✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोबद्ला

भ — भावना कल्लोळ, Fri, 02/15/2013 - 15:06
नमस्कार, मिपा वर माझे हे पहिले लेखन आहे, तरी तुमच्या प्रतिक्रिया, सुचना चे स्वागत. साभार : गारवा आज काम जरा जास्त आहे असे रोज ऑफिसात गेल्यावर वाटते, लंच टाईम पर्यंत खपून सुद्धा टेबलावर एवढे काम साठते , तरी बोटे चालतात, डोके मात्र चालत नाही, back ground मध्ये घरच्या कामाशिव्या काही चालत नाही, तितक्यात नवऱ्या चा फोन येतो, संध्याकाळी बिर्याणी कर म्हणून हुकुम सोडून जातो, रागाचा माझ्या हि तिथेच असाच पारा चढतो , मन हे नुसते घडाळ्याच्या का ट्या वर सैरा वैरा पळत सुटते, ५.११ च्या लोकाल साठी मी हि जीव घेऊन धावत सुटते , लोकल पकडून शुरू होतो कामाच्या आखणीचा खेळ, विचार करता करता घरी पोहचून मी वाजवते घराची बेल, दरवाजा उघडता पिल्लू येते धावत, पायाला मिठी मारून करते गोड माझे स्वागत, घेता त्याला मिठीत सर्व शीण जातो निघून, पापे त्याचे घेऊन सज्ज होते मी कामाला, कारण असा कामाचा मोबदला फक्त मलाच मिळणार असतो. भावनाकल्लोळ

प्रतिक्रिया द्या
3018 वाचन

💬 प्रतिसाद (25)

अभिनंदन.

इनिगोय
Fri, 02/15/2013 - 15:08 नवीन
आता जमलं. 'भावनाकल्लोळ' हा शब्द लिहायला. :)
  • Log in or register to post comments

नाही हो मला मिपा वर मराठी

भावना कल्लोळ
Fri, 02/15/2013 - 15:13 नवीन
नाही हो मला मिपा वर मराठी मध्ये टंकताच येत नाही हे मी gmail वर टाइप करून इथे टाइप करून इथे टाकले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

हा धागा बघा त्यासाठी. आणि थेट

इनिगोय
Fri, 02/15/2013 - 15:42 नवीन
हा धागा बघा त्यासाठी. आणि थेट लेख टाकण्याआधी सराव म्ह्णून काही काळ इतरत्र प्रतिसाद देऊन बघा. नक्की जमेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

लिंक राहून गेली.

इनिगोय
Fri, 02/15/2013 - 15:45 नवीन
लिंक राहून गेली. (कृपया स्वसंपादनाच्या सुविधेचं मनावर घ्या हो..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

मी gmail वर टाइप करून इथे

दादा कोंडके
Fri, 02/15/2013 - 18:26 नवीन
मी gmail वर टाइप करून इथे टाइप करून इथे टाकले आहे
इथे टाइप करायचं होतं तर मग जीमेलवर टाइप का केलं होतं? 'इथे ताइप करून इथे' म्हणजे परत कुठे टाइप केलं होतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

अजून एक

दादा कोंडके
Fri, 02/15/2013 - 18:28 नवीन
५.११ च्या लोकाल साठी मी हि जीव घेऊन धावत सुटते
कुणाचा जिव घेता तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

कठीण आहे हो!

संजय क्षीरसागर
Fri, 02/15/2013 - 15:14 नवीन
तुमच्या प्रतिक्रिया, सुचना चे स्वागत.
नोकरी सोडा किंवा नवर्‍याला बिर्याणी सोडायला सांगा.
  • Log in or register to post comments

हे

पैसा
Fri, 02/15/2013 - 15:17 नवीन
साभारःगारवा काय आहे?
  • Log in or register to post comments

गारवा कसा आणावा ते साभारला विचारून झालंय

संजय क्षीरसागर
Fri, 02/15/2013 - 15:33 नवीन
आता : तुमच्या प्रतिक्रिया, सुचना चे स्वागत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अरे, ये गारवा नही जानती |

कवितानागेश
Fri, 02/15/2013 - 16:11 नवीन
अरे, ये गारवा नही जानती | :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गारवा हा मराठी पाउस गाण्यांचा

श्री गावसेना प्रमुख
Fri, 02/15/2013 - 17:57 नवीन
गारवा हा मराठी पाउस गाण्यांचा अल्बम त्याचच विडंबन वाटतय उन जरा जास्त आहे दर वर्षी वाटत, भर उन्हात पाउस घेउन आभाळ मनात दाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

Thanks

भावना कल्लोळ
Fri, 02/15/2013 - 15:36 नवीन
@ संजय,आजच्या नौकरी करणाऱ्या स्त्रीयाच्या बाबतीतला एक छोटासा अनुभव व्यक्त केला आहे, मध्यमवर्गीय कुटुंबाना दोघांनी नौकरी करणे गरजेचे झाले आहे, तरी पण आभार तुमच्या सल्ल्यासाठी. @ ज्योती, मी कदाचित चुकीची असेन पण मला हे गारवाच्या कवितेवरून सुचले म्हणून साभार असे लिहिले आहे, मी पूर्ण नवीन आहे या आंतरजालीय विश्वात म्हणून काही चुका झाल्यास माफी असावी.
  • Log in or register to post comments

असं होय?

संजय क्षीरसागर
Fri, 02/15/2013 - 15:41 नवीन
मला वाटलं तुमचाच प्रश्न आहे.... मग टाइपिंगची प्रॅक्टीस घरच्याघरी बराह पॅडमधे करता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

अप्रतिम

वेल्लाभट
Fri, 02/15/2013 - 15:39 नवीन
अप्रतिम मांडणी झाली आहे विचारांची. त्यातील राग, तळमळ, आनंद समजता येणारा आहे. पोस्ट आवडली !
  • Log in or register to post comments

छान लिहिलयस गं

जेनी...
Fri, 02/15/2013 - 15:45 नवीन
छान लिहिलयस गं :) होइल सवय हळुहळु मराठिची :)... डोन्ट वरी .... आम्हि आहोत ना ;)
  • Log in or register to post comments

डोन्ट वरी

अभ्या..
Fri, 02/15/2013 - 18:00 नवीन
डोन्ट वरी .... आम्हि आहोत ना
=)) =)) =)) =))=))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

डोन्ट वरी .... आम्हि आहोत ना

संजय क्षीरसागर
Fri, 02/15/2013 - 18:03 नवीन
उचलायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

"मला पण खुप खायची आहे

प्रसाद१९७१
Fri, 02/15/2013 - 15:50 नवीन
"मला पण खुप खायची आहे बिर्याणी, मला आज उशीर होणार आहे तर तूच करुन ठेव" असे नवर्‍याला सांगावे. आणि खरच उशीरा जावे. जर त्यानी करुन ठेवली असेल तर पुढल्या वेळेला तुम्ही करा, नाहीतर फाट्यावर मारा असले हुकुम.
  • Log in or register to post comments

बाप रे !

जेनी...
Fri, 02/15/2013 - 15:52 नवीन
बाप रे ! :( असं एकदम बोलुन टाकल्यावर नवरा रागवणार नै का ओ काका ?? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

रागवणारा असेल तर बदलुन टाका

प्रसाद१९७१
Fri, 02/15/2013 - 15:55 नवीन
रागवणारा असेल तर बदलुन टाका नवरा. :-)
  • Log in or register to post comments

नायतर मारा फवारा!

संजय क्षीरसागर
Fri, 02/15/2013 - 15:59 नवीन
आहे त्या नवर्‍यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

असं हो काय काका

जेनी...
Fri, 02/15/2013 - 16:00 नवीन
असं हो काय काका :( शी बै ... असले कसले सल्ले देताय तुम्हि :( मला त बै कै सुचेचना :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

अगं त्यांचा स्वतःचा प्रश्न नाहीये

संजय क्षीरसागर
Fri, 02/15/2013 - 16:10 नवीन
त्या इथे टायपिंगची प्रॅक्टीस करतायत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

मस्त लिहीलय... अजून अजून

नानबा
Fri, 02/15/2013 - 16:51 नवीन
मस्त लिहीलय... अजून अजून लिहीत राहा... मराठी टंकलेखनासाठी बराहा पॅड वापरा... खूप मस्त टंकता येतं मराठीत... पुन्हा कवितेबद्दल - भावना मस्त आल्यात. (मुंबईकर स्त्रीची काम आणि घरकाम मधील दगदग उत्तमरीत्या जाणवली.) :) पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

भावना कल्लोळ
Fri, 02/15/2013 - 17:09 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा