Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर

ध
धोंडोपंत यांनी
गुरुवार, 01/03/2008 - 12:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
66930 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

स
स्पंदना Tue, 10/08/2013 - 14:17 नवीन

धोंडोपंत! अहो आहात कुठे?

धोंडोपंत! अहो आहात कुठे? मी म्हणते पुनरागमनाला काही अडथळा आहे का? आम्ही त्वरित तो दूर करु.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/09/2013 - 08:56 नवीन

टिंगल करता काय ज्योतिषाची?

टिंगल करता काय ज्योतिषाची? आयुष्यात एखादा झटका बसेल ना मग समजेल. तेव्हा ज्योतिषाची, देवाची, आठवण येईल. जेव्हा सगळ काही सुरळीत असत तेव्हा ही असली थेर सुचतात.इतर वेळेला ज्योतिषाची टिंगल करणारे मागल्या दाराने ज्योतिष बघतात आयुष्यात कधी ना कधी! बघा तुमच विज्ञान उपयोगाला येतय का तेव्हा!.............,,,,, (जिज्ञासूंनी अजून भर घालावी)
  • Log in or register to post comments
स
सुहासदवन Wed, 10/09/2013 - 09:38 नवीन

टिंगल कसली अहो गम्मतच केली मस्तपैकी

आयुष्यात एखादा झटका बसेल ना मग समजेल. तेव्हा ज्योतिषाची, देवाची, आठवण येईल.
अजिबात नाही. एखादा झटका बसला तर हजारो इतर उपाय आहेत ना करायला, ज्योतिष आणि देव देव करायचे सोडून. आम्ही स्वतः समर्थ (गैरसमज नसावा) आहोत आमच्या समस्यांची काळजी वाहायला. उगाच देवाला कशाला त्रास? त्याला राहू दे न मस्तपैकी.
इतर वेळेला ज्योतिषाची टिंगल करणारे मागल्या दाराने ज्योतिष बघतात आयुष्यात कधी ना कधी!
हे मात्र बरोबर. कधी कधी जेव्हा एखादा शनिवार रविवार काहीच मनोरंजनाचे साधन नसते तेव्हा एखाद्या मित्राला घेऊन जोतीष्याकडे जायचे आणि मग धमाल फुल टू टाईमपास.
बघा तुमच विज्ञान उपयोगाला येतय का तेव्हा!.............,,,,,
त्या पेक्षा तुम्हीच आजच्या सुधारलेल्या जोतिष्यांना सांगा ना आमच्या विज्ञानाने निर्माण केलेले संगणक आणि इतर प्रणाली वापरू नका म्हणून. बघूया काय होतंय ते. चमत्कार आणि साक्षात्कार हे फक्त टीवी आणि पुस्तकातच होतात प्रत्यक्षात नाही ह्यावर ठाम विश्वास असणारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
सुबोध खरे Wed, 10/09/2013 - 09:46 नवीन

हे मात्र पटले नाही

हे मात्र पटले नाही घाटपांडे साहेब , मी स्वतः आयुष्यात बर्याच उतार चढावातून गेलो आहे (आपल्या भाषेत झटका) ज्यात करियर पासून जीव(रोगामुळे) हे दावणीवर लावलेले होते तरीही कधी ज्योतिषाकडे जावे असे मला वाटले नाही किंवा मी कोणत्याही देवाला पाण्यात ठेवणे अथवा नवस बोलणे असे केले नाही . त्यात ज्योतिषाचा किंवा विज्ञानाचा भाग नाही. हा केवळ मानसिकतेचा भाग आहे. ज्यावेळी माणूस एखाद्या संकटातून जात असतो तेंव्हा त्याला मानसिक आधाराची गरज असते. यावेळेस जो कोणी मानसिक आधार देईल तो माणूस त्यावेळी महत्त्वाचा ठरतो. सुदैवाने माझ्या अशा संकटांच्या वेळेस माझे वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून मला अशा वेळेस सुद्धा ज्योतिषांकडे जावे असे वाटले नाही. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"हे श्री स्वामी समर्थांचे वाक्य त्यांच्या शिष्यांना असेच आत्मिक बल देत असतात असे ऐकले आहे. आपण संकटाच्या वेळेस आपल्या मुलांच्या मागे असे खंबीरपणे उभे राहिलो तर त्यांना दुसर्या आधाराची गरज वाटणार नाही. माझ्या जन्माच्या वेळेस पत्रिकेत लिहून ठेवलेले भविष्य जवळ जवळ नव्वद टक्के खरे झाले आहे परंतु मला अजूनही ज्योतिषांकडे जावेसे वाटत नाही. एवढेच आहे कि मी स्वतः ज्योतिष हि विद्या आहे हे मानतो पण अजून ते विज्ञान आहे असे मानण्यास तयार नाही. बाकी लोकानी आपला विचार आपण करावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
सुहासदवन Wed, 10/09/2013 - 10:14 नवीन

खरंच खेद वाटतो

मला प्रत्यक्ष कोणतीही व्यक्ती आणि जोतिष ह्याबद्दल वैयक्तिक आकस नाही. पण ज्योतिष हा निव्वळ ठोकताळा आहे हे वारंवार माहीत होऊन देखील आपल्या समाजातील लोकांचा त्यावर असणारा विश्वास कमी होत नाही ह्याबद्दल खरंच खेद वाटतो.
माझ्या जन्माच्या वेळेस पत्रिकेत लिहून ठेवलेले भविष्य जवळ जवळ नव्वद टक्के खरे झाले आहे.
माफ करा, राग मानू नका पण अशी टक्केवारीतील खरी होणारी भविष्ये प्रत्येकाच्या पत्रिकेत असतात आणि ती खरी होतात देखील कारण ती जेनेरिक वाक्ये असतात स्पेसीफिक नव्हे. माझ्याही पत्रिकेतील बहुतेक वाक्ये खरी आहेत पण तीच वाक्ये थोडी बहुत करून इतर दुसऱ्या व्यक्तीच्या पत्रिकेत देखील आहेत. वाटल्यास तपासून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
द
दादा कोंडके Wed, 10/09/2013 - 11:15 नवीन

+१

सहमत. उच्चशिक्षीत लोकं जेंव्हा असं म्हणतात तेंव्हा विषाद वाटतो. ज्योतिषावर किंवा देव-देवादीकांवर विश्वास असंण्यामागचं कारण, संस्कार असतात. लहानपणी वातावरण, आई-वडील आणि इतर जेष्ठ मंडळींमुळे असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. त्यांना काही अनुभव-अनुभुती आलेले असतात, नंतर थोडं कळायलागल्यावर आणि विवेक आल्यावरदेखिल त्यांच्यावरील प्रेम-आपुलकीमुळे ही डोक्यावर बसलेली भुतं सहजासहजी उतरत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन
च
चित्रगुप्त Sun, 10/20/2013 - 21:53 नवीन

उच्चशिक्षीत

'उच्चशिक्षीत' म्हणजे नेमके काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
अ
अनिरुद्ध प Wed, 10/09/2013 - 13:08 नवीन

वाटल्यास तपासून पहा.

तपासुन पाहिल्यावर असे आढळले कि जे काही जेनेरिक म्हणुन लिहिले गेले आहे ते माझ्या बाबतित तरी २०% सुद्धा बरोबर नाही आले आहे,म्हणजेच आपला ९०% चा दावा माझ्या बाबतित तरी खोटा ठरला आहे,आता तुम्ही म्हणाल अपवाद आहे,कारण वैज्ञानिक भाषेत सुद्धा अपवादा शिवाय नियम सिद्ध होत नाही असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन
ब
बॅटमॅन Wed, 10/09/2013 - 12:44 नवीन

सर्वश्री सुबोध खरेजी,

सर्वश्री सुबोध खरेजी, सुहासवदनजी आणि दादा कोंडकेजी: घाटपांडेकाकांचा प्रतिसाद उपरोधिक होता. टोनवरून अन त्यांच्या आधीच्या लेखांवरूनच समजतंय की ते.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 10/09/2013 - 13:05 नवीन

खरे आहे घाटपांडे काका.

खरे आहे घाटपांडे काका. आम्ही जे सांगतो ती गोष्ट खरी. आम्ही काही वेळा ज्याम्च्या थेट सम्बन्ध नाही त्याला समजू नये मात्र समजणाराना इशारा मिळावा अशा भाषेत सांगतो हे असे करायला ऋषी मुनीनी वैदीकानी सांगितले आहे. अगदी पाश्चात्य दाखले घ्यायचे तरी घ्या . ऋषी निरुत्तर दमनस ( नॉस्ट्रेडेमस भारतात या नावाने वावरायचा असे म्हणतात. तज्ञांच्या मते हे समकालीन ऋषी असावेत असे एक दुमत आहे. आपण त्या वादात सध्या पडायला नको ) यानी देखील असेच सांगितले आहे्एच बघाना एकविसाव्या शतकातील युद्धा बद्दल त्यानी लिहून ठेवले आहे पाण्याखालून आग ओकली जाईल. हवेतून झेप घेईल विजयी होईल तो जेंव्हा कणाना संदेश मिळेल. सूर्य जमिनीवर येईल किती स्पष्ट शब्दात ऋषी निरुत्तर दमनस यानी अणू युद्ध आणि अणू पाणबुडीबद्दल सांगितलेले आहे इतके स्पष्ट सांगुनेही ज्यांच्या ताच्याशी थेट संबन्ध नाही अशा इतरेजनाना यातून बोध मिळणार नाही मात्र समजणाराला इशारा मिळेल. जगाचा अंत कसा होईल यावर ऋषी निरुत्तर दमनस म्हणतात. आकाशातून वर्षाव होईल. ढग फुटून जातील तप्त धरती शुक्र मंगळाची युति लांडगा अस्वलाला मारेल. उंट जिराफा च्या घरी जाईल वायू तापेल पाण्याखाली. मासे उडून जातील. आम्ही याचे विष्लेषण केले आहे. मात्र तेदेखील अस्पष्ट ठेव असे द्रष्ट्याने सांगितले आहे. म्हणून त्याच्याच भाषेत म्हणजे ज्याचा संबन्ध नाही त्याला कळणार नाही असे ठेवले आहे. आम्ही जे साम्गतो तेंव्हा असेच साम्गतो
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 10/09/2013 - 13:52 नवीन

ऋषी निरुत्तर दमनस (

ऋषी निरुत्तर दमनस ( नॉस्ट्रेडेमस भारतात या नावाने वावरायचा असे म्हणतात. तज्ञांच्या मते हे समकालीन ऋषी असावेत असे एक दुमत आहे. आपण त्या वादात सध्या पडायला नको ) ह्म्म... मला स्मरते आहे की ट्वीन टॉवरवर विमान कोसळण्याच्या बरेच वर्ष आधी मी नॉस्ट्रेडेमस वर आधारीत एक चित्रपट बघीतला होता, मला वाटत त्यात ट्वीन टॉवर सारखे टॉवर पडताना दाखवले होते. ज्या वेळी ९/११ झाले तेव्हा तो चित्रपट मला आठवला होता. बहुतेक चित्रपटाचे नाव होते :- The Man Who Saw Tomorrow जाता जाता :-आता सहज म्हणुन जालावर या बाबत शोधाशोध केली तर जसे मला वाटले होते,तसेन ज्या ज्या लोकांनी हा चित्रपट ही घटना घडण्याच्या बर्‍याच आधी काळ पाहिला होता त्यांच्या मनात सुद्धा ही घटना घडल्यावर हाच चित्रपट आला{नॉस्ट्रेडेम}) आला.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 10/09/2013 - 13:55 नवीन

साहेब,

साहेब, माझ्या जन्माच्या वेळेस त्या ज्योतीषानी लिहून ठेवलेले आहे कि मेडिकल मध्ये करियर मिळेल. मुलगा लष्करात जाईल आणि मोठ्या हुद्द्यावर चढेल पण हे सर्व सोडून येईल.मी लष्करात देशभक्ती साठी गेलो नाही. माझा मुंबईच्या मेडिकल कॉलेजचा प्रवेश केवळ २ गुणांनी हुकला आणि प्रवेश परीक्षेतून केवळ आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. यानंतर मी नौदलात कमांडर या हुद्द्यापर्यंत( जोईंट कमिशनरची पातळी) चढलो आणि काही कारणास्तव मी ते सर्व सोडून दिले. आता हे इतके सर्व जर "लिहिले" आहे तर त्याला ठोकताळा कसे म्हणावे.जमले तर माझी जुनी पत्रिका अपलोड करायची तयारी आहे. यात मुलगा भरपूर शकेल भरपूर पैसे मिळवेल डोक्याला मार लागेल किंवा पचनाची तक्रार असेल अशी गोल गोल वाक्यरचना आहे असे नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे माझी फक्त जन्मतारीख सांगून पुण्यातील एका ज्योतिषाने( जुवेकर नावाचे आणि विश्रामबाग वाड्याच्या आसपास कुठेतरी होते असे आठवते). आपला पाण्याशी संपर्क आहे आणि पंधरा ते सतरा वर्षे सरकारी नोकरी असेल असे सांगितले हे सुद्धा मी नौदलात भरती होणार आहे यातील अवाक्षर न सांगता. मी कॉलेजात शिकतो आहे एवढेच त्यांना सांगितले होते. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे सरकारी(किंवा लष्करी) नोकरी हि पत्रिकेत लिहिलेली आहे.(मी शुद्ध मराठी बोलत होतो म्हणून लष्कराबद्दल बोलायला ते चाचरत असावेत) या ज्योतिषाकडे मी मित्राच्या बरोबर गेलो होतो आणि माझे पैसे सुद्धा त्यानेच भरले. ( माझा तेंव्हा सुद्धा ज्योतिष हे शास्त्र आहे यावर विश्वास नव्हता आणि आजही नाही). मी त्याच्या बरोबर गेलो होतो ते केवळ त्याला मराठी येत नव्हते म्हणून. एखाद्या ज्योतिषाला असे खरच आहे काय हे तपासायचे असेल तर मी माझी जन्मतारीख वेळ आणि स्थळ सांगण्यास तयार आहे. मला त्यांच्या भविष्यात रस नाही. फक्त केवळ आपण (तथाकथित) सुशिक्षित आहोत आणि आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही म्हणून ते थोतांड आहे असे मानण्याची माझी अजून तरी तयारी नाही. फक्त ती एका विद्या आहे शास्त्र नाही असे मला वाटते. आणि जोवर ते शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही तोवर त्याच्या वाटयाला जायची माझी तयारी नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 10/20/2013 - 19:44 नवीन

गंमतीची गोष्ट म्हणजे माझी

गंमतीची गोष्ट म्हणजे माझी फक्त जन्मतारीख सांगून पुण्यातील एका ज्योतिषाने( जुवेकर नावाचे आणि विश्रामबाग वाड्याच्या आसपास कुठेतरी होते असे आठवते). आपला पाण्याशी संपर्क आहे आणि पंधरा ते सतरा वर्षे सरकारी नोकरी असेल असे सांगितले हे सुद्धा मी नौदलात भरती होणार आहे यातील अवाक्षर न सांगता. मी कॉलेजात शिकतो आहे एवढेच त्यांना सांगितले होते. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे सरकारी(किंवा लष्करी) नोकरी हि पत्रिकेत लिहिलेली आहे.
एक शंका आहे कि फक्त जन्मतारीख सांगून पत्रिका तयार होत नाही. त्या ज्योतिषाने सरकारी नोकरी पत्रिकेत लिजिलेली आहे असे सांगितले. मग त्याने कशाच्या आधारे हे सांगितले? सांगितलेले भाकित खरे आले याबद्दल दुमत नाही. मला असे वाटते की त्याने हे अंतंस्फुर्तीने सांगितले असावे. ही अंतस्फुर्ती मानसशास्त्राशी संबंधीत आहे. खर येणे हा योगायोगाचा भाग असू शकतो.
फक्त केवळ आपण (तथाकथित) सुशिक्षित आहोत आणि आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही म्हणून ते थोतांड आहे असे मानण्याची माझी अजून तरी तयारी नाही. फक्त ती एका विद्या आहे शास्त्र नाही असे मला वाटते. आणि जोवर ते शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही तोवर त्याच्या वाटयाला जायची माझी तयारी नाही.
या मताचा आदर आहे.मला आपली भूमिका मान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चित्रगुप्त Sun, 10/20/2013 - 20:19 नवीन

अंतस्फुर्ती

ही अंतस्फुर्ती मानसशास्त्राशी संबंधीत आहे.
या 'अंतस्फुर्ती' लाच पतंजली 'प्रत्यक्ष ज्ञान' म्हणतात, असे वाटते. यालाच 'इंद्रियातीत बोध' असेही म्हणू शकतो. भविष्य जाणून घेणे हे या बोधातून शक्य आहेसे दिसते. 'चित्तवृत्तीं'चा लोप झाल्यावर हा बोध निखळपणे प्रकटतो, वगैरे पतंजलींच्या योगसूत्रातून सांगितलेले आहे. मी काही काळ केलेल्या लंबकाच्या प्रयोगातून सहजपणे भविष्य जाणू शकलो होतो, परंतु त्यामागचे नेमके कार्यकारण कळले नाही. तेवढी लायकी वा साधना नाही असेच म्हटले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
सुबोध खरे Mon, 10/21/2013 - 11:01 नवीन

फक्त जन्म तारीख नव्हे तर

फक्त जन्म तारीख नव्हे तर बरोबर जन्म वेळ आणि जन्म् ठिकाण सांगितले होते.वडिलांच्या मित्राच्या रुग्णालयात जन्म झाल्याने वेळ पण अचूक ठाऊक आहे तपशील कमी टंकल्याबद्दल माफ करा. (दोन्ही ज्योतिषानि जवळ जवळ त्याच गोष्टी सांगितल्या. का आणि कसे ते माहित नाही. तरीही आजही मी ज्योतिष शास्त्राकडे आणि ज्योतिषांकडे संशयानेच पाहतो.कारण ते शास्त्र आहे असे शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होत नाही तोवर असेल. कदाचित आधुनिक(?) शिक्षणाचा प्रभाव असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रसाद गोडबोले Wed, 10/09/2013 - 14:23 नवीन

आमची पिंक

१)पुणे विद्यापीठाने केलेल्या डबल ब्लाईड टेस्ट मधे असे निदर्शनास आले आहे की ज्योतिषाला शास्त्र म्हणता येईल असा स्टाँग स्टॅतिस्तिकल इव्हिडन्स ( भक्कम सांखिकीय पुरावा ) नाही . त्यामुळे सायंटीफिकली हा विषय संपलेला आहे . २) आता लॉजिकली , समजा ज्योतिष खरे आहे असे मानले , क्ष माणसाचे कोनत्या एका विषिष्ठ घटने बाबत , भ०(क्ष) हे भविष्य प्रेडिक्ट केले तर क्ष त्यात हस्तक्षेप करुन ते बदलु शकेल मग जे बदलल्यावर घडेल त्याचे प्रेडिक्शन भ१(क्ष) असे असेल , पण परत क्ष त्यात हस्तक्षेप करुन ते बदलु शकेल मग जे बदलल्यावर घडेल त्याचे प्रेडिक्शन भ२(क्ष) .... मग भ३(क्ष) ...भ४(क्ष)... भ५(क्ष) असे हे इन्फायनाईट रेग्रेस होईल जस्ट लाईक Turtles All the Way Down. सो लॉजिकली ही जोतिष शास्त्र असु शकत नाही .( इथे मनुष्य , कर्तृत्वाने भविष्यात बदल घडवु शकतो , हे गृहीत धरले आहे which requires proof ... but lets lets discuss it some other time ) ३) सायकॉलॉगिकली , ज्योतिष हे एक प्रकारचे "कंडिशनिंग" असावे (क्लासिकल कंडिशनिंग सारखे) सोप्या शब्दात ... क्ष ग्रह य स्थानात असला की झ परिणाम होतात हे कोणी तरी आधी सांगुन ठेवल्या मुळे माणुस त्यासाठी कंडीशन्ड होतो पुर्वी एका ऋषींनी मांजर पाळली होती , ती यज्ञात सारखी मधे मधे करायची लोकांचे चित्त विचलीत व्ह्यायचे , मग गुरुजींनी यज्ञा आधी ती मांजर एका खांबाला बांधायला सुरुवात केली मग यज्ञ व्यवस्थित पार पडु लागले ... पण मांजर खांबाला बांधल्याने यज्ञ व्यवस्थित पार पडतो असे कंदीशनिंग झाल्याने ती मांजर मेल्यावर शिष्य लोक दुसर्‍या कडची मांजर आणुन यज्ञा आधी आवर्जुन त्या खांबाला बांधु लागले ज्योतिषही असाच काहीसा प्रकार असावा ...ह्यावर एकदा अभ्यास केला पाहिजे ...मस्त पी एच डी विषय होवु शकतो हा :) अवांतर : पंत , जरा सांगता काहो आमच्या पत्रिकेत ज्योतिष शिकण्याचा योग कधी आहे ते ? ...हा घ्या आकडा ७३ !
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 10/09/2013 - 14:42 नवीन

भक्कम सांख्यिकीय पुरावा नाहीच

भक्कम सांख्यिकीय पुरावा नाहीच!!!! पण वर मजा अशी, की कुणीही वर्तवलेले भविष्य गंडल्यास शास्त्र गंडलंय असं कोणीही सांगत नाही...फक्त तो विशिष्ट ज्योतिषी गंडला असे सांगतात आणि वर तार्किकतेचा दावा करतात. तथाकथित शास्त्रवाद्यांचे हे मोठेच तार्किक वर्तन बरे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 10/09/2013 - 15:10 नवीन

सेम

अगदी सेम सेम अर्ग्युमेंट !! जेव्हा श्रीमदाद्यशंकराचार्य विविध वादविवादांमध्ये बौध्द मताचे खंडन करायचे तेव्हा बौध्द भिक्कु हेच लॉजिक वापरायचे "मति दौर्बल्यंमेतत , न मत दौर्बल्यं ||" पण आचार्यांनी ह्या विधानाचे ही तार्किक दृष्या खंडन केले आहे ... (line of arguments आत्ता आठवत नाहीये , घरी आलो की बघुन पेस्ट करतो ) आपण हीच तार्किक विधाने देवुन ह्या दाव्याचे खंडन करु शकतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 10/09/2013 - 15:44 नवीन

अगदी, अगदी!!!! बाकी

अगदी, अगदी!!!! बाकी शंकराचार्यांचे अर्ग्युमेंट वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
द
दादा कोंडके Wed, 10/09/2013 - 16:01 नवीन

हा हा...

वर इथं म्हटल्याप्रमाणे,
प्रश्नकुंडली मांडताना पहिला सगळ्यात महत्वाचा नियम असा कि प्रश्न कर्त्याच्या मनात त्या प्रश्नाबाबत तळमळ हवी . उगीचच टाइम पास म्हणून किंवा ज्योतिषाची टर उडवण्यासाठी म्हणून विचारलेला नसावा
म्हणजे बोलतीच बंद. दुसरा नियम असाही करावा की भविष्य खरं ठरलं नाहितर स्वतःचच नशीब खोटं आणि भविष्यकळून घ्यायचाच योग नसल्याचं मान्य करायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सुबोध खरे गुरुवार, 10/10/2013 - 11:34 नवीन

आम्ही पण अचूक भविष्य सांगतो

आम्ही पण अचूक भविष्य सांगतो पण ते फक्त पुण्यवान माणसांच्या बाबतीत खरे ठरते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
व
विजुभाऊ Wed, 10/09/2013 - 14:55 नवीन

बॅटम्याना एक वेगळा स्वतन्त्र

बॅटम्याना एक वेगळा स्वतन्त्र धागा काढूया. ज्योतिषांच्या गोल गोल गप्पां बाबत. त्याम्च्या तार्कीकाबात .
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 10/09/2013 - 15:06 नवीन

खरेतर घाटपांडेकाकांनी हे काम

खरेतर घाटपांडेकाकांनी हे काम आलरेडी केलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
क्रेझी Wed, 10/09/2013 - 15:16 नवीन

कोणताही ज्योतिषी हल्ली

कोणताही ज्योतिषी हल्ली कॉम्प्युटर वापरून पत्रिका बनवून देतो. पण जर ते सॉफ्टवेअर लिहीणा-याने काही चुक केली असेल तर ती पत्रिका १००% बरोबर असेल का?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 10/09/2013 - 19:23 नवीन

कोणताही ज्योतिषी हल्ली

कोणताही ज्योतिषी हल्ली कॉम्प्युटर वापरून पत्रिका बनवून देतो. पण जर ते सॉफ्टवेअर लिहीणा-याने काही चुक केली असेल तर ती पत्रिका १००% बरोबर असेल का?
अर्रर्रर्र्र.......... तुम्ही आणखी एक नवी सबब शोधून दिलीत की. खोटे ठरले तर दोष प्रोग्रामर चा. खरे ठरले तर श्रेय ज्योतिषाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेझी
अ
अनिरुद्ध प गुरुवार, 10/10/2013 - 11:49 नवीन

सॉफ्टवेअर लिहीणा-याने काही चुक केली

ती असलीच तरिही ज्याचा विद्येचा सखोल अभ्यास असेल तो ती पत्रिका स्वता नव्याने बनवुन ताडु शकतो,काही जण असेही ऐकलेले आहेत जर आपण एखद्या व्यक्तिचे प्रकाशचित्र आणि कुन्डली दिलीत तर ते प्रकाशचित्र पाहुन सान्गतात कि ती कुन्डली त्या व्यक्तीची आहे किवा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेझी
व
विटेकर Wed, 10/09/2013 - 15:31 नवीन

डॉक्टर श्री यांच्याशी पूर्ण सहमत..

भविष्य पहाणे हा मानसिकतेचाच भाग आहे. ज्यामुळे संकट काळात मनाला उभारी येते ते करायला काय हरकत आहे? प्रत्यक्ष संकटापेक्षा संकटाच्या कल्पनेने मनुष्य अर्धमेला होतो. आणि संकट आल्या वाटेने निघून ही जाते पण त्याकाळात जी मानसिक हानी होते त्यावर भविष्याचा सल्ला उपयोगी पडू शकतो. अमूक काळानंतर संकट संपणार आहे हा दिलासा फार मोठा असतो ! आणि सल्लाच तो , तो काय डॉक्टरांचा चुकत नाही काय ? ज्योतिषाकडे जाताना आपण एका सल्लागाराकडे जात आहोत एव्ढेच ध्यानात ठेवावे. आपल्या संचितामुळे आपल्या वाट्याला भाग्य येत असते त्यात ब्र्ह्मदेवाचा बाप देखील बदल करु शकत नाही. फक्त ते भोगताना कमी त्रास व्हावा , भोगून संपून जावे अशांसाठीच उपाय योजना करता येऊ शकते, भाग्य बदलता येऊ शकत नाही यांवर माझा ठाम विष्वास आहे. आणि मग जे बदलता येत नाही ते जाणून घ्यावे का ? हा ज्याच्या त्याच्या मान्सिकतेचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 10/09/2013 - 15:46 नवीन

बेशिकमध्येच लोच्या

ज्योतिषी भाग्य बदलू शकतो असा बहुतांश ज्योतिषांचाही दावा असतो किंवा कसे याबद्दल साशंक आहे. तूर्तास मुख्य वाद हा कुंडलीत बघून खरे भविष्य कळते की नाही हाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Wed, 10/09/2013 - 16:26 नवीन

खरे भविष्य..

नसेना का खरे भविष्य ! डॉक्टर महाशयांचे निदान चुकत नाही का? आणि सेकंड ओपिनियन घ्या ना ! प्रत्येक विद्येच्या आणि व्यवसायाच्या मर्यादा आहेत. वैमानिक/चालक योग्य तर्हेने विमान/वाहन चालवून आपल्याला विविक्षित स्थळी पोहोचवेल अशा विश्वासानेच आपण विमानात/ वाहनात बसतो ना ? पण कधी कधी चूक होते ना ? मग ज्योतिषानेच परिपूर्ण असावे असा आपला आग्रह का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 10/09/2013 - 16:46 नवीन

सफरचंद-संत्रे तुलना.

अतिशय हास्यास्पद तुलना. डॉक्टरकी आणि वैमानिक शास्त्र (प्राचीन नव्हे आणि अर्वाचीन) यांतही चुका होतात. पण शास्त्राचा बेस पक्का आहे. जे ठोकताळे आहेत ते निव्वळ प्युअर चान्सपेक्षा जास्त आहेत किंवा नाहीत यांच्या अतिशय काटेकोर चाचण्या घेतल्या जातात. एखादे नवीन औषध बाजारात आणायचे तर प्रयोग केले जातात, विमानाचा पार्ट डिझाईन करताना कितीतरी चाचण्या घेऊन मगच तो योग्य तिथे जोडला जातो. एक लक्षात घ्या, शास्त्र म्हंजे १००% अ‍ॅक्युरसी असे नसते. पण चुका झाल्या तरी बेस पक्का ही ग्यारंटी सततच्या प्रयोगांतूनच मिळते. सातत्याने प्रयोग करून, एखाददुसरे प्रचल बदलून काय निष्कर्ष होतात त्यांच्या आधारे हे सगळे ठरवले जाते. ज्योतिषात असे काय आहे? पुणे विद्यापीठाने अशी चाचणी घेतली तेव्हा संख्याशास्त्राच्या आधारे ज्योतिषांचे दावे फोल ठरले. नियमाला अपवाद सापडल्यामुळे नियम रद्दबातल होतोच असे नाही, परंतु त्यासाठी अनेकविध संख्याशास्त्रीय चाचण्या आहेत, काय-स्क्वेअर टेस्ट, टी-टेस्ट, झेड-टेस्ट, फिशर्स कोरिलेशन टेस्ट, इ.इ. यांपैकी कुठल्या चाचणीत ज्योतिषाला आजपर्यंत बसवले गेले आहे? चार टाळकी जुन्या काळापासून सांगत आलीत म्हणून दावा करणे यापलीकडे ज्योतिषात काय रिगरस पार्ट आहे हे सांगता आले तर बरे. कुणाला इच्छा आहे त्याने अवश्य ह्या फ्रॉडच्या मागे लागावे. मुद्दा इतकाच आहे, की या लोकांचे दावे धडपणी पडताळायला हे लोकच तयार नसतात-पितळ उघडे पडण्याच्या भीतीमुळे. आणि जिथे दावा पडताळायचा चान्स मिळतो, तिथे पितळ झक्कत उघडे पडतेच!!! जरा शोधले तर रामदास वैग्रे संतांनीही या पाखंडाला शिव्याच घातलेल्या दिसून येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Wed, 10/09/2013 - 16:57 नवीन

...

अतिशय हास्यास्पद तुलना धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सस्नेह Wed, 10/09/2013 - 15:57 नवीन

मुद्दा काही का असेना,

मुद्दा काही का असेना, प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
प
पिलीयन रायडर Wed, 10/09/2013 - 17:12 नवीन

माझा ह्या विषयावर पुष्कळ

माझा ह्या विषयावर पुष्कळ गोंधळ झालेला आहेच.. त्यामुळे मी ज्योतिष खरे की खोटे ह्या फंदात पडत नाही..पण.. धोंडोपंतांच्या ब्लॉग वर अनेकदा असे लेख असतात ज्यात ते नेमकी तारीख/ ठिकाण सांगतात. इथे "घरात तुम्ही सगळ्यांच कराल पण कुण्णी कुण्णी तुमचा विचार करत नाही" टाईप भविष्य नाहीये. कधी परदेशात जाईन - अमुक तारीख इतकं ठोस सांगितल्याच दिसतं.. हे कसं काय?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 10/09/2013 - 17:29 नवीन

सायकॉलॉजिकल

मी मागे म्हणाल्याप्रमाणे हा सायकॉलॉजिकल इफ्फेक्ट असावा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बॅटमॅन Wed, 10/09/2013 - 17:32 नवीन

सँपल सिलेक्शन बायसदेखील असावा

सँपल सिलेक्शन बायसदेखील असावा...नव्हे तो असणारच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बाळ सप्रे Wed, 10/09/2013 - 17:30 नवीन

इतकं ठोस सांगितल्याच दिसत

इतकं ठोस सांगितल्याच दिसत असेल तर त्यांनी पुणे विद्यापीठ / अंनिसचं चॅले़ज स्वीकारायला हव होतं असं नाही का वाटत? असे बरेच दावे घटना घडून गेल्यावर हमखास ऐकु येतात.. तसेच चुकलेल्या भविष्याविषयीमात्र सोयीस्कररीत्या मौन बाळगले जाते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 10/09/2013 - 17:42 नवीन

पुणे विद्यापीठ / अंनिसचं चॅले़ज आणि धोंडोपंत

त्या बद्दल काही माहित नाही... माझा प्रश्न इतकाच आहे की ढोबळ भविष्य सांगणारे पाहीले आहेत. पण पंतांच्या ब्लॉगवर तर प्रश्नाचे एकच एक उत्तर (जसे की अमुक तारीख) आणि त्या उत्तरापर्यंत ते कसे पोहोचले ह्याचे विवेचन असते. ज्यांना पत्रिका कळते ते लोक वाचुन सांगतिल की ते विवेचन कितपत बरोबर असते. पण जर कुणी गणित सोडवल्या सारखं भविष्य सांगत असेल आणि जेनरिक उत्तरा ऐवजी स्पेसिफिक उत्तर देत असेल तर त्यांच्या पद्धतीचा अभ्यास करता येईल का? तुम्ही एकदा ब्लॉग पहा.. विवेचन जे मी म्हणत आहे ते असे करतात ते.. नमुन्या दाखलः- http://dhondopant.blogspot.in/2013/09/blog-post.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Wed, 10/09/2013 - 19:33 नवीन

ब्लॉग वाचला.. एकतर घटना घडुन

ब्लॉग वाचला.. एकतर घटना घडुन गेल्यावरचा दावा आहे.. पुढे.. स्पेसिफिक उत्तर आणि विवेचन असले तरी विवेचनाच्या मूळाशी गेल्यास "रवि आश्लेषात गेल्यावर २-३ दिवसात घटना घडेल" अशी कार्यकारणभावरहीत विधानेच आहेत.. वरच्या शब्द्दांच्या बुडबुड्यांना भुलून लोकांना वाटतं "वा ! काय विवेचन आहे!!" पण त्या वैभवच्या परदेशी जाण्याचा आणि सूर्याच्या त्या नक्शत्रात जाण्याचा काय संबंय?? याचं विवेचन कुठाय?? एखादा सॉफ्टवेअर मध्ये काम करणारा , व्हिसा असणारा माणूस जो बरेच दिवस परदेशी जायला "ड्यू" आहे.. त्याला "लवकरच जाशील" असे सांगितल्यास उत्तर बरोबर येण्याची शक्यता जास्त हे समजण्यासाठी ज्योतिष जाणण्याची (??) गरज नसून फक्त कॉमन सेन्स असला तरी पुरतो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 10/10/2013 - 11:17 नवीन

बरोबर.. साधारण अंदाज बघुन..

बरोबर.. साधारण अंदाज बघुन.. परिस्थिती पाहुन ज्योतीष सांगता येईल असं मलाही वाटतं.. मला कुतुहल फक्त "४-५ ऑगस्ट ला जाशील" हे सांगुन मग तो वैभव खरच ५ ऑगस्टला गेला ह्या गोष्टीचं वाटतं.. आणि अशा बर्‍याच घटना ते लिहीतात. म्हणुन ज्यांना इथे पत्रिका कळते त्या व्यक्तीने सांगावे की इतके अचुक काही सांगणे कसे शक्य आहे? मुळात ज्योतीषाच्या विरोधात सगळेच लिहीत आहे. इथे कुणी शास्त्रशुद्ध आणि संयमित भाषेत पत्रिकेमधल्या ह्या गणितांविषयी सांगेल काय? धोंडोपंत लिहीतील अशी मला मुळीच आशा नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
स
सुहासदवन गुरुवार, 10/10/2013 - 11:24 नवीन

एखादी हिंट

जातकाने त्याला विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना अशी एखादी हिंट दिली जाण्याची दाट शक्यता आहे. बहुतेक वेळा आपल्या प्रश्नांची उत्तरे आपणच नकळत देत असतो हीच तर खरी ट्रिक असते प्रश्नांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
V
vrushali n गुरुवार, 10/10/2013 - 12:39 नवीन

माझे त्यांनी(धोंडोपतन्नी)

माझे त्यांनी(धोंडोपतन्नी) सांगीतलेले भविष्य जूळले नाही,M.D.मिळ्ण्यासाटी २०१२ डिसेंबर नंतर चांगला वेळ आहे,असे सांगीतले होते,पण मला जुने २०१२ मधेच चांगली, हवी असलेली ब्रांच मिळाली( rank बराच मागे असुनही,बहुदा पाचवा गुरुमूळे),आणी चेपू वर ते IPL match चा निकाल आधीच सांगत(बहुदा के.पी पध्द्तीप्रमाणे,काही वेळा चुकल्यावर्,त्यांनी त्याचे खापर match फि़कसींगवर फोड्ले होते....( "मूलाने सान्गंतलेले match फि़कसींग चे आरोप खरे असावेत असे आम्हस वाटु लागले आहे" हे त्यांचे शब्द होते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/10/2013 - 12:55 नवीन

अशी चुकलेली उदाहरणे कधीच समोर

अशी चुकलेली उदाहरणे कधीच समोर येत नाहीत तर गोमयवत् कारणे सांगून दडपली जातात. इथेच कौंटर एग्झांपल सांगितल्याबद्दल बहुत धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
ब
बाळ सप्रे गुरुवार, 10/10/2013 - 13:24 नवीन

माझे दीर्घ प्रतिसाद टंकण्याचे

माझे दीर्घ प्रतिसाद टंकण्याचे श्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
प
पिलीयन रायडर गुरुवार, 10/10/2013 - 13:31 नवीन

हो.. हे शक्य आहे की खापर

हो.. हे शक्य आहे की खापर फोडायला इतर बरीच कारणे मिळतात.. तुम्ही त्यांच्याकडे पैसे परत मागितले का? किमान स्पष्टीकरण तरी की का चुकले त्यांचे भविष्य? (विचारले असल्यास तुम्हाला काही तोडगा सांगितला असेल आणि तुम्ही तो केला नसेल म्हणुन तुमचीच चुक.. वगैरे उत्तर मिळाले का ?) बाकी आपल्या बोलण्यातच आपल्या प्रश्नाचे उत्तर असते हे मात्र खरे. खुपदा त्याने हिंट मिळते. ते पट्ट्या पाहुन भविष्य सांगणार्‍या कडे एकदा काय सांगतात ते ऐकायला गेले होते (दुसर्‍याचे भविष्य..माझे नाही) तेव्हा ह्या प्रकाराची साक्ष पटली.. "तुमचे नाव ए, डी, एम पैकी कशाने सुरु होते का? " नाही .. "बर मगं.. के, पी, एल ??" & सो ऑन... अरे काय चेष्टा आहे काय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/10/2013 - 14:18 नवीन

नाडी????????????? अरेरेरे....

नाडी????????????? अरेरेरे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 10/10/2013 - 14:42 नवीन

भोग हो.. आणखीन काय?

भोग हो.. आणखीन काय? माझा राहु / केतु वक्री असणार तेव्हा म्हणुन चांगले २ तास वाया गेले माझे...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
V
vrushali n गुरुवार, 10/10/2013 - 14:25 नवीन

नाही हो...

मी त्यांना ना पैसे परत मागीतले ना स्पष्टीकरण....उलट मी खूश होते,की त्यांच भविश्य चुकले आणी मला चांगली ब्रांच मिळाल्याने...पण मला मिलींद चितम्बर सरांचा खुप चांगला अनुभव आलाय्,त्यानी वर्तवलेले ९९% भविश्य खर निघालय्,आणी तेहि चकटफु.....त्यामुळे मी तरी भविश्य कोण सांगत ह्यावर भर देते,काय सांगते पेक्शा...कारण ईन्टर्र्प्रीटेशन करणारा महत्त्वाचा अस्तो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 10/10/2013 - 14:40 नवीन

नाही.. मला अशासाठी विचारावं

नाही.. मला अशासाठी विचारावं वाटलं की आपलं किती भविष्य बरोबर आलं हे जर कुणी इतकं डिट्टेलवार लिहीत असेल आणि "मला गरज नाही जातकांची" इतका जर आत्मविश्वास असेल तर असे लोक आपलं चुकलं हे कळाल्यावर काय करतात? तितक्याच बेधडकपणे त्याला सामोरे जातात का? आणि जी फिस घेतात *(जी पुष्कळ असेल असा माझा अंदाज आहे) ती परत देतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
V
vrushali n गुरुवार, 10/10/2013 - 15:03 नवीन

ह्म्म्..होना

चांगले १६०० रूपये घेतलेत हो... फिस परत मिळणार नाही हे आधीच सांगीतले जाते..माझ खरच चुकले हो...त्यांना फीड बॅक द्यायला हवा होता....आता April 12 ची गोश्ट असल्याने आणी एण्ड भला तो सब भला असा विचार केल्याने राहूनच गेल हो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 10/10/2013 - 15:09 नवीन

वाटलच..

मुद्दामच विचारलं कारण माझा (दुसर्‍या एका प्रसिद्ध ज्योतीषाबाबतीत) असा अनुभव आहे की त्यांचे भविष्य चुकले. मला काही पैसे नको होते, पण तुम्ही सांगितले ते चुकले एवढेच सांगायला फोन केला तर त्या माणसाने अभुतपुर्व तमाशा केला. की कसं तुमचच चुकलं आणि माझं काहीही चुकलेलं नाहि..तुम्हीच मी सांगितलं ते सगळं केलं नाही... प्रसिद्धी मिळाली की माणसं उद्दाम आणि असंवेदनाशील होतात हे पाहायला मिळाले. (कारण भविष्य चुकल्याने अर्थात घरात हिरमोड झाला होता. अगदि ज्योतीषाकडेही गेलो एवढी ती बाब गंभीर होती.. त्याचे ह्यांना काहिच नाही.. "मी चुकलो नाही" हाच घोष)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा