तूमचा अनुभव वाचुन..मला खात्री आहे,ह्या मोठमोठ्या नावांना फसुन बरीच जनता लुबाडल्या जात असणार.....पण ईतक्या लोकांच बरोबर येत आणी आपलच नाही म्हणजे आपलच नशीब खोट म्हणुन लोक गप्प बसत असतील....आणी चमच्यांची ह्यांना कमी नसतेच म्ह्णुन ह्यांचे दुकान चालू रहात्.
यातच त्यांचे फावते. एकतर भाराभर रक्कम घ्यायची आणि असे चुकीचे काहीबाही सांगायचे. त्यांना माहिती असते की ९९% लोक काय का चुकले म्हणून विचारणार नाही. कोणी विचारले तर तोडगा, मंत्र म्हणण्यात तुम्हीच चुकलात असे सांगून त्यांना कटवायचे.
दक्षिणा म्हणून काही कमी रक्कम घेतात का ते? साधा नारळ कुसका निघाला की दुकानदाराला परत करतात, मग ज्योतिषांना तो न्याय का लावू नये?
डॉक्टर महाशयांचे निदान चुकत नाही का? प्रत्येक विद्येच्या आणि व्यवसायाच्या मर्यादा आहेत.
चुकते पण डॉक्टर आणि ज्योतिषी ही तुलना कशी करता येईल.
दोन डॉक्टरांचे एकाच रोगाचे निदान जुळत नाही असे शक्यतो होत नाही. हे मी चांगल्या डॉक्टरांबद्दल बोलतोय.
कारण त्या निदानासाठी लागणारा विदा हा त्यासाठी केलेल्या चाचण्या, रोग्याची लक्षणे ह्यांवर आधारित असतो. केवळ तुम्ही सांगताय म्हणून डॉक्टर तुम्हाला औषध देणार नाही. ह्या चाचण्या कोणत्याही दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळेत केल्या तरी येणारा रीपोर्ट जवळ जवळ सारखा असतो.
अगदी रोग एक असला आणि दोन वेगवेगळे रोगी असतील तरी दोन वेगवेगळे डॉक्टर तुम्हाला जवळ जवळ एक सारखेच औषध देतील, औषधाच्या कंपन्या वेगळ्या असतील पण औषध नाही. तसेच ह्या चाचण्या का करायच्या आणि हे औषध का घ्यायचे ह्या साठी त्यांच्याकडे ठाम कारण असते.
डॉक्टरांबाबत बोलायचं तर वैद्यकीय शास्त्राच्या मर्यादा आणि वाव आपण सांगू तरी शकतो. ज्योतिष विद्येच्या मर्यादा सांगा बघू. कोणताही ज्योतिषी आपल्या शास्त्राच्या मर्यादा कधीही सांगत नाही
वैद्यक शास्त्र कुठे कमी पडत असेल तर डॉक्टरला वेळ आणि रोग्याला पैसा द्यायला.
वैमानिक/चालक योग्य तर्हेने विमान/वाहन चालवून आपल्याला विविक्षित स्थळी पोहोचवेल अशा विश्वासानेच आपण विमानात/ वाहनात बसतो ना ? पण कधी कधी चूक होते ना?
होते पण म्हणूनच विज्ञानाच्या सहायाने ह्या चुका व्यवथित शोधून त्या चुका वर्षानुवर्षे अत्यंत कमी केल्या गेल्या आहेत, त्याचा विदा देखील उपलब्ध आहे.
ज्योतिषी किंवा जोतिष जास्तीतजास्त अचूक होत आहे ह्याचा काही विदा कुठे आहे काय?
>>> यापैकी पंतप्रधान कोण होणार..
नजीकच्या काळातील लोकसभा निवडणुकीनंतर मोदी किंवा राहुल या दोघांपैकी कोणीही पंतप्रधान होणार नाही असे माझे ज्योतिष सांगते.
एकदा कोल्हापूरला पुण्यावरून खूप प्रसिद्ध ज्योतिषी आला व त्याने शाहू महाराजांचे भविष्य सांगण्याकरिता राजवाड्यात गेला त्यावेळी महाराजांनी त्यांच्या शिपायाला त्याला घेऊन जायला सांगितले व रात्री शिपायांनी त्याला मारले सकाळी महाराज त्याला भेटायला आले व म्हणाले पुण्यावरून इकडे येताना इथे आल्यावर तुला मार मिळणार आहे याचे भविष्य का कळले नाही तर तू माझे भविष्य काय सांगणार म्हणाले .
धोंडोपंत दिवसाला ५-१० पत्रिका तरी बघत असतील, पण त्यांच्या ब्लॉग वर फार च कमी भविष्य बरोबर आल्याची पत्रे आहेत. १०० लोकांना परदेशी जाण्याचा महिना सांगीतला तर ५ लोकांसाठी ते भविष्य बरोबर च येणार.
एकुणच त्यांचा ब्लॉग पाहाता, जाहिरातबाजी जरा जास्तच केली आहे असे मला वाटते. ते सचिन आणि केसरी ट्रॅवेल्स कसे पेपरात अर्धपानी लेख लिहून जाहिरात करतात. तसेच हे पण अश्या मोजक्या भाकितांना जालावर प्रसिद्ध करुन जाहिरात करतात.
लोकही त्यांना भुलतात. असो, लोकांकडे एवढी अक्कल असती तर ते ज्योतिषाकडे का गेले असते? :)
मग जोतिष शास्त्र (??) खरं हे ज्ञान तुम्हाला कुठुन मिळालं??
भौतिकशास्त्र , रासायान्शात्र, जीवशास्त्र हे ज्ञान तुम्हाला कुठून मिळाला? ह्या शास्त्रांवारचा प्रत्येक पुस्तक तुम्ही वाचला आहे का?
प्रत्येक प्रयोग करून बघितला आहे का?
काहीही म्हणा पण हा ब्लॉग इतका भारी आहे की बस्स ! मराठी शब्द सुचेना "एईस्थिटीकली प्लीझंट" !
ब्लॉग वाचुन , त्यातले काही अनुभव वाचुन .... स्वतःच ज्योतिष शिकावे अन (किमान स्वतःपुरता तरी ) एकदा ह्या प्रश्नाचा सोक्ष मोक्ष लावावा असे वाटु लागले आहे !!
(अवांतर : मुंबै 'ऑथेंटीक' ज्योतिष कुठे शिकायला मिळेल ? )
ज्योतिषाच्या फार नादी मीही लागत नाही. पण ओळखीतल्या एकांना लग्नाचे वर्षच काय तारीख वार देखील २ वर्षे आधी अचुक सांगितल्याचे माहिती आहे. त्याच व्यक्तीने माझ्याही बाबतीत काही ठोकताळे सांगितले होते ते अगदी खरे ठरले.
वडिलोपार्जित घरात मूळपुरुषाच्या पादुका सापडतील हे एकांनी सांगितले होते. साधारण दिशादेखील सांगितली होती. आमचे वडिलोपार्जित घर आम्हालाच ठिकसे माहिती नाही (काकाला माहिती आहे) तर त्या ज्योतिष्याला कुठुन माहिती असणार? पण त्याची माहिती खरी ठरली. या २ -३ गोष्टी निव्वळ योगायोग असु शकत नाहित त्यामुळे भविष्य हे अगदी १००% जुळणारे शास्त्र नसले तरी विद्या आहे असा विश्वास वाटतो. तरीही मी ज्योतिष्याच्या वाटेला जात नाही कारण समजा किती ही खरे जरी असेल तर ज्योतिषी जे होणार तेच सांगणार ना? मग ते असेही होणारच. ते आधीच जाणुन घेण्यासाठी वेळ आणि पैसा कशाला खर्च करावा? आयुष्यात सरप्राइजेस मिळण्यात मजा आहे. आयुष्य आधीच जाणुन घेतले की सगळी मजाच संपेल की.
हेच धोंडोपंत काही वर्षांपूर्वी ज्योतिष शास्त्राच्या विरोधात लेखन करत होते. तेव्हा त्यांचे टोपण नाव धोंडो जोशी असे होते. आता त्यांच्यात मतपरिवर्तन झालेले दिसत अहे. http://www.scribd.com/doc/100132091/Dhondo-Astrologer
भीती कसली वाटु लागली आहे?
माझ्यामते ते धोंडोपंत अतिशय हुशार आहेत. मार्केट मध्ये जी गोष्ट चालते तिचा पुरेपुर वापर करुन पैसे मिळवत आहेत. आधी ज्योतिष, मग स्वामी (महाराष्ट्रभरचे जातक) आणि आता साई (भारतभर जातक)!
प्रतिक्रिया
उत्तम
वाईट वाटल.
त्यांना ना पैसे परत मागीतले ना स्पष्टीकरण
खरय तूमचे....
परिपूर्ण असे काही नसते
मुळात धोंडोपंताच्या धाग्यावर चर्चा करताना पंतानी लिहायला हवे
धोंडोपंत काही उत्तर द्यायला येणार नाहीत हे नक्की
रोचक चर्चा !!
श्री ज्ञानेश्वर यांची कीर्ती
मोदी / राहूल
>>> यापैकी पंतप्रधान कोण
माझा ज्योतिष शास्त्रा वर
काय तो हंबरडा, वा गं म्हशी!
+१
हा प्रतिसाद..
आता खरे ज्योतिशि रहिलेत कुथे
अहो नामस्मरणातून मनासारख्या
रच्याक
सप्रे, एकदा म्हशीची शेपूट धरल्यावर चालीला अर्थ राहत नाही आणि...
>>म्हशींना चालते का जोतिष ?
एकदा कोल्हापूरला पुण्यावरून खूप प्रसिद्ध ज्योतिषी आला
धोंडोपंत दिवसाला ५-१० पत्रिका
धोंडोपंतांचा ब्लॉग
मग जोतिष शास्त्र (??) खरं हे
बाकी काही म्हणा म्हशीची
खिक
हा हा हा अगदी अगदी
म्हशींना चालते का जोतिष ?
श्री धोंडोपंतांशी सम्पर्क
http://dhondopant.blogspot.in
मस्त
ज्योतिषाच्या फार नादी मीही
हेच धोंडोपंत काही
ऑ! ही काय भानगड आहे. ते
भीती कसली वाटु लागली आहे?
@आधी ज्योतिष, मग स्वामी
रोचक