सुरुवात....
सरळ चंद्रावर नेणारं बुंबाट अंधुक वातावरण,
कानठ्ळ्ळ्या बसवणारा डिजेचा खण्खणाट ,
गुदमरवुन टाकणारी धुराडी अन चखण्याचा वास ,
आणि या सगळ्यांना सामावणारा असतो एक बार.....
..........असंच बनतं सगळं ....
......... आधी दीर्घ श्वास आणि मग…. एक लार्ज पेग... !!
आतमध्ये शिरताना झालेली चलबिचल .
ऑर्डर देताना झालेला गोंधळ ,
आ वासुन ऑर्डरची वाट बघणारे तुझे डोळे ,
आणि पांढऱ्याशुभ्र कपड्यातल्या कॅप्ट्नची नजर चुकवताना .....
अशी झाली ती पहिली भेट .....
...सोड्याची बाट्ली आणि तिथे .... एक लार्ज पेग...!!
बोटातली सिगारेट ओठात सारताना तू ,
फुंकुन फुंकुन दमल्यावरही मारलेला गोल्ड्न कश ,
खारेदाणे अन चकल्यांनी वाढलेली रंगत ,
आणि तुझ्या ग्लासातला फसफसणारा सोडा ....
असंच घडलं सगळं ......
थरथरणारा हात आणि तरीही .....एक लार्ज पेग ...!!
तर्र झालेले पाणीदार डोळे ,
अडखळणारे असंबद्ध शब्द ,
अन आकलन न होणारा विषय ,
तुला लपवता न आलेल तुझ्या आउष्यातल गुपीत ....
असंच जमलं आपलं .....
नि:शब्द झालेलो आपण आणि आपल्या सारख्याच इतरांनी प्यायलेला .......एक अन एक पेग ...!!!!
लेखनविषय::
एक दम टाइट .... ;)
का रे बाबा !!!
भन्नाट विडंबन
काय शेवट अपेक्षीत आहे.... ?
?????
:-)
व्वा त्रिपकराव
मजा आलि!