✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लघुपाककृतीस्पर्धा

ग
गणा मास्तर यांनी
Wed, 09/17/2008 - 07:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30294 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

ध
धनंजय Wed, 09/17/2008 - 08:28 नवीन

ओपन फेस टोस्टेड सँडविच (किंवा क्लोज फेस पानीनि)

सामग्री : १. चांगल्या प्रकारच्या ब्रेडचे तुकडे (स्लाइसेस) - वाटेल तितके. अजून सँडविच ब्रेड, किंवा असा कुठलातरी गिच्चगोळा पांढरा पाव खात असाल तर तुमची मुले कॉलेजात निघून गेल्यावर हा पदार्थ करावा. २. लालभडक आंबट टोमाटो : ब्रेडवर चकत्या ठेवण्यापुरते aपाश्चिमात्त्य (थंड) देशात राहात असाल तर फक्त उन्हाळ्यात पदार्थ करावा. भारतात कधीही ३. चीझ : जिथे मिळते तिथे ताजे मोत्सारेल्ला प्रकरचे, नाहीतर वाटेल ते. चीझमध्ये मिठाचे काय प्रमाण आहे, हे ओळखून असावे. ४. तुमचा आवडता सुवासिक पाला : भारतात अर्थात ताजी कोथिंबीर. आवडत असल्यास पांढर्‍या तुळशीची कोवळी पाने. नाहीतर इटालियन तुळशीची (बेसिल) पाने. नाहीतर थाई तुळशीची पाने. (कुठलातरी एकच प्रकार घ्यावा) ५. मिरी ताजी कुटून मिरपूड ६. मीठ कृती १. टोमाटोच्या चकत्या (स्लाईस) कराव्यात २. चीझच्या चकत्या (स्लाईस) कराव्यात ३. सुवासिक पाला बारीक चिरून घ्यावा (श्रेड) टोस्टर ओव्हन असल्यास : ४अ. ब्रेडच्या चकतीवर एक थर टोमाटोच्या चकत्यांचा द्यावा, त्यावर बारीक चिरलेला सुवसिक पाला घालावा. त्यावर चीझच्या चकत्यांचा थर लावावा. ५अ. टोस्टर ओव्हनमध्ये चीझ वितळेपर्यंत, वरून थोडे खरपूस होईपर्यंत टोस्ट करावे. ६अ. ताटलीत वाढावे, ताजी मिरपूड आणि मीठ भुरभुरावे. (टोस्टर ओव्हन नसल्यास - ओपन फेस ऐवजी क्लोझ फेस पानीनि सँडविच करावे) ४आ. ब्रेडच्या चकतीवर एक चीझच्या चकत्यांचा, एक थर टोमाटोच्या चकत्यांचा द्यावा, त्यावर बारीक चिरलेला सुवसिक पाला घालावा. ताजी मिरपूड आणि मीठ भुरभुरावे. त्यावर चीझच्या चकत्यांचा आणखी एक थर लावावा. ब्रेडची दुसरी चकती त्याच्यावर ठेवावी. ५आ. तव्यावर खूप थोड्या तेलावर (किंवा बटरवर) आधी एका बाजूने, मग दुसर्‍या बाजूने सँडविच भाजावे. चीझचे दोन्ही थर वितळले पाहिजेत. ६आ. ताटलीत खण्यास घ्यावे सामग्री एकत्र करण्यास १० मिनिटे. टोस्ट करण्यास ५ मिनिटे (तव्यावर भाजल्यास १० मिनिटे) १५-२० मिनिटे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 09/17/2008 - 08:29 नवीन

अरे

अरे वा! अलिकडे मिपावर निरनिराळ्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत याचा आनंद वाटतो. मिपा चहुबाजूंनी समृद्ध होत आहे असेच म्हणावे लागेल..! आपणहून पुढाकार घेऊन अतिलघुकथास्पर्धा आणि लघुपाककृतीस्पर्धा आयोजित करण्याबद्दल अनुक्रमे सर्किट व गणामास्तरांचे मनापासून आभार व सर्व स्पर्धकांना मन:पूर्वक शुभेच्छा! ..:) आपला, (आनंदीत) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/17/2008 - 08:35 नवीन

मक्याचे(जा

मक्याचे(जास्त निबर नसावेत) दाणे काढुन तव्यात तेल तिखट मीठ टाकुन परतावेत. मस्त लागतात. सगळे कच्चा माल तयार भेटतो.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 09/17/2008 - 09:21 नवीन

गटणेमामा त

गटणेमामा तुम्ही सैपाकघरात केवळ अन्नग्रहणासाठी जाता बहुतेक (ह घ्या) मक्याचे दाणे परतुन घेणे.....दात पडुन जातील. ते अगोदर उकडुन घ्यायचे असतात. किमान ७ ते ८ मिनीटे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/17/2008 - 09:23 नवीन

>>मक्याचे

>>मक्याचे दाणे परतुन घेणे कोवळ्या मक्याचे दाणे घेणे, वाळवलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ह
हर्षद आनंदी Wed, 09/17/2008 - 08:50 नवीन

तिखट्-सांजा

साहित्य : रवा, लसुण, कांदा (आवड्त अल्ल्यास, सक्ती नाही), तिखट (सोसवेल एवढे), मीठ (चवीप्रमाणे), तेल ३ चमचे कॄती : प्रथम तेल गरम करून, मोहरी व लसुण ठेचुन परतुन घ्यावी, त्यात रवा घालुन चांगला भाजावा, तिखट, मीठ, थोडे पाणी घालून मंद आचेवर शिजवावा. वरुन खोबरे-कोथींबीर घालुन गरम गरम ओरपावा... ४ माणसांसाठी १० मिनीटात तयार ...तिखट-मीठ बरोबर असल्यास भाव खाऊन जाल मटार \ मका \ कांदा \ टोमॅटो यांचा वापर प्रत्येक वेळी वेगळ्या चवी साठी करायला उत्तम..
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 09/17/2008 - 09:08 नवीन

रवीवारी

रवीवारी सकाळी, ५ मिनीट बायकोच्या पाककलेची स्तुति करावी, आणि संध्याकाळी खरेदिला कुठेतरी जावूया(कुठेतरी=तुळ्शीबागेचे गावोगावचे अवतार) असे म्हणावे, पुढिल १० मिनटात एक छान पदार्थ तयार होवुन येतो... (बायको असणे आनि तिला स्वयंपाक येत असणे ग्रुहित धरले आहे.)
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Wed, 09/17/2008 - 09:16 नवीन

बायको असती तर

शैलेन्द्र , बायको असती तर....... -(अविवाहीत) गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Wed, 09/17/2008 - 09:26 नवीन

हा हा, टुक

हा हा, टुक टुक... (याचि स्मायली कशी आहे?) (सदर स्पर्धा पाकक्रुतिन्चि असल्याणे बॅचलर लाइफ्चे इतर फायदे सांगु नये.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/17/2008 - 09:26 नवीन

शैलेन्द्र

शैलेन्द्र , बायको असती तर....... येथे भलताच विनोद तयार झालाय (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/17/2008 - 09:25 नवीन

शैलेन्द्र

शैलेन्द्र , बायको असती तर....... येथे भलताच विनोद तयार झालाय (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 09/17/2008 - 09:28 नवीन

विनोद तर

विनोद तर झालाच, पण तो फक्त पाककृतीबद्द्ल होता का, याचि शन्का आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/17/2008 - 09:30 नवीन

>>पण तो फक्त

>>पण तो फक्त पाककृतीबद्द्ल होता का, याचि शन्का आहे.. आजकाल कशाची पण पाकक्रुती असते :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Wed, 09/17/2008 - 09:47 नवीन

सखाराम,

सखाराम, रेसिपी आणि प्रोटोकॉल यात फरक आहे हो..(ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
च
चटोरी वैशू Wed, 09/17/2008 - 09:50 नवीन

स्वीट कॉर्न चाट...

स्वीट कॉर्न चाट... साहित्य : २-३ स्वीट कॉर्न , १ मोठा कांदा बारिक चिरलेला, १ टोमाटो बारिक चिरलेला, मीठ, मिर्चि पावडर, कोथिंबिर बारिक चिरलेली, १ टि.स्पून साखर, चाट मसाला इ. कृती : प्रथम स्वीट कॉर्न मीठ टाकुन कुकरच्या ३-४ शिट्यांमधे शिजवून घ्यावे, मग त्यांचे दाणे काढावे, त्या दान्यांमधे चिरलेला कांदा, चिरलेला टोमाटो, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, चवीनुसार मिर्चि पावडर, चिरलेली कोथिंबिर, चाट मसाला सगळे मस्त पैकी मिक्स करावे.... झाला चटपटीत नास्ता तयार...
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Wed, 09/17/2008 - 10:20 नवीन

कोथिंबिर

प्रतिबंधित घटक पदार्थांमध्ये कोथिंबिर लिहायला विसरलो होतो. असो तुमची पाककृती विचारात घेतली जाइल - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चटोरी वैशू
आ
आनंदयात्री Wed, 09/17/2008 - 10:12 नवीन

फेवरेट हॉट मिल्क

१. दुधाची पिशवी आणावी. २. ती फोडावी. ३. हवा अंमळ उकाड्याची असल्यास दुध डायरेक्ट तसेच प्यावे. ४. हवा अंमळ थंड असल्यास ते चवीनुसार गरम करुन ऐपतीप्रमाणे साखर घालुन प्यावे. (टिपः दुधाची पिशवी आपला आहार पाहुन आणावी .. ) (तळटिपः ही पाककृती भारतात पावशेराच्या अर्धा शेराच्या पिशव्या मिळतात म्हणुन करावी .. इंग्लडात पिंटात दुध मिळते का पिंपात त्याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही.)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/17/2008 - 10:18 नवीन

>> (तळटिपः

>> (तळटिपः ही पाककृती भारतात पावशेराच्या अर्धा शेराच्या पिशव्या मिळतात म्हणुन करावी .. इंग्लडात पिंटात दुध मिळते का पिंपात त्याच्याशी >> आम्हाला काही घेणेदेणे नाही.) पिंट नाही हो आणंदबाबा, पाईंट! आणि ते पिशवीत नाही मिळत, कॅनमधे मिळतं. आणि युरोपात आणि अमेरिकेत टेट्रापॅकमधे! (बारा गावचं पाणी प्यालेली) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Wed, 09/17/2008 - 10:26 नवीन

१० कोस

तुम्ही जिथ रहात होत्या तिथुन पुढच्या १० कोसांवर पॉइंटला पिंट म्हणत होते. (तुमच्या १० कोसातले एक एक संभाषण-- अ: आज पायपर वाचला का ? बः नाही हो आज सुट्टी मुनी नव्हती पाकिटात !) - आपलाच तर्कतीर्थ आंद्या खडखडकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/17/2008 - 12:07 नवीन

>> तुम्ही

>> तुम्ही जिथ रहात होत्या तिथुन पुढच्या १० कोसांवर पॉइंटला पिंट म्हणत होते. एक मिनीट! आसकुस मी हो भौ!! आमी कुटे र्‍हायचो तुमाला काय मैत? आणि आमच्या इथे पॉईंट नाही पाईंट म्हणायचे. तुम्हाला माजा प्वॉईंट कल्ला का? आणि आमच्या बरोबर युकेतल्या समद्या भागात फिरून आलेले शिकल्याले लोक होते, ते सर्वे पाईंटच म्हणायचे. आजूबाजूला काही डोक्यानी अंमळ स्थूल आणि मेदमयी लोक होते, ते काय वाट्टेल ते बोलायचे हो, कुठेही खडखडाट करायचे! आता बोलणाय्राचं तोंड थोडीच धरता येतं? (शिकलेली) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Wed, 09/17/2008 - 12:12 नवीन

व्यक्तिगत

=)) व्यक्तिगत टिका हे संयम सुटल्याचे अन मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/17/2008 - 12:23 नवीन

>>

>> व्यक्तिगत टिका हे संयम सुटल्याचे अन मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे ! कोणावर व्यक्तिगत टीका? आपण डोक्याने अंमळ स्थूल आहात काय? :-D आणि तुमी कितीही खडखडाट करा हो, बोलणाय्राचं तोंड थोडीच धरता येतं? (अगोचर) अदिती (स्वगतः आता पळा, तो आंद्या नारळानी झोडणार आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Wed, 09/17/2008 - 12:26 नवीन

थोड्या

थोड्या आंतरजालिय विश्रामाची आवश्यकता आहे. होशिल बरी. काळजी नको करुस. आणी हो नुसते प्रतिसादाच खदाखदा हसणारे स्माईली टाकुन वस्तुस्थिती बदलता येत नसते हे लक्षात ठेव बरं बाळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/17/2008 - 12:28 नवीन

>> थोड्या

>> थोड्या आंतरजालिय विश्रामाची आवश्यकता आहे. होशिल बरी. काळजी नको करुस. अरे हो, आज मी माझ्या एलियनायटीसेलियाचं औषध घेतलंच नाही! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/17/2008 - 12:25 नवीन

टेट्राप्याक ह्ये काय बॉ नवीण?

आमच्याहीकडे तर दॉध पिलॅष्टीकच्या कॅनमधेच मिळायचे. १ ग्यालणचा म्होटा कॅन आन् अर्धा ग्यालनचा छोटा कॅन. टेट्राप्याकमधे ते ट्रॉपिकानाचे ज्यूस मिळायचे.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/17/2008 - 12:27 नवीन

आमच्याहीक

आमच्याहीकडे तर दॉध पिलॅष्टीकच्या कॅनमधेच मिळायचे. १ ग्यालणचा म्होटा कॅन आन् अर्धा ग्यालनचा छोटा कॅन. टेट्राप्याकमधे ते ट्रॉपिकानाचे ज्यूस मिळायचे.. पुन्हा एकदा ऐकीव आणि वेबकॅममधली "बघीव" माहिती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/17/2008 - 13:50 नवीन

ऐकीव आणि 'वेबकॅममधली बघीव'??????

नाय हो आमच्या नवयार्कात क्यानातच दूध मिळते आणि ट्याट्राप्याकधे ट्रॉपिकानाचा जूस मिळतो. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
आ
आनंदयात्री Wed, 09/17/2008 - 12:28 नवीन

अहो त्यांची

अहो त्यांची आख्ख्या जगात दुध एजन्सी आहे अन तुम्ही काय शिकवता त्यांना ! त्या म्हणाल्या मडक्यात दुध मिलत होते तर आपण हाव म्हणायच??!! ..काय ... ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/17/2008 - 12:31 नवीन

अहो

अहो त्यांची आख्ख्या जगात दुध एजन्सी आहे अन तुम्ही काय शिकवता त्यांना ! त्या म्हणाल्या मडक्यात दुध मिलत होते तर आपण हाव म्हणायच??!! ..काय ... ?? हे बाकी भारीच! =)) आख्ख्या जगात?? विश्वात म्हणायचं असेल तुम्हाला! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Wed, 09/17/2008 - 12:38 नवीन

चला

एलियनासिनसिनाटी (काय अवघड नाव आहे बॉ) .. मधल्या एलियन इस्ट इंडीया कंपनीचा व्यवसाय तर पक्का झाले .. वैश्विक दुग्ध पुरवठा केंद्र ... (दुधाला दुग्ध म्हटल्यावर उगाच वजन येते .. जसे दुर्बिणीला टेलेस्कोप म्हटल्यावर येते तसे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ग
गणा मास्तर Wed, 09/17/2008 - 10:40 नवीन

वा वा

ही तर माझी आवडती हाये. फक्त भोकरवाडीला म्हशीच निरस दुध प्येतो आम्ही कधीमधी - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
अ
अंतु बर्वा Wed, 09/17/2008 - 10:23 नवीन

आनंदयात्र

आनंदयात्री.... ह.ह.पु.वा.....
  • Log in or register to post comments
प
पुणेरी पुणेकर Wed, 09/17/2008 - 10:33 नवीन

झणझणीत पाहीजे

काय राव ?? जरा चमचचमीत पाककृती येऊ द्या की .....
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Wed, 09/17/2008 - 11:32 नवीन

पोटॅटो चीप्स विथ ओन्यन.....

पोटॅटो चीप्स विथ ओन्यन: कृती : प्रथम मध्यम आकाराचे ५-६ बटाटे स्वच्छ पाण्यात धुवुन घ्यावेत. साले न काढता त्याचे पातळ मोठे काप करावेत. मायक्रो मध्ये एका प्लॅस्टिक डीश मध्ये / काचेच्या पसरट डीश मध्ये हे काप ठेवुन १० मिनिटे "ग्रील " ला ठेवावेत. मस्त कुरकुरीत होतात. ते ग्रील्ड होईपर्यंत कांदा उभा पातळ चिरावा. (१ किंवा २ कांदे). त्याच्यावर मीठ भुरभुरुन चतकोर लिंबु पूर्णपणे पिळावा. बटाटे मायक्रो च्या बाहेर काढुन त्यावर थोडासा तेलाचा हात लावावा. व वरुन तिखट किंवा चाट मसाला भुरभुरावा. " ६बटाटे : २ कांदे " या प्रमाणाला अनुसरुन बटाट्याच्या प्रत्येक चीप वर कापलेला कांदा ठेवुन सर्व करावा. आवडत असल्यास वरुन सॉस घेतला तर हा पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो. या पाककृतीला १५-२० मिनिटे लागतात. :)
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/17/2008 - 11:38 नवीन

शेंगदाण्य

शेंगदाण्याचा कुट आणि साखर मिसळुन खावी. गुळ-पाणी खावे
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/17/2008 - 11:39 नवीन

छान दुवा

छान दुवा आहे आवडला !!! पण मी येथे पाककृती देत नाही आहे कारण, माझ्या पाक क्रिये मुळे देशाची लोकसंख्या कमी होईल अशी आशंका आहे ;) पण तुमच्या पाकक्रुत्या मी जपून ठेवेन कधी काळी उपयोगी येतीलच :) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/17/2008 - 11:42 नवीन

दहीपोहे

२ वाट्या जाड पोहे (पातळ पोहे घेतल्यास गिचका होतो.) ४ चमचे दही. पोहे आणि दही एकत्र करावे. त्यात चवीप्रमाणे मीठ टाकावे. २ चमचे तूप एका भांड्यात घालून गरम करावे. त्यात १ चमचा जिर्‍याची फोडणी करावी. थोडा हिंग, आणि बरेचसे तिखट टाकावे. ही फोडणी दही पोह्यांवर टाकावी. एकून ३ मिनिटे लागतात ह्या पाककृतीसाठी. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Wed, 09/17/2008 - 11:47 नवीन

सर्कीटचे पोहे

आयला हे सर्कीटचे पोहे मस्त वाटत आहेत, करुन पाह्यला पाहिजे पण हिंग प्रतिबंधित आहे सर्कीटराव - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/17/2008 - 11:49 नवीन

हिंग

हिंग नाही टाकला तरी चालेल. (तिखट जास्त टाका, इतर कुठलीही चव लागू नये, ह्याची पुरेपूर काळजी घेतली जाईल :-) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
ग
गणा मास्तर Wed, 09/17/2008 - 11:45 नवीन

सर्कीटचे पोहे

आयला हे सर्कीटचे पोहे मस्त वाटत आहेत, करुन पाह्यला पाहिजे - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
आ
आनंदयात्री Wed, 09/17/2008 - 11:47 नवीन

आयला

सर्किट म्हणजे सुदामा तर तात्या म्हणजे कृष्ण का ?? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/17/2008 - 11:50 नवीन

नाही

तो पेन्द्या. बोलविता कृष्ण वेगळाच ! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Wed, 09/17/2008 - 11:52 नवीन

अगायायाया

=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
घ
घाटावरचे भट Wed, 09/17/2008 - 15:01 नवीन

यात वरुन

यात वरुन थोडीशी साखरही टाकल्यास चव अजून बरी लागते. अर्थात हा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे. पण खरोखर ३ मिनिटांत होणारी पाककृती. शिवाय हीच पाककृती पोह्यांऐवजी भाताबरोबरही होते (फक्त भात ताजा नको. सकाळचा संध्याकाळी अथवा संध्याकाळचा सकाळी असल्यास उत्तम. भातात दही कालवण्यास २ मिनिटे जास्त लागतात एवढंच...) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
र
रामदास Wed, 09/17/2008 - 19:45 नवीन

जाड पोहे (पातळ पोहे घेतल्यास गिचका होतो.)

कुरमुरे भिजवून बाकी सगळं तसंच करून पहा. लेज वेफर्स चुरा करून वर भुरभुरीत टाकावे. करायला आणि खायला ३ मिनीटं लागतात. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
भ
भाग्यश्री Wed, 09/17/2008 - 21:51 नवीन

वा.. कालच

वा.. कालच केले होते हे दही पोहे मी! :) मस्त लागतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/17/2008 - 11:59 नवीन

कच्चा चिवडा

कितीही प्रमाणात, पातळ पोहे, चुरमुरे, डाळं, शेंगदाणे, चिरलेला कांदा, (असल्यास कैरी बरीक चिरून), हिरव्या मिरच्या चिरून, कच्चे तेल, चवीप्रमाणे मीठ, आणि बरेच तिखट एकत्र करावे. लागणारा वेळः ५ मिनिटे. (यासोबत घ्यायचे जे पेय असते त्यात सी२एच्५ओएच चे प्रमाण जितके अधीक, तितके जास्त तिखट टाकावे.) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 09/17/2008 - 12:13 नवीन

माझ्याकडून काही...

कॉर्न उपमा पाककृतीला लागणारा वेळ : १५ मि. साहित्य : २०० ग्रॅ कोवळे मक्याचे दाणे (वाळवलेले नव्हेत) ४ हिरव्या मिरच्या १/२ चमचा जिरे १ चमचा तेल १/२ चमचा हळद अर्धे लिंबू मीठ कृती : १. मक्याचे दाणे मिक्सरमधून ओबडधोबड फिरवून घ्यावेत. २. मिरची आणि जिरे मिक्सरमधून काढावे. ३. १ चमचा तेल तापले की त्यात जिरे - मिरचीची पेस्ट आणि हळद घालावी. ४. मक्याचे दाणे टाकावेत. ५. चवीप्रमाणे मीठ घालावे. ६. वरून थोडेसे पाणी शिंपडून ५ मि झाकून वाफ काढावी. ७. लिंबू पिळून गरम गरम खावे. ================================================== बटाट्याचा कीस पाककृतीला लागणारा वेळ : १५ मि. साहित्य : ४ बटाटे (बटाट्याऐवजी रताळी पण घेउ शकतो) मीठ २ च दाण्याचा कूट २ च तूप १ च जिरे लिंबू कृती : १. बटाट्याच्या साली काढून किसून घ्यावा. २. तूप तापले की त्यात जिरे टाकावे. ३. किसलेला बटाटा टाकून मिश्रण सारखे करावे. ४. दाण्याचा कूट, मीठ टाकून एक वाफ आणावी. ५. वरून लिंबू पिळून खावे. ================================================== दही आलू पाककृतीला लागणारा वेळ : २० मि. साहित्य : २०० ग्रॅ दम आलूचे बटाटे (नसल्यास मोठ्या बटाट्याचे ४ तुकडे करावेत) मीठ तेल पाव कि दही चाट मसाला जिरे पूड तिखट साखर कृती : १. बटाट्याच्या साली काढून टूथपिकने / काटा चमच्याने त्याला टोचे द्यावेत. २. ५ मि साठी ते मीठाच्या पाण्यात भिजवावेत. ३. तेल तापवून त्यात बटाटे सोडून तपकिरी करावेत आणि तळून झाल्यावर टिशू पेपरवर टाकावेत. ४. दह्यात २ च साखर, अर्धा च तिखट, अर्धा च जिरेपूड, अर्धा च मीठ टाकून फेटून घ्यावे. ५. त्यात हे बटाटे सोडावेत. ६. वरून चाट मसाला घालावा. ब्रेड / पराठा / नुसते पण खाउ शकतो. ================================================== राईस शेवई पाककृतीला लागणारा वेळ : १५ मि. साहित्य : राईस शेवईचे पाकिट विकत मिळते. तेल मीठ ४ मिरच्या १/२ च मोहरी साखर लिंबू कॄती : १. ४ ग्लास पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळले की त्यात शेवई टाकून २ मि नी गॅस बंद करावा. पाणी पूर्ण काढून टाकावे. २. तेल तापले की त्यात मोहरी आणि चिरलेल्या मिरच्या टाकाव्यात. ३. त्यात शेवई टाकून हलवावे. ४. वरून मीठ टाकावे. लिंबू पिळावे. ================================================== फ्रूट सॅलड पाककृतीला लागणारा वेळ : १० मि. साहित्य : उपलब्ध असतील तेवढी फळे (सफरचंद / केळी / पेरू / डाळींब / अननस / मोसंबी / चिकू) पाव लिटर दूध साखर चवीप्रमाणे २ च कस्टर्ड पावडर कृती : १. फळे बारीक कापावीत. २. दूधात कस्टर्ड पावडर आणि साखर घालून मिश्रण सारखे करावे. ३. वरून कापलेली फळे घालून मिश्रण सारखे करावे. ================================================== उत्तप्पा पाककृतीला लागणारा वेळ : १५ मि. साहि त्यः MTR डोसा मिक्स आणि चटणी पावडर बाजारात विकत मिळते. तेल चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची कृती : १. डोसा मिक्समध्ये आवश्यक तेवढे पाणी आणि मीठ घालून मिश्रण ढवळून घ्यावे. २. तव्यावर तेल लावून, तवा तापला की हे मिश्रण तव्यावर जाडसर टाकावे. ३. वरून चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची टाकावी. ४. उत्तप्पा खरपूस भाजावा. ५. चटणी पावडरबरोबर खावा. ================================================== मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 09/17/2008 - 12:15 नवीन

बापरे बाप

बापरे बाप !! आपल्या पाककौशल्याला सलाम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ट
टारझन Wed, 09/17/2008 - 12:55 नवीन

आग्ग्गा बाबो ...

ए मने .... अफ्रिकेत मेस चालू कर ना ग तु ... आयला तु पाकृक्विन च आहेस .. वा वा वा ... प्लिज तेवढं मेस च मनावर घे ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा