✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लघुपाककृतीस्पर्धा

ग
गणा मास्तर यांनी
Wed, 09/17/2008 - 07:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30294 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

ग
गणा मास्तर Wed, 09/17/2008 - 13:03 नवीन

अरे वा

भरपुर पाककृती लिहिल्या तुम्ही तर..... हा खास तुमचाच प्रांत दिसतो. मिक्सर वापरायला बंदी असल्याने कॉर्न उपमा बाद - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मनस्वी Wed, 09/17/2008 - 13:06 नवीन

त्याऐवजी...

तुम्ही पाटा-वरवंटा वापरू शकता. आणि त्याला बंदी नाहीये! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
ग
गणा मास्तर Wed, 09/17/2008 - 13:14 नवीन

तुम्ही

तुम्ही पाटा-वरवंटा वापरू शकता. आणि त्याला बंदी नाहीये टेक्निकल चुक पकडलीस अगदी. खरे तर खरडा भरडायची तकतक नको कारण ती सोय नाही माझ्याकडे - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2008 - 16:41 नवीन

अट क्र. ४

४)मिक्सर किंवा पाटा वरवंटा न वापरता तयार करता येण्याजोगा हवा म्हणजे त्याला बंदी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
म
मनस्वी Wed, 09/17/2008 - 17:05 नवीन

अद्ययावत

>पाटा वरवंटा काका.. ते त्यांनी नंतर अद्ययावत केलंय. माझ्याकडे अजून १ पर्याय आहे -----> मक्याचे दाणे खलबत्त्यात ५ मि कुटून घ्यावेत. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2008 - 17:08 नवीन

असं आहे होय?

मक्याचे दाणे पोळपाटावर चेपूनही घेता येतील. (मी माझ्या पाककृतीत दिल्या प्रमाणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
व
विसोबा खेचर Wed, 09/17/2008 - 13:08 नवीन

पहिला नंबर.. :)

परिक्षकांचे मत माहीत नाही, परंतु आम्ही मनस्वीला पयला नंबर देत आहोत... :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ऋ
ऋचा Wed, 09/17/2008 - 12:27 नवीन

माझ्या काही पा.कृ.

जिरा शीरा वेळ १० मिनिटे. १ वाटी बारीक रवा, दिड वाटी पाणी, तिखट्,मीठ्,साखर. रवा खमंग भाजुन घ्यावा (३-४ मिनिटात होतो भाजुन) पाणी उकळत ठेवावे एकीकडे फोडणी करावी त्यात मोहोरी न घालता जीरे घालावेत. त्यात भाजलेला रवा घालावा व एकत्र करुन घ्यावा त्यात उकळलेले पाणी घाला मीठ्,तिखट्,साखर घाला. २ मिनीटे वाफ आणा. झाला जीरा शीरा तयार!! तांदुळाचे घावन वेळ ५ मिनिटे. तांदुळाचे पीठ १ वाटी,मीठ तांदुळाचे पीठ पाण्यात जाडसर भिजवावे त्यात चिमुटभर मीठ घालावे. तव्यावर पातळ पसरावे. दोन्हीकडुन रंग बदलल्यावर तव्यावरुन काढावे. (ह्यात हवे असल्यास मीरचीचे बारीक तुकडे घालावेत) सॉस,लिंबाच्या लोणच्या बरोबर खावे. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
आ
आरती Wed, 09/17/2008 - 12:30 नवीन

मुग डाळीचे कबाब

मुग डाळीचे कबाब साहित्य : १ कप मुगाची डाळ, कप उकडलेला बटाटा (मळून), थोडा बारीक चिरलेला कांदा, २ चमचे मिर्चि पावडर, १/४ चमचा गरम मसाला, १/४ चमचा हळद, १ चमचा आल-लसूण पैस्ट, १ चमचा चाट मसाला, २ चमचे कोथिंबीर, चवीपूरता मीठ. कॄती : निवडून, धूऊन मुगाची डाळ ऊकडून घ्यावी. त्यात उरलेले बाकीचे साहीत्य नीट मिसळून घ्यावे. मग त्याचे लहान लहान गोळे करावे. मग सळीला लावून मायक्रोवेव्ह मध्ये ३ ते ४ मिनीटे बेक करणे. गरमागरम कबाब तय्यार......... हिरव्या चटणी बरोबर गरम गरम खावेत.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Wed, 09/17/2008 - 13:06 नवीन

वाचुनच तोंडाला पाणी सुटले

वाचुनच तोंडाला पाणी सुटले.... पण कोथिंबिर प्रतिबंधित आहे :H ......बघा जमल्यास काही बदल करता येतो का ते :W - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरती
आ
आरती Wed, 09/17/2008 - 14:00 नवीन

कोथिंबिर

कोथिंबिर नको असल्यास पूदिना वापरला तरी वेगळीच चव येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
व
वल्लरी Wed, 09/17/2008 - 13:09 नवीन

काही सोप्या पाककृती

दुध-पोहे वेळ ५ मिनिटे साहि त्यः १.दुध २.जाड पोहे ३.वेलची +जायफळ पुड्-चिमुटभर ४.साखर ५.चवीनुसार मीठ कॄती : एका बाऊल मध्ये १ कप जाड पोहे घेउन त्यात दुध गरम करुन टाकावे (पोहे दुधात भिजेपर्यत).वरुन वेलची +जायफळ पुड्-चिमुटभर आणी साखर जेतके गोड हवे असेल तितकि,चवीनुसार मीठ टाकावे. दुध-पोहे तयार ........ =============================================================== मक्याच्या दाण्याचा चाट वेळ १० मिनिटे साहि त्यः १.उकड्लेले मक्याचे दाणे २.बटर ३.मिरपुड ४.लाल तिखट ५.चवीनुसार मीठ कॄती : एका बाऊल मध्ये उकड्लेले मक्याचे दाणे,थोडे बटर,मिरपुड,थोडे लाल तिखट,आणी चवीनुसार मीठ घालुन छान मिक्स करणे. मक्याच्या दाण्याचा चाट तयार.........
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 09/17/2008 - 13:21 नवीन

कच्चा चिवडा २

कच्चे पातळ पोहे. दीड वाटी त्यात अर्धा चमचा काळा मसाला मीठ चवी पुरते , एक चमचा गोडे तेल , भाजके किंवा कच्चे शेंगदाणे , टाकुन हलवुन घ्यावे. खाताना असेच किंवा दही / ताक टाकुन खावे तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरली आहे
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 09/17/2008 - 15:06 नवीन

कोळीनिकडु

कोळीनिकडुन ताजा हलवा किंवा पापलेट आणावा, चाकुने खवले साफ करुन स्वछ्ह धुवावा (२ मिन.) ऊभ्या आड्व्या चिरा पाडुन आत चाट मसाला/ मिरचि/ मीठ हे मिश्रन भरावे. वरुन थोड दही चोळाव ( ३ मिन.) केळिच्या पानात गुंडाळुन १० मिन. तव्यावर झाकुन ठेवावि(अधुन मधुन ऊलटावी), किंवा, २ मिन माय्क्रो आनि ७-८ मि. ग्रील करावी... (पदार्थाची चव कोळीन आणि हलवा यानुसार बदलते.) अजुन एक.. राजगीर्‍याच्या लाडुवर गरम दुध टाकाव, आव्श्यक्ता वाट्ल्यास थोडा गुळ/खजुर वरुन घ्यावा. आनि चमचाने खावे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2008 - 16:38 नवीन

काही झटपट पाककृती....

तवा चिझ सँडवीच. साहित्यः ब्रेड स्लाईस - २ छेडर चिझ स्लाईस - १ बटर - २ टेबल स्पून कृती: प्रत्येक स्लाईसला दोन्ही बाजूंनी बटर लावून घ्यावे. दोन्ही स्लाईस तापलेल्या तव्यावर ठेवावेत. खालून चरचरीत लाल झाल्यावर एक स्लाईस उलटून त्यावर चिझचा स्लाईस ठेवावा आणि त्यावर दुसरा स्लाईस न उलटता ठेवावा. (म्हणजे भाजलेली लाल चरचरीत बाजू चिझवर येईल अशा पद्धतीने). आता हे सँडवीच दोन्ही बाजूंनी भाजून लाल चरचरीत करून घ्यावे. तसे झाले की तव्यावरून उतरवून तिरपे (डायगोनली) कापून खावेत. ऑन्यन (कांदा) सँडवीच. साहित्यः ब्रेड स्लाईस - २ बटर २ टेबलस्पून मेयॉनिझ १ टेबलस्पून कांदा अर्धा (छोटासाच) भरडसर काळीमिरी पूड प्रत्येक स्लाईसला दोन्ही बाजूंनी बटर लावून घ्यावे. दोन्ही स्लाईस तापलेल्या तव्यावर ठेवावेत. खालून चरचरीत लाल झाल्यावर दोन्ही स्लाईस उलटून दुसर्‍या बाजूनेही तसेच भाजून घ्यावेत. तव्यावरून खाली उतरावावेत. कांदा पातळ, लांब चिरून घ्यावा. एका स्लाईसला मेयॉनिझ लावून घ्यावे. त्यावर पातळ लांब चिरलेला कांदा पसरवावा. त्यावर दूसरा स्लाईस ठेवून तिरपे (डायगोनली) कापून खावेत. धिरडे. साहित्य: १ वाटी तांदूळाचे पीठ १/२ वाटी चण्याच्या डाळीचे पीठ (बेसन) १/४ टीस्पून हळद १/४ वाटी बारीक चिरलेला कांदा २" आलं ३-४ लसूण पाकळ्या १ टीस्पून जीरं मीठ चवी नुसार. तेल परतण्यासाठी. कृती: आलं लसूण वाटून घ्यावे. (बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत). (तेल वगळता) सर्व साहित्य एकत्र मिसळावे आणि पाणी घालून सरसरीत भिजवावे. (ताका इतके पात्तळ नाही. जरा जाड ठेवावे) फ्राय पॅन मध्ये तेल तापवून त्यावर एक डाव वरील मिश्रण ओतून, पॅन गोलाकार फिरवून, सगळीकडे नीट पसरावे. झाकण ठेवून मध्यम आंचेवर शिजवावे. शिजल्यावर सर्व बाजूने बारीक तेल सोडून धिरडे उलटावे. दुसर्‍या बाजूनेही झाले की दह्या बरोबर खावे. (दह्यावर लाल तिखट भुरबुरावे.) गार्लीक ब्रेड साहित्यः बटर २-३ टेबलस्पून गार्लीक पेस्ट स्वादानुसार. फ्रेंच ब्रेड किंवा नॉर्मल ब्रेड स्लाईस. मॉझरेला चिझ आवडी नुसार. लाल तिखट चवीनुसार. बटर मध्ये आपल्या आवडीनुसार गार्लीक पेस्ट मिसळून 'गार्लीक बटर' तयार करावे. फ्रेंच ब्रेड घेतला तर त्याचे १ इंच जाडीचे तिरपे स्लाईस कापून घ्यावेत अन्यथा साधे ब्रेड स्लाईसही चालतील. ब्रेडला एकाच बाजूने 'गार्लीक बटर' लावून घ्यावे. त्यावर मॉझरेला चिझ किसून घालावे. (आवडीनुसार) वरून लाल तिखट भुरभुरावे. हे स्लाईस ओव्हन मध्ये ७ मिनिटे ग्रील करून घ्यावेत. गरम-गरम खावेत, थंड करू नयेत. जॅम अँड घी सँडवीच. साहित्यः कुठलाही आवडता जॅम. खमंग साजूक तूप. ब्रेड स्लाईस. जॅम आणि तूप एकत्र करून घ्या. तुमच्या आवडीनुसार प्रमाण ठरवावे. हे मिश्रण स्लाईसला लावून त्यावर दूसरा स्लाईस ठेवा आणि कडा काढून तिरपे कापा. मस्त मजेत खा. ह्या सर्व पाककृती परिक्षक वर्ग स्वतः करून पाहून निर्णय देणार आहेत की नुसत्या पाककृती वाचून? कारण पदार्थात चव फार महत्त्वाची आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 09/17/2008 - 16:42 नवीन

परिक्षकां

परिक्षकांचं मत मला माहीत नाही परंतु पेठकराशेठनाही मी पयला नंबर देईन..:) त्यांच्या सर्व पाकृ छानच आहेत... ह्या सर्व पाककृती परिक्षक वर्ग स्वतः करून पाहून निर्णय देणार आहेत की नुसत्या पाककृती वाचून? कारण पदार्थात चव फार महत्त्वाची आहे. या मुद्द्याशी मी सहमत आहे... आपला, (स्वैपाकी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मनस्वी Wed, 09/17/2008 - 17:03 नवीन

मस्त!

आलं लसूण वाटून घ्यावे. (बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
:D काका, तवा चिझ सँडवीच आणि जॅम अँड घी सँडवीच पाकृ आवडल्या! अशी धिरडी पण अधेमधे करते मी. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ग
गणा मास्तर गुरुवार, 09/18/2008 - 06:08 नवीन

निर्णय

>>ह्या सर्व पाककृती परिक्षक वर्ग स्वतः करून पाहून निर्णय देणार आहेत की नुसत्या पाककृती वाचून? कारण पदार्थात चव फार महत्त्वाची आहे. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद बघता सर्व पाककृती करणे शक्य होणार नाही, त्यामुळे पाककृती वाचुनच निर्णय देण्यात येईल. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2008 - 11:07 नवीन

निराशा..

निराशा झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
ग
गणा मास्तर Fri, 09/19/2008 - 11:20 नवीन

निराशा

समजु शकतो . पण स्पर्धा संपल्यावर इथल्या पाककृती निवांत करुन पाहीन - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
अभिज्ञ Wed, 09/17/2008 - 17:35 नवीन

आमचिहि बक्षिसपात्र पाककृती..

झानटामाटिक नुडल्स. साहित्य. १.मॅगि -२ मध्यम आकाराचे २. १ कांदा ३. १ बटाटा ४. १ सिमला मिर्ची ५. १ टोमॅटो. ६. तेल,मीठ,मोहरी,जिरे, तिखट, हळद (चवी नुसार व एका फोडणी साठि) ७.आले लसुण पेस्ट ८. बटर (२ मोठे चमचे) ९ .टोमॅटो सॉस (चवीनुसार) कृती : भाग १. एका जाड बुडाच्या पातेल्यात २.२५ ग्लास पाणि घालून उकळी फुटल्यावर त्यात मॅगी चे दोन तुकडे घाला व शिजवून घ्या.३ मिनीटे झाल्यावर एका ग्लासात हे पाणि गाळणिने वेगळे काढून घ्या व शिजलेली मॅगि एक वेगळ्या ताटलीत काढून घ्या. भाग २. प्रथम सर्व भाज्या धुवुन व चिरुन घ्या. कांदा व टोमॅटो बारिक चिरावेत. एका पॅन मध्ये २ च. तेल सोडा व त्यात मीठ,मोहरी,जिरे,तिखट्,हळद घालुन फोडणी करून घ्या. त्यात बारिक चिरलेला कांदा २-३ मि. परतुन घ्या. मग ह्यात आले लसुण पेस्ट घालावी व पुन्हा एकदा परतून घ्यावे. त्यातच बारिक चिरलेला टोमॅटो घालून एक वाफ येउ द्या. बटाटा व सिमला मिर्ची घालून थोडे परतवा. ग्लासातील पाण्यात मॅगी बरोबर आलेला नुडल्स मसाला (फक्त एकच पाकिट) घालून ते मिश्रण ह्या भा़जीत ओता. पाणि गरजेनुसार कमी जास्त करावे. व पॅनवर झाकण ठेवून बटाटा बर्‍यापैकी शिजे पर्यंत वाट पहावी. मग त्यात ताटात काढलेली मॅगी घालून मिश्रण नीट मिक्स करून हे २ मिनीटे शिजवून घ्यावे. शिजतानाच त्यात बटर व टोमॅटो सॉस घालावा. जेमतेम पाणी शिल्लक राहिल असे पहावे. हे सर्व झाल्यावर ह्या नुडल्स ताटलीत घेउन गिळाव्यात ह्या नुडल्स एकदम झानटामाटीक लागतात. (झानटामाटिक = लै भारी ?) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 09/17/2008 - 22:11 नवीन

एकसे एक

एकसे एक पाकृ आहेत!! मस्त!!
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Wed, 09/17/2008 - 23:14 नवीन

चिकन पकोडा आणि पनीर बुर्जी

चिकन पकोडा बोनलेस चिकन चे तुकडे करून घ्यावेत. साधारण दीड दोन इंच लांब. १ कप बेसन, २ चमचे लाल मिरची पावडर (तिखट), पावचमचा हळद, असल्यास १ चमचा आले लसूण पेस्ट आणि १ चमचा गरम मसाला पावडर , चवीनुसार मीठ हे सर्व पदार्थ एकत्र करून थोडे पाणी घालून भज्याच्या पिठासारखे पीठ बनवून घ्यावे. पीठ खूप पातळ ही नको आणि अतिघट्ट ही नको. कढईत तेल गरम करावे. चिकनचे तुकडे पीठात बुडवून लालसर रंगावर तळावेत. टोमॅटो केचप बरोबर गरमागरम पकोड्यांचा आस्वाद घ्यावा. अगदी झटपट होणारी पाककृती आणि तितकीच स्वादिष्ट. (बोनलेस चिकन पाव ते अर्धा किलो घ्यावे. पीठ कमी पडल्यास लगेचच पटकन परत तयार करता येते. ) पनीर बुर्जी २५० ग्रॅम पनीर चे अगदी बारिक तुकडे करून घ्यावे. १ छोटा कांदा बारीक चिरून घ्यावा. १ टोमॅटो बारिक चिरून घ्यावा. पातेलीत २-३ चमचे तेल गरम करावे. त्यात कांदा परतून घ्यावा. चविनुसार मीठ घाला. ( कांदा परतानाच मीठ घातले तर कांदा पटकन शिजला जातो कारण मीठाने कांद्याला पाणी सुटते आणि विस्तवामुळे पाण्याची वाफ होऊन कांद्यातील पाणी पटकन उडून जाते.). त्यात टोमॅटो घालून तो पण परतून घ्यावा. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, १ चमचा गरम मसाला पावडर , चिमूट्भर हिंग घाला. सर्व व्यवस्थित मिक्स करा. पनीर चे तुकडे घाला . चांगले हलवून घ्या. मंद गॅस वर अर्धा एक मिनिट ठेवा. मधून मधून हलवत रहा म्हणजे भांड्याला चिकटणार नाही. गरम असतानाच ब्रेड बरोबर आस्वाद घ्या. (अमेरिकेत असाल तर भारतीय दुकानात फ्रोजन सेक्शन मध्ये पनीर मिळेल.) ईश्वरी
  • Log in or register to post comments
श
शिवा जमदाडे Fri, 09/19/2008 - 15:43 नवीन

चिकन पकोडा सकाळी ८ वाजता???

चिकन पकोडा सकाळी ८ वाजता? हा रात्री ८ वाजता चांगला राहिल, आंबट द्रव्यासोबत.... - (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरी
ई
ईश्वरी Wed, 09/24/2008 - 08:07 नवीन

>>चिकन

>>चिकन पकोडा सकाळी ८ वाजता? हा रात्री ८ वाजता चांगला राहिल, आंबट द्रव्यासोबत.... खाद्यपदार्थ हा नाष्ट्यासाठीचा पदार्थ हवा. (भाजी नको ) असे म्हटले आहे. नाष्टा जसा सकाळचा तसा संध्याकाळचा ही असू शकतो...थोडक्यात मधल्या वेळचे खाणे. स्नॅक्स म्हणा हवंतर. खाद्यपदार्थ 'सकाळच्याच' नाष्ट्यासाठीचा हवा असे म्हटलेले नाही. ईश्वरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवा जमदाडे
अ
अंतु बर्वा गुरुवार, 09/18/2008 - 04:59 नवीन

लई भारी

लई भारी दोस्त लोक.... आम्हाला तर वाटल होत अमेरीकेतुन परत जाईपर्यंत काहि चांगल चुन्गल खायलाच मिलनार नाहि.... पण या सगल्या पाकक्रुति बघुन थोड बर वाट्तय....
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री गुरुवार, 09/18/2008 - 09:51 नवीन

आमच्याही

टोस्ट पोटॅटो ब्रेड ला बटर लावुन घेणे. व थोडे तव्यावर टोस्ट करुन घेणे उकडलेला बटाटा सोलुन व किसुन घेणे. त्यात चवी नुसार तिखट्,मीठ आअमचुर व गरम मसाला पावडर ,बारिक चिरलेली कोथिंबीर एकत्र करणे व ब्रेड ला लावुन घेणे. मग त्यावर चीझ किसुन घालणे व २ मि. Microwave करणे. एकदम चटकमटक लागते हे...!!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर गुरुवार, 09/18/2008 - 09:55 नवीन

कोथिंबीर

कोथिंबीर :H - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्नेहश्री
स
स्नेहश्री गुरुवार, 09/18/2008 - 12:55 नवीन

काय????

काय???? समजल नाही मला???? :B घालु नका कोथिंबीर्....हा हा हा सोप्प आहे.....!!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
ब
बेधुन्द मनाची लहर गुरुवार, 09/18/2008 - 14:11 नवीन

टोमॅटो ओमलेट...

साहित्य :-2 वाटी बारीक़ चिरलेले टमाटर २ वाटी बेसन १ चमच हिरवी मिर्ची, आले , लसून पेस्ट (दुकनातुन तयार घ्या) २ चमच ओवा मीठ चवीपुरते हळद कृति : वरील सर्वे साहित्य एकत्र करा व भज्याच्या पीठ सारखे पीठ भिजवा .आता तव्यावर तेल घालून त्यावर चमच्याने पीठ सोडा व पसरून घ्या ,दोन्ही बाजूने खरपूस परतवून घ्या व गरम गरम आमलेट सौसे /लोणचे बरोबर सर्वे करा . लागनारा वेळ - १५ मि. पुनम....
  • Log in or register to post comments
ब
बेधुन्द मनाची लहर गुरुवार, 09/18/2008 - 14:16 नवीन

पालक भजी

साहित्य:पालक (बारीक़ चिरलेला ) १ वाटी,कांदा (बारीक़ चिरलेला ) १ बेसन 2 वाटी,हिरवी मिर्ची २,मीठ,ओवा १ चामच कृति: पालक धुवून बारीक़ चिरून घ्या ,तयार बेसन ,बारीक़ चिरलेला कांदा,हिरवी मिर्ची,मीठ ,ओवा,मिक्स करा थोड़े पानी घालून भज्याचे पीठ भिजवा. आता कढईमधे तेल तापवून त्यात लहान लहान भजी सोडा व दोनही बाजुनी छान खरपूस तळुन घ्या ।
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 09/18/2008 - 18:39 नवीन

अरे वा..

मस्त मस्त पाककृती येत आहेत. :)
  • Log in or register to post comments
श
शिवा जमदाडे Fri, 09/19/2008 - 15:45 नवीन

गोड गोड खा...

  1. कालच्या पोळ्यांचा कुस्करा करा.
  2. पॅन मध्ये मस्त साजुक तुप टाका, आणि पोळ्यांचा कुस्करा टाकून परता.
  3. त्यात किसलेला गुळ टाकून एकत्र करा.
  4. झकास गोड गोड कुस्करा स्वतः खा आणि बच्चे कंपनी ला द्या.
टीपः तुप, कुस्करा आणि गुळ यातील कोण कोणाच्या नंतर टाकायचे, किती प्रमाणात टाकायचे हे काही आम्हाला माहीत नाही बुवा. ती माहिती आमच्या अन्नपुर्णेला विचारून सांगता येईल..... - (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Sun, 09/21/2008 - 21:58 नवीन

आवडली

आवडली - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवा जमदाडे
स
साक्षी Fri, 09/19/2008 - 23:44 नवीन

झटपट पिझ्झा

•रवा पाव वाटी •आंबट ताक एक वाटी •गाजर , ढब्बू मिरची प्रत्येकी एक, कोबीची चार पाच पाने •एखादी मिरची बारीक चिरुन, थोडं आलं किसून, चवीपुरते मीठ •पावाचे स्लाइस पाच सहा •अमूल बटर / लोणी, चीज रवा ताकात १५ मिनिटे भिजवून ठेवावा. सर्व भाज्या बारीक चिरून त्या भिजवलेल्या रव्यात एकत्र कराव्या. आलं, मिरची, मीठ घालून मिश्रण परत नीट एकत्र करून घ्यावे. पावाच्या एका बाजूला अमूल बटर किंवा लोणी व दुसऱ्या बाजूला ह्या मिश्रणाचा जाड थर द्यावा. ५ मिनिटे स्लाइस तसेच ठेवून द्यावेत. तवा मध्यम आचेवर ठेवावा. तवा तापल्यावर पावाची अमूल लावलेली बाजू आधी भाजून घ्यावी व नंतर दुसरी बाजू भाजून घ्यावी. ताटलीत ठेवून वरून चीज किसून घालावे. गरम गरम वाढावे
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 09/20/2008 - 00:00 नवीन

लाह्या

ज्वारीच्या पाण्यात धूवून त्यात दही, मीठ, साखर व थोडं कैरीचं लोणचं घालावं. थोडावेळ भिजू द्यावं (दोन मिनिटं). घट्ट वाटल्यास थोडं दूध घाला. रेवती
  • Log in or register to post comments
प
पाटलीणबाई Sat, 09/20/2008 - 01:01 नवीन

मुग चाट

हिरवे मुग चमचाभर मीठ टाकुन कुकर मधे शिजवुन घ्यावेत. साधरण ३-४ शिट्या पुरेश्या होतात. मुग एका मोठ्या वटित काढुन त्यात दही, टोमॅटो सॉस, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टमाटे, गरजे पुरते लाल तिखट टाकुन एकत्र करावे व वरुन शेव टाकावी. गरम-गरम मुग चाट तयार.
  • Log in or register to post comments
प
परीसा Tue, 09/23/2008 - 17:33 नवीन

टोमॅटो चिझ सँडविच

साहित्य : चांगल्या प्रकारच्या ब्रेडचे तुकडे (स्लाइसेस), लाल टोमॅटो, बटर, चिझ, मिरी पावडर, मीठ. कृती : १. टोमाटोच्या चकत्या (स्लाईस) कराव्यात २.ब्रेडचे कडा काढुन टाकावित. ३. चीझचे बारीक पातळ पिस करावेत किंवा किसुन घ्यावा. ४. ब्रेडला बटर लावावे. त्यावर मिरी पावडर टाकावी. मिठ टाकावे. ५. टोमाटोचे स्लाईस त्यावर ठेवावे. त्यावर चिझ चा किस टाकावा. ६. वरुन परत थोडी मिरी पावडर भुरभुरावी. ७. वरती दुसरा ब्रेड स्लाईस बटर लावुन त्यावर ठेवावा. टोमॅटो चिझ सँडविच तयार. टोमॅटो सॉस बरोबर नाही खाल्लेत तरी चालेल. असेही छान लागते. परीसा
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Tue, 09/23/2008 - 20:14 नवीन

पाककृती

सदर पाककृती धनंजयच्या ओपन फेस टोस्टेड सँडविच (किंवा क्लोज फेस पानीनि)सारखीच आहे. सबब एकच पाककृती दोन स्पर्धकांकडुन स्वीकारता येत नसल्यामेळे आपली प्रवेशिका बाद करण्यात येत आहे. :H स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद. नवीन पाककृती पाठवल्यास नक्की विचार करण्यात येईल. *सर्व वादविवाद भोकरवाडी न्यायालयाअंतर्गत - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परीसा
ब
बिन्धास्त बबनी Wed, 09/24/2008 - 11:59 नवीन

नाचणीची लापशी

नाचणीचे पीठ २चमचे घेऊन त्यात २ वाट्या पाणी घालून शिजवावे. नंतर त्यात २चमचे दही,चिमूटभर मीठ,थोडे जिरे टाकावे.साधारण १ बाऊल भरून मिश्रण होईल.हा अत्यंत पौष्टिक नाश्ता लहानापासून थोरापर्यंत उपयोगी आहे.'रागी पावडर'म्हणून सर्व देशांत,सर्व मॉल्समध्ये मिळ्ते तेच आपली नाचणी पीठ.दररोज घेतल्यास कॅल्शियमची कमतरता जाणवणार नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा