✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझी मिठि अद्याप खुली आहे..........

प — पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे, Sun, 01/05/2014 - 14:27
कानी पडला आवाज पैंजणांचा झपकन नजर मागे गेली मनास झाला भास पावलांचा मला तर वाटले तुच आली असे कित्येकदा होत असते तुच सगळीकडे दिसत असते वार्याची एखादी झुळुकही तुझ्या येण्याची चाहुल भासते तु दूर जातेस जेव्हा परतीची मी वाट बघतो ज्या वाटेने गेलीस तु त्याच वाटेवर उभा राहतो तुझे निघुन जाणे नेहमीचेच माझेही वाट पाहणे नेहमीचेच जरी प्रेम आपल्यात टिकुन आहे आपले भांडण होणे नेहमीचेच तु परत येण्याची खात्री आहे तरी अजुन रात्र भित्री आहे लवकर परत येशील का तु? माझी मिठि अद्याप खुली आहे.......... - कवि म.ना.दे.

प्रतिक्रिया द्या
8988 वाचन

💬 प्रतिसाद (41)

व्याकरण

वेल्लाभट
Sun, 01/05/2014 - 14:34 नवीन
तेवढं बघा जरा...
  • Log in or register to post comments

तरी व्याक्रण बघून धाय

बॅटमॅन
Sun, 01/05/2014 - 14:48 नवीन
तरी व्याक्रण बघून धाय मोकलायाची गरज नाही हे कै कमी नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात....

पंडित मयुरेश न…
Sun, 01/05/2014 - 18:34 नवीन
व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

आयला, कवितेच्या कव्हरातनं

संजय क्षीरसागर
Sun, 01/05/2014 - 18:43 नवीन
जाहिरातीची मिठी खोल्लीये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे

आयला, कवितेच्या बाहूतून

संजय क्षीरसागर
Sun, 01/05/2014 - 18:46 नवीन
हलकेच जाहिरातीची मिठी खोल्लीये! क्या आयडिया है सरजी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे

व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात....

पंडित मयुरेश न…
Sun, 01/05/2014 - 18:45 नवीन
व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

हे घ्या तपशील:

सूड
Mon, 01/06/2014 - 14:41 नवीन
कानी पडला आवाज पैंजणांचा झपकन नजर मागे गेली मनास झाला भास पावलांचा मला तर वाटले तूच आली असे कित्येकदा होत असते तूच सगळीकडे दिसत असते वार्याची एखादी झुळूकही तुझ्या येण्याची चाहूल भासते तू दूर जातेस जेव्हा परतीची मी वाट बघतो ज्या वाटेने गेलीस तू त्याच वाटेवर उभा राहतो तुझे निघून जाणे नेहमीचेच माझेही वाट पाहणे नेहमीचेच जरी प्रेम आपल्यात टिकुन आहे आपले भांडण होणे नेहमीचेच तू परत येण्याची खात्री आहे तरी अजून रात्र भित्री आहे लवकर परत येशील का तू? माझी मिठी अद्याप खुली आहे..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे

मला तर वाटले तूच आली

यसवायजी
Mon, 01/06/2014 - 15:35 नवीन
मला तर वाटले तूच आली
आली ?? मुंबईच्या मुली म्हणतात तसे का? मी आली, मी गेली.. आमच्या कोल्लापुरात 'आलीस' म्हणतात.. बाकी यमकासाठी कायपन चालतय म्हणा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ओ काका,

कवितानागेश
Mon, 01/06/2014 - 15:38 नवीन
ओ काका, आमच्या मुंबईला काही बोलायचं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

काका >>> ब्बॉर्र...

यसवायजी
Mon, 01/06/2014 - 17:07 नवीन
:)) काका :)) >>> ब्बॉर्र... आणी माऊ, कुणीतरी म्हटलंय... मुंबईला जर कुणी एक भिकार म्हणालं तर आपण सात भिकार असं म्हणून मोकळं व्हावं.. (जाज्वल्य अभिमानी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

>>मुंबईच्या मुली म्हणतात तसे

सूड
Mon, 01/06/2014 - 15:50 नवीन
>>मुंबईच्या मुली म्हणतात तसे का? मी आली, मी गेली.. आमच्या कोल्लापुरात 'आलीस' म्हणतात.. आमच्याकडं पन त्येच म्हनत्यात, पर त्येचं कसंय ह्ये कवी लोकं त्येंचं त्ये येमक का काय जुळवाया सूट घेत्यात. शेवटी तुमी म्हनलंच हा न्हवं 'बाकी यमकासाठी कायपन चालतय म्हणा..' म्हमयच्या पोरींचं म्हराटी काय ईचारता. त्येस्नी लाज वाटती म्हराटी बोलाया. ;) स्वगतः काडी टाकली, आता पळावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

जाऊद्या हो!!

वडापाव
Sun, 01/05/2014 - 18:53 नवीन
निरंकुश: कवयः म्हणून सोडून द्यायचं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

बाऽरीक दुरुस्ती

बॅटमॅन
Sun, 01/05/2014 - 23:52 नवीन
ते निरंकुशा: कवयः असे आहे, निरंकुशः हे एकवचन झाले. कवी हे निरंकुश असतील पण तसे सांगणार्‍या वाक्याला मात्र व्याकरणाचा अंकुश आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव

अर्रर्रर्रर्र

वडापाव
Mon, 01/06/2014 - 14:00 नवीन
चुकलो चुकलो चुकलो चुकलो :)
कवी हे निरंकुश असतील पण तसे सांगणार्‍या वाक्याला मात्र व्याकरणाचा अंकुश आहे
आवडलं. पटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आँ !!!

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 01/05/2014 - 14:45 नवीन
आँ !!!
  • Log in or register to post comments

हा प्रकार

संजय क्षीरसागर
Sun, 01/05/2014 - 15:17 नवीन
तु परत येण्याची खात्री आहे तरी अजुन रात्र भित्री आहे लवकर परत येशील का तु? माझी मिठि अद्याप खुली आहे........
....अपरात्री घडल्यासारखा वाटतो.
  • Log in or register to post comments

अस काही नाही..

पंडित मयुरेश न…
Sun, 01/05/2014 - 18:44 नवीन
अस काही नाही कि रात्रीचीच कविता आहे.....हे शेवटच कडव आहे ज्यात तो ती गेल्यावर रात्रहि कशी भासते ते सांगतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

असंय होय

संजय क्षीरसागर
Sun, 01/05/2014 - 18:51 नवीन
मिठी मारल्यावर ती गेली का कविनं उगीच आपली मिठी खुली सोडलीये? (ती आली तर बोलण्यात वेळ जायला नको म्हणून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे

ओ

इरसाल
Mon, 01/06/2014 - 14:18 नवीन
मग ती बंद कधी करताय ?
  • Log in or register to post comments

हो ना लवकर करा

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 01/06/2014 - 15:30 नवीन
यांच्या मिठ्यांची वर्णन वाचता वाचता आमच्या मुठी वळू लागल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

लिहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/06/2014 - 19:54 नवीन
छान. अजून लिहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

पंडित मयुरेश न…
Tue, 01/07/2014 - 20:25 नवीन
धन्यवाद तुम्ही कवितेला छान म्हणलात म्हणुन नाही तर निदान एकानी तरी कवितेला साजीशी प्रतिक्रिया दिली.... ऊगाच पानचट प्रतिक्रिया वाचुन थोडा हिरमुसलो होतो..........या संकेतस्थळावर नविन असल्यामुळे या प्रकाराची सवय नाही अजुन........ पण तुमच्या प्रतिक्रियेने धीर दिला......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. बिरूटेसरांसाठी अजून लिहा

सुहास..
Mon, 01/06/2014 - 19:59 नवीन
छान. बिरूटेसरांसाठी अजून लिहा. ;)
  • Log in or register to post comments

लेका...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/06/2014 - 20:06 नवीन
बिरूटेसरांसाठी अजून लिहा. आपल्या सर्वांसाठी म्हणायचं ना राव. :( कानी पडला आवाज पैंजणांचा झपकन नजर मागे गेली मनास झाला भास पावलांचा मला तर वाटले तुच आली यातले पैंजण साले आता दिसतच नाही. कुठे आवाज नै कै नै. बंजारा स्त्रीया छम छम आवाज येणा-या पैजणं घालायच्या आता तेही दिसत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

आँ सर कहिच दिसत/एकु येत नाहि म्हणता???

दिपक.कुवेत
गुरुवार, 01/09/2014 - 14:36 नवीन
म्हणजे वय झालं आता!!!
  • Log in or register to post comments

सरांना म्हणे

इरसाल
गुरुवार, 01/09/2014 - 15:42 नवीन
मेणबत्त्या मोजता मोजता लागे धाप !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

चांगली प्रतीक्रिया

पंडित मयुरेश न…
गुरुवार, 01/09/2014 - 18:20 नवीन
एखादा जेव्हा चांगली प्रतीक्रिया देतो तेव्हा त्य्चे स्वगत करयची मनसिकत ठेवा... तुमच्यासारख्यांमुळेच लोक अशा चांगल्या संकेत स्थळांवर येणे बंद करतात........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

अरे देवा

इरसाल
Fri, 01/10/2014 - 10:04 नवीन
:hz:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे

एक काम करा,

सूड
Fri, 01/10/2014 - 14:13 नवीन
पुढल्या वेळेपासून 'माझ्या लिखाणाला चांगलंच म्हणा' अशी सूचना लिहीत चला तुमच्या लिखाणात. एकाला आवडली म्हणून दुसर्‍यालाही आवडलीच पाह्यजे असा नियम आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे

प्रतिक्रिया किमान पानचट नसावी

पंडित मयुरेश न…
Fri, 01/10/2014 - 16:43 नवीन
चुका काढण्याविषयी किंवा टीका करण्याविषयी माझी काहीच हरकत नाही........ पण टीका कवितेला समर्पक असाव्यात एवढी साधी अपेक्षा आहे....... माझ्या कवितेला चांगलच म्हणा अशी अपेक्षा नाही पण किमान टीका करताना त्या टीकेचाही अभिमान वाटुद्या....... साहीत्यात लेखका इतकच समिक्षकालाही मान आहे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कविता बरी असावी. वाचेन नंतर.

प्यारे१
Fri, 01/10/2014 - 14:54 नवीन
कविता बरी असावी. वाचेन नंतर. अवांतरः तुमचं नाव पंडित आहे का? तुम्हाला ज्योतिष विषयक सल्ला कसा विचारु? इथेच की फोन वर? फी किती? वास्तुशास्त्रानुसार संडास कुठल्या दिशेस असावा? भाग्यांक सांगण्यासाठी तुम्हाला काय माहिती द्यावी लागते? Gemology म्हणजे काय? भारतातला भ्रमण ध्वनी क्रमांक आहे का? धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे

>>वास्तुशास्त्रानुसार संडास

सूड
Fri, 01/10/2014 - 15:05 नवीन
>>वास्तुशास्त्रानुसार संडास कुठल्या दिशेस असावा? कुठल्या का दिशेस असेना पटकन अ‍ॅक्सेसेबल असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ऑटोमॅटिक?

प्यारे१
Fri, 01/10/2014 - 15:07 नवीन
ऑटोमॅटिक? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कवितेवर प्रतिक्रिया देताय ना?

पंडित मयुरेश न…
Fri, 01/10/2014 - 16:46 नवीन
कवितेवर प्रतिक्रिया देताय ना? मग कवितेविषयीच बोला ना.....अवांतर विषयांसठी दुसरे खादे सदर बघा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पंडीत मयुरेशकाका

सूड
Fri, 01/10/2014 - 16:53 नवीन
पंडीत मयुरेशकाका प्यारेकाकाकडे दुर्लक्ष करा. असाच आहे तो. वशाड मेलो !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे

>>> अवांतर विषयांसठी दुसरे

प्यारे१
Fri, 01/10/2014 - 16:55 नवीन
>>> अवांतर विषयांसठी दुसरे खादे सदर बघा.. हे काय वाईट आहे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे

श्री श्री

इरसाल
Fri, 01/10/2014 - 15:27 नवीन
सुड आणी प्यारे१... तुमच्यासारख्यांमुळेच लोक अशा चांगल्या संकेत स्थळांवर येणे बंद करतात. समजलं !
  • Log in or register to post comments

अहो आम्ही ज्योतिष विषयक सल्ला

प्यारे१
Fri, 01/10/2014 - 16:12 नवीन
अहो आम्ही ज्योतिष विषयक सल्ला विचारला होता फक्त. बाकी संडास कुठे असावा हा प्रश्न असतोच की. सूड ने तातडीच्या वेळची गरज सांगितली इतकंच. ह्या मुळं लोक बंद होत असतील तर आमचा 'ना विलाज'!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

सुपारी घेतलीय का?

सूड
Fri, 01/10/2014 - 16:54 नवीन
सुपारी घेतलीय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अस्सं

इरसाल
Fri, 01/10/2014 - 16:54 नवीन
आला तुमचा डाव माझ्या लक्षात.... मग कवितेविषयीच बोला ना.....अवांतर विषयांसठी दुसरे एखादे सदर बघा.
  • Log in or register to post comments

आला तुमचा डाव माझ्या लक्षात....

संजय क्षीरसागर
Sat, 01/11/2014 - 11:46 नवीन
मी पैलेच म्हटलं होतं कवितेच्या बाहूतून हलकेच जाहिरातीची मिठी खोल्लीये! क्या आयडिया है सरजी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा