ओढ
पहिले सूर्यकिरण
त्याचे आसुसले नयन,
रात्रभर पळाला तो
धरणीस भेटण्याला .......
लहानशी कळी
उमलतेय तळी,
तिची धाव ती
वृक्षास व्यापण्याला .......
नदीचे काठ जशी
चांदण्यातली वाट,
चालण्याचा योग परी
आसुसली भेटीला ........
भिरभिरती नजर
तिची धाव अवाक्यापर,
काव्य धाव घेतेय
निसर्ग पिण्याला ........
कशाची तरी ओढ
हवी माणसाला,
नाहीतर निष्फळ आयुष्य
काय अर्थ जगण्याला ........
श्री. साजीद यासीन पठाण
दह्यारी
पलूस, सांगली (महाराष्ट्र)
कल्पना चांगली आहे; पण शब्द
१००% खरे आहे!
छान
छान काव्य