✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गोफ - २

ऋ — ऋषिकेश, Sat, 12/15/2007 - 03:48

Book traversal links for गोफ - २

  • ‹ गोफ
  • Up

प्रतिक्रिया द्या
13032 वाचन

💬 प्रतिसाद (19)
म
मुक्तसुनीत Sat, 12/15/2007 - 03:53 नवीन

कंटाळ्याचे बोल :-)

हर हर बोला हर हर बोला बोला अमृत बोला या दुनिये मध्ये थांबायाला वेळ कोणाला ?
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 12/15/2007 - 04:38 नवीन

कोटावरची मेंढा तोफ

देवगिरीला गरजत होती कोटावरची मेंढा तोफ तरी किल्ला गारद झाला नियती विणते मुश्किल गोफ (चारोळी हा प्रकार मला अजून समजलेला नाही, गोखल्यांच्या बहुतेक रचना मला आवडलेल्या नाहीत :-( तरी या वाटेला मी बहुधा जात नाही... मागे एकदा चार लिहिल्या होत्या तितक्याच...)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/17/2007 - 20:19 नवीन

मस्त !!!

डॊ. धनंजय फारच सुंदर चारही ओळी ! (चारोळी) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ऋ
ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 05:13 नवीन

वरवर

वरवर कोरड्या वाटणार्‍या नारळात थंड मधूर पाणी असतं मृगजळ का असेना, अहो वाळवंटातही पाणी असतं
  • Log in or register to post comments
श
शलाका पेंडसे Sat, 12/15/2007 - 10:30 नवीन

वा!

छानच चारोळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
प्रमोद देव Sat, 12/15/2007 - 09:40 नवीन

झकास!

ऋषिकेशराव गोफ बाकी मस्त विणलाय तुम्ही आणि इथल्या समस्त कवींनी. मस्त आहे हा खेळ. चालू द्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 12/15/2007 - 09:55 नवीन

पंचाईत

आहे तर खरच आहे काय? नाही तर खरच नाही काय? पंचायत समीती आहे काय? नाहीतर पंचाईत झालीय काय?
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/15/2007 - 10:34 नवीन

आमचा क्रमांक चार

आम्ची पंचाईत झाली अशी इथली पंचायत गेली तशी आहे आमचा क्रमांक चार पण कोण करतो आमचा विचार ? आमच्या नावावर येते लिहून ते असेल कुणाही कडून पण त्याचा आम्ही करता निषेध देती आम्हाला भावनात्मक छेद.. (च्यामारी हे चारोळी लिहिणे वाटले तितके सोपे नाही हो !) - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ध
धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 10:27 नवीन

छान गोफ

वा वा, गोफ अगदी छान विणलाय सर्वांनी. आम्हालाही लिहायची इच्छा आहे. पण हा काव्यप्रकार आम्ही कधी हाताळलेला नाही. बघतो प्रयत्न करुन काही जमताय का? आपला, (नवखा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 10:32 नवीन

व्वा!

व्वा! ऐकून आनंद झाला... तुमच्या चारोळीची वाट पाहत आहोत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
ऋ
ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 10:31 नवीन

बंद करा हे बंद करा

प्रकाशरावांच्या सुचनेनुसार एक पाचोळीचा प्रयत्न.... आता चोरि बंद करा! अशी मुजोरी बंद करा! अश्लीलता बंद करा! पंचायत, मालक बंद करा! अहो मग बंद करा की बंद करा.. आरडाओरड करून हे सगळं चालू कोण ठेवतय? (झालं गेलं विसरू पाहणारा) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
श
शलाका पेंडसे Sat, 12/15/2007 - 10:34 नवीन

अजून एक.

समाजकंटकाना मारा चिंचेचा फोक आणि मिसळपावचा विणा छान छान गोफ! ही कशी आहे?-:)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/15/2007 - 10:37 नवीन

समाजकंटक

कंटक कुणाला म्हणावे ? ज्यांनी आजवर केली सेवा, समाजाची, पण कुणीतरी, समजते मालक समाजाचा, कंटकांचा कंटक, कुणीतरी ? (ही मराठी साहित्यप्रकारांच्या विष्ठावळीतील, आमची पाचोळी) - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलाका पेंडसे
प
प्राजु Sun, 12/16/2007 - 05:26 नवीन

का

का समाजाच्या नावने बोंबलायचे.. तो ही माणसांनीच बनवलेला.. केला कितीही आरडाओरडा तरी गांव तिथे उकिरडा........! - प्राजु.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:57 नवीन

समाजसेवक

मी आहे समाजसेवक* असेच सारे म्हणतात कर्तृत्व त्यांचं पाहून ते समाजसेवक** ठरतात *अर्थः समाजाची सेवा करणारा **संधीविग्रहः माजासहित असलेले सेवक ;)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/17/2007 - 19:52 नवीन

समाजाचे

समाजाचे नितीनियम आणि संस्कृतीची जाणीव पाळणा-यांसाठी सर्वकाही.. नाहीतर सगळ्याचीच उणीव.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/17/2007 - 20:30 नवीन

खड्डे

मिसळपाववर खोदलेले खड्डे बुजवतांना आम्ही दक्ष राहिलो होतो. म्हणतात की, प्रत्येक खड्ड्यात त्यांनी सुरुंग पेरले होते. ( कोणता प्रकार हाताळला आम्ही कोणास ठाऊक )
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 12/18/2007 - 06:06 नवीन

सुरुंग

मोकळ्या स्वच्छंदी गगनातही पेरू शकतात सुरुंग.. स्वातंत्र्य झेपत नाही, कारण सवयीचे असती तुरुंग!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 12/18/2007 - 21:54 नवीन

मंडालेच्य

मंडालेच्या तुरूंगात घडले गीतारहस्य.. सुखावल्या त्या भित्ती अन गजांवर उमटले हास्य.. - प्राजु.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा