✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814

म
मोदक यांनी
Sun, 03/24/2013 - 23:12  ·  लेख
लेख
1998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते. श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच. अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे. या धाग्यामध्ये आपण या अपहरणासंदर्भात चर्चा करूया. संपादक मंडळास नम्र विनंती. १) माहेरच्या अव्हेरावरचे प्रतिसाद इथे शिफ्ट करणे शक्य असेल तर कृपया करावेत - तिथले विषयांतर टळेल. २) सदर धागा अस्थानी किंवा अनावश्यक वाटत असेल तर जरूर उडवावा - माझी हरकत नाही. सदर अपहरणादरम्यान अपहरणकर्त्यांकडून मारल्या गेलेल्या रूपेन कट्याल यांना श्रद्धांजली.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52015 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

ईस्त्राईलने ती कारवाई

मोदक
Mon, 03/25/2013 - 16:29 नवीन
ईस्त्राईलने ती कारवाई करण्यापूर्वी पंतप्रधान गोल्डा मायर यांनी ओलीसांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता त्यावेळी नातेवाईकांच्या जीवापेक्षा देशहित महत्वाचे आहे असे सांगून सरकार जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठींबा दिला होता असे वाचल्याचे आठवते. तपशीलामध्ये फरक आहे... १) ऑपरेशन एंटबे दरम्यान "यित्झॅक राबीन" हे इस्राईलचे पंतप्रधान होते २) ओलीसांच्या नातेवाईकांनी पंतप्रधान राबीन यांच्या निवासस्थानावरील सैनिकांचे संरक्षक कडे तोडून व सैनिकांना धक्काबुक्की करून राबीन यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता व ओलीसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करा अशी जाहीर विनंती केली होती. बाकी समाजाच्या प्रगल्भतेबद्दल हेच म्हणावेसे वाटते की.. कितीही उदात्त विचार केला तरी वैयक्तीक पातळीवर आपण थोडेफार स्वार्थी असतो. "माझे नातेवाईक या विमानांमध्ये असते तर...?" या प्रश्नाचे आपल्याबाबतीतले उत्तर सर्व प्रश्नांना पूर्णविराम देते. इस्राईलमधले आणखी एक उदाहरण - एंटबे संदर्भातलेच.. एंटबे विमानतळावरती हल्ल्याच्या सुरूवातीच्या क्षणांदरम्यान योनी नेतान्याहू च्या आदेशावरून मुकी बेत्सर या योनीच्या सहकार्‍याने दोन सैनीकांवर गोळ्या झाडल्या होत्या व या गोळ्यांच्या आवाजामुळे "Element of Surprise" राहिले नाही व याचा परिणाम योनी नेतान्याहूच्या मृत्यूमध्ये झाला. या मुद्द्यावरून योनी नेतान्याहूचा लहान भाऊ व सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू आणि मुकी बेत्सर यांनी एकमेकांवर उघड उघड आरोप केले आहेत. हे उदाहरण द्यायचा उद्देश हाच आहे की.. आपण आपल्या कुटुंबीयांच्या बाबतीत हळवे असतो, देशप्रेमापुढे वा देशाच्या भलाईपेक्षाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी

धन्यवाद

लाल टोपी
Mon, 03/25/2013 - 18:29 नवीन
तपशीलातील चूक दाखऊन दिल्याबद्द्ल धन्यवाद व्यक्तिगत पातळीवर आपण सर्वच हळवे असतो. १०० टक्के सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

"कारगिल नुकतेच झाले होते ..

श्रीगुरुजी
Mon, 03/25/2013 - 18:08 नवीन
"कारगिल नुकतेच झाले होते .. शहीद अजय आहुजाची विधवा या नातेवाईकांची समजूत घालण्यासाठी आली.. पण त्याचा उपयोग न होता सर्व नातेवाईक अजून भडकले.. " त्यावेळी इतर सर्व विरोधी पक्षांनी 'नरो वा कुंजरो वा' अशी भूमिका घेतलेली असताना व अपहृतांच्या नातेवाईकांचा दबाव वाढत असताना व वाहिन्या या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया सतत दाखवून वातावरणनिर्मिती करत असताना, तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री वसुंधरा राजे यांनी कारगिल युद्धातील हुतात्म्यांच्या नातेवाईकांना वाहिन्यांसमोर आणून अपहृतांच्या नातेवाईकांची समजूत घातली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

हा प्रतिसाद खूपच आवडला.

श्रीगुरुजी
Mon, 03/25/2013 - 20:18 नवीन
हा प्रतिसाद खूपच आवडला. सूर्याजीपंत, श्रीरंग जोशी, मोदक इ.चे प्रतिसाद देखील माहितीपूर्ण आहेत. माझ्या माहितीत नव्याने भर पडली. "एकूण ४५ मिनिटे मिळाली होती. पूर्वसूचना नसताना..आधी काहीही राजकीय / मिलिटरी / RAW चर्चा नसताना तिथे विमान थांबवण्यात अपयश आले." बरोबर. अमृतसरमध्ये भारताला जेमतेम ४५ मिनिटे मिळाली. अमृतसरमध्ये भारताचे कमांडो किंवा एनएसजी उपस्थित नव्हते व त्यांना तिथे पोचायला काही तास लागले असते. त्यामुळे स्थानिक पोलिसांवरच जबाबदारी येऊन पडली. ४५ मिनिटे इतक्या कमी वेळात दिल्लीत चर्चा करून एखादी कारवाईची योजना आखणे, त्यातले धोके तपासणे व धोके कमी करणे, ती योजना अमृतसरच्या अधिकार्‍यांपर्यंत पोचविणे व त्या योजनेप्रमाणे अमृतसरमध्ये तशी कारवाई स्थानिक पोलिसांनी करणे हे जवळपास अशक्य होते. स्थानिक पोलिसांपैकी एखाद्याने स्वतःहून विचार करून स्वतःच्या मनाने काहीतरी कारवाई करून विमान थोपविण्याचा प्रयत्न केला असता तरच काहीतरी होउ शकले असते. पण आपले पोलिस्/सैनिक हे हुकुमांचे ताबेदार असतात व स्वतःहून काही करायला जाऊन त्यातून अजून हानी झाली असती तर त्यांच्यावरच दोषारोप झाले असते. या प्रकरणामध्ये भारताने अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले, वाजपेयी नेभळट निघाले, भारताची अब्रू गेली, सरकारने बेजबाबदारपणाचा कळस केला, इस्राएलसारखा चिमूटभर देश जे करू शकला ते भारत करू शकला नाही, कमांडो कारवाई करून अतिरेक्यांना मारणे सहज शक्य होते पण भारत सरकारने बेपर्वाई दाखविली इ. दोषारोप "लोकसत्ता"तून कुमार केतकर व इतर काही माध्यमे सातत्याने करत असतात. इथले काही सभासद असेच प्रतिसाद देत होते. या चर्चेतील काही माहितीपूर्ण प्रतिसादांमुळे त्यांना वस्तुस्थिती लक्षात आली असेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

या प्रकरणामध्ये भारताने

मोदक
Mon, 03/25/2013 - 20:24 नवीन
या प्रकरणामध्ये भारताने अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले, वाजपेयी नेभळट निघाले, भारताची अब्रू गेली, सरकारने बेजबाबदारपणाचा कळस केला, इस्राएलसारखा चिमूटभर देश जे करू शकला ते भारत करू शकला नाही, कमांडो कारवाई करून अतिरेक्यांना मारणे सहज शक्य होते पण भारत सरकारने बेपर्वाई दाखविली इ. दोषारोप "लोकसत्ता"तून कुमार केतकर व इतर काही माध्यमे सातत्याने करत असतात. इथले काही सभासद असेच प्रतिसाद देत होते. या चर्चेतील काही माहितीपूर्ण प्रतिसादांमुळे त्यांना वस्तुस्थिती लक्षात आली असेल अशी आशा आहे. +१११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

यापुढे

पुण्याचे वटवाघूळ
Mon, 03/25/2013 - 13:21 नवीन
जे काही झाले त्यात आपण काही बदल करू शकत नाही.पण यापुढच्या काळात मात्र दोन गोष्टी करायला हव्यातः १. जर विमान अपहरणाची वेळ आली आणि जर विमान भारतीय हद्दीतून बाहेर न्यावे लागले तर ते पाकिस्तानात किंवा अधिक शक्यता अफगाणिस्तानसारख्या ठिकाणीच उतरवले जाईल-- २०१४ मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य परतले की तालीबानला पूर्ण मोकळे रान मिळेल आणि मग परत २००१ पूर्वीचीच परिस्थिती निर्माण होईल. अशा वेळेला सर्व वैमानिकांना अगदी स्टॅन्डिंग इन्स्ट्रक्शन देण्यात यावी (अर्थातच तोंडी) की वेळ पडल्यास विमान पाकिस्तानात जास्तीत जास्त नुकसान करण्याच्या दृष्टीने पाडावे म्हणजे आपणच ९/११ करावे. विमान उर्जाप्रकल्प-बंदरे किंवा नागरी वस्तीत पडले तर अती उत्तम.पण काहीही झाले तरी वैमानिकाने विमान कुठेही लॅन्ड करू नये. २. कोणत्याही कारणाने (विमान अपहरण किंवा कोणा प्रसिध्द व्यक्तीचे अपहरण वगैरे) जर दहशतवाद्यांना सोडायची वेळ आली तर त्यांना स्लो पॉयझनिंगचे इन्जेक्शन देऊन सोडावे म्हणजे ते हरामखोर लगेच नाहीत तरी महिन्याभरात मरतील. दिल्लीतील १९८४ च्या शीखविरोधी दंगलीसंदर्भात हरकिशनलाल भगत फेब्रुवारी १९९६ मध्ये दिल्लीतल्या कोर्टात गेलेला असताना नेमका तिथे त्याला माईल्ड हार्ट अ‍ॅटॅक आला होता. त्यावेळी असे म्हटले जात होते की त्याने अशा प्रकारचा हार्ट अ‍ॅटॅक "स्टेज" केला होता. त्याच धर्तीवर महिन्याभरात कोणी दहशतवादी मरेल अशा प्रकारचे इन्जेक्शन देणे अगदीच अशक्य नसावे. आणि निरपराध पाकिस्तानी मरतील किंवा कायद्याचे उल्लंघन होईल अशा प्रकारच्या गळे काढणार्यांना अगदी फाट्यावर मारत आहे.
  • Log in or register to post comments

विमान पाडावे ?

सूर्याजीपंत
Tue, 03/26/2013 - 07:36 नवीन
याला साध्या भाषेत फक्त आत्महत्या म्हणता येईल. प्रत्येक वेळची परिस्थिती भिन्न, आव्हाने भिन्न आणि परिणामकारक घटक भिन्न असणार. अशावेळी अपहरण झाल्यावर काहीच न करता स्वतःच विमान पाडून टाकण्यात काहीही शहाणपणा नाही. अशाने जरी सुटण्याची किंवा कमांडो कारवाईची शक्यता असेल तरी ती होणार नाही. आणि आपणच अशी आत्महत्या करून घेतली तर आपल्यात आणि फिदायीन अतिरेकी आणि सायनाइड घेणाऱ्या तमिळ वाघांमध्ये काय फरक राहिला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

श्रीरंग जोशी , सूर्याजीराव ,

निनाद मुक्काम …
Mon, 03/25/2013 - 16:59 नवीन
श्रीरंग जोशी , सूर्याजीराव , मोदक व इतर अनेकांचे प्रतिसाद वाचून चांगली माहिती मिळत आहे , माझ्या माहितीप्रमाणे तालिबान राजवटीत सुद्धा भारताचे चार दूतावास अफगाण मध्ये कार्यरत होते , तालिबान राजवटीचा पाकिस्तानला पाठिंबा असल्याने व तालिबान विरोधक गटाला भारताचा असल्याने तेथे विमान गेल्यावर डाव पाकिस्तानच्या हातात गेला , ह्यावरून एक महत्त्वाचा धडा भारत शिकला तो म्हणजे अफगाण मध्ये कोणतीही सत्ता असली तरी तिच्याशी चांगले संबंध ठेवून पाकिस्तानला ह्या भूमीचा भारताच्या विरोधात वापर करू द्यायचा नाही , उद्या अमेरिका गेल्यावर तेथे जर तालिबान सत्तेवर आले तर त्यांच्याशी संबंध ठेवणे भारतच्या हिताचे आहे , कारण पाकिस्तान हा भरवशाचा साथीदार नाही हे तालिबान ला कळून आले आहे , भारतने अमेरिकेला लष्करी सहाय्य केले नाही व आपली भूमी लष्करी वापरासाठी दिली नाही , पाकिस्ताने दिली हे तालिबान ला ठाऊक आहे , भारताची अफगाण मध्ये भूमिका शांतता व विकास करण्यासाठी कटिबंध आहे हे तालिबान ला ठाऊक आहे , तेव्हा शक्तीचे संतुलन राखण्यास्तही तालिबान पाक व भारताशी चांगले संबंध ठेवण्याच्या दिशेने प्रयत्न करेन , भारत सुद्धा इराण व ज्यू राष्ट्राशी एकाच वेळी वेळी चांगले संबध ठेवून आहे.
  • Log in or register to post comments

>>>चार दूतावास

प्यारे१
Mon, 03/25/2013 - 17:29 नवीन
>>>चार दूतावास ऑऑऑऑऑ???? अरे प्यारे राजदूत असावं. ऑऑऑऑ ???? एका देशात चार राजदूत???? चार राजदूत ? अरे,स्टाफसकट असेल ते प्यारे. माठच आहेस. असो. बाकी आपलं चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

चार कॉन्स्युलेट्स असाव्यात

श्रीरंग_जोशी
Mon, 03/25/2013 - 18:01 नवीन
एम्बसी एकच असते पण विविध शहरांत अधिक कॉन्स्युलेट्स असतील. कॉन्स्युलेट या शब्दाला मराठी प्रतिशब्द मलाही मिळत नाहीये. येथे कॉन्स्युलेट म्हणजे वाणिज्य दूतावास असे म्हंटले आहे. बाकी निनाद यांचे या अपहरणानंतरच्या भारतीय अफगाण नितीचे विश्लेषण पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

"माझ्या माहितीप्रमाणे तालिबान

श्रीगुरुजी
Mon, 03/25/2013 - 18:12 नवीन
"माझ्या माहितीप्रमाणे तालिबान राजवटीत सुद्धा भारताचे चार दूतावास अफगाण मध्ये कार्यरत होते ," तालीबान राजवटीला पाकिस्तान व सौदी अरेबिया या दोनच देशांनी मान्यता दिली होती. इतर सर्व देशांनी त्या राजवटीला मान्यता न देता आपले दूतावास बंद केले होते. भारताची या राजवटीला मान्यता नव्हती व त्यामुळे तिथे भारताचा एकही दूतावास नव्हता. अफगाणिस्तानचा ९० टक्के भूभाग तालिबानच्या ताब्यात होता व उरलेल्या भागात (पंजशीर खोरे) धडाडीचा ताजिक नेता अहमदशहा मसूद याची सत्ता होती. भारत अहमदशहा मसूद शस्त्रास्त्रे व इतर मदत पुरवित होता. मसूदला ९/११ च्या दोन दिवस आधी ९/९ ला तालिबान्यांनी आत्मघातकी हल्ल्यात मारले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

माझी लिहिण्यात चूक झाली

निनाद मुक्काम …
Tue, 03/26/2013 - 00:10 नवीन
माझी लिहिण्यात चूक झाली तालिबान राजवटीत नाही पण सध्या आपले चार दूतावास तेथे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वाणिज्य दूतावास म्हणा :-)

श्रीरंग_जोशी
Tue, 03/26/2013 - 00:14 नवीन
काबूलमध्ये दूतावास (एम्बसी) आहे व कंदहार अन दोन इतर ठिकाणी वाणिज्य दुतावास (कॉन्स्युलेट्स) असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

माझी लिहिण्यात चूक झाली

निनाद मुक्काम …
Tue, 03/26/2013 - 00:12 नवीन
माझी लिहिण्यात चूक झाली तालिबान राजवटीत नाही पण सध्या आपले चार दूतावास तेथे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आपला Northen Alliance ला

सूर्याजीपंत
Tue, 03/26/2013 - 07:29 नवीन
आपला Northen Alliance ला पाठींबा होता. त्याच्या अनेक नेत्यांपैकी एक महत्वाचा आणि प्रभावशाली नेता अहमदशाह मसूद होता, त्यालाच पंजशीर चा वाघ म्हणत. बाकीचे प्रभावी नेते म्हणजे अब्दुल रशीद दोस्तम आणि हमीद करझाई. त्यांच्या कबीलाई परंपरेप्रमाणे प्रत्येक नेता आपल्या आपल्या जमातीचे नेतृत्व करतो. पण माझ्या माहितीनुसार तिथेपण काही भारताचा अधिकृत तळ नव्हता. बाकी उत्तरेला अफगाणिस्थान पूर्व-सोविएत राष्ट्रांनी वेढलेला आहे, तिथे भारत प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. नवीन विचारसरणीच्या परराष्ट्रीय धोरणांचा हे यश आहे कि ताजिकिस्तान मधील फार्खोर येथे आपला पहिला लष्करी हवाई तळ आहे. तिथे एक मिग-२९ ची संपूर्ण sqaudron तैनात आहे. राजकीय वक्तव्य करायचा झालाच तर, वाजपेयी सरकारच्या काळात NAM धोरणात आणलेल्या मुलभूत वैचारिक बदलाचे हे फलित आहे. लष्करी दृष्टीने बोलायचं झालाच तर, देव न करो, पण अशीच वेळ जर का परत आली, तर आपला प्रतिसाद हा नक्कीच वेगळा असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

विकीपेडिया वर वाचली माहिती

मालोजीराव
Mon, 03/25/2013 - 17:32 नवीन
विकीपेडिया वर वाचली माहिती मोदका… एकदम जबरा ऑपरेशन तडीस नेलं… Image removed. २०११ मध्ये ह्या गोंडस ६१ सोमाली पायरेट्स वर भारतीय नौदलाने केलेली कारवाई पण जबराच होती
  • Log in or register to post comments

कंदाहार प्रकरणावर चर्चा

बंडा मामा
Mon, 03/25/2013 - 18:51 नवीन
कंदाहार प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सेपरेट चर्चा करायची आहे त्यात पुन्हा एटांबे, पांडे वगैरे प्रकरणे कशाला. कंदाहारचे निमीत्त पण काँग्रेस किती वाइट आणि भाजपा किती स्वच्छ ह्यावरच चर्चा हवी असेल तर ती माहेरचा अव्हेर मधे चालूच आहे.
  • Log in or register to post comments

कंदाहार प्रकरणावर चर्चा

मोदक
Mon, 03/25/2013 - 20:13 नवीन
कंदाहार प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सेपरेट चर्चा करायची आहे त्यात पुन्हा एटांबे, पांडे वगैरे प्रकरणे कशाला. मान्य - अवांतर झाले आहे परंतु ते धागा काढला त्यावेळी माहेरच्या अव्हेरावरती दिलेले प्रतिसाद होते. मला या घटनांविषयी अधिक माहिती नसल्याने "स्वपार्टीसमर्थक" इथे थोडा प्रकाश टाकतील अशी अपेक्षा होती! (ह.घ्या.) एंटबेचा उल्लेख आला कारण अनेकदा तपशीलातील चुका बर्‍याच गोष्टींना वेगळे वळण लावतात... उदा लाल टोपी यांचा हा प्रतिसाद. ईस्त्राईलने ती कारवाई करण्यापूर्वी पंतप्रधान गोल्डा मायर यांनी ओलीसांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता त्यावेळी नातेवाईकांच्या जीवापेक्षा देशहित महत्वाचे आहे असे सांगून सरकार जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठींबा दिला होता ही वस्तुस्थिती नाहीये, आणि हा गैरसमज दूर करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. कंदाहारचे निमीत्त पण काँग्रेस किती वाइट आणि भाजपा किती स्वच्छ ह्यावरच चर्चा हवी असेल तर ती माहेरचा अव्हेर मधे चालूच आहे. काँग्रेस वाईट आहे आणि भाजपा स्वच्छ आहे असे मी म्हणालो आहे का..? हे तुमचे मत असेल तर माझी काहीच हरकत नाही. तुम्ही भाजपाला वाईट म्हणाला आणि काँग्रेसला चांगले म्हणाला तरीही माझी हरकत नाही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

कॉग्रेसने केलेली चूक लक्षात

बंडा मामा
Wed, 03/27/2013 - 20:08 नवीन
कॉग्रेसने केलेली चूक लक्षात आल्याने काही विशिष्ट सदस्य मौनव्रतामध्ये गेले असावेत असा माझा अंदाज.
ह्या टिप्पण्या इथे अनावश्यक होता. त्यातुन तुम्हाला कंदाहरवर चर्चा करायची नसुन काँग्रेसच्या चुका दाखवयच्या आहेत असा समज होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

विशेष प्रवासी

निनाद मुक्काम …
Tue, 03/26/2013 - 01:37 नवीन
गुरुजी फार पूर्वी पाकिस्तानी चर्चा सत्र तू नळीवर ऐकले होते तेव्हा भारतावर पाकिस्तान च्या सीमेवर अफगाणिस्तान भारत अनेक दूतावास उघडून तेथे रॉ चे हस्तक प्रशिक्षित अतिरेक्यांना पाकिस्तानात सोडत आहेत त्यांचा रोख तेहेरीके तालिबान वर होता , ह्याला उद्देशून एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला की हे चूक आहे ,भारताचे फक्त चार दूतावास असून त्यातील काही तर तालिबानी राजवटीत सुद्धा होते , माझ्या डोक्यात तो मुद्दा बसला होता , विशेष प्रवासी ह्या अतिरेक्यांनी जी अफाट खंडणीची मागणी केली होती ती एकरकमी एका चेक वर देऊ शकले असा एक प्रवासी त्या विमानाच्या बिसनेस क्लास मध्ये उपस्थित होता ,ह्याची जर सुद्धा कल्पना त्या दहशतवाद्यांना नव्हती, जगभरातील करन्सी प्रिंटींग चा ९० टक्के व्यवसाय ताब्यात असलेला हा प्रवाशाचे नाव होते De La Rue Giori त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले हिंदूइजम म्हणजे काय ह्याची मला अजिबात कल्पना नाही पण ह्या १० दिवसात ह्या परिस्थितीस शांतपणे सामोरे गेले. हे पाहून मी थक्क झालो , मी कल्पना केली ह्यांच्या जागी फ्रेंच व इटालियन प्रवासी असते तर ह्या परिस्थितीत काय केले असते ,
  • Log in or register to post comments

विशेष प्रवासी

निनाद मुक्काम …
Tue, 03/26/2013 - 01:39 नवीन
गुरुजी फार पूर्वी पाकिस्तानी चर्चा सत्र तू नळीवर ऐकले होते तेव्हा भारतावर पाकिस्तान च्या सीमेवर अफगाणिस्तान भारत अनेक दूतावास उघडून तेथे रॉ चे हस्तक प्रशिक्षित अतिरेक्यांना पाकिस्तानात सोडत आहेत त्यांचा रोख तेहेरीके तालिबान वर होता , ह्याला उद्देशून एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला की हे चूक आहे ,भारताचे फक्त चार दूतावास असून त्यातील काही तर तालिबानी राजवटीत सुद्धा होते , माझ्या डोक्यात तो मुद्दा बसला होता , विशेष प्रवासी ह्या अतिरेक्यांनी जी अफाट खंडणीची मागणी केली होती ती एकरकमी एका चेक वर देऊ शकले असा एक प्रवासी त्या विमानाच्या बिसनेस क्लास मध्ये उपस्थित होता ,ह्याची जर सुद्धा कल्पना त्या दहशतवाद्यांना नव्हती, जगभरातील करन्सी प्रिंटींग चा ९० टक्के व्यवसाय ताब्यात असलेला हा प्रवाशाचे नाव होते De La Rue Giori त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले हिंदूइजम म्हणजे काय ह्याची मला अजिबात कल्पना नाही पण ह्या १० दिवसात ज्या रीत्या ह्या परिस्थितीस शांतपणे सामोरे गेले. हे पाहून मी थक्क झालो , मी कल्पना केली ह्यांच्या जागी फ्रेंच व इटालियन प्रवासी असते तर ह्या परिस्थितीत काय केले असते ,
  • Log in or register to post comments

विशेष माहितीबद्दल धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Tue, 03/26/2013 - 01:52 नवीन
या प्रवाशाच्या व्यवसायाबद्दल अतिरेक्यांना किंवा त्यांच्या सुत्रधारांना काहीच माहिती नसणे हे आपले नशिबच म्हणायचे. नाहीतर वाटाघाटींमध्ये त्यांचे पारडे अधिकच जड झाले असते. अर्थात त्या व्यक्तिचे प्रसिद्धीपासून लांब राहणे यावेळी उपयोगी ठरले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

९/११

बेभान
गुरुवार, 04/04/2013 - 09:57 नवीन
९/११च्या हल्ल्यातील युनायटेड ९३ विमानातील प्रवाशांसारखे धाडसी कृत्य IC 814 प्रवाशांनाही का करता आले नाही? हा मुद्दापण या चर्चेत यायला हवा. प्रत्येकवेळेस "सरकार"ला जबाबदार ठरविण्याऐवजी, जर त्या विमानातील १००+ देशबांधवानी ६ अतिरेक्यांचा मुकाबला करून इतिहास बदलला असता. कुठल्याही अतिरेकी संघटनेचे धाडस झाले नसते पुन्हा इथे येवून दहशतवादी कारवाया करण्याचे. देशाची आणि देशवासियांची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावली असती. नाना पाटेकरचे दिव्य शब्द : इथे http://www.youtube.com/watch?v=u-DNavQ5l9w
  • Log in or register to post comments

९/११च्या हल्ल्यातील युनायटेड

मोदक
गुरुवार, 04/04/2013 - 11:55 नवीन
९/११च्या हल्ल्यातील युनायटेड ९३ विमानातील प्रवाशांसारखे धाडसी कृत्य IC 814 प्रवाशांनाही का करता आले नाही? युनायटेड ९३ च्या प्रवाशांनी अपहरणाची बातमी देण्यासाठी आपापल्या कुटुंबीयांना मोबाईलवरून कॉल केले तेंव्हा त्यांना ९/११ बद्दल समजले. म्हणजेच त्यांना माहिती होते की ट्वीन टॉवर्स वर विमाने धडकली आहेत व आपणही असेच कुठेतरी आदळणार आहोत. अपहरण झाल्यानंतर युनायटेड ९३ काही मिनिटे अत्यंत कमी उंचीवरून उडत होते व युनायटेड ९३ च्या प्रवाशांनी बदललेला रूट फ्लाईट अटेंडंट्सच्या मदतीने "गेस" केला होता. या सर्व घटनांची परिणीती "मृत्यू निश्चित आहे" या धारणेत झाली व त्यामुळे जिवावर उदार होवून प्रवाशांनी कॉकपीटवर हल्ला केला असावा. त्या सर्व प्रवाशांनी दाखवलेल्या धाडसामुळे व्हाईट हाऊस / कॅपीटल बिल्डींग शाबूत राहिली असे म्हणायला हरकत नाही. अवांतर - ९/११ च्या घटनेमध्ये बहुतांश विमानांमध्ये अपहरणकर्त्यांनी प्रवाशांना फारसा उपद्रव न करता सरळ कॉकपीटवर हल्ला करून तेच ताब्यात घेतले होते व स्वतःला तिथे कोंडून घेवून विमाने लक्ष्यांवर धडकवली! यामुळे "नक्की काय चालले आहे" हे अनेक प्रवाशांना लक्षात आले नसावे अतीअवांतर - होलोकॉस्टमध्ये कैद्यांना जाणीवपूर्वक "मृत्यू निश्चित आहे" या भावनेची जाणीव करून दिली नव्हती. "जिवंत राहण्याची आशा" अशा घटनांमध्ये परिस्थिती आणि प्रतिकाराच्या मनस्थितीवर प्रभाव टाकत असावी. :-( जर त्या विमानातील १००+ देशबांधवानी ६ अतिरेक्यांचा मुकाबला करून इतिहास बदलला असता. तुमच्या भावना समजू शकतो परंतु अपहरणकर्त्यांनी रूपेन कट्याल ला भोसकून आणि मारहाण करून दिलेला मृत्यू दहशत बसवण्यास पुरेसा असावा असे वाटते. कुठल्याही अतिरेकी संघटनेचे धाडस झाले नसते पुन्हा इथे येवून दहशतवादी कारवाया करण्याचे. हा गैरसमज आहे - प्रतिकाराची एखादी घटना इतक्या टोकाची दहशत बसवू शकत नाही. (असे मला वाटते!) देशाची आणि देशवासियांची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावली असती. पास. *********** इतिहास बदलणे, देशाची प्रतिमा उंचावणे वगैरे गोष्टी माझ्या"नंतर" घडणार असल्याने अशा घटनांमध्ये "नंतर" फॅक्टर निर्णायक ठरत असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेभान

बेल बॉटम चित्रपटाची कथा

diggi12
Fri, 09/24/2021 - 03:04 नवीन
बेल बॉटम चित्रपटाची कथा कोणत्या अपहरण प्रकारणाशी निगडित आहे
  • Log in or register to post comments

ते दिल्ली - श्रीनगर विमान (१९८४)

अनन्त अवधुत
Sat, 09/25/2021 - 01:41 नवीन
फ्लाईट ४२१ अपहरण विकी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: diggi12

काही जणांना वस्तुस्थिती

श्रीगुरुजी
Fri, 03/28/2025 - 08:52 नवीन
काही जणांना वस्तुस्थिती समजावी यासाठी धागा पुनर्जिवीत करीत आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा