✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सिद्धहस्त कवी, लेखक ,समीक्षक : प्रा. केशव मेश्राम

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Sat, 12/01/2007 - 20:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8280 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

आ
आजानुकर्ण Sat, 12/01/2007 - 21:32 नवीन

श्रद्धांजली

आक्रस्ताळेपणा न करता संयमित भाषेत लेखन करणारे लेखक. त्यांचे एक पुस्तक वाचले आहे. (नाव आठवत नाही.) शिवाय शालेय अभ्यासक्रमात त्यांचा एक धडाही होता. विनम्र श्रद्धांजली. - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 12/02/2007 - 00:30 नवीन

बिरुटेसाहेब,

बिरुटेसाहेब, प्रा केशव मेश्राम यांच्या साहित्यिक वाटचालीचा आपण मोजक्या शब्दात परंतु अत्यंत योग्य असा मागोवा घेतला आहे. मेश्रामसाहेबांच्या स्मृतीस माझीही विनम्र आदरांजली.... तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/02/2007 - 15:34 नवीन

आमची आदरांदली

प्राध्यापक साहेब, सरांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक निगर्वी, सात्विक आणि संयम ठेऊन लेखन करणारा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. आपला, (खिन्न) धोंडोपंत आपला लेख उत्तम झाला आहे. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/02/2007 - 15:39 नवीन

ज्ञानेश्वरी

सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते खुलून बोलत. त्यांचा ज्ञानेश्वरीचा व्यासंगही दांडगा होता. आपला, (वारकरी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/02/2007 - 20:49 नवीन

तुकाराबद्दल !!!!

सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. धोंडोपंत, वाचकांची अभिरुची संकुचीत स्वरुपाची असु नये या मताचे आम्ही. त्यामुळेच हा विषय आम्ही येथे टंकीला. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते जसे खूलुन बोलत तसे ते तुकारामाचा विषय निघाला की, तब्येतीने बोलत. त्यांचा एक लेख आहे, 'तुकारामः समुहाचा वाटाड्या, आणि 'गाथा तुकारामांची' या शिर्षकाचा. ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! आपला. साहित्याचा वारकरी प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
अ
अवलिया Mon, 07/19/2010 - 17:58 नवीन

पंत, लिहू

पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! या आठवड्यात आषाढी एकादशी आहे. यापरते गोमटे निमित्त मिळणार नाही. वाट पाहात आहे.... विठठल ...विठठल.. !! --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रमोद देव Sun, 12/02/2007 - 21:19 नवीन

माझीही श्रद्धांजली!

प्राध्यापक केशव मेश्राम ह्यांना माझीही श्रद्धांजली. मराठीतील माझे साहित्यवाचन अतिशय तुटपुंजे असल्यामुळे(आणि मराठी व्यतिरिक्त मी दुसर्‍या कोणत्याही भाषेतले काही वाचत नाही. का? अहो इथे समजतंय कुणाला?) मला स्वतःला प्रा.केशव मेश्राम सरांबद्दल विशेष माहिती नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते एक वर्ष अध्यक्ष होते इतपतच त्यांची माहिती आहे. तेव्हा बिरुटेसाहेब आपल्यासारख्यांच्या लेखनातून आमच्यासारख्या अल्पवाचन असणार्‍या लोकांना अशीच माहिती वेळोवेळी मिळत राहो अशी विनंती करतो.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 10:33 नवीन

क्या बात है !!

ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. वा वा प्राध्यापक साहेब, आपल्या लेखाची आतुरतेने वाट पहात आहे. दादांचा शेर आठवला ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे...... ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखोबा, सेनामहाराज, निळोबा, मुक्ताई,जनाई यांच्याबद्दल जेवढे लिहाल तेवढा आम्हाला आनंद आहे, कारण ही आमची वंशावळ आहे असे आम्ही मानतो. झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग| उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधना बुडविली पिटू भक्तिचा डांगोरा | कळीकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंद हे आमचे जगण्याचे तत्वज्ञान आहे. त्यामुळेच दूरदर्शन वरील एखाद्या "पंचतारांकित" स्वामींपेक्षा - "ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा काय भुललासी वरलीया रंगा ?" हे म्हणणारा आमचा चोखोबा आम्हाला "आपला" वाटतो. आपला, (संतचरणरज) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Mon, 07/19/2010 - 17:11 नवीन

दलित

दलित साहित्य, त्याच्या संकल्पना, त्या अनुषंगानेच्या चळवळी तसेच लोककलेच्या अनुभवाचे जागरुक मंथन त्यांनी केले. हम्म्म.. मेश्रामसरांना नाशिकच्या साहित्यसंमेलनात पाहीले होते. एका पुस्तकाच्या स्टॉलवर बसलेले होते. एकदम साधा माणुस. विद्वत्तेचा, मोठेपणाचा कुठलाही आव नाही. नंदा मेश्रामांची 'मी नंदा' आताच वाचले. छान लिहिले आहे. मेश्रामसरांचे ही साहित्य वाचायचे आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा