डाएट ची गरज आहे... हे कसे ओळखावे बुवा? :? (ह.घ्या.)
बाकी डाएट प्रोग्रॅम छान आहे, कौतुक ह्याच गोष्टीचे वाटते कि, तुम्ही प्रथम अंमलात आणलात आणि मग आम्हाला सांगितले.
माहिती बद्दल धन्यवाद!!!!!!!!!
प्रोग्राम उत्तम आहे पण कृपय ढकलपत्रातला मजकुर मराठीत लिहीलात तर बरे होईल.
निदान तुमचे काहितरी कॉन्ट्रीब्युशन राहील.
ढकलपत्रातील मजकुर मिपावर तसाच चिकटवणे धोरणात बसत नाही
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
mazya PC cha font problem aahe tyamule engilish madhe lihit aahe
tyabaddal kshamaswa
आनि mala marathi type pan karta yet nahi fast
Krupaya madat karal ka Vijubhau?
mazya PC cha font problem aahe tyamule engilish madhe lihit aahe
tyabaddal kshamaswa
Raw/boiled vegetables madhe mi Palak Soup, Cabbage Soup, mod aalele matki ani moog (boil karoon) khalle, tyachbarobar kakadi, gajar, beat root, khalle
१ वर्षा पूर्वी मी ह्या प्रोग्रामनुसार डाएट केले होते. चांदणी म्हणते/तो त्या प्रमाणे माझे ही ४ किलो वजन कमी झाले. पण परत महिन्या दोन महिन्यात लेव्हलला आले. वजन कमी करायला किकस्टार्ट म्हणून हा प्रोग्राम चांगला आहे पण त्याच बरोबर व्यायाम आणि प्रोग्राम नंतर खाण्यावर कंट्रोल हे आवश्यक आहे.
आंबोळी
इंग्लिश असल्याने वाचनाचा मुडच आला नाही .
अवांतर :
अरे वा ,..... कंदिलाची वात पेटलेली आहे का आजुन ... बरेच दिवस काही घटना ऐकू नाही आली ....
असो .. शुक्राची चांदणी ... तुम्ही नक्की चांदणी की चंद्र ? इथे ऑल्रेडी नावांचे फार गोंधळ होतात ...कृ. सहकार्य करावे.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
... ही कंपनी बकवास गाड्या बनवायचे सोडून आहारशास्त्रात कधीपासून लुडबूड करू लागली???
"जी एम" च्या गाड्या आणि बकवास ???
असो बाबा.
आम्ही तर "मनापासुन " काम करतो "बेस्ट व्हेईकल डिसाईन" करण्यासाठी ...
- सब सिस्टीम डिसाईन लीड, इंजिन डिसाईन
जी एम - आर & डी
अवांतर : तो आहार फक्त " यु एस" मधल्या "बैठे काम करणार्या " कंपनीच्या कर्मचार्यासाठी रेकमेंड केला अशी मला माहिती आहे.
तो भारतात व भारतीय जीवनपद्ध्तीत कितपत फायदेशीर आहे ह्याबद्दल मतभेद आहेत ...
अतिअवांतर : माझ्या रुममेटचाच अनुभव ...
दिवस ४ : त्याला दुपारी कंपनीत डोळ्यापुढे अंधारी आली व तो घरी आला ...
दिवस ८ : वजन अंमळ " १.३ किलो" ने वाढलेले होते.
कारणमिमांसा : मुळात रोजचे जेवण एवढे हेल्दी नसतेच. ह्या डाएट मुले मस्त चांगले हेल्दी फुड खाल्ले गेले परिणामी वजन वाढले ..
थोडक्यात काय तर वजन कमी करण्याचा मार्ग भलत्याच "काट्यातुन" जातो : इति भाईकाका.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मी हा डाएट प्लान ट्राय केला आहे.
पहिल्या प्रयोगाच्या वेळी वजन ३-४ किलो ने कमी होते.
१ महिन्यांनी तोच प्रयोग केला तर रिझल्टस फारसे दिसत नाही. पुन्हा केला तर नो रिझल्ट.
हे मी अनेकांकडून ऐकले आहे.मी स्वतः अनुभवले आहे.
मीनल.
दहा दिवस असे खायचे हे वाचूनच इतकी काळजी वाटली की माझे त्या काळजीनेच २ पौंडांनी वजन कमी झाल्यासारखे वाटले ;)
विनोद बाजूला राहूंदेत - प्रकार इंटरेष्टींग वाटला. त्यात ऍक्टीव्हीटी, व्यायाम याबद्दल पण एकत्रीत माहीती हवे असे वाटले. पण इतर प्रतिक्रीया वाचल्यावर त्याचा दूरगामी परीणाम आहे का नाही ते समजले नाही.... बाकी गीताईतील ओळी त्यासंदर्भात आठवल्या: (अध्याय ६)
न योग फार खाऊनि किंवा खाणे चि सोडुनी । न फार झोप घेऊनि किंवा जागत बैसुनी ॥ १६ ॥
निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि । मोजूनि करितो त्यास योग हा दुःख-नाशन ॥ १७ ॥
थोडक्यात ऑप्टींआयझेशनची गरज आहे जी, आजकाल कधिही कुठलेही पदार्थ खाण्याचाअतिरेक आणि कार्यपद्धती बदल्याने, आपण घालवून बसलो आहोत...त्यावर कदाचीत वरील डाएट हे "जंपस्टार्ट" म्हणून उपयुक्त असेल पण नंतर मात्र "मोजून" (म्हणजे हवे तितके या अर्थी) खाल्ले नाही तर त्याचा (त्याचाच काय कशाचाही) उपयोग होऊ शकणार नाही.
पण जनरल मोटर्स चा आणि डाएटचा काय संबंध हा मला देखील प्रश्न पडला आहे. कदाचीत गेल्या शतकातील , "व्हॉटेव्हर गूड फॉर जीएम इज गूड फॉर अमेरिका" या अमेरिकन वाक्प्रचाराप्रमाणे, कदाचीत जीएम ने डाएटींग चालू केले असावे :-) बाकी जीएमचे डॉलर्स/स्टॉकमार्केट मधील वजन कमी होत आहे हे ऐकून आहे....
ह्म्म.. जीएमडाएट नावाने प्रसिद्ध असलेल्या या डाएट बद्द्ल दोन्ही बाजूंनी ऐकायला मिळतं.. काहींना फरक जाणवला.. तर काहीना फरक जाणवला, मात्र त्रास झाला.. डिझीनेस्,प्रॉपर जेवण न गेल्याने अशक्तपणा आल्यासारखंही होऊ शकते.. वजन कमी करण्यासाठी किक स्टार्ट, किंवा पहीली स्टेप म्हणता येईल.. पुढे मात्र, व्यायाम्,जेवण याचा बॅलन्स करूनच कमी केलं पाहीजे..
या डाएटने मात्र पोट्,डायजेशन सिस्टीम एकदम साफ होऊन जाते असं ऐकलं.. अजिबात मसालेदार्,तळणीचे पदार्थ नसल्याने तसं असावं..
काही दिवस सर्च केलं खूप कसं आहे वगैरे.. पण व्यायाम आणि संतुलित आहार हाच बेस्ट उपाय म्हणायचा!
हंऽऽऽऽ ... पण तीन दिवस प्रोटीन्स न खाता रहाणं मला फार शहाणपणाचं वाटत नाही स्नायू कमी होऊन वजन झपाट्याने कमी होईल पण अशक्तपणा येईल आणि आकार मात्र फार कमी होणार नाहीच!
आणि एकदम चार किलो वजन कमी व्हायला मुळात तेवढं जास्तीचं असलं पाहिजे. म्हणजे खूप जास्त वजन असेल तर पटापट कमी होतं पण शेवटचे २-३ किलो कमी होता होत नाहीत. असंही म्हणतात की आठवड्याला ५०० ग्रॅमच्यापेक्षा जास्त वजन घटवू नये. त्यातही अर्ध आहारातून कॅलरीज कमी करून आणि अर्ध व्यायामानी घटवावं.
शिवाय वजन कमी करण्यापेक्षा फॅट्स /मेद कमी करणं महत्त्वाचं. वजन कमी होण्यापेक्षा गेल्या वर्षी घेतलेली ट्रूजर पोटावर सैल होत असेल तर ते जास्त आरोग्यमय!
असले डाएट करताना प्रत्येकाने आपल्या शरीर प्रकृतीचा योग्य विचार करावा !
हे आता जगन्मान्य आहे की दिवसातू चार वेळा (थोड्या थोड्या प्रमाणात) समतोल आहार घेतला आणि रोज किमान अर्धा तास चालणे - धावणे - सायकलिंग करणे ह्यापैकी एक प्रकारचा व्यायाम केला तर वजन कमी होते. सात दिवसांत वगैरे नाही पण हळू हळू नक्की !
जी.एम. वगैर डाएटचा प्रॉब्लेम असा असतो की सात दिवसांनंतर वजन तात्पुरतं कमी होतं पण नंतर जास्त वाढू शकतं !
संदीप, खरय. माझ्या एका मैत्रीणीने हे डाएट केले होते, पण नंतर तिला थकवा जाणवला व डाएट नंतर पुन्हा एकदा वजन जैसे थे झाले - थोडे वाढलेच. असली डाएटस फारशी उपयोगी पडतात असे वाटत नाही.
लेख वाचत असताना सतत "देजा वू" चा भास होत होता. वाचून पूर्ण झाल्यावर मायबोलीच्या संस्थळावर थोडे उत्खनन केले आणि सुमारे सव्वा दोन वर्षांपूर्वी मी स्वतः सुरू केलेला धागा सापडला.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/111353.html?1150764001
अर्थात प्रस्तुत लेखिकेने कॉपी-पेस्ट करताना किंचित फेरफार जरूर केले , पण ते अपूर्ण पद्ध्तीने केल्यामुळे एक किंचित अंकगणितीय त्रुटी राहून गेली! (गरजूंनी शोधून पहावी).
असो, गेल्या सव्वा दोन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता पुन्हा ह्या डाएट प्रोग्रामकडे पाहताना काही गोष्टी जाणवतात, त्या अशा -
१) जी एम कंपनीशी ह्याचा काही संबंध नसावा कारण त्यांच्या अधिकृत संस्थळावर याबाबतीत काहीही आढळले नाही.
२) पहिल्या प्रयोगात वजन कमी होते हे खरे, पण तरीही का कार्यक्रमाकडे वजन कमी करण्याचा उपाय म्हणून न पाहता, "ऍन्टी टॉक्सीक" म्हणून पहावे. त्याने जास्त फायदा होतो.
३) वजन कमी करण्यासाठी योग्य आहार (हाच डाएट प्रोग्राम असे नव्हे) आणि व्यायाम ह्या दोन्हींचीही योग्य सांगड आवश्यक आहे.
४) पहिले काही दिवस शरीरात प्रोटीन न गेल्यामुळे, सर्वच मंडळींना हा कार्यक्रम झेपेल असे नाही.
५) कारण काहीही असो, एक बदल म्हणून ४-६ महिन्यांतून एकदा हा प्रयोग करून बघण्यासारखे आहे. मी स्वतः वर्षातून एकदातरी करतो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
हा सरळ सरळ साहित्य चोरीचा प्रकार आहे !
तुमच्या लेखातील वाक्ये जशीच्या तशीच येथे लिहली गेली आहेत...
आपणापैकी बरेच जणांनी General Motor ह्या कंपनीने आहारतज्ञांच्या मदतीने आपल्या कर्मचार्यांसाठी बनविलेल्या Diet बद्दल ऐकले-वाचले असेल.
मी गेले आठवडाभर हा Diet करीत होतो. आज शेवटचा दिवस !
कंपनीच्या दाव्यानुसार तुमचे वजन किमान ५-८ किलो कमी होते. हा दावा अर्थातच अतिरंजीत आहे. माझे वजन आत्तापावेतो ३ किलो कमी झाले आहे. अर्थात उद्यापासून नेहेमीचे जेवण सुरू केल्यावर त्यात किमान अर्धा-पाऊण किलोनी वाढ झाली तरी, दोन्-अडीच किलो तरी घट झाली असे म्हणायला हरकत नाही.
हा भाग सुनिल ह्यांच्या लेखातील आहे ;)
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
होय मी हे http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/111353.html?1150764001 इथेच मि हे प्रथम वाचले.
मग मी स्व्त हे केले आनी मग इथे दिले.
असा विचार करुन की हे कुनाला तरी उप्योगी होइल.
आनी सुनिल : अर्थात प्रस्तुत लेखिकेने कॉपी-पेस्ट करताना किंचित फेरफार जरूर केले......... मि काही लेखिका नाहिये , असच कधी तरी पोस्त करते
माफ करा हा सगला उद्योग दुसर्यना ही याचा लाभ व्हावा म्हनून
क्शमस्व
प्रतिक्रिया
डाएट
लाडु मोदक
गरज...
धन्यवाद
ढकलपत्रातील मजकुर
ढकलपत्रातील मजकुर
धन्यवाद
आनंद
१ वर्षा
प्रिय
अरे वा
जनरल मोटर्स...
काय सांगता ???
उपयोग थोड्या काळासाठी.
डायेट भारी
डाएट वाचून
जी एम
मस्त!
ह्म्म..
प्रोटीन्स?
सावधान !
संदीप, खरय.
देजा वू ...... !!!!! ?????
निषेध !
ती आहे का तो
निषेध !, देजा वू ...... !!!!! ?????
आयला नक्कि सागा करु का नको