✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुमचं सर्वात आवडतं ड्रिंक कोणतं?

प
पिवळा डांबिस यांनी
Fri, 02/15/2008 - 06:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32892 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

आ
आणिबाणीचा शासनकर्ता Fri, 02/22/2008 - 00:19 नवीन

बिजी असतो..

ते शनिवार बुधवारी प्यायचं द्रव्य आहे. ;-) वा वा! :) असो, शनिवार बुधवारवरून सर्किटची आठवण झाली. हल्ली गेला सर्किट कुणीकडे? हल्ली बराच बिजी असतो असं ऐकून आहे. त्यामुळे इथे यायला वेळ नसेल मिळत! असो.. लवकरच इथे यावा हीच इच्छा! आपला, (विकासरावांसारखी, कोलबेरसारखी, प्रियालीसारखी जुनी माणसं पुन्हा भेटल्याने खूप आनंदीत झालेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/22/2008 - 09:27 नवीन

ते प्रकरण बीझीच बरे आहे :)

>>असो, शनिवार बुधवारवरून सर्किटची आठवण झाली. हल्ली गेला सर्किट कुणीकडे? हल्ली बराच बिजी असतो असं ऐकून आहे. त्यामुळे इथे यायला वेळ नसेल मिळत! सर्किटराव, कामातच बरे आहेत. याहू आणि मायक्रोसॉफ्ट्ची युती होऊन त्यांच्या बॉसने इतके कामे सांगावी या सर्किटाला की बस :) त्यांच्यासारख्या माणसाने कामात असणे चांगली गोष्ट आहे, ते जर का मोकळे असले ना !!!! संकेतस्थळावर त्यांना आवरणे आणि आमच्या सारख्यांना वावरणे ,कठीण जाते :) तसे, सॅन होजे ला जाऊन त्यांना मला एक 'मानपत्रही' द्यायचंय ;) जुनी माणसं भेटल्यावर आम्हालाही खूप आनंद झाला !!!!! सर्किटची वाट पाहणारा प्रा.डॉ.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आणिबाणीचा शासनकर्ता
प
प्रमोद देव Fri, 02/22/2008 - 14:52 नवीन

हाहाहाहाहा!

तसे, सॅन होजे ला जाऊन त्यांना मला एक 'मानपत्रही' द्यायचंय ;) क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रियाली Fri, 02/22/2008 - 15:37 नवीन

मिसळपाव खायचा....

त्यांच्यासारख्या माणसाने कामात असणे चांगली गोष्ट आहे, ते जर का मोकळे असले ना !!!! संकेतस्थळावर त्यांना आवरणे आणि आमच्या सारख्यांना वावरणे ,कठीण जाते :) आणि नाका-डोळ्यातून पाणी येतं आहे म्हणून तक्रार करायची? :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सुनील Fri, 02/22/2008 - 00:55 नवीन

रोजच घ्या की!

फक्त बुधवार-शनिवारच का? तसा मार्गारीतातील पीच फ्लेवर माझा आवडीचा. पण खरच सांगायचं तर, हे "भेसळीचे" तकीला दिसायला मनमोहक आणि चवीलाही छान! तरीही, मीठ-लिबाने गिलावा केलेल्या तोंडात थेट तकीला शॉट टाकण्यातील थ्रील काही वेगळेच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Fri, 02/22/2008 - 01:08 नवीन

बुधवार-शनिवार

तात्यांचे खास "आवडते" दिवस आहेत आणि सर्किटच्या कायम आठवणीत राहणारे. (सर्वांचा हिशेब चोख राखणारी) प्रियाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सख्याहरि Fri, 02/22/2008 - 16:38 नवीन

रम वुइथ कोला..कृती...

स्कॉच ऑन द रॉक्स! आम्हांस ही फार आवडते. सुवर्णकांती झळाळणारं... आपला आब राखून असणारं... फक्त बर्फाशिवाय आणखी कुणाशी (सोडा, लेमन, ज्यूस वगैरे) सलगी न करणारं... मस्त वर्णन केले आहे. वा. त्यानन्तर... म्हनजे जर चांगली स्कॉच उपलब्ध नसेल्...(उदा. ग्लेन्न्फिडिच, शीवसरीगल..) तर रम वुइथ कोला.. याची क्रुती देत आहोत! एक लांब स्वच्छ चकाकणारा क्रिस्टलचा ग्लास घ्यावा. त्यात बर्फाचे किणकिणणारे चार-पाच स्फटिक घालावे. बेताची, जेमतेम स्फटिक बुडतील, न बुडतील इतकी (६० - सुमारे)बकार्डी रम घालावी. (माफ करा पिवळा डांबिस.. तुमची कृती चपखल बसत असल्यामुळे कॉपी पेस्ट केली थोडी.. आम्च्या लिखाणाच्या वेगाची जरा बोम्बाबोम्ब आहे :)) तर.. त्यानंन्तर, त्यात एक लिंबू पिळावे.. ग्लास अता ३०-४०टक्के भर्लेला असेल. अता ग्लास मधे चिल्ड कोला भरावा.. (भारता सार्खे थम्स्-अप मिळत नस्ल्याने, कोककोला किंवा तत्सम कोला आवडीप्रमाणे) ग्लासावरती लिम्बची एक चक्ती अडकववी.. सजावट म्हणून... ज्यांना ऑल्कोहोल ची चव अवडत नाही पण टल्ली व्हावे वाटते, त्यांना हे पेय हमखास आवडते.. अवश्य करून पहा.. मस्त लागते. ४-५ ड्रिन्क्स घेततल्यावर हळूच समाधी कधी लागते समजत नाही... -(स्कॉच प्रेमी) सख्याहरी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 17:09 नवीन

वा!

४-५ ड्रिन्क्स घेततल्यावर हळूच समाधी कधी लागते समजत नाही... वा! आपला, (समाधिस्त!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सख्याहरि
प
पिवळा डांबिस Sun, 02/24/2008 - 12:07 नवीन

आभार!

प्रिय सख्याहरी, आमची स्कॉचस्तुती आवडल्याचे कळवल्याबद्दल आभारी आहे. तुमच्या रम च्या रेसेपीमध्ये एक नम्र सूचना... साध्या क्लिअर बकार्डीपेक्षा, डार्क बकार्डी घालून ट्राय करा एकदा... ओक बॅरलची इतकी सुंदर चव येते म्हणून सांगू... आपला मदिरापरायण, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सख्याहरि
स
सख्याहरि Mon, 02/25/2008 - 20:43 नवीन

धन्यवाद...

डार्क बकार्डी घालून ट्राय करीन लवकरच...

टिप दिल्याबद्दल धन्यवाद.

इथे जर्मनीमध्ये  बीयरही फार मस्त मिळते.वाइझन बीयर.. विशेष!

-कृतकृत्त्य सख्याहरी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सख्याहरि Fri, 02/22/2008 - 17:40 नवीन

आज काही खरे नाही..

एक तर शुक्रवार्ची दुपार.. त्यात हा दरू गझलंचा विशय... कधी घरी जातो... आणि .. बसतोय असे झलेय.. ... त.क. - इथे चित्रे कशि हो घालतात प्रतिक्रीयेत? आम्च्याकडे बरीच लई भारी भारी चित्रे आहेत...
  • Log in or register to post comments
ल
लबाड मुलगा Fri, 02/22/2008 - 18:05 नवीन

ताजा ताजा

ताजा ताजा उसाचा रस (लिंबु आले घालुन) पक्या
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sun, 03/09/2008 - 08:15 नवीन

आवडते ड्रींक

स्कॉचमध्ये आम्हाला ब्लेंडेड प्रकारात जॉनी वॉकर ब्लॅक लेबल आणि शिवस रिगल (डांबीस काकांची फेव्हरेट) आवडते..आणि सिंगल माल्ट मध्ये ग्लेन फिडीच आणि ग्लेन लिविट आवडते.. (इतकीच ट्राय केली आहे).. डांबीस काकांनी सांगीतलेल्या कृती व्यतिरिक्त स्कॉच आम्हाला कधी कधी थोडासा क्लब सोडा घालून देखिल आवडते! स्कॉच खेरीज आम्हाला आमच्या टेनिसीची जॅक डॅनीयल व्हिस्की पण जाम आवडते.. लाजवाब आहे.. सोड्या मध्ये मस्त लागते!.. एखाद दुसरा पेग घेतल्यावर आमच्या इथल्या बार्बेक्यू जॉइंट मधील रिब्ज खावेत.. आहाहाहा!!! इस्ट कोस्ट वेस्ट कोस्ट वाले तुमची संमेलने संपली इकडे या.... तुम्हाला उत्कृष्ट बारबेक्यू खिलवू!!! -कोलबेर
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sun, 04/14/2013 - 10:14 नवीन

अस्मादिक रम आणि बियर या दोन

अस्मादिक रम आणि बियर या दोन टोकाच्या आवडी बाळगून आहेत. दोन्ही एकत्र पिल्यात तर अती उत्तम
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 04/14/2013 - 10:29 नवीन

२००८ साली आवडत असलेल पेय २०१३

२००८ साली आवडत असलेल पेय २०१३ साली नावडत होउ शकत अथवा उलट ही होउ शकते.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sun, 04/14/2013 - 11:28 नवीन

शारीरिक व मानसिक त्राण ज्या

शारीरिक व मानसिक त्राण ज्या दिवशी अधिक असते अश्या कामाच्या बहुतेक दिवशी रेड्बुल हे पेय माझ्या मानसिक व शारीरिक शिणवट्यावर सर्वोत्तम पर्याय असतो उन्हाळ्याच्या झळा सुसह्य करण्यासाठी ,उसाचा रस , चिल्ड बियर ,येथे चिल्ड मध्ये बर्फात गोठवलेली अगदी ज्या ग्लासात ती रीती होते तो सुद्धा आइस कोल्ड हवा. दादरच्या कैलास नाथ ची लस्सी चमच्याने खायला आवडते. रम्य संध्याकाळी मार्गरिटा, पिनाकोलाडा ,मार्टीनी , अश्या कॉकटेल सोबत सांध्र संगीत कानावर पडत असतांना प्यायला खूप आवडते. साग्रसंगीत ब्रंच करायचा असेल तर फेसाळणारी वारुणी शॅम्पेन माझ्यामते अत्यंत महागडं आणि उच्च अभिरुचीच पेय अशी शॅम्पेन म्हणजे पांढराशुभ्र फेस, झिंगवणारा स्वाद आणि उत्कृष्ट मुरलेली चव, सेलिब्रेशनचा मूड आणणारं हे सोनेरी मद्य आनंदाचं उत्साहाचं सर्वोत्तम प्रतीक आहे. किंवा डिनर साठी रक्तवर्णी वारुणी भोजनाच्या उत्तरार्धात Cognac Image removed. चा चषक हातात रेंगाळत चर्चिल च्या थाटात गहन विषयावर काथ्याकूट करायला खूप आवडतो.
  • Log in or register to post comments
ट
टिनटिन Sun, 04/14/2013 - 20:58 नवीन

गिनीस

आयरीश बीअर आहे (स्टाउट). काळ्या रन्गाची असते. त्याच्या बरोबर सोडा ब्रेड असेल तर अजुन धमाल. चव कडु असते पण एकदा आवडली तर त्याच्या सारखे दुसरी बीअर नाही. आपल्याकडे कुठे मिळत असेल तर कळवा.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sun, 04/14/2013 - 22:43 नवीन

आपल्याकडे अनेकदा घरी आलेल्या

आपल्याकडे अनेकदा घरी आलेल्या पाहुण्यांना काय घेणार असे विचारले तर बरेचदा त्यांचे उत्तर कूच नही असे असते. अश्यावेळी त्यांना अगत्याने कूच नही पाजावे. लय भारी
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/15/2013 - 07:51 नवीन

आइसक्रीम लस्सी

४४/४५ डिग्री से. तापमानात सायकलवरून अंतर कापताना घामाघूम होऊन जीव घाबरा झाल्यावर कडुनिंबाच्या झाडाखाली वाळ्याच्या ताट्या वापरून तात्पुरत्या टपरीमध्ये कानपुरवाले परदेसी भैय्या यांनी बनवलेली आइसक्रीम लस्सी पिल्यावर जी अनुभूती मिळाली होती तशी पुन्हा कधीच भेटली नाही. अनेक वर्षे गेली पण त्या लस्सीची चव अगदी काल प्यायल्याप्रमाणे जीभेवर आहे. लेख व प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 04/15/2013 - 09:52 नवीन

एकूण मी पेयांचा आशिक

मला खाण्यापेक्षा " पिण्याचा" नाद अधिक आहे. मद्यापेक्षाही मादक , अजिबात " पेय" नसलेले मला प्यायला आवडते. मी ते फक्त डोळ्याने पितो. काय असेल ते. आता साठीला आलो तरी या पेयाची संवय जात नाही. काय करावे बरे ?
  • Log in or register to post comments
प
पक पक पक गुरुवार, 04/18/2013 - 10:05 नवीन

मद्यापेक्षाही मादक , अजिबात "

मद्यापेक्षाही मादक , अजिबात " पेय" नसलेले मला प्यायला आवडते. आजोबा, आता तरी बास की... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
भ
भटक्य आणि उनाड Wed, 04/17/2013 - 11:51 नवीन

भन्नाट !!!!

काय पन मस्स्त विशय !!!
  • Log in or register to post comments
भ
भटक्य आणि उनाड Wed, 04/17/2013 - 11:53 नवीन

भन्नाट !!!!

काय पन मस्स्त विशय !!!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 04/17/2013 - 15:42 नवीन

नॉन-अल्कोहोलिच ड्रिंक चालणार

नॉन-अल्कोहोलिच ड्रिंक चालणार नै का हो? (टीटोटलर) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
प
पक पक पक गुरुवार, 04/18/2013 - 10:07 नवीन

नॉन-अल्कोहोलिच ड्रिंक चालणार

नॉन-अल्कोहोलिच ड्रिंक चालणार नै का हो? चालतय ! तु बनव अल्कोहल आम्ही टाकु ... ;) सोत्री आहेतच कॉकटेल बनवायला... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/18/2013 - 17:30 नवीन

हौ अबौट ताक/लस्सी/रसम ?

हौ अबौट ताक/लस्सी/रसम ? शिवाय एका जवळच्या सोर्सकडून ऐकलेय की चेन्नैच्या काही बार्समधून चखणा म्हणून रसम देतात म्हणे. ऐकूनच तोंडाला पाणी सुटले. सोत्रिअण्णांचा अनुभव काय आहे म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 04/18/2013 - 21:19 नवीन

कोंबडीचा काढा - आजीच्या हातचा.

लहान असतानाची आठवण.. आमची आजी नॉनवेज करण्यात अख्ख्या गावात प्रसिद्ध.. मग आजकालच्या शहरी मुली तर सोडा अगदी माझी आई वगैरे ही त्या समोर पाणीकमच.. त्यात ही तिच्या हातचे कोंबडी म्हणजे अहाहा.. आजही म्हातार्‍या कोतार्‍यांनी नाव काढावे.. असो, तर विषय ड्रींकचा आहे तर ती कोंबडीचा कसलासा काढा करायची.. काय कसा हे समजण्याच्या वयात मी नव्हतो.. अर्थात आजही स्वयंपाकघरात मी लुडबुड करत नाही ती गोष्ट वेगळीच.. पण त्या तिखट झणझणीत काढ्याची चव अवर्णनीयच असायची.. जणू काही सारे कोंबडीचे सार त्या काढ्यात उतरले असायचे.. आणि हा खास काढा मी आणि आजीच प्यायचो, इतरांना नुसता चवीला मिळायचा.. आणि म्हणूनच इतर सारे चिडायचे.. कारण त्या काढ्यामुळे कोंबडीची चवही कमी व्हायची.. साहजिकच आहे म्हणा, ती सारी चव त्या काढ्यात घोळवून मी आणि आजीच जे फस्त करायचो... आज हा धागा बघून काहीतरी वेगळे ड्रीक लिहावे म्हणून आठवायला घेतले आणि... धन्यवाद माझ्या आठवणी जागवल्याबद्दल.. आजी गेली त्याला आज चौदा-पंधरा वर्षे झालीत.. चव मात्र अजूनही रेंगाळतेय..
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 04/19/2013 - 02:02 नवीन

थम्स अप ऑन द रॉक्स! (कृपया

थम्स अप ऑन द रॉक्स! (कृपया हसू नये!!!! ;-)) मोठ्या बुडाचा ग्लास भरून बर्फ आणि त्यामध्ये बर्फांच्या राशीमधून हळूहळू भरत जाणारे.. काठोकाठ भरलेले थम्स अप. उगाच किडा म्हणून लिंबू पिळणे वगैरे प्रकार करायचे नाहीत.. आहे तसे आहे त्या चवीचे. सोबत तंदूरी चिकन आणि गरमागरम कबाब! वाह्! आणखी एक आवडते ड्रिंक (?) म्हणावे तर तांबडा आणि पांढरा रस्सा. मागच्या वर्षी पावसाळ्यात कमळगडाचा ट्रेक केल्यानंतर परत येताना दिवसभराचा पाऊस, बोचरा वारा, नखशिखांत भिजणे आणि कमळगडापासून वाईपर्यंत त्या नदीच्या शेजारून कुडकुडत बाईक चालवून वाईला थांबलो होतो.. "सिद्धगिरी" नावाच्या एका धाब्यावर फुल्ल वेटींग सहन करून जेवायला बसल्यावर वाट्या बाजूला सारून बिन्धास्त पाण्याच्या ग्लास मधून गरमागरम तांबडा आणि पांढरा रस्सा रिचवला होता. सोबतीला सुरमई फ्राय. अशी मनासारखी वेळ खूप कमी वेळा जमून येते!!!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 04/19/2013 - 11:27 नवीन

+११११११११११११११११११११.

+११११११११११११११११११११. थम्स अप बद्दल नै तर रश्श्याबद्दल. आपलेपण लै आवडते ड्रिंक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ब
बाबा पाटील Fri, 04/19/2013 - 11:37 नवीन

दुद्दु...

आपले आवडते एकच ड्रिंक दुद्दु...(कृपया चावट अर्थ काढु नये.)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा