✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

क
कैलासवासी सोन्याबापु यांनी
गुरुवार, 10/02/2014 - 18:26  ·  लेख
लेख
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात. तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन) १. मी क्लासिक ३५० का घेतली ?? अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते) ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च २. क्लासिक ३५० चे फ़ायदे ?? अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो) क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते. ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते) ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही ३. क्लासिक ३५० चे तोटे ?? १. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे. २. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते ३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे) ४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स ५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही ६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत. मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
148731 वाचन

💬 प्रतिसाद (648)

प्रतिक्रिया

तेच म्हणणार होतो, ये ग्लासवूल

llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/13/2014 - 13:00 नवीन
तेच म्हणणार होतो, ये ग्लासवूल ग्लासवूल क्या है ग्लासवूल ग्लासवूल? एन्फिल्डचा ऑफरोड पण छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ग्लास वूल

कपिलमुनी
Mon, 10/13/2014 - 16:40 नवीन
http://www.team-bhp.com/forum/motorbikes/9757-goldstar-silencer-16.html अधिक माहिती साठी हा दुवा बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ऑफिशियल सर्विस सेंटर

कपिलमुनी
Mon, 10/13/2014 - 16:42 नवीन
ऑफिशियल सर्विस सेंटर मधला अनुभव बर्‍याच लोकांना वाईटच आहे . मी काही एंन्फील्ड क्लब चा सदस्य आहे. तिथल्या सर्व लोकांचे मत हेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

शेल मधला पेट्रोल भरा?

प्रान्जल केलकर
Fri, 07/08/2016 - 15:12 नवीन
बुलेट साठी शेल चा पेट्रोल चालेल का?? मला मिळालेल्या माहिती प्रमाणे चालत नाही कृपया शंकेचे निरसन करावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हो.

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 07/08/2016 - 17:50 नवीन
मी गेले वर्ष शेल्चेच वापरतोय, काहीही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला कोणती माहिती मिळाली ज्यात लिहिले होते की चालत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रान्जल केलकर

क्लासिक की थंडरबर्ड? ३५०की ५००?

भटकंती अनलिमिटेड
Wed, 09/16/2015 - 17:12 नवीन
क्लासिक ही जुनी (रेट्रो) स्टाईलची मोटरसायकल आहे. एकदम दमदार रेट्रो स्टायलिंग आणि शहरातील ट्राफिकमध्ये हॅंडलिंगवर अधिक नियंत्रण यासाठी क्लासिक अतिशय योग्य बाईक आहे. अर्थात इंजिनाचेही ३५० आणि ५०० असे दोन ऑप्शन आहेत. अर्थात क्लासिकच्या हॅंडलच्या पोझिशनमुळे फार मोठ्या राईड्सला थकवा जाणवू शकतो, हात भरुन येऊ शकतात. क्लासिकला पुढील चाकाला डिस्कब्रेक आणि मागील चाकाला ड्रमब्रेक आहे. थंडरबर्ड ही थोडी प्रगत डिझाईन असलेली बाईक मोठ्या राईड्ससाठी डिझाईन केलेली आरामदायक सीट्स असलेली बाईक आहे. क्रुझर स्टाईलिंग असलेली बाईक शहरातील ट्राफिकमध्ये हॅंडलिंगसाठी जरा त्रासदायक आहे (पण एकदा सवय झाली की अजिबात त्रास नाही). थंडरबर्डला दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक, पुढील चाक थोडे मोठे, मागील चाक अधिक रुंद असल्याने मोठ्या राईड्सना "सोफा ऑन व्हील्स" फील येतो. मी स्वतः थंडरबर्ड वापरतो आणि नॉनस्टॉप दिवसाला चारशे किमी चालवली (चहा ब्रेक्स सोडून) आहे. कुठेही थकवा किंवा पाठीला त्रास झाला नाही. ३५०सीसी- कार्बुरेटरवाले इंजिन असल्याने काही प्रॉब्लेम झाला तरी कुठलाही सर्व्हिससेंटरवाला चालू करु शकतो. कमी पॉवर असली तरी सपाट आणि थोडीफार घाटाच्या रस्त्याला अजिबात loss of power जाणवत नाही. फक्त हिमालयातल्या रस्त्यांसाठी जिथे ५०-६० किमी घाटच असतात तिथे ७० किलोच्या दोन व्यक्ती डबलसीट पिदाडायला जरा शक्ती कमी जाणवेल. ५००सीसी- ईएफआय (electronic fuel injection)मुळे आणि मोठ्या इंजिन स्ट्रोकमुळे अधिक शक्ती. पण ईएफआय सहजासहजी दुरुस्त होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला कुशल मेकॅनिकच हवा. रॉयल एनफिल्डलाही अजून तसे तंत्रज्ञ अधिक संख्येने तयार करणे जमले नाही. हिची शक्ती मात्र कुठेही कमी पडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बरं ते असो

इरसाल
Tue, 10/07/2014 - 14:53 नवीन
पीयुसी नीट चेक करुन घेता ना बुलेट्वालेहो, का तो पिवळी टपरी वाला देतो बनवुन असचं. *** हेचा अर्थ नंतत सांगणेत येईल.
  • Log in or register to post comments

अ‍ॅवरेज?

योगी९००
गुरुवार, 10/09/2014 - 11:09 नवीन
या बुलेटला अ‍ॅवरेज काय पडतो भाऊ? (अ‍ॅवजेज कमी म्हणून आजून हार्ले घेतली नाही बघा... त्याचा आवाज मात्र लई आवडतो...हार्ले हार्ले हार्ले हार्ले..)
  • Log in or register to post comments

या बुलेटला अ‍ॅवरेज काय पडतो

मदनबाण
गुरुवार, 10/09/2014 - 11:27 नवीन
या बुलेटला अ‍ॅवरेज काय पडतो भाऊ? हॅहॅहॅ... हत्ती पोसताना त्याला रोजचा खुराक किती लागतो याचा विचार करायचो नसतो बरं का योगी महाराज ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

मे़कॅनिक

कपिलमुनी
गुरुवार, 10/09/2014 - 13:03 नवीन
मे़कॅनिक हा बुलेटवाल्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतो . तुम्ही तुमची बुलेट कुणाकडे सर्विंसिंगला देता . या निमित्ताने चांगल्या मेकॅनिकची / मॉडिफय करणार्‍यांची माहिती शेयर करता येइल .
  • Log in or register to post comments

मे़कॅनिक हा बुलेटवाल्यांच्या

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/09/2014 - 13:20 नवीन
मे़कॅनिक हा बुलेटवाल्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतो .
हे वाक्य "आमची कुठेही शाखा नाही" या वाक्याईतकेच मुर्खपणाचे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बर

कपिलमुनी
गुरुवार, 10/09/2014 - 14:58 नवीन
असु दे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मुंबईत वर्दे नावाच्या तरुणाने

खटपट्या
Fri, 10/10/2014 - 07:36 नवीन
मुंबईत वर्दे नावाच्या तरुणाने "वर्देंची" नावाचा स्वत:चा ब्रांड काढला आहे. बुलेट मोडिफ़िकेशन मध्ये त्याचा हात धरणारा भारताततरी सध्या कोणी नाही. नवीन/जुनी बुलेट त्याच्याकडे घेवून जायची. त्यातील नको असलेले पार्ट तो आपल्याला परत करतो. उपलब्ध असलेल्या असंख्य मोडल मधील एकावर बोट ठेवायचे आणि घरी यायचे. नवीन गाडीवर बसल्यावर लोकांनी परत परत वळून बघितलेच पाहिजे. अधिक माहिती साठी खालील संकेत स्थळाला भेट द्या. http://www.vardenchi.com/ हा मोडिफ़िकेशन ची किमत तेवढी विचारू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

कमीत कमी २.५ लाख

टवाळ कार्टा
Fri, 10/10/2014 - 07:54 नवीन
कमीत कमी २.५ लाख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

माझ्यामते ७५ हजारापासून

खटपट्या
Fri, 10/10/2014 - 08:25 नवीन
माझ्यामते ७५ हजारापासून सुरवात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

वा वा वा

श्रीरंग_जोशी
Fri, 10/10/2014 - 08:27 नवीन
एकाहून एक बाईक्स बनवतात वर्देसाहेब. एक तांत्रिक प्रश्न, वर्देंकडून मॉडिफाय केलेली गाडी रस्त्यावर चालवण्यासाठी कोणते कायदेशीर सोपस्कार करावे लागतात? जशी कुठल्याही कंपनीला नवी गाडी खरेदीसाठी उपलब्ध करण्यासाठी एआरएआय सारख्या सरकारी संस्थांकडून प्रमाणित करून घ्यावा लागतात. तसे काही या प्रकारात लागू होते का? अवांतर - इथे अमेरिकेत माझ्या शेजारी बसणारा स्थानिक सहकारी असाच छंद बाळगून आहे. जुन्या पुराण्या (कधी कधी तर ४०-५० वर्षांपूर्वीच्या) गाड्या विकत घेऊन त्या बर्‍यापैकी बदलून काही काळ वापरून विकतो. वरील प्रश्न विचारला होता तर तो म्हणाला की बाहेरून कशीही दिसली तरी ज्या मूळ गाडीचे चेसिस असते तीच त्या गाडीची सरकारदरबारी ओळख / नोंद असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

बहुतेक बेसिक/जुन्या बुलेट चे

खटपट्या
Fri, 10/10/2014 - 10:30 नवीन
बहुतेक बेसिक/जुन्या बुलेट चे पासिंग गृहीत धरत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

जबरदस्त बाईक्स..

चिगो
Mon, 10/13/2014 - 16:25 नवीन
कसल्या सॉलिड जबरा बाईक्स आहेत, यार.. मजा आ गया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

वर्दे साहेबांच्या गाड्या

मोहनराव
Mon, 05/04/2015 - 19:23 नवीन
वर्दे साहेबांच्या गाड्या पाहुन थक्क झालो. रच्याकने समिरा रेड्डीचा नवरा आहे तो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

समीरा रेड्डी पण दणकट आहे की!

प्यारे१
Wed, 09/16/2015 - 18:32 नवीन
समीरा रेड्डी पण दणकट आहे की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

अक्षय वर्दे हे फ़क्त नव्या

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 10/11/2014 - 22:06 नवीन
अक्षय वर्दे हे फ़क्त नव्या बुलेट मॉडिफाई करतात , जुन्या नाहीत असे ऐकले आहे
  • Log in or register to post comments

सहमत. नवी बुलॅट घ्यायची आणि

llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/13/2014 - 13:04 नवीन
सहमत. नवी बुलॅट घ्यायची आणि त्याम्च्याकडे द्यायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

स्लोप ऑफ हेल

कपिलमुनी
Mon, 10/20/2014 - 18:51 नवीन
Slope Of Hell ही पुण्याजवळ कामशेटपासून साधारण ५ किमी वर असलेले ठिकाण आहे . अत्यंत तीव्र चढ आणि कच्चा रस्ता या वरून एक खिंड आणि एक चढण चढायची आणि पलिकडे उतरायचा तिथे ( बहुधा) बी एस एन एल च टॉवर आहे . तिथे मस्त पोडीयम बांधला आहे . तिथे विश्रांती घेउन परतायचे. बायकिंगची मजा आणि थ्रिल अनुभवायचा असल्यास नक्की जावा अशी जागा ( अर्थात सर्व काळजी घेउन )
  • Log in or register to post comments

आयशर मोटार

सुधीर
गुरुवार, 11/27/2014 - 11:35 नवीन
अवांतरः आयशर मोटार म्हटल की फक्त टेंपोच नजरेसमोर येतात. रॉयल एन्फिल्ड हा आयशर मोटरचा ब्रँड आहे हे आज कळले. आयशर मोटारचा स्टॉक वर्षभरात एवढा का वर चढला याची कारणं शोधताना ही माहिती झाली.
  • Log in or register to post comments

बुलेट म्हणजे माज आहे राव...

वेल्लाभट
गुरुवार, 11/27/2014 - 12:26 नवीन
बुलेट म्हणजे माज आहे राव... आहाहा ! काय मझा येतो आवाज ऐकूनच... घेईन केंव्हा माहीत नाही. पण कडक्क गाडी. अरे आवा.......ज कुणाचा ? बुले........टगडगडग चा
  • Log in or register to post comments

बुलेटला AMP मीटर का असतो?

मोदक
Mon, 05/04/2015 - 15:28 नवीन
बुलेटला AMP मीटर का असतो? त्याचे नक्की काय काम असते? फ्युएल गेज वगळून याला जागा दिली आहे इतके काय महत्वाचे असते?
  • Log in or register to post comments

जुन्या बुलेट मध्ये आधी हलकीशी

आयुर्हित
Mon, 05/04/2015 - 15:41 नवीन
जुन्या बुलेट मध्ये आधी हलकीशी किक मारून काटा ० (zero)वर आणावा लागायचा व नंतर जोरात किक मारून बुलेट सुरु व्हायची, नाहीतर किक मारली जात नसे. आताही नवीन बटन स्टार्ट बुलेट मध्ये विजेरी चार्ज/डिस्चार्ज होत आहे कि नाही हे कळण्यासाठी हे मीटर उपयोगी आहे. विजेरी चार्ज झाली नाही व किक स्टार्ट ची सवय नसल्यास मात्र खूप अवघड होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मीटर उपयोगी?

कपिलमुनी
Mon, 05/04/2015 - 17:11 नवीन
थंडरबर्डला हे AMP मीटर नाहिये. पण काही प्रॉब्लेम येत नाही . Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

मग ३५० ला हे नाटक का दिले आहे

मोदक
Mon, 05/04/2015 - 17:00 नवीन
मग क्लासीक ३५० ला हे नाटक का दिले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

क्लासिक लुक तसाच ठेवायला

टवाळ कार्टा
Mon, 05/04/2015 - 17:19 नवीन
क्लासिक लुक तसाच ठेवायला बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हा RPM मीटर असलेला फार चांगला

टवाळ कार्टा
Mon, 05/04/2015 - 17:19 नवीन
हा RPM मीटर असलेला फार चांगला...गिअर कधी बदलायचे ते बर्रोब्बर समजते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आम्ही गाडीच्या प्रतिसादावरून

मोदक
Mon, 05/04/2015 - 17:37 नवीन
आम्ही गाडीच्या प्रतिसादावरून गिअर बदलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

:)

टवाळ कार्टा
Mon, 05/04/2015 - 17:41 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सोप्पी युक्ती

आदिजोशी
Mon, 05/04/2015 - 19:32 नवीन
बुलेट चालवताना पार्किन्सन झाल्यासारखी भरपूर थर थर जाणवायची सोडून आता गाडीवरून आपण फेकले जातो की काय असं वाटायला लागलं की वरचा गिअर टाकायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हा हा हा हा!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 05/07/2015 - 23:46 नवीन
हा हा हा हा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

आरारा!

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 05/08/2015 - 14:01 नवीन
एवढे हाल कशाला करता ;) गाडीच्या मन्युअलमध्ये गेअरवाइज किती वेग ठेवावा दिल असेलच. साधारण १५ च्या टप्प्यात ठेवत असतात बहुतेक. इंजिन खुश आणि तुम्हीपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

continental gt

खंडेराव
गुरुवार, 05/07/2015 - 21:39 नवीन
नमस्कार . ही गाडी मिळते १०००० किमी चाललेली, १३०००० रुपयात। लाल रंगाची आहे, निट वापरलेली. मला आर ई ची फार आवड नाही पण ही गाडी आवडली. घ्यावी का? सल्ला द्या
  • Log in or register to post comments

५००

कपिलमुनी
गुरुवार, 05/07/2015 - 21:49 नवीन
घेऊन टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

त्यापेक्षा नविन क्लासिक घ्या

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/07/2015 - 22:10 नवीन
त्यापेक्षा नविन क्लासिक घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

३० चा average milel ka?

खंडेराव
गुरुवार, 05/07/2015 - 22:21 नवीन
Sorry..using phone.. Is the price right?this was used by an expat. What can be the best price? As I am not in need, will only go if I am getting an exceptional deal
  • Log in or register to post comments

३५० वाली क्लासिच देइल ३० चा अ

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/07/2015 - 22:52 नवीन
३५० वाली क्लासिच देइल ३० चा अ‍ॅवरेज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

धन्यवाद टका आणि कपिलमुनी

खंडेराव
Fri, 05/08/2015 - 11:42 नवीन
१) किंमत योग्य आहे का? २) चालवायचा खर्च साधारणतः किती येईल? ३) कोणी ही गाडी वापरली असेल तर काही सल्ला? ४) जुनी घेत असल्यामुळे काही नेमक्या गोष्टी ज्या चेक केल्या पाहीजेत या गाडीसाठी?
  • Log in or register to post comments

१. माझा पास

टवाळ कार्टा
Fri, 05/08/2015 - 13:37 नवीन
१. माझा पास २. continental gt २० चा अ‍ॅवरेज देते बहुतेक ३. टुरींग साठी नाहिये...स्पोर्टी पोझिशन आहे बसण्याची ४. पुण्यात असाल तर कपिलमुनींच्या ओळखीत एक मेकॅनिक आहे बहुतेक आणि नुस्ते धन्यवाद नक्को...घेतली तर १ राउंड मारायला देणार कै? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

नक्की!

खंडेराव
Fri, 05/08/2015 - 14:51 नवीन
घेतली तर एक चक्कर पक्की लक्ष्मी रोडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नक्की का? तेव्हड्यासाठी येईन

टवाळ कार्टा
Fri, 05/08/2015 - 14:56 नवीन
नक्की का? तेव्हड्यासाठी येईन मी पुण्यात परत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

काय हे …

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 05/08/2015 - 15:02 नवीन
ती गाडी लक्ष्मी रोडला जाणार होय? मग काय राईड होणार :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

...आणि इतके करून सिंगल सीट

मोदक
Fri, 05/08/2015 - 15:38 नवीन
...आणि इतके करून सिंगल सीट आहे. सिंगल सीट ऐवजी डबल सीट बसवली तर त्या गाडीचा लूक जातो असे माझे वैयक्तीक मत आहे. (किंवा कदाचित मी पाहिलेल्या लोकांनी टुकार सीट बसवली असेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

होना, हा

खंडेराव
Fri, 05/08/2015 - 15:54 नवीन
आणखीन एक घोळ आहे..नवीन घ्यावी लागेल डबल सीट.. आणि चांगली/ टुकार अशी नाही, आहे ती एकच आहे कंपनीची :-) ती टुकारच दिसते. किमतीची चवकशी केली, ५२०० रु, सीट आणि फुट रेस्ट. हा अजुन खर्च, आणि तो करावाच लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

१) किंमत योग्य आहे का?

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 05/08/2015 - 13:56 नवीन
१) किंमत योग्य आहे का? किंमत व्यवस्थित वाटतेय, सध्या किंमत २+ लाखाच्या घरात आहे. २) चालवायचा खर्च साधारणतः किती येईल? ५००+ सीसी इंजिन आहे त्यामुळे मायलेज येवढा मिळणार नाही २० - २५ च्या आसपास मिळू शकेल. बाकी ऑइल, रेग्युलर चेकअप एन्फिल्ड स्टाइल. १०००० किमी झालेत म्हणजे फ्री सर्विसिंग संपल्यातच जमा. सो दर ३ महिन्यांनी त्याचा खर्च. ३) कोणी ही गाडी वापरली असेल तर काही सल्ला? टेस्ट राईड घेतली होती, स्पोर्टी आहे. इतर बाबतीत रायडींग पोझिशन मला कम्फर्टेबल नाही वाटली. तुम्ही किमान ५ - १० किमी चालवून निर्णय घ्या. ४) जुनी घेत असल्यामुळे काही नेमक्या गोष्टी ज्या चेक केल्या पाहीजेत या गाडीसाठी? गाडी तुम्ही म्हणता तशी जर एक्स्पाटची असेल तर किती कालावधीत १०००० किमी झाले ते बघा. एन्फिल्डचा सुरुवातीचा ३००० - ४००० किमीचा टप्पा फार महत्वाचा. जर त्यात गाडी व्यवस्थित चालली असेल तर ती पुढे जास्त कटकट करत नाही. ह्या गृहस्थांनी कुठे कुठे फिरवली आहे त्याचा पण विचार करा. नवीन गाडी १०K च्या आधी लडाख, किंवा इतर हिली भागात फिरून आली असेल तर इंजिन, क्लचप्लेट सगळ चेक कराव लागेल. सगळ्यात महत्वाच, जाणकार मेक्यानिकला दाखवूनच घ्या. ते अजून डिटेल सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

ओके!

खंडेराव
Fri, 05/08/2015 - 14:50 नवीन
बरोबर..गाडी चालवुन बघतो, त्याशिवाय रायडींग पोझिशन किती सुट होते कळणार नाही, बरीच वेगळी आहे आत्तापर्यंत वापरलेल्या गाड्यांपेक्षा. बरेच रिव्यु वाचले, दोन्ही बाजुची मते आहेत. ज्यांच्याकडे आहे त्यांनी २५ ते ३९ पर्यंत अ‍ॅवरेज क्लेम केलय वेगवेगळ्या परिस्थितीत. सध्याच्या मालकाने १०,००० मधले ४५०० एका ट्रिप मधे केलेत साउथच्या..त्यामुळे चेक करुन घेतो मेक्यानि़क कडुन फायनल झाल्यास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा