✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल!

च — चतुरंग, Mon, 01/21/2008 - 02:38

प्रतिक्रिया द्या
45513 वाचन

💬 प्रतिसाद (13)
व
वेडा Mon, 01/21/2008 - 10:40 नवीन

वाह! क्या बात है!

माझी आवड्ती गझल... का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा? की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा! भेटून वादळाला, इतुके विचार आता शाबूत एवढाही, का, कोपरा असावा ही नवीन २ कडवी समजली.. शतशः धन्यवाद चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 12:28 नवीन

क्या बात है!

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा क्या बात है! सुंदर... चतुरंगराव, ही गझल इथे दिल्याबद्दल आपलेही अनेक आभार.. तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Mon, 01/21/2008 - 15:30 नवीन

वा वा

इलाही जमादारांची ही गझल आमची अत्यंत आवडती आहे. ती येथे दिल्याबद्दल धन्यवाद. 'जखमा अशा सुगंधी' मधील अनेक गझला आमच्या आवडीच्या आहेत. आपला, (आभारी) धोंडोपंत तात्या --- तुझा फोन येऊन गेल्यावर आम्ही लगेच इलाहींना फोन केला होता. ते १६ फेब्रुवारीला मुंबईत येत आहेत. तेव्हा भेटायचे ठरवले आहे. आपला, (मध्यस्थ) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 18:04 नवीन

धोंड्या,

ते १६ फेब्रुवारीला मुंबईत येत आहेत. तेव्हा भेटायचे ठरवले आहे. इलाहीसाहेबांचा आवडता ब्रँड कोणता ते सांग फक्त! सगळी यथास्थित वेवस्था करू आणि झकासपैकी मैफल जमवू! इलाहीसाहेबांना खास मिपावर टाकण्यासाठी एखादी नवी पेशल गझल लिहायला सांगू.. :) आपला, (मैफलीत रमणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
ऋ
ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 20:00 नवीन

वा!

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा क्या बात है. इलाहींच्या गझला मी वाचलेल्या नाहित. 'जखमा अशा सुगंधी' हे पुस्त्क आहे की आल्बम? -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
आ
आवशीचो घोव् Sat, 10/25/2008 - 20:30 नवीन

या

या गझलेच्या सुरुवातीला एक शायरी आहे. ती मिळेल का?
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 10/25/2008 - 22:17 नवीन

ही घ्या!

वाचलेली ऐकलेली, माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली, माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो, आरशावरती अता आरशाला भावलेली, माणसे गेली कुठे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवशीचो घोव्
प
प्राजु Sat, 10/25/2008 - 20:35 नवीन

इलाही जमादार

यांची माझी अतिशय आवडति गझल आहे ही.. किती वेळा वाचली असेल मी कोण जाणे.. जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा काय जबरदस्त आहे हा शेर..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आनंद Sat, 10/25/2008 - 20:49 नवीन

मस्तच

मस्तच गझल,शोधतच होतो. पण मिपाच्या नियमात बसते? इतकी आवडती गझल वाचतानाही हे मनात आलच. कधी कधी नियमालही अपवाद ही असावेत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 10/25/2008 - 22:17 नवीन

आनंदराव,

ही गजल मी जेव्हा दिली तेव्हा मी नुकताच सभासद झालो होतो आणि तेव्हा मिपाही सुरुवातीच्या दिवसात असल्याने नियम वगैरे बनायचे होते. पुढे पुढे जालावरील ढकल साहित्य आणी कॉपी इतकी होऊ लागली की नियमात बदल करणे क्रमप्राप्त होते. असो. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
च
चौथा कोनाडा Fri, 12/06/2019 - 08:46 नवीन

सहजच मिपा चाळत असताना ही

सहजच मिपा चाळत असताना ही सुंदर गझल पुन्हा"भेटली" बाय द वे वे, आज सायंकाळी ७ वाजता, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, आगरकर रस्ता, पुणे इथं इलाही जमादार यांची प्रकट मुलाखत आहे !
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 12/07/2019 - 22:29 नवीन

खूपच छान गझल

जुना धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
ज
ज्ञान Sun, 12/08/2019 - 17:10 नवीन

वाचलेली ऐकलेली माणसे गेली

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा माथ्यावरी नभाचे ओझे सदा ईलाही दाही दिशा कशाच्या हा पिन्जरा असावा – इलाहि जमादार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा