अदिती, धन्य आहे तुझी आणि तुझ्या वाचनव्यासंगाची..!
साला, आपल्याला इतकं विंग्लिश कळतंच नाय तर विंग्रजी लेखक काय वाचणार कप्पाळ?! :)
आम्ही फक्त पुलं, श्रीना आणि जयवंत दळवी वाचतो...! आपल्या मातीशी नातं सांगणारं मायमराठीतलं त्यांचं लेखनच वाचायला बरं वाटतं! :)
आपला,
(वाचनाची फारशी आवड नसलेला) तात्या.
तात्या, धन्यवाद! पण खरं सांगायचं तर मलाही काही वर्षांपूर्वी असलं काही वाचायची बिल्कुल हौस नव्हती. तुम्हाला लेख वाचून कळलंच असेल खरं श्रेय अशोक काकांचं आहे ते! घोडीला पाण्यापर्यंत नेण्याचं सगळ्यात कठीण काम त्यांनीच केलं, आता घोडी पाणी पिते त्यात काय नवल?
आणि खरंतर मी श्रीना कधीच वाचले नाहीयेत, जयवंत दळवींचं एक पुस्तक कधीतरी लहानपणी वाचलं होतं, त्यामुळे ठणठणपाळ म्हणालात तर कोणाबद्दल एवढंच मला समजेल.
(लहानपणी रशियन परीकथा वाचणारी) अदिती
लेख, अतिशय आवडला. रसलच्या आयुष्याची आणि त्याच्या पुस्तकांची ओघवती ओळख तुम्ही करून दिली आहे.
बाकी बर्थ कंट्रोलला जनन नियंत्रणाबरोबरच संततिनियमनही चालू शकेल. रसलला समकालीन असणार्या आणि भारतात संततिनियमनाचा पुरस्कार असणार्या र. धों. कर्व्यांच्या विचारावर रसलचा (किंवा त्याच्या पालकांचा) कितपत प्रभाव होता, हेही जाणून घेणे रोचक ठरेल. (अवांतर - मॅनिफेस्टोला जाहीरनामा हा प्रतिशब्द चालू शकेल.)
रसलचे आत्तापर्यंत 'मॅरेज अँड मॉरल्स' हे एकच पुस्तक वाचले आहे, पण त्यातही तुम्ही लिहिले आहे त्याप्रमाणे त्याची विद्वत्ता, नेमके आणि मोजके शब्द वापरायची शैली जाणवत राहते. त्याच्या आत्मचरित्रातला हा परिच्छेद त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा ठरावा.
सुखी माणसाचा सदरा आणि मॅरेज ऍण्ड मॉरल्स दोन्ही वाचल्यावर मला असं वाटायला लागलंय की मॅरेज.. चं पण भाषांतर व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते विचार पोहोचले पाहिजेत.
अदिती
आणि हो, प्रतिशब्द सुचवल्याबद्दल धन्यवाद.
ऍट लास्ट.... अदिती मी बरेच दिवस ह्या लेखाची वाट बघत होतो... विनंतिला मान दिल्याबद्दल धन्यवाद. रसलबद्दल तशी साधारण माहिती होती. तुझ्यालेखात अजून काही डिटेल कळले. आता त्याच्या तुला आवडलेल्या पुस्तकाबद्दल पण लिही...
बिपिन.
रसल याच्या आत्मचरित्राचे तीन खंड कॉलेजमध्ये वाचले, आणि हा विनोदी, विचारी लेखक आवडून गेला. रसलचे "The history of western philosophy" हे हल्ली माझ्या बिछान्याशेजारी ठेवलेले आहे - आणि अधूनमधून दोन-दोन चार-चार पाने वाचतो. त्यातली भाषा ओघवती आणि सोपी असल्यामुळे पुस्तक सहज वाचले जाते, पण कल्पना गहन असल्यामुळे नीट समजायला पुन्हापुन्हा कित्ता गिरवावा लागतो.
त्यांच्या लोकाभिमुख विषयांवरील व्याख्यानसंग्रह "Mysticism and Logic" हा माझ्यापाशी आहे, आणि त्यातली व्याख्याने एक-एक करून वाचतो आहे. यातलीही भाषा समजायला तशी सोपी आहे, विचार गहन आहेत. यात अदिती यांनी सांगितलेल्या काही व्याख्यानांचे पुनर्संकलन झालेले आहे.
माझ्याकडचे त्यांचे "Theory of Logical Atomism" पुस्तक मात्र तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांसाठी दिलेल्या व्याख्यानांचा संग्रह आहे. त्यातील आशय मला समजायला बर्यापैकी जड जातो आहे. पण जितपत समजतो आहे, पुष्कळ पटतो आहे.
माझ्या वैचारिक पठडीवर रसल यांच्या विचारपद्धतीचा सर्वाधिक प्रभाव आहे, असे मला कित्येकदा लक्षात येते.
माझ्याही या आवडत्या लेखकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद, अदिती.
धन्यवाद धनंजय.
मी अजूनही रसलचं आत्मचरित्र वाचलेलं नाही आहे, पण लवकरच तेही सुरू करेन. Mysticism and Logic आणि Theory of Logical Atomism बद्दल मला माहित नव्हतं. पण आता असं दिसतंय पुन्हा एकदा दुकानाकडे जायला पाहिजे.
अदिती
एका अपघातातून वाचलेल्या थोडक्या लोकांत तो असल्यामुळे The history of western philosophy ची विक्री वाढली आणि रसलचं उत्पन्न स्थिरावलं.
या वाक्याचा नीट अर्थबोध होत नाही अशा तक्रारी आल्यामुळे:
एका विमान अपघातात ४८ पैकी २४ प्रवासी वाचले, त्यांतला रसल एक होता. त्यामुळे (सहानुभूतीची लाट येऊन) अपघातापूर्वी तीन वर्ष प्रसिद्ध झालेल्या The history of western philosophy ची विक्री वाढली.
एकदम माहितीपूर्ण लेख..
धन्यवाद...
दोनेक वर्षांपूर्वीच्या लोकसत्तेमध्ये ,लोकरंग रविवार पुरवणीत बहुतेक, रसेल आणि टिळक यांच्यात एक थोर गणिती आणि थोर तत्त्वज्ञानी या अर्थाने बरीच साम्ये होती आणि ते तसे समकालीनही होते, याबद्दल लेख होता..... ( कदाचित टिळक एका खटल्याच्या निमित्ताने १९१७ ते १९१९ चुभूद्याघ्या इंग्लंडात होते तेव्हा त्यांची आणि रसेलची भेट व्हायला हवी होती किंवा कदाचित झाली होती , असे काहीसे वाचल्याचे स्मरते...)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
लेखाला प्रतिसाद द्यायच्या आधी हा अवांतर प्रतिसाद -
मग तू 'सुंदर वासालिसा' आणि 'डेनिसच्या गोष्टी - व्हिक्तर द्रागून्स्की'पण वाचलं असशील. वाचलंयस?
आता लेखाबद्दल -
चांगला झाला आहे लेख. आता रसल वाचायची उत्सुकता कितीतरी वाढली आहे.
तू पद्मजा फाटकनं 'गर्भश्रीमंतीचं झाड'मधे रसलवर लिहिलेला लेख मिळवून नक्की वाच. तुला जाम आवडेल.
आणि 'मॅरेज ऍण्ड मॉरल्स'वर काही नाही? मी किती उत्सुकतेनं वाट पाहत होते!
मी लेखात लिहिलंय तसंच आता काही पुस्तकं वाचून दोन-तीन वर्ष झाली. पुन्हा एकदा आता ते वाचेनच लवकर आणि प्रत्येक पुस्तकावर हवं तर स्वतंत्र लिहिते.
मी 'गर्भश्रीमंतीचं झाड'बद्दल ऐकलं होतं असं अंधूकसं आठवतंय, आता मिळवायला पाहीजे.
सर्वप्रथम पुस्तकांची आवड आहे पण काम, आळस, वेळेचे गणीत, आंतरजालावर अडकले जाणे व अधुन मधून कमजोर आकलन यांच्यामुळे आपल्यासारखे इतर कोणाचेही वाचन रडतखडत चालले हे बघून जरा बरे वाटले :-)
एकंदर असे वाटु लागले आहे की मुळ इंग्रजी पुस्तकांच्या नादी न लागता जरा अनुवाद, रुपांतर आधी उचलावे. कोणास रसल यांच्या मराठी अनुवादाविषयी माहीती असल्यास कृपया इथे द्यावी.
धन्यवाद संहीता.
अवांतर एक प्रश्न - मानसशास्त्राच्या हिशोबातुन एखाद्या अभ्यासकाला ठीक आहे पण जेव्हा एखाद्याचे लेखन जेव्हा "लेखन" म्हणुन चर्चा केली जाते तेव्हा त्या लेखकाचे आई-वडिल अन्य नातेवाईक यांचे कोणाशी व का शारीरिक संबध होते ह्याचा उल्लेख / चर्चा आवश्यक आहे का? तसे लिहले नसते तर काय एकंदर ह्या लेखात फरक पडला असता का, अपूर्ण वाटला असता का?
अवांतर उत्तर - या सगळ्याचा लेखनाशी थेट संबंध नाही हे खरंच आहे. पण फक्त मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समीक्षा करणार्यालाच हे तपशील माहीत असावेत असं थोडंच आहे. रसलच्या काळाचा विचार करता त्याने जे काही विचार मांडले ते अक्षरशः स्फोटक होते. असे विचार मांडणारी माणसं काही आभाळातून पडत नाहीत. त्यांना त्यांचा इतिहास - भूगोल असतो. काही पार्श्वभूमी असते. त्याचे पडसाद त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर उमटलेले असतात, म्हणून ती माणसं तशी होतात. हे जाणून घेणं मनोरंजक नाही का? दुर्गाबाईंची आई लहानपणीच गेली होती, त्या ज्या आजीजवळ वाढल्या ती उत्तम वाचन असणारी नि आधुनिक विचारांची होती, दुर्गाबाईंना आयुष्यात कधी कुणाचा मिंधेपणा पत्करावा न लागता स्वतंत्र बुद्धीनं अभ्यास करता यावा म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी पोष्टात काहीएक रक्कम ठेवून दिली होती, तसाच लग्न न करण्याचा दुर्गाबाईंचा निर्णय सहजपणे स्वीकारला होता - हे सगळं दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काहीच सांगून जात नाही?
रसलच्या आयुष्याच्या या माहितीच्या आधारे मी काही त्याचं मनोविश्लेषण करू शकत नाही. पण त्यामुळे त्याची विचारपद्धती मला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते, हे मात्र नक्की.
मला फक्त रसलची ओळख करून द्यायची होती आणि (मला असं वाटतं की मेघनानी माझं बरंचसं काम केलेलं आहे.) मी त्याच्या पुस्तकांबद्दल आत्ता इथे जास्त लिहिलं नाही आहे आणि मा़झा तो विचारही नव्हता, पण कोणीही त्याची पुस्तकं वाचली (/असतील) तर त्याचे विचार एवढे "आत्यंतिक" कसे झाले याचा अंदाज कदाचित त्याच्या बालपणातून येऊ शकतो. बाकी रसलचेही अनेक स्त्रियांबरोबर संबंध होते जे त्या काळात खूपच वादळी ठरले होते. आजही प्रिंस चार्ल्सचं लग्न घटस्फोटीतेशी झालं तर (ब्रिटीश) मीडीयाने त्याबद्दल प्रचंड धुरळा उडवला होता. तेव्हा अर्ल रसलच्या घरात विचित्र असं काही झालं होतं ....
(अवांतरः अजून १०० वर्षांनी अदिती एवढी विक्षिप्त का होती याबद्दल जेव्हा ब्रिटीश लोक पेलएल.कॉम लिहितील तेव्हा ते मिपाचा उल्लेख नाही का करणार?)
ओझरता परिचय सुद्धा आपण बरेच काहि अभ्यासले आहे याची चुणुक देवुन गेला.
अशीच अनेक लेखकांची आमच्या सारख्या मराठी, संस्कृत शिवाय इतर साहित्याशी परिचय नसणा-यांना व्हावी
जेणे करुन दुस-याच्या अनुभवाने तरी का होईना शहाणपण शिकण्याची मनीषा पुर्ण होईल
पुढील लेखनास मनापासुन शुभेच्छा
(दर आठवड्याला एक तरी लेख वाचायला मिळावा असे वाटते)
नाना
धन्यवाद.
>> अशीच अनेक लेखकांची आमच्या सारख्या मराठी, संस्कृत शिवाय इतर साहित्याशी परिचय नसणा-यांना व्हावी
मग आम्हा "असंस्कृत" लोकांसाठीही काही लिहा, नाना!
ओझरता परिचय सुद्धा आपण बरेच काहि अभ्यासले आहे याची चुणुक देवुन गेला.
किंवा तसं नाटक करू शकते! ;-)
अदिती
वा अदिती,
अतिशय माहितीपूर्ण लेख. तितकाच वाचनीय. लेखविषयाला मस्त साजेशी सैली.
मी रसल साहेबांचे काहिच वाचले नाहि आहे. आता जरूर वाचेन.
या सुंदर लेखाबद्द्ल आभार
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
रसलची सुंदर पद्धतीने ओळख करुन दिलीत. प्रतिसाद सुद्धा छान आहेत, माहितीत भर पडली.
रसल विषयी अजून काही लिहिलेत तर आनंदाने वाचीन.
आपण दिलेल्या दुव्यावरील अनुवादित लेख सुद्धा वाचला. फार छान आहे.
--लिखाळ.
धन्यवाद नंदन, बिपीन, सहज, मेघना, ऋषिकेश, आंद्या, मनस्वी, स्वाती ताई, भडकमकर मास्तर, तात्या, नाना, लिखाळ, धनंजय et al.
रसल विषयी अजून काही लिहिलेत तर आनंदाने वाचीन.
:-)
पुन्हा एकेक पुस्तकं नीट वाचून एकेक पुस्तक परिक्षण लिहिण्याचा विचार आहे, वाचक आहेत असं वाटतंय.
फक्त मी तत्त्वज्ञानाचा नीट अभ्यास केलेला नाही त्यामुळे जाणकार लोक, समजून घ्या जरा!
अदिती
लिखाळ यांनी दिलेल्या http://www.misalpav.com/node/9007 या चर्चेतील दुव्यामुळे हा लेख परत वाचला.
थॉमस पेन यांच्या " दी एज ऑफ रीझन" http://www.infidels.org/library/historical/thomas_paine/age_of_reason/part1.html पेन यांचे या पुस्तकात विस्तृत आणि स्पष्ट लेखन सापडेल. ते वाचल्यानंतर रसेल यांचा लेख समजू शकेल. (मी स्वतः रसेल यांचा लेख न वाचल्याने काही लिहू शकत नाही). अल गोर यांच्या लिखाणात मध्ये पेन यांचा उल्लेख पाहून हे पुस्तक नंतर वाचले होते). यात मुख्य रोख ख्रिश्चन धर्मातील विशेषतः बायबलमधील श्रद्धांवर असला, तरी आपल्याही पुराणे/आणि तत्सम धार्मिक साहित्यास असेच निकष लावता येतील असे वाटले होते.
सुंदर परिचय करुन दिल्याबद्दल धन्य. वाद नको.
रसेल ची फलज्योतिषाबद्द्लची मते काय होती? हे कुणी सांगितले तर बरे होईल. सध्या माझे वाचन व उत्साह यांच्याशी जवळीक कमी झाल्याचे प्रकर्षाने जाणवले.असो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया
पुन्हा एक डिस्क्लेमर!
अदिती,
श्रेय!
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
भाषांतर
धन्यवाद...
छान ओळख
धन्यवाद
एक अनुवाद
माहीतीपूर्ण
थोडं स्पष्टीकरण
व्वा !!!
एकदम
लेखाला
मॅरेज ऍण्ड मॉरल्स
लेख..
धन्यवाद
अवांतर
मला फक्त
ओझरता परिचय
अपेक्षा!
वा!
छान
हेच म्हणते
सुंदर
धन्यवाद.
वा!
थॉमस पेनबद्दल थोडेसे
सुंदर परिचय
रसेल थोडा कळला