✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी केलेला एक प्रयत्न !!

ख
खटपट्या यांनी
गुरुवार, 06/26/2014 - 12:14  ·  लेख
लेख
संजय क्षीरसागर आणि प्रशांत आवले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी काढलेल्या चित्रावर स्वतंत्र धागा काढत आहे. - --------------------------------------------------------------------------------- बरेच दिवसापासून आमच्या हिचे म्हणणे होते कि आपण हॉल मधील या दर्शनी भिंतीवर काहीतरी चांगले चित्र लावले पाहिजे. बाजारात बरेच फिरलो पण चित्र काही पसंत पडेना. देवाचा/गणपतीचा मोठा फोटो लावावा तर त्या भिंतीपलीकडे नेमके बाथरूम आणि शौचालय येत होते. याच भिंतीवर चित्र लावण्याचे कारण हे कि पलीकडच्या बाथरूम ची ओल सदैव भिंतीच्या पायथ्याशी दिसते व कोणी आले कि तिकडे लक्ष जाते. ते लक्ष विचलित करण्यासाठी छानसे चित्र काढावे/लावावे जेणेकरून घरात आलेला पाहुणा चित्राकडे बघेल व पायथ्याशी असलेल्या ओलाव्याकडे त्याचे लक्ष जाणार नाही. आंतरजालावर शोध घेत असता या वाघोबांनी माझे लक्ष वेधून घेतले. आणि हेच वाघोबा भिंतीवर विराजमान करण्याचे ठरवले. भिंतीवर बिल्डर ने मारलेला डिस्टम्पर कलर होताच त्यावर ओईल पेंट चा पृष्ठभाग तयार करून त्यावर चित्र काढायचे ठरवले. ओइल पेंट चा वापर यासाठी कि पाण्याने चित्र पुसता येईल. बाजारात सहजासहजी उपलब्ध होणारा एशियन अप्कोलाइट चा १०० ग्राम चा डबा घेवून आलो. दोन इंच रुंद ब्रश ने सफेद रंगाचा पहिला हात मारला. (रंग थोडा घट्ट असतो तो पातळ करण्यासाठी त्यात डायरेक्ट केरोसीन/टर्पेण्टाइन ओतू नका. केरोसीन जास्त पडल्यास रंग पातळ होतो जो परत घट्ट करण्याचा काहीच उपाय नाही. यासाठी ब्रश केरोसीन मध्ये ओला करून रंगात बुडवावा.)सुकल्यावर आतील भगवा कलर डोकावत होता म्हणून अजून एक कोट चढवला. रंग ओला आहे कि सुकला आहे हे बघण्यासाठी आमच्या दोन्ही कन्या त्यावर आपल्या बोटांचे ठसे उमटवू लागल्या. असे करता करता चांगले चार ते पाच कोट चढवून दोन ते अडीच दिवसात पृष्ठभाग तयार झाला. स्केच करण्यासाठी ग्लास मार्किंग पेन्सिल वापरली (बाजारात ग्लास मार्किंग पेन्सिल लाल व सफेद रंगात उपलब्ध आहेत) साधी पेन्सिल ओईल पेंट च्या पृष्ठभागावर तितकीशी चालत नाही. ग्लास मार्किंग पेन्सिल नसल्यास मुलांचे क्रेयोन चे खडू सुद्धा चालतात. ग्लास मार्किंग ने स्केच केल्यावर जर ते मनासारखे नाही झाले तर कपडा केरोसीन मध्ये ओला करून आपण स्केच पुसू शकतो. एकदा मनासारखे स्केच झाल्यावर काळ्या रंगाने स्केच भरून टाकले. बाकीचे प्रतिबिंबाचा भाग राखाडी रंगाच्या वेगवेगळ्या छटांनी रंगवला. झाले घरच्या घरी चित्र तयार. पाच वर्षे झाली अजूनही काल परवा काढल्या सारखे वाटतेय. हेच तंत्र वापरून मुलांची खोली रंगवण्याचा विचार आहे. बघू कधी योग येतोय. test
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
116793 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

अप्रतिम

अक्शु
गुरुवार, 06/26/2014 - 12:25 नवीन
वा फारच सुरेख काढलंय चित्र.मला सुरुवातीला वाचताना(scroll down न केल्याने)वाटत होत की रंगीत चित्र असेल.पण हे तर रंगीत पेक्षाही भारी वाटतंय.वेगळा प्रयत्न आवडला.
  • Log in or register to post comments

सुरेख चित्र.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 06/26/2014 - 12:35 नवीन
अतिशय सुरेख चित्र. अभिनंदन. फक्त प्रतिबिंबात स्वतःलाच पाहताना वाघोबांच्या अंगावर 'डर के मारे रोंगटे खडे' झालेले दिसताहेत.
  • Log in or register to post comments

मागे लिहील्याप्रमाणे, सुंदर

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/26/2014 - 12:38 नवीन
मागे लिहील्याप्रमाणे, सुंदर चित्र ! एकावर थांबू नका. तुमच्या हातात कला आहे. अजून चित्रे काढा आणि इथेपण टाका.
  • Log in or register to post comments

भारी काढलंय चित्र!

एस
गुरुवार, 06/26/2014 - 13:40 नवीन
मस्तच. अजून येऊद्या. आणि छायाचित्र घेताना लेन्सचा कोन चित्राच्या पृष्ठभागाला लंबरूप ठेवा म्हणजे अजून छान फोटो येईल.
  • Log in or register to post comments

सुर्रेख! अजून चित्रं येउदेत.

यशोधरा
गुरुवार, 06/26/2014 - 13:45 नवीन
सुर्रेख! अजून चित्रं येउदेत.
  • Log in or register to post comments

दादा,

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/26/2014 - 13:53 नवीन
या स्वतंत्र पोस्टबद्दल अभिनंदन. तुम्ही अजून चित्रं अपलोड करायचा वादा केलायं. चित्रकलेसाठी जरुर वेळ काढा.
  • Log in or register to post comments

मस्त काढलय चित्र. छान युक्ती

कवितानागेश
गुरुवार, 06/26/2014 - 13:59 नवीन
मस्त काढलय चित्र. छान युक्ती आहे. :)
  • Log in or register to post comments

आता कसं....!

प्यारे१
गुरुवार, 06/26/2014 - 14:07 नवीन
आता कसं....!
  • Log in or register to post comments

मस्तच

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 06/26/2014 - 14:22 नवीन
आयडिया झकास
  • Log in or register to post comments

मस्त !

सस्नेह
गुरुवार, 06/26/2014 - 14:47 नवीन
भारीच आहेत तुमच्या खटपटी !
  • Log in or register to post comments

खूप छान चित्र.

प्रचेतस
गुरुवार, 06/26/2014 - 15:47 नवीन
खूप छान चित्र.
  • Log in or register to post comments

मस्त . फक्त सावली वाघोबाची न

म्हैस
गुरुवार, 06/26/2014 - 16:51 नवीन
मस्त . फक्त सावली वाघोबाची न वाटत dragon ची वाटतीये
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

बबन ताम्बे
गुरुवार, 06/26/2014 - 19:33 नवीन
अप्रतिम ! १. चित्राची साईझ काय आहे? २. भिंतीवर डायरेक्ट ऑइल पेंट लावला की आधी थोडे घासून प्रायमर लावला?
  • Log in or register to post comments

भिंत घासून प्रायमर लावला

खटपट्या
गुरुवार, 06/26/2014 - 23:59 नवीन
भिंत घासून प्रायमर लावला पाहिजे खर तर. पण आळसामुळे नाही केले. मागील भिंत मैट फिनिश ची होती म्हणून मग डायरेक्ट कलर चढवला. चित्राची साइज चार फुट X दोन फुट आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

ब्येश्ट...

वपाडाव
गुरुवार, 06/26/2014 - 20:22 नवीन
ब्येश्ट...
  • Log in or register to post comments

चित्र सुरेख आलंय, पाण्यावरील

मराठे
गुरुवार, 06/26/2014 - 20:31 नवीन
चित्र सुरेख आलंय, पाण्यावरील तरंगांमुळे सावली वेगळी दिसणं बरोबर आहे पण सावली तरंगाशी मॅच होत नसल्यामुळे थोडी विचित्र वाटतेय. (आगाऊ सुचना: फोटो जर समोरून काढलात आणि पुरेसा प्रकाश असेल (जास्त नको) तर कदाचीत नीट दिसेल)
  • Log in or register to post comments

झक्कास काढलंय राव हे चित्र.

किसन शिंदे
गुरुवार, 06/26/2014 - 21:01 नवीन
झक्कास काढलंय राव हे चित्र.
  • Log in or register to post comments

सर्वांचे भरपूर आभार, वेळ

खटपट्या
गुरुवार, 06/26/2014 - 23:53 नवीन
सर्वांचे भरपूर आभार, वेळ काढून नवीन चित्रे काढून अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर चित्र रेखाटले आहे

शिद
Fri, 06/27/2014 - 00:48 नवीन
खुपच सुंदर चित्र रेखाटले आहे आणि अगोदर दिलेल्या प्रतिसादाप्रमाणेच पुन्हा म्हणतोय "जबराट". *good*
  • Log in or register to post comments

वाह्ह... आयडियाची कप्लना

मदनबाण
Fri, 06/27/2014 - 07:14 नवीन
वाह्ह... आयडियाची कप्लना आवडली ! :) {कला प्रेमी} मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- मेघा रे मेघा रे... :- प्यासा सावन
  • Log in or register to post comments

मस्त...

मुक्त विहारि
Fri, 06/27/2014 - 07:26 नवीन
झक्कास...
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा सर्वांचे आभार

खटपट्या
Fri, 06/27/2014 - 09:36 नवीन
पुन्हा एकदा सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments

हायला!!

तुषार काळभोर
Fri, 06/27/2014 - 11:21 नवीन
भारीच 'खटपट्या' माणूस आहे हा!
  • Log in or register to post comments

मस्त आयडिया!

पैसा
Fri, 06/27/2014 - 12:52 नवीन
आणि चित्रही आवडले! झक्कास!
  • Log in or register to post comments

खुप छान..! कल्पना आवडली..

माणिकमोति
Fri, 06/27/2014 - 13:48 नवीन
खुप छान..! कल्पना आवडली.. फक्त चित्र न देता ते कसे काढले ते सांगितल्यामुळे प्रयत्न करुन बघेन.. :)
  • Log in or register to post comments

क्रिएटिव्ह!!!

अत्रुप्त आत्मा
Fri, 06/27/2014 - 14:51 नवीन
क्रिएटिव्ह!!!
  • Log in or register to post comments

जबरा !!!!!!

नि३सोलपुरकर
Fri, 06/27/2014 - 19:12 नवीन
अतिशय सुरेख चित्र. अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

ओ भौ, तुम्हाला एक व्यनि

किसन शिंदे
Fri, 06/27/2014 - 20:14 नवीन
ओ भौ, तुम्हाला एक व्यनि धाडलाय. अजून पाह्यला नसावा असं वाटतंय. उत्तराची प्रतिक्षा आहे.
  • Log in or register to post comments

उत्तर दिलंय,

खटपट्या
Fri, 06/27/2014 - 22:59 नवीन
उत्तर दिलंय, उशीर झाल्याबद्दल क्षमस्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

उत्तम !

निखळानंद
Sat, 06/28/2014 - 15:52 नवीन
फक्त 'हे मी काढलेले चित्र !' अश्या प्रकारे इथे न 'फेकता' त्याच्या निर्मिती चे तपशीलवार वर्णन दिल्यामुळे इतरांनाही त्यातून स्फूर्ती मिळू शकेल.. चित्र फार छान ! कल्पना भन्नाट ! पुढील प्रयोगांसाठी शुभेछा ..
  • Log in or register to post comments

एक नंबर !

चौथा कोनाडा
Sat, 06/28/2014 - 17:27 नवीन
एक नंबर ! लिहिलेही छान आहे. आता पुढची खटपट कोणती ?
  • Log in or register to post comments

चित्र आणि तुमची 'खटपट' आवडली!

आतिवास
Sat, 06/28/2014 - 17:36 नवीन
चित्र आणि तुमची 'खटपट' आवडली!
  • Log in or register to post comments

मस्त आलेय चित्र. वाघाचे जे

रेवती
Sat, 06/28/2014 - 20:44 नवीन
मस्त आलेय चित्र. वाघाचे जे प्रतिबिंब काढले आहे, पाण्याजवळ तोंडाचे त्याला जरा चांगले रूप दिल्यास कसे दिसेल?
  • Log in or register to post comments

सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

खटपट्या
Sat, 06/28/2014 - 21:26 नवीन
सर्वांचे पुन्हा एकदा आभार. @ रेवतीतै -पाण्यात पडलेल्या प्रतीबिम्बाबद्दल बर्याच लोकांचे तेच मत आहे. सुधारणा करायला हवी
  • Log in or register to post comments

पाण्यात वाघ पाणी प्यायला

प्यारे१
Sun, 06/29/2014 - 20:37 नवीन
पाण्यात वाघ पाणी प्यायला लागलेला आहे, जीभ लावली पाण्याला तिथं पाण्याची वर्तुळं निर्माण होणारच की.... इतर भाग सुद्धा त्या अनुषंगानं बदलणार... प्रतिबिंब काय घंटा दिसणारे हलत्या पाण्यात? चित्रात बदल नको असं वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आणखी एकः त्या वर्तुळाच्या

प्यारे१
Sun, 06/29/2014 - 20:40 नवीन
आणखी एकः त्या वर्तुळाच्या रेघा तेवढ्या वाघाचं तोंड पाण्याला लागतंय ती जागा केंद्रस्थानाशी धरुन पर्स्पेक्टीव्ह धरुन वाढवाव्या लागतील. ती जी ड्रॅगन ची मान वाटतेय तिथं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

परफेक्ट निरीक्षण आवळे साहेब !

खटपट्या
Mon, 06/30/2014 - 02:56 नवीन
परफेक्ट निरीक्षण आवळे साहेब !!! धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>> आव'ळे'

प्यारे१
Mon, 06/30/2014 - 03:06 नवीन
>>> आव'ळे' कमळ ळ नसून ते लसूण ल आहे साहेब. कृपया नोंद घ्यावी. (जल्ला मराठीचा लई लोचा हाय पब्लिकचा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ओक साहेब आय माय सॉरी.

खटपट्या
Mon, 06/30/2014 - 04:51 नवीन
ओक साहेब आय माय सॉरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अहो ते "ओक" नाहीत आवले आहेत :

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/29/2014 - 13:19 नवीन
अहो ते "ओक" नाहीत आवले आहेत :) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

एक्का साहेब ओके च्या ऐवजी ओक

खटपट्या
Wed, 07/30/2014 - 11:11 नवीन
एक्का साहेब ओके च्या ऐवजी ओक झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

झकास!

सुधीर
Mon, 06/30/2014 - 12:55 नवीन
सुरेख, चित्र काढण्यामागच्या हेतूमुळे मलाही प्रेरणा मिळाली. :)
  • Log in or register to post comments

वा! फारच सुंदर आहे चित्रं.

शुचि
Mon, 06/30/2014 - 19:21 नवीन
वा! फारच सुंदर आहे चित्रं.
  • Log in or register to post comments

सुरेख

सविता००१
Fri, 07/11/2014 - 11:41 नवीन
अप्रतिम आहे चित्र
  • Log in or register to post comments

वाह

vrushali n
Sat, 07/12/2014 - 21:25 नवीन
किती मस्तं!!!!
  • Log in or register to post comments

सुधीर, शुचि, सविता००१, वृषाली

खटपट्या
Sat, 07/12/2014 - 22:29 नवीन
सुधीर, शुचि, सविता००१, वृषाली एन. मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments

अररररर… कसलं भारीये हे…. व्वा

वटवट
Tue, 07/29/2014 - 12:35 नवीन
अररररर… कसलं भारीये हे…. व्वा… अ फा ट
  • Log in or register to post comments

मस्त

कविता१९७८
Tue, 07/29/2014 - 12:37 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Tue, 07/29/2014 - 12:56 नवीन
चित्र अगदी जिवंत वाटते आहे
  • Log in or register to post comments

वटवट, कविता, आशु जोग धन्यवाद

खटपट्या
Wed, 07/30/2014 - 11:10 नवीन
वटवट, कविता, आशु जोग धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा