पण माझं लहानपण, तो हादगा, त्या मंदिरातल्या आरत्या हे सगळं-सगळं हातातून निसटणार्या वाळूसारखं वाटतंय.
वा सुंदर वाक्य !
मनातील विचार व्यवस्थीत प्रकट झाले आहे.. अभिनंदन !
लेखन आवडले ! अंबाबाईचे नाव घेताच कोल्हापुर आठवले होते आधी पण तुम्ही मिरजे बद्दल लिहत होता... कोल्हापुरला पण २० एक वर्षापुर्वी खुप मस्त पैकी नवरात्र होतं असे... त्याची कळत नकळत आठवण तुमच्या लेखामुळे झाली !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
भाग्यश्री,
छान लिहिले आहेस.
हादगा, नवरात्र हे दिवस म्हणजे अगदी सर्वत्र एक उत्साहाचे वातावरण असते.
कोल्हापुरच्या साईडला हादगा -खिरापत वाटणे हे खुप चालते.
आणि अंबाबाई देवळात तर खुप सुंदर रोशनाई असते आणि नऊ दिवस वेगवेगळ्या रुपातील अंबाबाईचे दर्शन होते, नऊ दिवस पालख्या निघतात .
:)
पण माझं लहानपण, तो हादगा, त्या मंदिरातल्या आरत्या हे सगळं-सगळं हातातून निसटणार्या वाळूसारखं वाटतंय.
हीच भावना मनात आली..
आमच्याकडे हादग्याला भोंडला म्हणतात.ऐलोमा पैलोमा.. खिरापती..ती मजा...
ह्म्म.. आता तर भोंडल्याची गाणीच माहित नाहीत कितिक जणांना..म्हणून आम्ही शाळांमध्ये ५ वी ते ७ वीच्या मुलींकडून भोंडल्याची गाणी पाठ करून घेतली आणि त्या मुलींचा भोंडला घातला,खिरापतीसकट..:)मुलींना खिरापत ओळखायला खूप मजा वाटली.
घंटाळीदेवीच्या अंगणात नवरात्राचे कितीतरी छान छान कार्यक्रम,व्याख्याने होत असत. विंदा,पाडगावकर,बापट या त्रयींचं काव्यवाचन मी प्रथम तिथेच ऐकलं. भावसरगम हा हृदयनाथांचा कार्यक्रम,पं भीमसेन जोशींची अभंगवाणी,प्रा.शिवाजीराव भोसल्यांची व्याख्यानं आणि किती तरी..
अष्टमीला ब्राह्मण सेवासंघातल्या देवीला जायचं .तिचा मुखवटा तांदळाच्या उकडीचा असतो आणि तो चढवणं म्हणजेच एक मोठा सोहळा! घागरीफुंकणार्या बायकांविषयी भीतीयुक्त कुतुहल संघात आणि घंटाळीला अष्टमीला गेलो की वाटायचं..
आणि दसर्याला तर घंटाळीचं सारं देऊळच गोंड्याच्या फुलांनी(झेंडू) केशरी सोनपिवळं होत असे.(अजूनही होत असेल पण आता ते पहायला दसर्याला ठाण्यात असायला हवं.)
भाग्यश्री,तुझ्या लेखाने त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.
स्वाती
त्यामुळे गरब्याचं अप्रुपही वाटतंय, पण माझं लहानपण, तो हादगा, त्या मंदिरातल्या आरत्या हे सगळं-सगळं हातातून निसटणार्या वाळूसारखं वाटतंय.
हा आठवणींचा अमुल्य ठेवा हीच त्या रम्य बालपणाची देणगी. संवेदनशील मनाला ह्या आठवणी तात्काळ त्या बालपणात घेऊन जातात, आपण रममाण होतो. वर्तमान, त्याचे बंध, ते खोटेपणाचे मॅनर्स, ती मनावरील विविध दडपणं आणि नातीगोती टिकविण्याची केविलवाणी धडपड सर्व गळून पडतं आणि मन स्वच्छंदपणे त्या बंध विरहीत बालपणात बागडतं.
मन ताजंतवानं होऊन जातं. असह्य ताणाच्या वर्तमानातही खळखळून हसण्याची प्रेरणा देतं.
मस्त लिहिलं आहे. अभिनंदन.
वाचून मला माझ्या लहानपणीचा भोंडला आठवला. माझी आई हौसेनं एका वेळेस पंधरा पंधरा खिरापती करायची. अगदी साखर खोबर्या सारख्या साध्या पदार्थापासून ते गुळाची पोळी, वेगवेगळे भात, भेळ, वाटली डाळ आणि काय काय.
लग्न झाल्यावर पहिल्यांदा अष्टमीला घागरी फुंकणे म्हणजे काय ते पाहीले. सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे घागरी उदवून त्या अंगात येणार्या महीलांना द्यायला सांगितले. एका बाईंच्या अंगात सुपरवूमन आली (संचारली) कि काय, त्यांनी घागरीसकट पलायन केले. मी घाबरले तर सासूबाईंनी सांगितले कि येतील त्या परत तासाभराने. मी फार हसले त्यादिवशी. चित्पावन संघात सकाळी पुजेला गेल्यावर तिथल्या आजीबाईंनी विचारले,"अगों, कोकणस्थाची म्हणवतेंस तर रंग बरिक सांवळाच हों तुझा." लग्गेच दुसर्या बाईंनी उत्तर दिले कि हिचे माहेर देशस्थाचे हों. त्यानंतर अग्गोबाई!, होक्का, वगैरे बोलणी ऐकून जाम मजा वाटली.
रेवती
सुंदर लिहिलं आहेस नवरात्र.
आम्ही माझ्या आत्याकडे जायचो. तिच्याकडे मोठ्या प्रमाणात असायचं नवरात्र. मुखवटा उभा करून त्याला साडी दाग दागिने... सगळंच सुंदर.
नऊ दिवस सकाळ संध्याकाळ रोज ३०-३५ माणूस जेवायला.
रात्री आरती.. आणि अष्टमीला घागरी फुंकायच्या.. खेळ आणि गाणी.
सगळंच हातातून निसटून गेलंय..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
खूप मस्त लिहीलंयस गं.. सगळं लहानपण आठवलं!!
(तुझं नाव वाचून मी हबकलेच! म्हटलं हा लेख मी कधी लिहीला?किंवा मी इतकी फेमस कधी झाले की माझ्या नावाचे डुप्लीकेट आयडी आले! :)) ह.घे..! मीही भाग्यश्री कुलकर्णीच! :) )
लेख मस्तच लिहिलाय. :)
अवांतर : मी आता प्रश्नच विचारणार होतो की मि पा वर दोन दोन भाग्यश्री कुलकर्णी झाल्या की काय?
कारण मला माहीत असलेली भाग्यश्री एवढुशा वयात मिरज, नाशिक, पुणे आणि अमेरिका कधी कधी फिरली हा प्रश्न मनात आलाच. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
आमच्याकडेही एखाद्या दिवशी पाटावर हत्ती काढून त्याभोवती फेर धरला जायचा
माझ्या लहानपणीची आठवण झाली. घरी रोज भोंडला (=हादगा) असे, आणि रोज एक खिरापत वाढवत जाई.
माझी माता तिचं १० तास काम करून त्यात ह्या खिरापती वगैरे मस्त करत असे. ती सुपरमाता आहे हे आता कळलंय.
प्रतिक्रिया
पण माझं
मस्त
भावना..
नॉस्टॅल्जिआ...
स्मृतीरंजन
स्मृतीरंजन...
भाग्यश्री,
भाग्यश्री..
एकदम सुंदर
+१
खूप मस्त
लेख मस्तच
भोंडला
छोटेखानी
मस्तच लिहिलाय ।।।।