✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हा बाजार बंद करा

स
सर्वसाक्षी यांनी
गुरुवार, 09/11/2008 - 23:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19104 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sat, 09/13/2008 - 23:33 नवीन

साक्षिदेव

साक्षिदेवा, बहुसंख्य जनतेला रखडत ठेऊन काही विशिष्ठ लोकांना अग्रक्रमाने मनसोक्त दर्शन देणे म्हणजे हजारो बालकांना भुकेले ठेवुन त्यांच्या वाटचे धान्य परस्पर विकुन चार अधिकार्‍यांनी मजा मारण्यासारखे आहे. मग एखाद्या गणेशोत्सव मंडळापुढे जाऊन तू या बाबतीत जाहीर सत्याग्रह का करत नाहीस? रांगेत उभे असलेले अनेक सामान्य जन तुझ्या बाजूने उभे राहतील! मिपावर किंवा वर्तमानपत्रात लिहिणे ठीकच आहे परंतु अन्यायकारक गोष्टींचा ग्राऊंड लेव्हलवर उतरून विरोध केला पाहिजे! रांगेत उभ्या असलेल्या सामान्य जनांमध्ये जाऊन अन्यायकारक गोष्टींबद्दल बोललं पाहिजे, न्यायाचा आग्रह धरला पाहिजे! उदा - शिल्पा शेट्टी जर केवळ एक सेलिब्रिटी म्हणून देवदर्शनाच्या रांगेत घुसणार असेल तर त्या रांगेत उभ्या असलेल्या सर्वांनी आवाज उठवून "आम्ही अश्या पार्शल मंडळाच्या गणेशोत्सवाचे दर्शन घेणार नाही, आम्ही हा अन्याय सहन करणार नाही!" असा पवित्रा घेऊन तेथून निघून आले पाहिजे! हे होतं का? सेलिब्रिटींची संख्या किती? ५-१०-१५-२०-२५? आणि सामान्य जनांची संख्या किती? तर अक्षरश: लाखांच्या घरात! तरीही ते सामान्य जन लाखोंच्या संख्येत दर्शन घेतच असतात! याला काय म्हणावे? दोष कुणाचा? आमचे नरहर कुरुंदकर म्हणतात की गुंडांचा गुंडपणा हा सज्जनांच्या सज्जनपणावर अवलंबून असतो! ते खरंच आहे.. आणि कुणाला व्हीआयपी कोट्यातून प्रवेश द्यायचा, कुणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार हा त्या त्या मंडळाचा आहे. तो ज्याला मान्य नसेल त्याने एक तर भररस्त्यावर जाहीर लोकांदोलन करावे किंवा मंडळाविरुद्ध कोर्टात जावे आणि न्याय मिळवावा! राईट? तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
ध
धनंजय Mon, 09/15/2008 - 04:46 नवीन

ठीक आहे - चोरीच्या मालाचा बाजार थांबवा

मुळात काय चोरले जात आहे ते मला कळलेले नाही. मी आताच दुसर्‍या खोलीत जाऊन गणपतीच्या मूर्तीकडे बघितले, गणपतीचे दर्शन विनाखर्च मिळाले. माझ्यापेक्षा अधिक भक्तिभाव असलेल्या मित्राशी आताच बोलणे झाले, त्याच्या बोलण्यातून त्याच्यापाशी पूर्वीसारखाच भक्तिभाव होता असे जाणवले. त्यामुळे माझ्याकडून आणि माझ्या मित्राकडून तरी काहीतरी चोरी गेले असेल तर कळले नाही. सर्वसाक्षी यांच्यापाशी कुठलीतरी वस्तू होती, आता ती त्यांच्यापाशी नाही, याची त्यांनी नीट शहानिशा केली आहे, याबद्दल त्यांच्या कळकळीने सांगण्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ती जी काय हरवलेली वस्तू त्यांनी अमुक मंडळाकडून विक्रीस ठेवलेली बघितली, याबद्दल माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्या वस्तूची विक्री होते आहे, ती चोरी त्यांचीच हरवलेली वस्तू आहे, याबद्दल त्यांना संबंधित अधिकार्‍यांना पटवता यावे, ही मनोमन शुभेच्छा. त्यांच्याकडून चोरलेल्या वस्तूला कोणी तिर्‍हाइताने विकू नये, याबाबत पूर्णपणे सहमत. अशी महत्त्वाची वस्तू (ती कुठली वस्तू आहे, हे मला अजून कळलेले नाही, पण कुठलीतरी महत्त्वाची वस्तू हरवून मग मंडळानी लंपास केली आहे, याबाबत सर्वसाक्षी यांची कळकळ पोचली, पटली)... अशी महत्त्वाची वस्तू इकडेतिकडे निष्काळजीपणे ठेवू नये, मग पुढच्या वेळी अशी बेमालूम चोरी होणार नाही, अशीही मनोमन शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
व
विसोबा खेचर Fri, 09/12/2008 - 23:29 नवीन

वरील

वरील सर्वांच्या प्रतिसादातील लालबागच्या राजाच्या उत्सवाविषयीच्या ज्या काही तक्रारी, गार्‍हाणी आहेत ती संबंधितांच्या कानावर जरूर घातली जातील! तसेच ज्यांना लालबागच्या राजाच्या दर्शनाला प्रत्यक्ष गेले असतांना काही अडचणी आल्या असतील, त्यांच्या काही तक्रारी असतील त्यांनाही राजाच्या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदवण्याची सोय आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (वर्ष ७५ वे!) त्यातील इष्ट आणि व्यवहार्य बाबींची अवश्य नोंद घेईल याची खात्री आहे! लालबागच्या राजाचा विजय असो....! तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 09/13/2008 - 00:40 नवीन

मला नाही

मला नाही वाटत केवळ लालबागच्या राजाबद्द्ल इथे कुणी बोलतंय.. एकंदरीत चर्चा चालूये.. आणि मला पटतं.. मागच्या वर्षी दगडूशेठ गणपतीला दर्शनाला गेले होते तेव्हा इतकं गर्दी मधे उभं राहून १मिनिटं शांत डोकं टेकवून उभं राहता येत नव्हतं.. देवाच्या दारात जाऊन केवळ शांतताच लाभली पाहीजे.. बाकीचे ते देखावा अन रोषणाई नंतरच्या गोष्टी झाल्या.. शिर्डीचीही हीच गोष्ट.. माहीत नाही हे सगळं कसं बदलेल.. पण बदललं पाहीजे.. पण एक आहे.. आपल्याला हे सगळं सहज उपलब्ध असेल तर अशा तक्रारी सुचु शकतात.. पण आजुबाजुला उभे असलेले लांब लांब खेडोपाड्यातून आलेल्या लोकांना केवळ दर्शन मिळणं,तो देखावा,रोषणाई, विविध ठीकाणच्या मंदीरांचे देखावे पाहणे म्हणजे एक सोहळा असतो .. त्यांच्या डोळ्यातला आनंद खूप वेगळा असतो.. दर वर्षी पुण्यात गणपती पाहायला लांबूनलांबून येणारी लोकं पाहीली की छान वाटतं! त्यांच्यासाठी ती चेंगराचेंगरी,गर्दी,कशालाही महत्व नसेल,जितकं ते देखावे,गणपतीच्या नुसत्या मिनिटभराच्या दर्शनाला असेल.. !
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sat, 09/13/2008 - 07:33 नवीन

अत्यंत वाईट प्रकार

लालबागच्या राजाबद्दल आमच्याही मनात प्रेम आदर आहे. पण त्या टोपीवाल्या कार्यकर्त्याने त्या महिलेशी जे वर्तन केले त्याचे समर्थन कुठेही आणि कुणीही करू शकत नाही. ती चपला घालून गेली किंवा व्ही आय पी च्या लायनीत शिरण्याचा तिने प्रयत्न केला.... हे सर्व भोंगळ युक्तीवाद जरी मान्य केले तरी एका महिलेवर हात टाकण्याचा जो प्रकार त्या निर्लज्ज कार्यकर्त्याने केला आहे त्याचे समर्थन गणपतीच्या प्रेमामुळे निदान आम्ही तरी करणार नाही. मराठी संस्कृतीचे प्रतिक म्हणून लालबागच्या राजाकडे पाहणार्‍यांनी श्री शिवछत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला दिलेली वागणूक आणि लालबागच्या राजासमोर एका स्त्रीची झालेली विटंबना या दोन गोष्टी कुठल्या निकषावर एका पातळीवर येऊ शकतात ते पहावे आणि मग मराठी संस्कृतीचे प्रतिक आहे की नाही ते ठरवावे. आम्ही त्या कार्यकर्त्याच्या वागणुकीचा निषेध करतो आणि कार्यकर्त्यानी कसे वागावे, महिलांशी वर्तन कसे असावे ही बुद्धी त्या कार्यकर्त्यांना आणि त्याच्या संतापजनक आणि निंदनीय कृतीचे समर्थन करणार्‍या मंडळाच्या निर्लज्ज पदाधिकार्‍यांना द्यावी अशी "मागणी" (प्रार्थना नव्हे) त्या लालबागच्या राजाकडे करतो. आम्ही यापुढे त्याचे दर्शन घेण्यास जाणार नाही, हे ठरवले आहेच. काल आमच्या सौभाग्यवती जाऊन आल्या पण आम्ही गेलो नाही. धनदांडग्यांच्या आणि सिनेनट्यांच्या देवाला भेटण्याची आमची इच्छाही नाही. आपला, (संतप्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/13/2008 - 08:02 नवीन

त्या

त्या कार्यकर्त्याचे समर्थन कधीच करता येणार नाही. मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी त्या कार्यकर्त्याचे समर्थन केलेले नाही, उलटपक्षी लोकांची क्षमाच मागितली आहे. (फक्त संस्थळावरच नव्हे, तर उत्सवाच्या ठिकाणीसुद्धा!) बाकी, तो कुणाचा देव आहे हे ठरवण्याचा आणि त्याचे ८-९ तास रांग लावून दर्शन घ्यायचे किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे! त्याबबत आम्हाला काहीच बोलायचे नाही. "माझं दर्शन घ्या हो..." असं राजाने ना कुणा धनदांडग्याला, ना कुणा सिनेनटाला आणि ना कुणा सामन्य गोरगरीब माणसाला सांगितलं आहे! असो, मिसळपाव डॉट कॉम हे संकेतस्थळ आज त्याच्याच कृपेने सुरू आहे इतकेच आम्ही ठामपणे सांगू इच्छितो...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
स
सर्वसाक्षी Sat, 09/13/2008 - 23:49 नवीन

विरोध

<<सेलिब्रिटींची संख्या किती? ५-१०-१५-२०-२५? आणि सामान्य जनांची संख्या किती? तर अक्षरश: लाखांच्या घरात! तरीही ते सामान्य जन लाखोंच्या संख्येत दर्शन घेतच असतात! याला काय म्हणावे? दोष कुणाचा?>> अर्थातच रांगेत उभे रहणार्‍यांचा ! म्हणुनच आवाहन केले आहे -"जर हा बाजार बंद करायचा असेल तर या देवस्थानांना रांगा लावणे बंद करा आणि आपला देव आपल्या मनात पूजा." <<मिपावर किंवा वर्तमानपत्रात लिहिणे ठीकच आहे परंतु अन्यायकारक गोष्टींचा ग्राऊंड लेव्हलवर उतरून विरोध केला पाहिजे! रांगेत उभ्या असलेल्या सामान्य जनांमध्ये जाऊन अन्यायकारक गोष्टींबद्दल बोललं पाहिजे, न्यायाचा आग्रह धरला पाहिजे!>> अतिरेक्यांनी केलेल्या स्फोटाचा निषेध सगळेच करतात, इथेही करतील; पैकी किती जण घरदार सोडुन अतिरेक्यांविरुद्ध लढायला जाणार आहेत? आणि जे जाणार नसतील त्यांना निषेधाचा अधिकार नाही का? तात्या, आजपर्यंत तू स्वतः ज्या ज्या गोष्टींचा निषेध केला आहेस वा धिक्कार केला आहेस त्या पैकी किती ठिकाणी प्रत्यक्ष आंदोलन उभे केले आहेस वा याचिका दाखल केल्या आहेस? पण म्हणुन एखादी वाईट गोष्ट दिसली वा खटकली तर तु निषेध न करता व्यक्त करता गप्प राहणार आहेस का? आधी सांगितल्याप्रमाणे लालबागचा प्रसंग हे एक निमित्त आहे मात्र दोवाच्या श्रद्धेचा बाजार सर्वत्र मांडला जात आहे आणि ते योग्य नाही असे माझे प्रतिपादन आहे. मात्र लालबागच्या राजाचा एक भक्त म्हणुन तु हे फार व्यक्तिशः घेतलेले दिसत आहे. असो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/13/2008 - 23:54 नवीन

मात्र

मात्र लालबागच्या राजाचा एक भक्त म्हणुन तु हे फार व्यक्तिशः घेतलेले दिसत आहे. असो. हे विधान बरेचसे खरे आहे!:) असो... आपला, (प्रांजळ) तात्या. अर्रे लालबागच्या राजाचा विजय असो...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
सर्वसाक्षी Sun, 09/14/2008 - 00:02 नवीन

विजय असो

तात्या, तुझ्या प्रांजळपणाचा विजय असो! एकदम पु. लं. चा रावसाहेब. पण तुझ्या सारख्या सरळसोट माणसाला माणसाने मांडलेला देवाचा बाजार कसा काय चालतो? (इथे लालबागचा संबंध नाही. आणि हो, एक मुंबईकर म्हणुन आणि गणेशभक्त म्हणुन मला लालबाग राजाविषयी सादर भक्तिभाव आहे हे सांगायलाच नको)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 09/19/2008 - 18:51 नवीन

अर्रे हे काय?

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई गणपती उत्सव म्हणजे राजकारणी आणि बॉलिवूडवाल्यांसाठी पर्वणीच असते... कुठल्याही गणपतीला त्यांना रांगेशिवाय प्रवेश मिळतो, ब-याचदा तर वलय निर्माण करण्यासाठी त्यांना मंडळांचं आग्रहाचं बोलावणंच असतं आणि तिथे मीडियाची मंडळी त्यांना शूट करायला, बाइट घ्यायला तयारच असतात... आयती मिळणारी ही प्रसिद्धी लक्षात घेऊन बॉलिवूडचे निर्माते-दिग्दर्शक आपल्या चित्रपटाचं प्रमोशन गणरायाच्या आशीर्वादाने करतात. लालबागच्या राजासमोर तर दहा दिवस अनेक सेलिब्रिटींची रांग असते. पण, अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याला अपवाद ठरले. ' गोलमाल रिटर्न ' चं प्रमोशन ' लालबागच्या राजा ' ला येऊन करावं, असं निमंत्रण त्यांना मंडळानं दिलं होतं. पण हा प्रस्ताव अजय आणि रोहितनं साफ धुडकावून लावला. अरे, देवाचा वापर कसला सिनेमाच्या प्रमोशनसाठी करताय ? देवाच्या चरणी तरी निरपेक्ष भावनेनं लीन व्हा ! हे उद्विग्न उद्गार आहेत, श्रद्धाळू अजयचे... तर, ' भगवान को क्यूं उल्लू बनाए ?', असा मिस्किल सवाल केलाय रोहित शेट्टीनं... खरं तर अजय खूपच धार्मिक आहे. तो त्याच्या ऑफिसमध्येही गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो. त्याशिवाय तिरुपती, अजमेर शरीफ इथं अनेकदा अजय भाविक म्हणून जातो, देवाचं दर्शन घेतो. त्याचा हा श्रद्धाळूपणा माहीत असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या काही सदस्यांनी त्याच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला. त्यांनी दिग्दर्शक रोहित शेट्टीला गाठलं आणि ' गोलमाल रिटर्न ' चं प्रमोशन करण्यासाठी ' राजा ' ला येण्याचं आमंत्रण दिलं. तो प्रस्ताव घेऊन रोहित अजयकडे आला, पण अजयनं ही ऑफर साफ धुडकावली. ' देवाचा असा वापर करणं मला पटत नाही ' , असं त्यानं ठणकावून सांगितलं. मनातून देवाची पूजा करा, प्रमोशनच्या वेळीही मनात श्रद्धा बाळगा, पण सार्वजनिक ठिकाणी इतरांचा खोळंबा करून प्रमोशनाचे कार्यक्रम करणं साफ चुकीचं आहे, असं मत अजयनं मांडलं. त्यानंतर अजय आणि रोहितचं एकमत झालं आणि त्यांनी आपण येणार नसल्याचं कळवून टाकलं. पण अजय, अर्शद वारसी, तुषार कपूर आणि श्रेयस तळपदे ही चौकडी सारेगमपच्या सेटवर आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाणार आहे. गोलमाल है - प्रमोट तो करना पडेगा ना ?, असं रोहित गमतीनं विचारतो. अर्रे लालबागच्या राजाचा विजय असो. आपला, (सिन्सिनाटीचा राजा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा