Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी तरुणांसाठी नोकरी-उद्योग देणारा वेबमंच

अ
अभिरत भिरभि-या यांनी
Wed, 10/22/2008 - 23:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14234 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

म
मुक्तसुनीत Wed, 10/22/2008 - 23:20 नवीन

उत्तम विचार

एक साधा-सोपा उपाय : मिसळपावर च्या या धाग्यावर माहिती देत ठेवा. मिपाचे एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे नवे प्रतिसाद असलेला धागा वर वर येत रहातो. नवी माहिती येत राहील तसा हा धागाही ताजा राहील. (५० प्रतिसाद झाले की नवा धागा उघडणे सोयीचे ! )
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 10/23/2008 - 00:52 नवीन

छान कल्पना आहे...

सहमत... स्वतःची माहिती याच धाग्यावर देत राहावी... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
भ
भाग्यश्री गुरुवार, 10/23/2008 - 00:00 नवीन

मलाही

मलाही कल्पना आवडली.. नोकर्‍यांच्या जाहीराती असतात बर्‍याच.. त्याही मोजक्या ठीकाणांच्या.. या माध्यमातून अशा माहीतीची देवाण घेवाण होईल.. रोजगार,नोकरी-बिझनेस ,मराठी माणसाला उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त कल्पना.. राज ठाकरेंच्या सर्व धाग्यांमधे हाच मुद्दा यायचा, की मराठी माणूस ही कामं करत नाही किंवा त्याच्यापर्यंत पोचत नाहीत. या कल्पनेने थोडाफार तरी हातभार लागेल.. असे वाटते.. तसेच समान कार्यपद्धत/अभ्यास असणार्‍यांचा स्टडी ग्रुप हे ही आवडलं..
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 10/23/2008 - 00:05 नवीन

उत्तम सुचना!

नक्की केले पाहीजे. भरपूर चांगला वापर करता येईल. फक्त असे संकेतस्थळ हे निष्पक्ष (नॉन पार्टिजन) असले पाहीजे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 10/23/2008 - 01:03 नवीन

खुप उत्तम सुचना...

अभिरत भिरभि-या, उत्तम सुचनेबद्दल धन्यवाद. मिपा वर चर्चा, काव्य, साहित्य, पाककृती, कौल, संपादकीय असे बरेच विभाग आहेत. रोजगार म्हनुन एक असा स्वतंत्र विभाग सुरु करता येइल. त्याचा फायदा सर्व गरजु लोकांना होउ शकेल. मिपा च्या संपादक मंडळाकडे असा प्रस्ताव मांडता येउ शकतो. अंतीम निर्णय तात्या व मिपा संपादक मंड्ळाचा. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/23/2008 - 09:28 नवीन

चांगली कल्पना

चांगली कल्पना आहे ही! आणि त्यावरून आठवलं जी.एम.आर.टी.मधे एक तात्पुरत्या स्वरुपातली नोकरी आहे, तिची जाहीरात (बहुदा) अजून दिली नाही आहे. आणि ती नोकरी शक्यतो मराठी भाषिकासाठी आहे. कामाचं स्वरुपः खोडद, नारायणगावच्या जवळपासच्या खेड्यांत जाऊन जी.एम.आर.टी.च्या दृश्य दुर्बिणी वापरून खगोलशास्त्राची स्थानिक लोकांना ओळख करून देणे. रहाण्याची सोय तिथेच (जी.एम.आर.टी.ला) असेल (आणि महिना ~पाचशे रुपये भाडं), जेवण-खाणही सबसिडाईझ्ड (मराठी शब्द?) दरात होईल. कामासाठी प्रवास करण्यासाठी कार्यालयाची गाडी असेल (खर्च आणि त्रास शून्य), महिन्याचा पगार ~६००० शैक्षणिक पात्रता: शक्यतो एम.एस्सी. (भौतिकशास्त्र), खगोलशास्त्राची थोडीफार माहिती असल्यास उत्तम! मराठी भाषिक लोकांना प्राधान्य कारण नारायणगावच्या जवळपासच्या खेड्यांतल्या लोकांशी बोलायचं असेल तर मराठीच भाषा असलेली बरी! कोणी इच्छुक उमेदवार असल्यास माझ्याशी संपर्क साधा. पुढची फॉर्मल अर्ज करण्याची इत्यादी सगळी माहिती काढून देईन.
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 10/23/2008 - 09:38 नवीन

खुपच छान विचार आहे.

रोजगार संधी असा एकादा विभाग मिपा वर सुरु करण्यास काही हरकत नसावी. जिथे एकादी नोकरी उपलब्द असेल त्याची माहिती संबधिताने मिपा वर द्यावी. म्हणजे मराठी गरजवंताला नोकरी मिळु शकेल. वेताळ
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 10/23/2008 - 09:56 नवीन

बायोटेक्नोलॉजी

माझ्या कंपनीत ३- ४ जागा आहेत.. कामाचे स्वरुप- हाय टेक बायोटेक्नोलॉजी संयंत्राचे विक्री व्यवस्थापण. शिक्षण- एम एस्सी इन लाइफ सायन्स / बायोटेक्नोलॉजी पगार- १५०००- ८०००० महीना अनुभवानुसार, मराठी ऊमेद्वारास प्राधान्य.( कंपनीचे मालक मराठी.)
  • Log in or register to post comments
व
वैदेहि गुरुवार, 10/23/2008 - 10:03 नवीन

कम्पनीच

कम्पनीच नाव कळु शकेल का?बायोटेकनोलोजी मधे एम्.बी.ए असेल तर चालेल का?
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 10/23/2008 - 21:21 नवीन

कंपनीचे

कंपनीचे नाव, labindia Instruments Pvt Ltd, we represent biotech giant "Applied biosystem Inc.(ABI)" in india. Labindia is a appx. 700 Cr group and ABI is a 5 billion $ US multinational after merger. Labindia Instruments Pvt. Ltd. was founded in 1981 and promoted by a group of committed and visionary technocrats, engineers and professionals. The founders have since grown Labindia into a highly successful sales, marketing, service and support organization that is recognized all over India as a key supplier of state-of-the-art instrumentation and reagents for biotechnology and life science research. I request you to visit www.labindia.com and www.appliedbiosystems.com For any further details, feel free to contact me at shailendrakawade@gmail.com The four directors of company are, Mr Bhalerao, Mr bibikar, Mr Bapat and Mr upadhye
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैदेहि
व
वेताळ गुरुवार, 10/23/2008 - 10:30 नवीन

मला ही सविस्तर माहिती द्या.

कपनीचे नाव,पत्ता तसेच तुमच मेल पत्ता ही दया.
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/23/2008 - 11:03 नवीन

येथे काही

येथे काही जॉब उपलब्ध आहेत ह्याचा ही उपयोग होतो का पहा ! काही लॉगिन न करता फक्त सरळ आपला सिव्ही अपलोड करु शकता ...! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
म
मिंटी गुरुवार, 10/23/2008 - 11:06 नवीन

माझ्या

माझ्या कंपनीत २-३ जागा आहेत .net Developer अनुभव :- ६ महिने ते २ वर्ष पुणे, मुंबई साठी...
  • Log in or register to post comments
M
mina गुरुवार, 10/23/2008 - 17:58 नवीन

उत्तम कल्पना

मराठी तरूणांचा विचार मराठी माणसानेच करणे आज आवश्यक आहे.यानुसार अभिरत भिरभिर्‍या यांनी सुचवलेली कल्पना अतिशय उत्तम आहे.मिपावर ही कल्पना यश संपादन करेल,याची मला पूर्ण खात्री आहे. आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/23/2008 - 18:11 नवीन

अभिनंदन

http://vipravani.wordpress.com/ आपले अभिनंदन. हेच तर करायचे असते.
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 10/23/2008 - 18:12 नवीन

उत्तम.

खुपच चांगला दुवा चालु केला आहे. मराठी तरूण्-तरूणींना नक्की याचा उपयोग होईल. :)
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या गुरुवार, 10/23/2008 - 18:26 नवीन

धन्यवाद :)

एकूण सर्व प्रतिसाद उत्साहवर्धक आहेत. :) कन्नडमित्र ह्या साईटवर कानडी लोकांना भेडसावणार्‍या माहितीचा अभाव/ मार्गदर्शनाची कमतरता/ उत्तम इंग्रजी नसणे वगरे समस्या दिल्या होत्या. एकूण वर्णन इतके तंतोतंत फिट्ट बसत होते की मी इथे कानडी शब्दाऐवजी सरसकट "मराठी" शब्द टाकला तरी चालेल. असो, हे इवलेसे रोपटे मोठे होवो :) मि.पा. वर प्रस्ताव कसा देतात ते ठाऊक नाही. पण ही औपचारिकता न पाळता आपल्या सार्‍यांचा पाठिंबाने हा प्रस्ताव मि.पा. पंचांकडे सोपवतो.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री गुरुवार, 10/23/2008 - 23:55 नवीन

विधायक पाऊल,

आपले हे पाऊल विधायक असेच आहे. मिपावर याचे वेगळे सदर होऊ शकते. त्यापेक्षाही आपण एक वेगळे संकेतस्थळ निर्माण करु शकतो. त्यामध्ये स्वताचे विश्लेषण, भविष्यकालिन व्यवसाय / नौकरीच्या गरजा, यशस्वी लोकांचे मनोगत इत्यादी आपण व्यावसायीक स्वरुपात निर्माण करु या. त्याचबरोबर समज / गैरसमज इत्यादीही देऊ या. मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्रधर्म वाढवावा हे आपले ब्रीदच आहे.
  • Log in or register to post comments
स
सागर Wed, 10/29/2008 - 13:27 नवीन

काही सुचना

अभिरत भिरभिर्‍या... मस्त नाव आहे... सर्वप्रथम उपक्रमाबद्दल अभिनंदन....मराठी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अतिशय चांगले समाजोपयोगी काम आपण करत आहात. माझ्या काही सूचना: १. शासनाच्या मुख्य रोजगार केंद्रातून रोजगाराच्या संधींबद्दल माहिती मिळवून ती जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवणे ( सरकार मदत करेन की नाही माहीत नाही. पण हेतू पटवून दिलात तर सरकारात काम करणारे मराठी जन नक्कीच मदत करतील. ) २. इंटरनेट या माध्यमाचा प्रभावी वापर : याहू ग्रुप्स , गूगल ग्रुप्स , मराठी फोरम अशा अनेक माध्यमांतून ही माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल. ३. ग्रामीण भागात इंटरनेटवर अवलंबून राहता येणार नाही. पण त्यासाठी चर्चा करुन नेटवर्क उभारता येईल... ४. एक कमिटी असावी जी सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षांमधून उपलब्ध होणार्‍या रोजगारांच्या संधींवर लक्ष ठेवीन (युपीएससी, एमपीएससी, मर्चंट नेव्ही, आर्मी, इ...) आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ई-मेल , परिपत्रक या माध्यमातून पोहोचवेन. ५. एक स्वतंत्र कमिटी असावी जी अभ्यास करेन की एखाद्या विभागात परप्रांतीयांनी रोजगार उभे केले आहेत, त्यांना टक्कर देईन अशी मराठी उद्योजकांची फौज उभारण्यात मदत करेन. इथे लांबचा विचार करुन परप्रांतीयांना टक्कर देण्यासाठी दीर्घमुदतीची नियोजन आखणी करणे आवश्यक आहे या सर्व ढोबळ सूचना आहेत, ४ डोकी एकत्र आली की त्याला चांगले स्ट्रक्चरल स्वरुप देता येईन. एकच सांगतो, सगळी कामे छोट्या छोट्या स्वरुपात वाटून दिलीत तर कामाचा ताणही कोणावर पडणार नाही आणि मराठी जनांसाठी रोजगार मिळवून देण्यात हातभार लावल्याचे समाधानही लाभेल... जय महाराष्ट्र - सागर
  • Log in or register to post comments
च
चैतन्यकुलकर्णी Wed, 11/12/2008 - 00:08 नवीन

ईआरपी सॉफ्टवेअर मध्ये संधी

Namaskar. I am Chaitanya Kulkarni, living in Pune and doing self business from last four years in ERP software. I have developed an ERP system for companies based on Indian Work Pattern and Standards. This ERP system is already sold to two private sugar factories and are working properly on three locations. But due to my personal problems and lack of sufficient finance, I am searching for a Job now. But still I think ERP software which I developed has a good potential and can stood in Market very well. If any one is interested in business for marketing and sales/support of this software then please give me the details at shreeseva.it@gmail.com. You can also contact me if there is any opportunity for the ERP/any such software, Data Analysis tools or s/w etc. in your company. आपल्या सहकार्याबद्द्ल धन्यवाद व अशी महत्वपुर्ण संकल्पना मांडल्याबद्दल आपले अभिनंदन!
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष गुरुवार, 11/13/2008 - 12:39 नवीन

कोणी...

जपान मधे लॉजिस्टिक्/सप्लाय चेन मॅनेजमेन्ट संदर्भात असणार्‍या संधींची माहीती देऊ शकेल का? (थोडीफार जपानी भाषा बोलू शकेन्...डे टू डे ...सरावानी ऑफिशिअल भाषा बोलता येईल.) व्य नि/खरड चालेल
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 11/08/2016 - 00:02 नवीन

धागा काढतोय वर...

धागा काढतोय वर...
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 11/08/2016 - 09:06 नवीन

डांगे अण्णा

भारी खोदकाम केलेत की हो. दिवाळी अंकातला एक उप्क्रम म्हणून हा धागा दखलमध्ये दाखल करावा आणि नेहमी अद्ययावत करावा (विशेष तः शालेय-कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धा परिक्षा यांची माहीती,जाहीराती, वेळा इत्यादी या धाग्यात आल्या तर उत्तमच. नेट पेक्षाही थेट आणि सुटसुटीत समजेल अशी माहीती केव्हाही जास्त श्रेयस्कर. नाखु पालकायनी
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 11/08/2016 - 14:19 नवीन

खोदकामाचं माझं श्रेय नाही हो,

खोदकामाचं माझं श्रेय नाही हो, खरडफळ्यावर कोणीतरी लिन्क दिली काल.. बहुतेक सही रे सई यांनी. मी फक्त धागा वर काढला. अजून काय काय रत्नं असतील मिपामायच्या पोटात देवजाणे! खोदा म्हणजे सापडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
व
वेल्लाभट Tue, 11/08/2016 - 10:08 नवीन

ही कल्पना आधीही चर्चिली होती.

ही कल्पना आधीही चर्चिली होती. छोट्या जाहिराती (घर, इत्यादी विकणे/विकत घेणे) रोजगार या विभागांचा विचार होऊ शकतो
  • Log in or register to post comments
N
NiluMP Wed, 01/18/2017 - 23:18 नवीन

Please think about this.

Please think about this.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा