✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा कट्टा, पुणे.

प
प्रभाकर पेठकर यांनी
Sun, 10/05/2008 - 11:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14696 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 10/05/2008 - 11:06 नवीन

कट्टा हुकला

गटण्या॑चे अभिन॑दन! मला काही वैयक्तिक अडचणी॑मुळे कालचा मिपा कट्टा अटे॑ड करता आला नाही ह्याचा मनस्वी खेद आहे. पण म॑डळी॑नी मजा केली हे पाहून आन॑द झाला. फोटू आणि लेखाबद्दल पेठकरकाका॑चेहे आभार
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sun, 10/05/2008 - 11:10 नवीन

आनंद झाला.

आनंद तर झालाच पण येण्याची इच्छा असुनही येता आले नाही याचे अतिव दुख झाले. आपला वृतांत वाचुन थोडेफार "दुधाची तहान" या उक्तीचा प्रत्यय आला. तात्याने आपल्या या ज्ञानाचा फायदा इतरांना करुन देण्यासाठी दृक्श्राव्य माध्यमाचा उपयोग केला पाहिजे. सध्या तबकडी बनविणे सोपे आहे तशी ध्वनिफीत बनविता येऊ शकते. आणि 'पुन्हा भेटूच' ह्या शब्दात एकमेकांची रजा घेतली. या वाक्यात मी फक्त "लवकर" हा शब्द जोडू इच्छितो.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/05/2008 - 11:12 नवीन

काका, मस्त

काका, मस्त वर्णन आणि तुम्ही लोकांनी एकंदरीत धमाल केलेली दिसते. तात्यांचे फोटू तर क्लासच! त्यांच्या गाण्याचं रेकॉर्डींग कोणी केलं आहे का? पहिल्या फोटूत तात्यांबरोबर आणखी कोण मंडळी आहेत? मलाही कार्यबाहुल्यामुळे(!) येता आलं नाही त्यामुळे तुम्हा लोकांना असात्विक संगीताचा आस्वाद घेता आला नाही त्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि क्षमस्व. अदिती
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 10/05/2008 - 11:40 नवीन

सांगतो....

पहिल्या फोटूत तात्यांबरोबर आणखी कोण मंडळी आहेत? पहिल्या फोटोत तात्यांच्या उजव्या बाजूला पूर्ण बाह्यांचा सदरा घातलेले श्री. नीलकांत, तंत्रज्ञ मिपा. तात्यांच्या डाव्या बाजूलाऽऽऽऽ???? नीट ओळख झाली नाही किंवा मी विसरलोय. पण प्रतिसादांमधून तेच पुन्हा आपली ओळख करून देतील अशी आशा आहे. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ड
डोमकावळा Mon, 10/06/2008 - 11:24 नवीन

झकासराव

आहेत ते... ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Mon, 10/06/2008 - 20:07 नवीन

धन्यवाद....

त्यांची 'झकास' अशी ओळख झालीच नाही. असो, आता लक्षात ठेवीन. माफी असावी झकासराव... जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डोमकावळा
झ
झकासराव Mon, 10/06/2008 - 20:38 नवीन

अहो राहु

अहो राहु द्या हो काका. माफी मागुन लाजवता कशाला? :) काल आम्ही समस्त तरुण वर्गाने शेव आणि उकडलेले शेंगदाने गिळुन गप्प बसण्याचच काम केल की. तुमची चौफेर फटकेबाजी बघत होतो. पेठकर काका, विजुभाउ, घाटपांडे काका आणि तात्या .... बाकी कोणाला बोलायला काही चान्सच नाही की. ;) त्यांची 'झकास' अशी ओळख झालीच नाही>>> मग तुम्ही फोटोग्राफी संबंधीत चर्चा कोणाशी केलीत?? :) कट्टा एकदम झकास झाला. कट्ट्याच्या व्यवस्थापनात "गटण्या"चा "नारायण" झाल्यामुळे कसलीही अडचण आली नाही. :) तात्या लयी भारी हसतात. एकदम सात मजली. आणि विजुभाउ आणि पेठकर काकानी हसण्याच्या अनेक संधी दिल्या. "सज्जन" एकदम उच्च होता. :) आणि हो तात्याच्या नरड्यात आणि विजुभाउंच्या बासरीत अम्मंळ मजा आहे राव. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विसोबा खेचर Mon, 10/06/2008 - 23:01 नवीन

आणि हो

आणि हो तात्याच्या नरड्यात आणि विजुभाउंच्या बासरीत अम्मंळ मजा आहे राव. धन्यवाद रे झकासा... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
प
प्रभाकर पेठकर Tue, 10/07/2008 - 00:13 नवीन

खरेच की....

मग तुम्ही फोटोग्राफी संबंधीत चर्चा कोणाशी केलीत?? अहो मैफिलीतल्या उत्तरार्धातील घटनांचे डोक्यातील तपशील जरा अपरिहार्य कारणाने सरमिसळ झाले आहेत. पण आता तुम्ही आठवण करून दिलीत आणि ट्यूब लख्ख पेटली बघा. धन्यवाद. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
व
विजुभाऊ Mon, 10/06/2008 - 09:36 नवीन

त्याबद्दल

त्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा ? हे काय गौड्बन्गाल आहे/ कोणाचा वर्धापनदिन होता? ज्या कोणाचा असेल त्याना त्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
य
यशोधरा Sun, 10/05/2008 - 11:12 नवीन

रेकॉर्डिं

रेकॉर्डिंग केलंत का?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 10/05/2008 - 11:42 नवीन

केलं आहे...

चौदा मिनिटांचे केले आहे. सध्या ते 'सेन्सॉर बोर्डाकडे ' आहे. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
च
चित्रा Mon, 10/06/2008 - 05:48 नवीन

अच्छा

छान, मजा केलेली दिसते आहे. तात्यांच्या गाण्याचे रेकॉर्डिंगही चढवा असल्यास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मुक्तसुनीत Mon, 10/06/2008 - 08:32 नवीन

+१

हेच म्हणतो . कट्टा जोरदार झाला असे दिसतेय ! व्हीडीओ क्षणचित्रे पुरवा अशी विनंती :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
आ
आनंदयात्री Mon, 10/06/2008 - 09:41 नवीन

रेकॉर्डिंग

रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे पण ते मोबाईलवर शुट केल्यामुळे 3gp फॉरमॅट मधे आहे, उद्या दुपारपर्यंत देण्याची व्यवस्था करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रकाश घाटपांडे Sun, 10/05/2008 - 11:32 नवीन

मठ्ठ माणुस

अगदी साध्या आणि सोप्या भाषेतील वर्णन आणि सोबतीला माझ्यासारख्या ह्या विषयातील मठ्ठ माणसालाही 'यमन' रागाचे सौंदर्य सहजी लक्षात यावे म्हणून 'गाना मेरे बसकी बात नही, सुर और तालका मेल नही' ही ओळ वेगवेगळे गायक कसे गातील हे प्रत्यक्ष गाऊन दाखविले. मलाच खूप मजा आली
अहो पेठकर सायेब आपन या विषयात मठ्ठ आहोतच पन आपन गुंगुन गेल्तो कि नाई. गाना मेरे बस कि बात नही या शब्दांनीच आपली संगीताशी जवळीक साधली गेली. पेठकर साहेबांचा रंग- पानी तेरा रंग कैसा जिस मे मिलाऎ जाये वो जैसा। हे अनुभवाला आले. तरी म्हन्ल पेठकर सायेब पानीच का टाकत्यात प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
क
कवटी Sun, 10/05/2008 - 16:40 नवीन

तरी

तरी म्हन्ल पेठकर सायेब पानीच का टाकत्यात =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 10/06/2008 - 08:29 नवीन

पण घाटपांडे साहेबही काही कमी नाहीत.

रम्य ही स्वर्गाहून लंका घाटपांडे साहेबांनी काय सही म्हटले अगदी त्यातल्या सतारीच्या आवाजसकट.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ऋ
ऋषिकेश Sun, 10/05/2008 - 11:33 नवीन

वा!

आमच्या नशीबात कार्यबाहुल्य (!!) नको तेव्हा नको त्या दिवशीच का आडवं येतं कोण जाणे.. असो... कट्ट्याला म्हणजे अपेक्षेप्रमाणे फूल टू धमाल केलेली दिसतेय :) तात्यांच्या भावमुद्रा प्रेक्षणिय ;) पेठकरकाका, इथे फोटू चढवल्या बद्दल व व्रुत्तांतावद्दल अनेक आभार.. विकासरावांचा फोटू नाहिये का? -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 10/05/2008 - 11:36 नवीन

नाही...

विकासरावांचा फोटू नाहिये का? नाही नं.. ते नुसतेच कट्ट्याचे दार ठोठवून परतले. त्यांचे कांही महत्वाचे काम होते. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
व
विनायक प्रभू Sun, 10/05/2008 - 13:10 नवीन

सहमत्स्

http://vipravani.wordpress.com/ सहमत. आनंद झाला. अवांतरः फोटो बघुन तात्या रागावले तर कसे दिसतील ह्या बाबतीत प्रश्न निर्माण झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ट
टारझन Sun, 10/05/2008 - 13:48 नवीन

अरे वा !

सर्वप्रथम सर्व कट्टेकरूना आणि खास गटणेला आयोजनाबद्दल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... तात्यांच्या भावमुद्रा भावल्या ... लाष्टचा फोटू क्लास ... असो .. कमीत कमी ठाणे कट्ट्याला उपस्थिती लाउ शकू असा अशावाद :) सोनेरी द्रव्यांचे ना फोटो दिलेत ना वर्णन ? सात्विक झाला का काय कट्टा ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sun, 10/05/2008 - 13:54 नवीन

अरे व्वा..!!

मस्त मज्जा केलेली दिसतेय तुम्ही लोकांनी तर....... :) फोटो बघून पुरेपूर अंदाज आला ;) तात्यांचे फोटो "विलक्षण बोलके" आलेत :)
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 10/05/2008 - 14:28 नवीन

अरे वा,

अरे वा, मज्जा केलेली दिसतेय. असे कट्टे वारंवार घडो :) -------------------------------------------------------------------------------------------- प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 10/05/2008 - 14:42 नवीन

सही

मस्त! जोरदार मजा केलेली दिसते. विकासराव यांचा फोटू काढायला पाहीजे होता. असो. पेशव्यांची त्यांच्या न्हाव्याशी भेट झालेली दिसते. :-) [संदर्भ इस्ट कोस्ट कट्टा फोटु] तात्यांचा व्हीडिओ लवकर येउ दे. माननीय आनंदयात्रीजी क्या कहने! रामगोपाल वर्मानी श्री. गटणे यांना पाहीले तर पुढच्या सिनेमात नक्की कास्ट करतील असे वाटते. नीलकांत कधी जॉइन होणार रे? पेठकरकाकांचा, घाटपांडेकाकांचा फोटो का बरे नाही आला? स्वगतः तात्यांच्या भावमुद्रा पाहून असे वाटते की त्यांचे लक्ष त्यांच्या "पितळी तांब्या" कडे आहे व ते गाण्यात मग्न आहेत हे पाहुन गटणे हळुच "तांब्या" रिकामा करु पहात आहे ;-)
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 10/05/2008 - 14:53 नवीन

कट्टा जोरदार झाला असावा.

पेठकर साहेबांनी काढलेले फोटो फार सुंदर आहेत. पेशव्यांनी पान खायला सुरुवात केलेले दिसते आहे. (आलोच आहे इंडीयात तर केस कापून घ्यावेत.) यात्री आणि नीलकांत सुखवस्तू दिसायला लागले आहेत. बाकी उपस्थीती कमी वाटते आहे. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 10/05/2008 - 15:35 नवीन

फोटो आहेत.

इतर सदस्यांनीही काढलेले फोटो आहेत जे कदाचित येतीलच मिपावर. माझे फोटो 'निवडक' आहेत. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 10/05/2008 - 15:46 नवीन

जियो

जियो मिपाकर्स....असे कट्टे वारंवार होवोत हीच इच्छा!!! अजून फोटो टाकायला हवे होते...बाकीची मंडळी कुठे आहेत??? --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
घ
घासू Sun, 10/05/2008 - 15:54 नवीन

फोटोची॑ लि॑क जोडणे

अहो काही ठिकाणी फोटो नाही दिसत हो, एखादी लि॑क जोडा की?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 10/05/2008 - 16:14 नवीन

घासू, हे

घासू, हे फोटो बहुधा फ्लिकर वर चढवून मग इथे लिंकवले आहेत. आपल्या इथे यु.ए.ई. मधे फ्लिकर बॅन आहे. फोटो बघायाला काही युक्ति लागेल ती मी तुम्ही भेटाल तेव्हा सांगेन. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घासू
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 10/05/2008 - 16:17 नवीन

कट्टा

कट्टा एकंदरीत छानच झालेला दिसतो आहे. काका, तुम्ही लिहिलंय पण छान. तात्याराव एकदम फॉर्मात दिसत आहेत. मी धम्याला फोन करायचा खूप प्रयत्न केला पण फोन लागतच नव्हता :( . तात्याला केला नाही कारण मला वाटलंच होतं की तो गाण्यात रंगला असणार. असो. बिपिन.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 10/05/2008 - 16:22 नवीन

पेठकरशेठ, क

पेठकरशेठ, कट्टा वृत्तांत लै भारी.. सगळ्या गोष्टी अगदी छान कव्हर केल्या आहेत. बाकी, कट्ट्यावरील काही काही गोष्टींवर कव्हरच राहू दिलेत ते बरे केलेत.. :) फोटू टाकण्यात आपली काहीतरी गडबड झाली होती ती आता सुधारली आहे... काल आपल्या सर्व मिपाकरांसोबत कट्ट्याला खूप मौज आली.. :) तात्या. -- आम्ही देवांपाशी तेलाच्या दिव्यासमवेत, तुपाचाही दिवा लावतो.. :)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 10/05/2008 - 16:56 नवीन

हा पुणे

हा पुणे कट्टा यशस्वी केल्याबद्दल समस्त मिपाकरांचे अभिनंदन... ( आणि आयोजनाबद्दल गटणेचे सुद्धा अभिनंदन)... कट्ट्याचे मस्त वर्णन.... पेठकर काकांना धन्यवाद... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 10/05/2008 - 17:43 नवीन

गोडी अपूर्णतेची

कट्ट्यावर थोड्यावेळासाठी का होईना जाऊन सर्वांना प्रत्यक्षात भेटता आले म्हणून आनंद झाला. पण ८-१० दिवसांसाठीच असल्याने एकाच संध्याकाळी अनेकांना भेटणे गरजेचे होवून गेले होते. त्यामुळे वरील वृत्तांत वाचल्यावर संपूर्ण कार्यक्रमासाठी राहता आले नाही याची रुखरुख लागली. परत लवकरच भेटता येईल अशी आशा करतो...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/05/2008 - 17:50 नवीन

मस्त !!!

फोटो, कट्टा वर्णन सहीच !!!
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 10/05/2008 - 19:08 नवीन

तात्या जरा बारीक झालेला दिसतोय?

का रे तात्या? सध्या काही पथ्यावर वगैरे आहेस की काय? असो. आता ठाणे कट्टा कधी?
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 10/05/2008 - 19:11 नवीन

पेठकर साहेब, तुम्ही दिसत नाही!

सगळयांना टिपता टिपता तुमच्या कॅमेर्‍यावर स्वतःचे एकही चित्र उतरले नाही? अहो द्यायचात कुणालातरी तुम्हाला टिपायला. बाकी वृत्तांत झकास. भेटु एकदा सवडीने.
  • Log in or register to post comments
म
मी_ओंकार Mon, 10/06/2008 - 20:56 नवीन

हेच म्हणतो

बाकी वृतांत आणि छायाचित्रे छान. - ओंकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
प
प्राजु Sun, 10/05/2008 - 23:00 नवीन

कट्ट्याचे

कट्ट्याचे फोटो मस्त. पुण्याचे पेशवे आत एकदम सभ्य वाटताहेत. बहुतेक, अमेरिकेतून घरी पोचल्यावर केसांवर कात्री चालवली गेली वाटतं. तात्यांचे गातानाचे फोटो एकदम मस्त. त्याचं रेकॉर्डींग केले आहे का? यूट्यूब वर टाकाल का ? आवांतर : सखाराम गटणे कौल काढण्याव्यतिरिक्त इव्हेंट मॅनेजमेंटही चांगली करू शकतात असं दिसतंय. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Sun, 10/05/2008 - 23:54 नवीन

सही..

कट्टा जोरात झालेला दिसत आहे त्याबद्द्ल समस्त मिपाकरांचे अभिनंदन...
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 10/06/2008 - 00:29 नवीन

जोरात

मजा आलेली दिसते. पेठकरकाका - धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 10/06/2008 - 03:55 नवीन

व्वा.......

व्वा. कट्टा जोरदार झालेला दिसतोय्,,आम्ही आपले फोटो पाहुनच समाधान करुन घेतो..ठाणे कट्ट्याची वाट पाहतो आहे !! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 10/06/2008 - 08:11 नवीन

माझा कट्टा

माझा कट्टा हुकला :( तुम्ही मजा केलेली दिसतेय मस्त :) रेकॉर्डींग केल आहे का गाण्यांच? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 10/06/2008 - 09:07 नवीन

फोटो,

फोटो, कट्टा वर्णन सहीच !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
श
शिवा जमदाडे Mon, 10/06/2008 - 09:42 नवीन

लै बेष्ट...

लै बेष्ट मजा केलीत लोकाहो तुम्ही...... थोडं रेकॉर्डींग बी लवकर चढला जालावर..... - (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 10/06/2008 - 09:56 नवीन

दिवाळी दसरा

साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा !! या उक्तीचा प्रत्यय आला :) संत तात्याबा महाराजांनी खास कट्ट्यासाठी पुण्यात येउन यावर्षी आम्हाला दिवाळी दसरा अंमळ आधीच घडवला. संत तात्याबा महाराजांचे प्रवचन फार छान झाले, सर्वप्रथम त्यांनी निरनिराळ्या किश्यातुन, विनोदातुन त्यांचे अफाट जिवनविषयक तत्वज्ञान सांगितले. नंतर "गाना मेरे बस की बात नही" हे बाबुजी कसे म्हणतील अन अण्णा कसे म्हणतील असे उदाहरण घेउन समजवुन देतांना यमन रागाचे काही बारकावे समजावुन दिले. तात्याबांच्या सत्संगाला तिर्थ हवेच म्हणुन पेठकरकाकांनी उंची स्कॉच आणली होती सगळ्यांसाठी (ग्रँड्स). पेठकरकाका फुल्ल फॉर्मात ब्याटिंग करत होते. तात्या, पेठकर काका, प्रकाशकाका अन विजुभाउं यांची विनोदांची आतिशबाजी ऐकुन आख्खा कट्टा प्लस बाजुचे वेटर मंडळी हसुन हसुन बेजार झाले होते. धमाल मुलगा वीस पंचवीस वेळा ठ्याssss झाला होता. तरुण मंडळी तशी गप्पच होती, कोणतरी कानात कुजबुजले पण होते की "तरुण तुर्क अन म्हातारे अर्क" म्हनुन, कोण म्हटले आठवत नाय बॉ आता ! ;) काय वर्णन कितीही करता येईल अजुन पण काहीही म्हणा कट्ट्याला लै मजा आली राव !!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 10/06/2008 - 10:07 नवीन

ठीऽऽऽक आहे..

तरुण मंडळी तशी गप्पच होती, कोणतरी कानात कुजबुजले पण होते की "तरुण तुर्क अन म्हातारे अर्क" म्हनुन, कोण म्हटले आठवत नाय बॉ आता ठीऽऽऽऽऽक आहे आनंदराव! आम्ही 'म्हातारे अर्क' काय? पाहतोच आता पुढच्या कट्ट्याला तुमच्याकडे. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Mon, 10/06/2008 - 10:25 नवीन

गैरसमज..

गैरसमज..गैरसमज..गैरसमज.. !! काका तुम्ही तर तरुणात होते ना :D .. बस्स का ?? बर आपण हा विषय थांबवुयात, मिपाची आचारसंहिता पाळुयात ना !! ;) (विषय थांबला म्हणजे मी सुटलो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/06/2008 - 11:31 नवीन

डरपोक

>> (विषय थांबला म्हणजे मी सुटलो) आंद्या हलकट्ट ऐवजी तुझं नाव आंद्या डरपोक केलं पाहिजे. बाकी पेठकर काका तरूणांत मोजले जावेत याला माझंही अनुमोदन! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Mon, 10/06/2008 - 11:43 नवीन

हि हा हा

डरपोक म्हणा काहीही म्हणा !! आम्ही चिडणार नाही :D तुम्हाला माहितीये का ? पुर्वी लोक आंतरजालावर वावरायला गेंड्याची कातडी लागते असे म्हणायचे आता आंद्याची कातडी लागते असे म्हणतात !! -आंद्या हलकट (यापुढे खरडवहीतुन बोलावे ही ण्म्र विनंती)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा