Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाव कट्टा - सॅन होजे/सॅन फ्रान्सिस्को व परिसर बे एरिया

ब
बेसनलाडू यांनी
Wed, 09/10/2008 - 01:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13210 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

न
नाटक्या Wed, 09/10/2008 - 02:05 नवीन

नक्कीच..

मी नक्कीच येइन. कट्टा माझ्या घरी केल्यास चालू शकेल. मी फ्रिमाँट येथे रहातो. त्यामुळे ईस्ट बे मधील मंडळींना देखील सोयीचे होईल.. साधारणतः किती लोकं येणार हे जर कळले तर 'ईतर' व्यवस्था करणे सोपे पण होईल.. - नाटक्या
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 09/10/2008 - 02:12 नवीन

अरे वा, बे-कट्टा होणार तर आता!

मस्त! भरपूर मिपाकर सहकुटुंब, सहमित्र जमूदेत! मजा करा. आमच्या शुभेच्छा. (खुदके साथ बातां : रंग्या, एखादी कॉन्फरन्स नाही का रे त्या सुमारास बे-एरियात? ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Wed, 09/10/2008 - 02:19 नवीन

कट्टा..

हीच कॉन्फरन्स समजुन आलात तरी चालेल.. किंबहूना स्वागतच होईल... - नाटक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/10/2008 - 02:28 नवीन

कॉन्फरन्स

नाटक्या, रंगाला बहुतेक तिकीट एक्स्पेन्स करायचे असेल ;-) -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या
न
नाटक्या Wed, 09/10/2008 - 02:33 नवीन

आमची..

कंपनी स्टार्ट अप आहे. त्यामुळे याहू सारखी दिवाळी साजरी करणे परवडणार नाही.. - नाटक्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
च
चतुरंग Wed, 09/10/2008 - 18:55 नवीन

सर्किटराव अनुभवी आहेत आणि मनकवडेही!

बघा कसं बरोब्बर ओळखलं त्यांनी! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
भ
भाग्यश्री Wed, 09/10/2008 - 02:45 नवीन

अरे वा

अरे वा ठरला का एकदाचा कट्टा करायचे? मी याच विकेंडला येतेय सॅन्टा क्लाराला.. तेव्हा परत २७ ला येणं जमेल की नाही माहीत नाही.. जमलं तर सहीच!
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 09/10/2008 - 03:57 नवीन

बहोत अच्छे !

कट्ट्यास शुभेच्छा ! (खुदके साथ बातां : मुशा , एखादी टेले-कॉन्फरन्स (म्हन्जे आपले वेब्-काष्ट हो !!) नाही का रे करता येणार बे-एरियात? )
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Wed, 09/10/2008 - 04:26 नवीन

हो..

करता येईल ना!! याहू तात्काळ निरोप्या वरून पाहू शकाल. वेळ आणि ठिकाण नक्की झाल्यावर कळवतो.. - नाटक्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ब
बेसनलाडू Wed, 09/10/2008 - 04:31 नवीन

सहमत

याहू वर कॉन्फरन्स् करता येईल. रंगाशेठलाही तिकिट एक्स्पेन्स् क्लेम् करायची भानगड नको ;) तूर्तास शनिवार २७ सप्टेंबर २००८ रोजी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ ते ७ हीच निश्चित वेळ. एखाद दिवस थांबून मग शिक्कामोर्तब करून टाकायचा विचार आहे. (आमंत्रक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या
ए
एक Wed, 09/10/2008 - 04:03 नवीन

मी येईन.

खाण्यापिण्याची काही सोय करायची असेल तर नक्की सांगा.
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 09/10/2008 - 06:00 नवीन

आधी/नंतर

त्याच्या आधीचा (२० सप्टें) किंवा नंतरचा (४ ऑक्टो) वीकांत चालण्यासारखा आहे का? २७ च्या वीकांताला नेमकी बे एरियावरूनच मित्रमंडळी येत आहेत. :(

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 09/10/2008 - 06:37 नवीन

२० ला ये तू

अनधिकृत कट्टा करू :) पण २० ला सगळ्यांनाच चालणार असेल आणि तुलाही जमणार असेल, तर माझी हरकत नाही. मी २० ला मोकळा वेळ ठेऊ शकेनच. (अनधिकृत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
न
नाटक्या Wed, 09/10/2008 - 06:40 नवीन

> अनधिकृत

> अनधिकृत कट्टा करू .. मला पण चालेल. - नाटक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बबलु Wed, 09/10/2008 - 12:45 नवीन

एका पायावर ...

मी एका पायावर तयार आहे. :) २० किंवा २७ सुद्धा चालेल. ....बबलु-अमेरिकन
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 09/10/2008 - 12:53 नवीन

सही

२० सप्टेंबर चालेल का सर्वांना? पिडांकाका/सर्किटराव?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/10/2008 - 21:37 नवीन

२० ला

२० ला मला नाही रे जमणार. मला फक्त २७-२८ च्या विकांतालाच जमू शकेल. पण २१ ला इथे असणार असशील तर आपण भेटू शकतो. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
पिवळा डांबिस Wed, 09/10/2008 - 22:04 नवीन

नाही रे!

२० ला मला नाही रे जमणार! १५ ते १९ मी सॅन डियागोमध्ये आहे (विसरलास?:)) लगेच २० ला विरुद्ध दिशेला इतक्या लांब यायला नाही जमणार... (घरची लाकडं फोडायची असतात!!!!:)) २७ असेल तर काही विचार करता येईल... त्यानंतरच्या तारखांनाही विचार करता येईल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ध
धमाल मुलगा Wed, 09/10/2008 - 12:57 नवीन

करा मज्जा

करा मज्जा :) सही रे बेसनलाडु! एकदम मिटींगीचा अजेंडाच लिहिला हैस की रं :) करा करा, च्यायला, केव्हाचं घोळतंय तिकडं कट्टा करायचा, आमच्या डांबिसकाकांना आता किती बरं आणंद झाला असेल :) मस्त मजा करा, आणि हो, फोटो बिटो द्या इथं चढवून. कट्ट्याला शुभेच्छा! (जमल्यास त्या नंदनला काँप्युटर्सपलिकडे लिवंत माणसंही असतात ह्याची आठवण करुन द्या.)
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Wed, 09/10/2008 - 21:48 नवीन

मला वाटते..

जर सगळ्यांना शक्य असेल आणि मंजुर असेल तर आपण संध्याकाळी ६:३० वा. जमूया. शनिवार असल्यामुळे दुसर्‍या दिवशी उठण्याची पण घाई नसेल तेव्हा रात्री उशीरापर्यंत कट्ट्यावर निवांत गप्पा हाणता येतील. खाणे-पिणे पण चापून करता येईल. मिसळ-पाव, पुलाव, मसाला-पापड, सॅलड वगैरे वगैरे असा भक्कम बेत करावा म्हणतो.. मिसळ-पाव ची जवाबदरी माझी. बाकी सगळ्या गोष्टी सारख्या वाटून घेवू. काय पटते का? - नाटक्या...
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Wed, 09/10/2008 - 21:48 नवीन

मला वाटते..

जर सगळ्यांना शक्य असेल आणि मंजुर असेल तर आपण संध्याकाळी ६:३० वा. जमूया. शनिवार असल्यामुळे दुसर्‍या दिवशी उठण्याची पण घाई नसेल तेव्हा रात्री उशीरापर्यंत कट्ट्यावर निवांत गप्पा हाणता येतील. खाणे-पिणे पण चापून करता येईल. मिसळ-पाव, पुलाव, मसाला-पापड, सॅलड वगैरे वगैरे असा भक्कम बेत करावा म्हणतो.. मिसळ-पाव ची जवाबदरी माझी. बाकी सगळ्या गोष्टी सारख्या वाटून घेवू. काय पटते का? - नाटक्या...
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Wed, 09/10/2008 - 21:58 नवीन

मला पण यायची इच्छा आहे पण...

फारच लांब आहे...मी डेट्रॉइट ला आहे. कट्ट्याला शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 09/11/2008 - 01:14 नवीन

हा हंत!!!

हा हंत!!!! २७ला कट्टा आणि १ तारखेला परीक्षा :( :( माझ्यापण लांबूनच शुभेच्छा कट्ट्याला... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
ए
एक गुरुवार, 09/11/2008 - 02:11 नवीन

२० ला जमू शकेल बहुतेक..

१४ नंतरचा लगेचचा विकेंड आहे त्यामुळे इतके दिवस तुंबून राहिलेली "पूल पार्टी" त्यादिवशी उपटली नाही तर नक्कि जमू शकेल.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 09/17/2008 - 04:30 नवीन

अंतिम निर्णय

कट्ट्यासंबंधी सर्वांच्या सोईचा एकत्रित विचार करता पुढील वेळ आणि स्थळ निश्चित झाले आहे. स्थळ - नाटक्याचे घर, फ्रीमॉन्ट - विस्तृत पत्ता लवकरच देण्यात येईल. वेळ - शनिवार दि. २७ सप्टेंबर २००८, स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ ते ७ (किंवा ५ ते ८?); गरज पडल्यास सर्वांची सोय पाहून घड्याळी वेळ पुढे-मागे करता येईल, पण तारीख हीच सोईची आहे, असे दिसते. निश्चित सहभाग - १. नाटक्या २. सर्किट ३. बेसनलाडू ४. एक ५. बबलु-अमेरिकन हे मिपाकर आणि काही मित्रमंडळी आणि/किंवा कुटुंबिय सहभागाच्या प्रतीक्षेत (?) - १. फटु २. श्रीकृष्ण सामंत ३. पिवळा डांबिस ४. भाग्यश्री यापुढील चर्चा - कट्ट्यासाठीचा मेनू (मिसळपावसोबत आणखी काय? :) ) आणि (असल्यास) प्रस्तावित कार्यक्रम. कट्ट्याला येण्यासाठी सॅन होजे, मिल्पिटास,सनीवेल,सॅन्ता क्लॅरा भागातून कोणाला राइड हवी असल्यास माझ्या गाडीत २ ते ३ जणांसाठी जागा असेल. (आमंत्रक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 09/17/2008 - 04:42 नवीन

विनंती

फोटो येतीलच. रेकॉर्डींगही करा. सर्कीटराव हे उत्तम गाणार्‍यांपैकी आहेत. (ध्वनिमुद्रणाच्या प्रतीक्षेत असणारे एक हौशी गायक. ) त्यांची दादागिरी ( या बाबतीत तरी) सहन करू नका. गायल्याशिवाय थेंबसुद्धा चाखायला मिळयची नाही म्हणावे ;-) आणि हो , बाकीच्याही गुणी मिसळपावकरांना ऐकायला आवडेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
न
नाटक्या Wed, 09/17/2008 - 05:25 नवीन

वेळ

४-७ (किंवा ५-८) असण्या पेक्षा ७ ते कितीही करुया का? म्हणजे खादाडी करुन गप्पा टाकायला बसता येईल आणि खाण्यामध्ये गप्पांचा (आणि गप्पांमध्ये खाण्याचा) व्यत्यय येवून रसभंगही होणार नाही. मेनू (माझ्या मताप्रमाणे): १. मिसळ-पाव २. पुलाव (किंवा कुठला तरी भात) ३. भाताबरोबर काहीतरी (कढी/आमटी सारखा एखादा पदार्थ) ४. एखादा गोड पदार्थ ५. जमल्यास एखादे appetizer. ५. शितपेये(म्रुदु किंवा कठीण)/ज्युसेस ;-) मिसळीची जवाबदारी माझी (जर कोणाची हरकत नसल्यास). - नाटक्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
भ
भाग्यश्री Wed, 09/17/2008 - 05:43 नवीन

मला नाही

मला नाही जमणार.. २०च्या विकेंडला येणं होतंय माझं.. परत एकदा जमणं अवघड.. :( तरी, कट्ट्याला शुभेच्छा! वेस्ट कोस्टातला बहुचर्चित पहीला वहीला कट्टा दणक्यात होऊन जाऊदे! गाणी असतील तर रेकॉर्डींग करा प्लीज..
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Wed, 09/17/2008 - 05:47 नवीन

अरेच्या

मला वाटले होते की तुम्ही याल म्हणून. आला असता तर बरे झाले असते. हरकत नाही कधीतरी तुम्ही कट्टा आयोजीत करा. आम्ही नक्की येऊ. तोवर आमच्या फोटो/रेकॉर्डींग वर समाधान माना.. ;-) - नाटक्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
ब
बबलु Wed, 09/17/2008 - 06:30 नवीन

क्यालेंडर...

आमच्या आउटलूक च्या क्यालेंडर वर "MiPa Katta" रिझर्व झाला आहे. ::) ....बबलु-अमेरिकन
  • Log in or register to post comments
च
चिंचाबोरे Fri, 09/19/2008 - 09:15 नवीन

मीपण येणार

इतक्या उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व. पण मीही या कट्ट्यात सामिल होइन.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 09/19/2008 - 13:49 नवीन

उत्तम!

कुठे जमायचे आहे तो पत्ता आणि संबंधित दूरध्वनी क्र. लवकरच तुम्हांला पाठवतो. सहभागी झाल्याबद्दल सहर्ष धन्यवाद. (आभारी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंचाबोरे
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/19/2008 - 14:20 नवीन

ह्ये मस्त

ह्ये मस्त झाले... आम्ही लक्ष ठेवूनआहोतच्...कट्ट्याला शुभेच्छा... आता अजून एकदा फोटो , रेकॉर्डिंग ची वाट पाहतोय... ___________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चिंचाबोरे Sat, 09/20/2008 - 06:41 नवीन

गोड पदार्थ

चालेल आणि गोड पदार्थ करायची जबाबदारी मी घेईन??
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 09/20/2008 - 12:24 नवीन

उत्तम

काय आणताय? साधारण १०-१२ जणांसाठी हवे आहे या हिशेबाने आणल्यास उत्तम! (हावरट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंचाबोरे
प
प्राजु Sat, 09/20/2008 - 07:21 नवीन

बे एरियाच्या

कट्ट्याला माझ्या तर्फे शुभेच्छा! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/22/2008 - 13:17 नवीन

माझ्याही..

माझ्याही शुभेच्छा!!कट्ट्याला भरपूर मजा करा ,चित्रं आणि वृत्तांत लवकर टाका, जमले तर चित्रीकरणही करा..:) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ब
बेसनलाडू Sat, 09/20/2008 - 12:22 नवीन

पत्ता आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्र.

कट्ट्याचे स्थळः 38592 Wilde Terrace, Fremont, CA - 94536 संपर्कासाठी दूरध्वनी : नाटक्या - (408)832-5099 बेसनलाडू - (919)412-4663 (आमंत्रक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चिंचाबोरे Mon, 09/22/2008 - 11:16 नवीन

सरप्राईज

सरप्राईज!सरप्राईज!!
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Tue, 09/23/2008 - 03:07 नवीन

अहो..

"सरप्राईज!सरप्राईज!!" असे ओरडताय काय? काय सरप्राईज ते तर सांगा? (आश्चर्यचकित) नाटक्या.. :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंचाबोरे
भ
भाग्यश्री Tue, 09/23/2008 - 03:21 नवीन

काय

काय सरप्राईज आहे ते सांगितले तर ते सरप्राईज राहील का! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या
ब
बबलु Tue, 09/23/2008 - 11:40 नवीन

गोड पदार्थाची डीश सरप्राईज.

गोड पदार्थाची डीश सरप्राईज आहे. ....बबलु-अमेरिकन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा