मरणे कठीण झाले
मरणे कठीण झाले
जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले
ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले
हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले
कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले
बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले
सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला
माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले
एकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले
आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले
दिसतात "अभय" येथे चकवे सभोवताली
रस्ताच जीवनाचा सुचणे कठीण झाले
- गंगाधर मुटे
------------------------------------------------------
अवांतर :
याहो पवारदादा, इकडे अभय जरासे
चिक्कार घाम जाता --णे कठीण झाले
------------------------------------------------------
सुंदर...
सुंदर
भयाण परिस्थितीचे हुबेहुब वर्णन..
-
छान..
छान, पण
मनपूर्वक धन्यवाद.
आपले लिखाण खरोखर दर्जेदार व प्रचंड वास्तववादी असते.
स्पर्धा विजेती गझल
अभिनंदन! आवडली गझल...
अभिनंदन !
"तूच आहे तुझी जीवनाचा शिल्पकार"
- सरकारे येतात आणि जातात.
"कीव येईल असेच आयुष्य जगायचा संदेश"
- मी तुम्हाला मतीमंद किंवा
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
कुर्हाडीचा दांडा
गुजरात विकासाचे मृगजळ..
- गुजरातचा शेतकरी FIVE STAR
"भाव दृढ करा"
आत्महत्या करण्याची पाळी
तोट्यात कास्तकारी
परत एक तोडका मोडका प्रयत्न...
"कोथींबीर महागली,अन
ओक्के. अजुन एक चूक झाली, २
अभिनंदन! गझल आवडली.
छान !
तेव्हाही परिस्थीती बिकट होती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Arash - Boro Boro | Nippandab Remix | FAST & FURIOUS [Dubai Scene]