✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Mon, 06/21/2010 - 11:58  ·  लेख
लेख
डीसक्लेमर :- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही. "पर्‍या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते. "वेडाच आहेस, मिपावर प्रसिद्ध होण्यासाठी फार काही कष्ट लागत नाहीत लेका, चल मी समजावतो तुला." मी त्याला आश्वासन दिले. मिपावर आजकाल दोन प्रकारचे सदस्य पटकन प्रसिद्ध होतात, १) विचारजंत २) टुकार १) विचारजंत :- ह्या लोकांना स्वत:विषयी फार म्हणजे फारच कौतुक असते. आपण जे काहि लिहितो ते अतिशय ज्ञानसंपन्न, लोकांना शहाणे करुन सोडणारे म्हणजेच 'लै भारी' असते असा ह्यांचा गोड गैरसमज असतो (माझ्यासारखा). आपले लेखन म्हणजे मिसळपाव इतिहासातील सोनेरी अक्षरे आहेत असेच हे लिहित असतात. खरे तर अक्कल असते शुन्य पण आपण फार मोठे ज्ञानी, सगळ्या विषयातली सगळी अक्कल असल्यासारखे वागणे हे ह्यांचे गुण. आपण फार मोठे विचारवंत आहोत असे ह्यांना वाटु लागते आणी मग जंत झालेल्या माणसला जसे सारखी साखर खावेसे वाटु लागते तसे ह्यांना विचार लिहावेसे वाटु लागते. मग एक दिवस ह्यांचे विचारजंतात रुपांतर होते. विचारजंत होण्यासाठी करावयाचे उपाय :- १) सहसा इतरांच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायचा नाही, दिला तरी तो प्रतिसाद धाग्यापेक्षा मोठा असला पाहिजे ह्याची काळजी घ्या. धागा १० ओळींचा असेल तर तुमचा प्रतिसाद कमीत कमी २० ओळींचा असला पाहिजे. २) २/३ दिवसातुन अतिशय रटाळ विषयावर धागे काढुन त्यावर त्याहुनही रटाळ चर्चा करीत रहा. उदा :- १) राजीव गांधीचा प्रेम विवाह. २) समाजातील महिलेचे स्थान व अबलांच्या रक्षणासाठी सरकारी कायद्यातील तरतुदींचा अभाव. ३) सिमेंटच्या आधारभुत किंमतीचे फायदे. ४) भजनलाल ह्यांची पुढील कारकीर्द काय असावी ? ह्या धाग्यात कोणीही प्रतिसाद दिला नाही तरीही आपण लिहितच रहावे, कुण्या नेत्यांची वाक्ये, पुस्तकातील संदर्भ गुगलुन गुगलुन लिहित रहावे. एखादे फेक प्रोफाईल असल्यास स्वत:च्याच धाग्यावर येउन "अतिशय अभ्यासु लेख." "नेहमीप्रमाणेच कसदार व सुंदर लेखन." अशा प्रतिक्रीया द्याव्यात. ३) एका वाक्याची चार वाक्ये बनवता आलीच पाहिजेत. दुसर्‍या सदस्यानी दिलेली माहिती आपण दिल्यासारखा आव आणता आला पाहिजे. उदा :- 'क्ष' ने एखाद्या विषयावर " १९८७ साली पवारांनी हा नियम आंमलात आणला, त्याला महाजन ह्यांनी अनुमोदन दिले." अशी प्रतिक्रीया दिली असेल, तर आपण लगेच "खरे तर हि कल्पना महाजनांची पण 'वाईज थिंक्स अलाईक' असे काहिसे घडुन ती कल्पना आधी मांडण्याचा मान पवारांनी घेतला, १९८७ साल होते ते (मग त्या वर्षात घडलेल्या एखाद्या घटनेचा उल्लेख करावा. उदा :- १९८७ साल लक्षात रहायचे कारण म्हणजे ह्याच साली अमेरीकन मोटर्स कंपनी ख्राईसलर्स मध्ये विलीन झाली) असे ठोकुन द्यावे. म्हणजे विचार लोकाचे पण ते आपले म्हणुन मांडता आले पाहिजेत. ४) विशेषत: नविन आलेल्या सदस्यांना 'टार्गेट' करावे. ह्यांनी लिहिलेल्या लेखनावर हे लांबच्या लांब 'अभ्यासु प्रतिसाद' द्यावेत. हे लगेच तुमचे फॅन होउन जातात. संपुर्ण कम्युनिटी ज्या सदस्याच्या लेखनाला 'भिकार' म्हणत असेल त्या सदस्याच्या धाग्यावर जाउन हमखास "मस्त लिहिलय, असे वेगवेगळे विषय कसे काय सुचतात तुम्हाला?" अशी प्रतिक्रीया देउन यावी. आता बघुयात 'टुकार' कसे बनावे. टुकार बनण्यासाठी धागे व तुमचे प्रतिसाद हे दोन्ही जमेल तेव्हडे टुकार असले पाहिजेत. तुमचे लेखन वाचुन लोकांनी डोकीच आपटुन घेतली पाहिजेत. सध्या अशा सदस्यांची फुल्ल चलती आहे . टुकार होण्यासाठी काय करावे :- १) प्रथमत: जमेल तेव्हड्या टुकार प्रतिक्रीया द्याव्यात. उदा :- १) 'हिटलर एक क्रुरकर्मा' अशा धाग्यावर जाउन "क्रुरकर्मा ? तुम्हाला काय त्रास दिला त्यानी??" अशी एक टुकार आणी हिणकस प्रतिक्रीया द्यावी. २) कोणी 'शाळेतील गमती जमती' असा धाग काढला तर तिथे जाउन "तुम्ही मोठे कधी होणार?" किंवा "पाळण्यातल्या गंमती जंमतींचा धागा कधी?" अशी प्रतिक्रीया देउन यावी. अशा प्रतिक्रीयांचे बरेच चाहते असल्याने, ते लगेच तुमची प्रतिक्रीया कॉपी पेस्ट करुन खाली दात दाखवणार्‍या स्मायली काढतात. ३) जमेल तेव्हडा धागा काढणार्‍याचा अथवा त्या धाग्यावर प्रतिक्रीया देणार्‍यांचा अपमान करावा. उदा :- 'बालविवाह आणी कायदा' असा धागा कोणी काढला की लगेच तिथे जाऊन धागा काढणार्‍याला 'लग्न करा आता म्हणजे असे प्रश्न पडत नाहीत" अथवा " तुमचा बालविवाह मोडला होता का हो?" असे कुच्छीत प्रश्न विचारावेत. एखाद्या प्रतिसादकर्त्याला "काय हो तुम्हाला मुले किती?" असा हलकट प्रश्न विचारावा. 'मिपासाठी आपले योगदान' अशा प्रकारे कोणी धागा काढल्यास "तुमचे सदस्यत्व रद्द करुन घ्या, उपकार होतील' असा एक उगाच हिणकस टोमणा मारुन यावे. एखाद्या सुंदर कथेवर "लाजवाब, अप्रतिम !" असे लिहुन एकदम खाली, "कुठुन ढापलीत?" असे विचारुन यावे. त्या धाग्यावर 'अगले जनम मोहे बिटिया हि कीजो" वगैरे मालीकांना शिव्या देउन याव्यात. उगाचच कुठल्याही धाग्यावर जाउन "रावण कोणी बघितला का?" अशा चर्चा करुन याव्यात. एकुण काय तर जेव्हडे टुकार वागता येईल तेव्हडे वागावे. लवकरच आपली (अप)किर्ती मिपावर पसरुन आपण प्रसिद्धी पावाल. "बदनाम हुए तो क्या ? नाम तो हुआ !!" -----------------------------------------------------------------------
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19981 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

सहमत आहे.

बिपिन कार्यकर्ते
Mon, 06/21/2010 - 22:08 नवीन
सहमत आहे. शिवाय, काही लोकांची आधीच एवढी उघड लाल असते की त्यांना मान्य वगैरे करण्याची गरज पडत नसेल. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

धन्यवाद

पंगा
Mon, 06/21/2010 - 22:21 नवीन
दुजोर्‍याबद्दल धन्यवाद. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

टारझन

Pain
Mon, 06/21/2010 - 22:49 नवीन
टारझन फॅक्ट्स: चूक. आणि स्वतः ला त्यात धरल्याने चुकिची वस्तुस्थिती होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

म्रुत्युंजय

Pain
Mon, 06/21/2010 - 22:53 नवीन
आधी सुरु केलेली मुलाची गोष्ट पुर्ण कर आणि मग काहीही लिही. या क्रमशः वाल्यांचे काहीतरी केले पाहिजे.
  • Log in or register to post comments

???

सुहास..
Tue, 03/29/2011 - 12:50 नवीन
हा कसा काय मिस झाला ;) =)) =)) =)) झकास लिखाण आणि त्यावरील प्रतिसाद ही
  • Log in or register to post comments

हा कसा काय मिस झाला ???

वपाडाव
Tue, 03/29/2011 - 14:48 नवीन
सुहासराव.. हा कसा काय मिस झाला ? अगदी हेच म्हंतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

पुन्हा

कवितानागेश
Tue, 03/29/2011 - 14:56 नवीन
पुन्हा एकदा खूप हसले. शिवाय, काही लोकांची आधीच एवढी उघड लाल असते की त्यांना मान्य वगैरे करण्याची गरज पडत नसेल. >> ही प्रतिक्रिया बेष्ट आहे!
  • Log in or register to post comments

उद्बोधक ....

मन१
Sun, 03/24/2013 - 13:46 नवीन
हुच्च.
  • Log in or register to post comments

संभ्रमित

भावना कल्लोळ
Mon, 03/25/2013 - 17:39 नवीन
हा सगळा लेख वाचल्यावर मिपा वर लिहावे की नाही असा प्रश्न पडला आहे कारण आम्ही नवीन लोकांना प्रसिद्धी नको पण वाचनातून, प्रतिक्रियेतुन एक मित्र परिवार मिळेल हिच अपेक्षा आहे …
  • Log in or register to post comments

वाचनातून, प्रतिक्रियेतुन एक मित्र परिवार........

मन१
Tue, 03/26/2013 - 08:29 नवीन
वाचनातून, प्रतिक्रियेतुन एक मित्र परिवार मिळेल गॉड ब्लेस यू.टेक केअर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

(No subject)

भावना कल्लोळ
Tue, 03/26/2013 - 16:18 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/25/2013 - 20:00 नवीन
मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ? Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

जय हो स्मायली बाबा कि

जेनी...
Mon, 03/25/2013 - 20:45 नवीन
=)) जय हो स्मायली बाबा कि =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+१११११११११११११.

बॅटमॅन
Mon, 03/25/2013 - 21:06 नवीन
+१११११११११११११. काय स्मायली का काय हो, मारिओ गेम आठवला एकदम =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

सगळ्यात सोप्पी पध्धत....

टवाळ कार्टा
Mon, 03/25/2013 - 21:09 नवीन
सगळ्यात सोप्पी पध्धत.... "पोरीचा" आयडी घ्यावा ;)
  • Log in or register to post comments

+१

प्रसाद गोडबोले
Sat, 03/30/2013 - 08:46 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

* विशेषत: नविन आलेल्या

स्मिता चौगुले
Tue, 03/26/2013 - 16:28 नवीन
* विशेषत: नविन आलेल्या सदस्यांना 'टार्गेट' करावे. *जमेल तेव्हडा धागा काढणार्‍याचा अथवा त्या धाग्यावर प्रतिक्रीया देणार्‍यांचा अपमान करावा. अगदि मान्य... असेच होते इथे
  • Log in or register to post comments

"Some say love is a feeling

सासुरवाडीकर
Tue, 03/26/2013 - 18:29 नवीन
"Some say love is a feeling that lasts till death do us part. but I disagree. my love for you will last beyond death, beyondearth, beyond the universe" beyond the time and spece.
  • Log in or register to post comments

प्रसिद्धिसाठी सद्ध्या सुरू

श्रिया
Fri, 03/29/2013 - 14:32 नवीन
प्रसिद्धिसाठी सद्ध्या सुरू झालेली पद्धत १.मुद्दाम अशुद्ध लिहिणे २.बोबडे लिहिणे ३.इंग्रजीचा अतिरेकी वापर
  • Log in or register to post comments

धागा हा हटके विषयावर असावा...

अविनाशकुलकर्णी
Sat, 03/30/2013 - 12:20 नवीन
धागा हा हटके विषयावर असावा....निराळ्या बाजुने घटनेचा विचार करुन धागा गुंफावा ...जेंव्हा शब्द अपुरे पडतात त्या वेळी चित्रांचा मुक्त हस्ते वापर करावा..[चित्रे कशी चढवायची याच्या सुचना दिल्या आहेतच ] टिकाकाराना घाबरू नये..पण सुचनांचा आदर करावा.. .....बरेच वेळा तुमचे धागे उडतात ...पण ना उमेद होऊ नये.. धागा काढताना आपले व इतरांचे २ घटका मनोरंजन इतकी माफक अपेक्षा ठेवून धागा गुंफावा ...
  • Log in or register to post comments

छान मार्गदर्शन!!! मी 2) टुकार

भोळा भाबडा
Mon, 06/06/2016 - 20:51 नवीन
छान मार्गदर्शन!!! मी 2) टुकार
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा