच्या खाडीपुलावरून ढकलून द्या त्याला!
कशाला खाडी घाण करताय ? ऑलरेडीच आहे तेवढी पुरे !!
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा
3 Nov 2008 - 11:02 am | पिवळा डांबिस
आता तुमचं बिना पत्त्याचं पत्र जर पोष्टात टाकलं तर ते इच्छित व्यक्तिला पोचल का ? मग ? आन् पत्रात इशय कुडय? मंग मंग ?
हां, त्येबी खरंच म्हना...
कशाला खाडी घाण करताय ? ऑलरेडीच आहे तेवढी पुरे !!
:)
3 Nov 2008 - 11:45 am | यशोधरा
>>>सोबत (तुझ्या यशोधराताईच्या सल्ल्यानुसार) बडिशेपेचा मधातला अर्क पाठवत आहे. बुद्धिवर्धक असतो असे म्हणतात, >>काही फरक पडला वापरून तर बघ (असे ती म्हणते!!)
काकाश्री, उगाच माझ्या नावावर का खपवताय हो अर्क?? घाबरता की काय टारुबाळाला? :) :)
तसा बरा आहे हो बाळ हा मनाने, फक्त झंजावाती बडबड करतो एवढच...
ता. क. - ते अर्क पाठवून दिलात हे एक बरं केलत!!