✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!

ग — गंगाधर मुटे, Wed, 07/09/2014 - 15:34
विठ्ठलाला पिणारा पाहिजे..! Pandharpur बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!

प्रतिक्रिया द्या
19116 वाचन

💬 प्रतिसाद (73)

जय हरी विठ्ठल...!!

आयुर्हित
गुरुवार, 07/10/2014 - 00:33 नवीन
आजच्या या आषाढि एकादशीच्या शुभ पावन दिवशी भक्तीरसात भिजलेले "अरविंद" श्री गंगाधरजी मूटे पाहून मन तॄप्त झाले. जय हरी विठ्ठल...!जय हरी विठ्ठल...!!
  • Log in or register to post comments

--/\--

माहितगार
गुरुवार, 07/10/2014 - 10:25 नवीन
--/\-- जाहले आज बढीया रसपान 'अरविंदा'ने दिले आम्हा आत्मभान !! धन्यवाद
  • Log in or register to post comments

चित्र

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/10/2014 - 11:21 नवीन
ऑफीसात चित्र दिसत नाहीये ... पण धाग्याचे नाव विठ्ठलाला पिणारा पाहिजे..! वाचुन एका खास मिपाकराची आठवण झाली .... =))
  • Log in or register to post comments

शीर्षक भयानक आहे.

भृशुंडी
गुरुवार, 07/10/2014 - 22:49 नवीन
शीर्षक भयानक आहे.
  • Log in or register to post comments

असहमत, भयानक नव्हे मार्मिक

माहितगार
Fri, 07/11/2014 - 08:19 नवीन
शीर्षक मनाला साशंकीत करावयास लावत, पण ती माझ्या मनाचा मळभ आहे जो मला सतत पिणे शब्द पाहीला की नाही त्या गोष्टीची आठवण देतो ? शीर्षक भरकटलेल्या अशुद्ध मनाला आकर्षीत करून आणत आणि सन्मार्गाला नेऊन सोडत. या अर्थाने शीर्षक धक्का तंत्राचा उपयोग करत, पण ते भयानक नाही मार्मिक आहे. काव्य तंत्र आणि समीक्षेबद्दल मला काहीच कल्पना नाही. या काव्यावर काव्यातील भावात्मकते सोबत काव्यतंत्राचा प्रभाव जाणवत राहतो. काव्याच तंत्र असावयास हरकत नाही, भावोत्कटता, सोअत चपखल शब्द सुचणे एवढी असली पाहीजे की तांत्रीकता जाणवली नाही पाहीजे. अर्थात कविची अभिव्यक्त होतानाची भावोत्कटता आणि स्फूर्ती ह्यास गणितीय नियम लागू होऊ शकत नाहीत ते जुळूनच याव लागत अस कुठेतरी वाटल. (चूभु.दे.घे.) हे असूनही भरकटणार्‍या मनांना, तसेच महाराष्ट्रातील अल्कोहोलीक अ‍ॅनॉनिमस लोकांकरता हे काव्य एक ऊत्तम पाठ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी

धन्यवाद

गंगाधर मुटे
Sat, 07/12/2014 - 18:08 नवीन
विश्लेषणाबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

काव्यतंत्राचा प्रभाव

गंगाधर मुटे
Sat, 07/12/2014 - 18:22 नवीन
काव्यतंत्राचा प्रभाव जाणवण्याचे कारण गीत लयीत आणणे, हे आहे. गीत गाताना शब्दांची ओढातान होनार नाही, याची काळजी घ्यावीच लागते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

सहमत

माहितगार
Sun, 07/13/2014 - 19:52 नवीन
होय, ते समजण्या सारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

गीतरचना ओघवती

गंगाधर मुटे
Mon, 07/14/2014 - 09:35 नवीन
मात्र हे गीतरचना ओघवती झाली नाही, हे खरेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

तुमचं टोपण नाव का बदललं? अभय

मराठे
गुरुवार, 07/10/2014 - 23:13 नवीन
तुमचं टोपण नाव का बदललं? अभय होतं ना?
  • Log in or register to post comments

अरविंद हे उपनाव

गंगाधर मुटे
Sat, 07/12/2014 - 18:06 नवीन
अरविंद हे उपनाव मी फक्त भक्तीगितासाठीच वापरत असतो, ज्या भक्तीगीतांना सामाजिक बांधिलकी नसते. केवळ भक्तीभाव असतो. अभय हे उपनाव मी सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या आणि वैचारिक मांडणी करणार्‍या सर्व प्रकारच्या काव्यामध्ये वापरतो. भावभक्ती व सामाजिक बांधिलकी यात द्वंद निर्माण होऊ नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

जय हरी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/11/2014 - 06:55 नवीन
अजून येऊ द्या ! विठठलाला बसायला कंपनी पाहिजे असेल तर कळवावे. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मोहमाया ! बाकी काही नाही !

माहितगार
Fri, 07/11/2014 - 08:54 नवीन
आम्हाला तर कळल तो तुमच्या क्लास मध्ये बसतो ! अन तुम्ही त्याला मिपाच्या कंपनीला बोलावताय ? ( गंमत :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विट्ठल कोणा रुपातही भेटू शकतो ! विंदा म्हणतात-

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/11/2014 - 09:35 नवीन
पंढरपूरच्या वेशीबाहेर आहे एक छोटी शाळा सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल! - विंदा करंदीकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हा हा... मस्तं कविता!

अनुप ढेरे
Fri, 07/11/2014 - 10:03 नवीन
हा हा... मस्तं कविता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१+

माहितगार
Fri, 07/11/2014 - 11:10 नवीन
दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल!
कृष्ण असो वा विठ्ठल, किती खोडकर असले तरीही संदीपनींना संदीपनींचाच, यशोदेला यशोदेचाच रोल पार पाडावा लागतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

@मास्तर म्हणतात करणार काय?

अत्रुप्त आत्मा
Fri, 07/11/2014 - 11:30 नवीन
@मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल!>>>. मस्स्स्त...! *i-m_so_happy*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हायला! जबरीच हो कविता.

बॅटमॅन
Fri, 07/11/2014 - 12:12 नवीन
हायला! जबरीच हो कविता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात! मस्त!

यशोधरा
Sat, 07/12/2014 - 18:24 नवीन
क्या बात! मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त कविता !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 07/13/2014 - 20:45 नवीन
मस्त कविता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जमेल तुम्हाला?

गंगाधर मुटे
Sat, 07/12/2014 - 18:19 नवीन
त्याच्या कंपणीत बसने लैच अवघड असते राव! तरीही लाखो लोकं खुशीने पायीपायी जातात हो कंपनीत बसायला. शिवाय एकदा चढली की गावे आणि नाचावे पण लागते बरं का! जमेल तुम्हाला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरसंधान विठ्ठलावर कि मास्तरवर?

गंगाधर मुटे
Sat, 07/12/2014 - 18:35 नवीन
बिरुटे सर, ज्याला विठ्ठल कळत नाही आणि विद्यार्थीही कळत नाही, ज्याला स्वार्थ कळत नाही आणि परमार्थही कळत नाही, ज्याला चांगले कळत नाही आणि वाईटही कळत नाही, अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.
  • Log in or register to post comments

@त्यामुळे कवीने शरसंधान

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/13/2014 - 09:18 नवीन
@त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

...अशी तारांबळ उडालेल्या

माहितगार
Sun, 07/13/2014 - 20:29 नवीन
...अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही. - विंदा करंदीकरांच्या कवितेवरील गंगाधर मुटे यांचे भाष्य
शक्य आहे की विंदाच्या काव्य जीवनातील सुरवातीच्या काळातील कविता असेल, अर्थात त्यांच मी लेखन फारस वाचलेल नाही पण काव्य लिहिताना शाळा या शब्दाशी यमक जुळवण्या साठी काळा हा शब्द ओढून ताणून आणलेला वाटतो किंवा कसे माहीत नाही. बहुधा तो यमक जुळवण्या पुरताच असावा बाकी रुपक या अर्थाने निरर्थक असावा तरीही प्रथम दर्शनी तो उल्लेख रुचला नाही हे खरे. पण काळ्या रंगा संबंधीत रुपके वापरणारे ते एकटेच भारतीय साहित्यिक नसावेत आणि नवीन काळातील मुल्य बदल होण्या आधी जुन्यापिढीतील कविने विचार केला नसेल हे संभवते. पण बाकी कविता (इश्वर स्वरुप) विठ्ठलाचे शरसंधान करत नाही असे निश्चितपणे म्हणता येईल असे वाटते. इथे कविता शरसंधान अद्वैताच स्वरूप नीटस न कळलेल्या भक्तगणांच करते आहे (कि अद्वैताची मर्यादा सांगते आहे) ? आणि इश्वराच रूप सर्वत्र आहे हि श्रद्धा महत्वाची असली तरी चिमूटभर मीठा सोबत संकल्पनेची मर्यादा समजून घेण्या साठीही हि कविता आहे. काळा रंगाच रुपक वापराव का आधूनीक मुल्यांप्रमाणे विवाद्य मुद्दा असला तरी तो दांभिकतेच स्वरूपावर टिपण्णी असल्यास कल्पना नाही. माणसाला (बारश्याच्या वेळी) इश्वराची अथवा संतांची नाव देण्याची पद्धत मला स्वतःला मुलतः पटत नाही कारण त्या मूळ पुरूष (अथवा इश्वरीय) कडून अभिप्रेत गूणांच्या पेक्षा अगदीच वेगळ्याच गूणांचे दर्शन असंख्य लोकांकडून होताना दिसते. माणूस स्खलनशील असतो आई-वडील किंवा मागच्या पिढीतील लोकांनी काय नाव ठेवले यात नाव असलेल्या व्यक्तीचा दोष नसतो म्हणून त्या व्यक्तीला समजून घेता येते पण नाव ठेवणार्‍या संबंधीत भक्ताला (त्याचा उद्देश चांगला असूनही) समजून घेता येते का ? कवितेतल्या मास्तरांना अद्वैत समजत आहे हि चांगलीच गोष्ट आहे पण गीतेतला आपापल कर्म करण्याचा उपदेश हा अद्वैताच्या कल्पनेपासून फार फारकत घेऊन नसावा आणि मास्तरांची गफलत तेथे होते आहे. (कि कविला अद्वैताची मर्यादा दाखवून द्यावयाची आहे..विद्यार्थ्याचे वेगळे वागण्यातून कविला द्वैताकडे निर्देश करावयाचा आहे का ?) योग्य ठिकाणी कठोर होण्याची गरज असताना सुद्धा शिक्षक आळंम टाळम करतो आहे या कडे कविचा निर्देश असेल काय या बाबतीत मास्तर केवळ एक रुपक आहे पालक आणि समाजही श्रद्धेच्या मर्यादा न समजता दांभिकतेला तर सत्य समजत नाहीए ना ? खोडकरपणा त्याच वेळी मुलांच्या लहान वयातला सहजभाव आहे हे ही कवि स्वतः अप्रत्यक्षपणे स्विकारतोय आणि वाचकापुढेच प्रश्न टाकतो आहे की तुम्ही स्वतः मास्तर/पालक अथवा समाजाचा घटक असाल तर नेमक काय कराल ? म्हणून त्या रंग रूपकाची मर्यादा यमकाची ओढाताण करून केलेली जुळवा जुळव लक्षात घेऊन सुद्धा इतर बाबतीत कवितेची दखल विनोदी आणि गंभीर दोन्ही अर्थांनी घ्यावी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

साधच बघायच झालं तर,विंदांनी

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/13/2014 - 20:44 नवीन
साधच बघायच झालं तर,विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

सहमत

माहितगार
Sun, 07/13/2014 - 20:49 नवीन
हाही अँगल नक्कीच शक्य आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तुमच्या मताचा आदर

गंगाधर मुटे
Mon, 07/14/2014 - 09:40 नवीन
विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कोणत्याही कलाकृतीकडे पाहाण्याच्या दृष्टीकोन व्यक्तीसापेक्ष असतो, तुमच्या मताचा आदर आहे. मात्र मला तसे अजिबात दिसत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मुटेजी, 'अत्रुप्त आत्मा'

माहितगार
Mon, 07/14/2014 - 12:01 नवीन
मुटेजी, 'अत्रुप्त आत्मा' यांनी मांडलेला 'चराचरात विठ्ठल (इश्वर) पाहणे' हा सुद्धा भारतीय अध्यात्म विचार आहे या बाबत आपलेही दुमत असणार नाही. करता करविता सर्वकाही परमेश्वर आहे. मुलाचा दंगा, मस्ती, अट्टल खोड्या हे सर्वकाही इश्वर निर्मित मायाजालच आहे. इश्वराच्या निर्मीत कोणत्याच गोष्टीला इश्वरेतर म्हणून मी नाकारत नाही त्यातही मी निस्पृहतेने इश्वरच (इश्वरी लीला) बघतो. असा काहीसा तो 'अत्रुप्त आत्मा' निर्देशिक करु इच्छित असलेला विचार असावा असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

माहितगारजी,

गंगाधर मुटे
Mon, 07/14/2014 - 12:29 नवीन
माहितगारजी, 'अत्रुप्त आत्मा' यांनी मांडलेल्या अध्यात्मविचारांचा या कवितेत लवलेशही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

व्हाय णॉट?

मेघवेडा
Sat, 09/13/2014 - 16:22 नवीन
हे असं ठाम कसं काय बरं सांगू शकता तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

पोरगा "काळा" म्हणून विठ्ठल

गंगाधर मुटे
Mon, 07/14/2014 - 09:45 नवीन
खट्याळ आणि खोडकरपणा हे विठोबाचे स्वभावगूण नाहीत. फक्त तो पोरगा "काळा" आहे, एवढ्या एका कारणासाठी मास्तरला त्याच्यात विठ्ठल दिसतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अहो विठ्ठल म्हणजेच द्वारकाधीश

प्यारे१
Mon, 07/14/2014 - 14:52 नवीन
अहो विठ्ठल म्हणजेच द्वारकाधीश कृष्ण असं आहे. कृष्णाची बायको रुक्मिणी आहे ना? हा काळा, तो काळा. खट्याळपण आणि खोड्या करणं हे कृष्णचरित्रातनं घेतलेलं आहे. कदाचित आता समीकरणं जुळतील. बाकी कीस बाई कीस चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

समर्थन

गंगाधर मुटे
Mon, 07/14/2014 - 15:13 नवीन
अशा तर्‍हेनेच समर्थन करायचे झाले तर ही कविता विठ्ठलावर नव्हे तर येशू ख्रिस्तावर बेतलेली आहे, आणि तो बालक म्हणजे बजरंगबलीचा अंश आहे हेही सिद्ध करून दाखवता येईल. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बरं तसं करता येईल.

बॅटमॅन
Mon, 07/14/2014 - 15:17 नवीन
बरं तसं करता येईल. सो व्हॉट???? ततः किम्???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

कविता फक्त आपल्यालाच कळतात

सूड
Mon, 07/14/2014 - 15:29 नवीन
कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास झालेला बघून अंमळ मौज वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

गोर्‍या" पोरांमध्ये विठ्ठल नाही?

गंगाधर मुटे
Mon, 07/14/2014 - 09:47 नवीन
मास्तरला "गोर्‍या" पोरांमध्ये विठ्ठल दिसत नाही, हे सुद्धा लक्षात घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/14/2014 - 10:17 नवीन
*dirol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

अहो विठ्ठलाची मूर्ती काळी

अनुप ढेरे
Mon, 07/14/2014 - 10:34 नवीन
अहो विठ्ठलाची मूर्ती काळी असते म्हणून मास्तरांना काळ्या पोरात विठ्ठल दिसला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

दृष्टी-सापेक्षतेनुसार...तुमचं

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/14/2014 - 10:41 नवीन
दृष्टी-सापेक्षतेनुसार...तुमचं बरोबर आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

मास्तला काळा रंगात देव दिसतो

गंगाधर मुटे
Mon, 07/14/2014 - 11:26 नवीन
अहो विठ्ठलाची मूर्ती काळी असते म्हणून मास्तरांना काळ्या पोरात विठ्ठल दिसला.
अगदी अगदी. मी पण तेच म्हणतोय! साने गुरूजींना लहान मुलात देव दिसला. गांधीजींना जनसेवेत देव दिसला. गाडगेबाबांना ग्रामसेवेत देव दिसला. तुकडोजींना मानवतेत देव दिसला. भक्त मंडळींना दगड-धोंड्याही देव दिसला. संतांना भूतदयेत देव दिसला. साधूपुरूषांना चरचरात देव दिसला. . . . . या कवितेतील मास्तला काळा रंगात देव दिसतो! बरोबर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

काळ्या मुलात दिसला.

अनुप ढेरे
Mon, 07/14/2014 - 11:34 नवीन
काळ्या मुलात दिसला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

हम्म हाही अँगल महत्वाचा आहे

माहितगार
Mon, 07/14/2014 - 12:07 नवीन
हम्म हाही अँगल महत्वाचा आहे खासकरून अत्रुप्त आत्मा यांच्या मांडणी सोबत वाचला म्हणजे पटतो असे वाटते. मला वाटते या कवितेकडे बर्‍याच अँगलनी बघता येते किंवा आपण सर्व मिपाकरांनी पाहिले. @ बिरुटेसर, धन्यवाद, तुमच्या या कवितेस पोस्टवण्यामुळे एक चांगल्या कवितेस वाचण्याची संधी मिळाली. (मी कीस जरा जास्तच पाडला असेल तर क्षमस्व.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

अहो, कवितेवर छान चर्चा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/15/2014 - 20:44 नवीन
कवितेवर उत्तम चर्चा झाली पाहिजे, मजा येते. आवडली चर्चा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

वाह...

मदनबाण
Sun, 07/13/2014 - 09:43 नवीन
वाह... माहितगार आणि बिरुटे सरांचा प्रतिसाद आवडला ! :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- "Independent Women Part 1" (With Lyrics) :- Destinys Child
  • Log in or register to post comments

मुस्कटदाबी

गंगाधर मुटे
Mon, 07/14/2014 - 16:03 नवीन
कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास झालेला बघून अंमळ मौज वाटली.
याला मुस्कटदाबी म्हणतात. प्रश्नाची उत्तरे समर्पकपणे देता आली नाही की, एखाद्याची मुस्कटदाबी करायची ही फार जुनी परंपरा आहे. कविता केवळ विंदा करंदीकर यांची आहे म्हणून न पटणारी वस्तुस्थितीही स्विकारायची हे मला जमायचे नाही. तरी पण इथेच थांबतो. या कवितेवियी एक शब्दही आता लिहिणार नाही. तुम दिनको रात कहेंगे तो मै रात कहूंगा!
  • Log in or register to post comments

>>या कवितेवियी एक शब्दही आता

सूड
Mon, 07/14/2014 - 16:10 नवीन
>>या कवितेवियी एक शब्दही आता लिहिणार नाही' जशी तुमची इच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

बळजबरी

गंगाधर मुटे
Mon, 07/14/2014 - 20:27 नवीन
@ सूड, तुम्ही एकीकडे बळजबरीने माझे तोंड दाबून धरले. शब्दबान चालवून मी पुढे लिहिणार नाही याचा बंदोबस्त केला. आता पुन्हा "जशी तुमची इच्छा!!" म्हणताय? :D माझी इच्छा तर कवितेविषयी लिहायची होती. :) शब्दबान चालविण्याऐवजी तुम्ही त्या कवितेचा सविस्तर रसग्रहण करून अर्थ उलगडून दाखवला असता तर मी आपोआपच उघडा/तोंडघशी पडलो असतो ना? त्यासाठी माझी मुस्कटदाबी करायची गरजच नव्हती! जाऊ द्या. आता तरी तुम्हीच अर्थ उलगडून दाखवा. *bye*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अहो लोकांनी वर स्वतःला

अनुप ढेरे
Mon, 07/14/2014 - 20:37 नवीन
अहो लोकांनी वर स्वतःला उमजलेले अर्थ सांगितले आहेत. तुम्हीही सांगा तुम्हाला काय उमगलं. काहीच उमगलं नसेल तर राहुद्या. आणि एकच अर्थ असेल कवितेला असही नाही. एकहून अधिक अर्थ असू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

विंदांच्या अष्टदर्शनेच्या

माहितगार
Tue, 07/15/2014 - 08:30 नवीन
विंदांच्या अष्टदर्शनेच्या प्रस्तावनेत कोणत्याही विचारधारेच्या तत्वज्ञानाच्या विपर्यस्त लेखन होत नाही आहे हे दुसर्‍या समीक्षकाकडून तपासून घेण्याचे भान विंदा दाखवताना दिसतात. दुसरा मुद्दा विंदांची हि कविता कोणत्या काव्य संग्रहातून आहे कल्पना नाही पण त्यांच्या साहित्य लेखनाचा एक मोठा भाग बाल साहित्य आणि बाल कवितांचा असावा. कवितेच्या काँटॅक्स्टची आपल्याला काहीच कल्पना नाही. बर्‍याचदा कविता एखाद्या घटनेवरून सुचलेल्या असू शकतात, किंवा लहान मुलांकरता वरवर लिहिलेल्या कवितेला आपण फारच खोदतोय असे असे तर नाही ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

विंदांना आज अम्मळ हसू आलं

प्यारे१
Mon, 07/14/2014 - 16:09 नवीन
विंदांना आज अम्मळ हसू आलं असेल. :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा