ज्यांना मार्गदर्शन हव आहे त्यांना शोध घेणे पुण्यात काहीच अवघड नाही.
रोज दै. सकाळ वाचला तर त्यात मार्गदर्शन करणारे भरपुर निवेदने व जाहिराती असतात.
स्वयंसेवी सेवी संघटना आहेत. महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्र शेतकी महाविद्यालयाच्या आवारात आहे.
प्रकाश घाटपांडे
१ )मिटकॉन
कुबेरा चेंबर्स .. जंगली महाराज रोड पुणे ..
इथे स्वतःचा व्यवसाय करु इच्छिणा-यांना मार्गदर्शन देतात .. (प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा /लोन ऍप्लिकेशन इ.)
२)शेतकी महाविद्यालय -- महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र
इंग्रजी येत नसल्याने कॉल सेंटर सारख्या नोकर्या मिळत नाहीत
हे आता फारसं खरं नाही कारण आजकाल कॉलसेंटरकडून मराठी, हिंदी किंवा प्रादेशिक भाषांतही सुविधा पुरवल्या जातात.त्यामुळे शुद्ध मराठी किंवा हिंदी बोलता येणार्या लोकांनाही तिथे नोकर्या मिळतात.
केण्डेसाहेब, कदाचित तुमच्या ओळखीतल्या, माहितीतल्या लोकांसाठी ही माहिती उपयुक्त नसेल पण तुम्ही बेअरफुट कॉलेजचं नाव ऐकलय का?
http://www.barefootcollege.org/
आपल्या दूरदर्शनवरच मी याबद्दल एक माहितीपट पाहिला होता म्हणून कळलं.
आता मी फार खोदून या वेबसाईटवर पाहिलं नाही, आणि त्या माहितीपटामधलं फारसं आठवत नाही; गेली अनेक वर्ष या ठिकाणी ग्रामीण भागातल्या वीज, पाणी या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महिलांना प्रशिक्षण दिलं जातं. सौर उर्जेवर चालणारे कंदिल बनवणं, त्यांची काळजी घेणं इत्यादी गोष्टी या 'बेअरफुट अभियंत्यां'ना शिकवल्या जातात. नाममात्र फी आकारून महिला सक्षमीकरणासाठी हे काम केलं जात आहे. अनेक मागास, आफ्रिकन, दक्षिण अमेरीकन देशातल्या महिलाही इथे शिकून गेल्या आहेत.
अदिती
घाटपांडे साहेब, मनीषा, खट्याळराव व अदिती ताई,
आपल्या सर्वांच्याच सूचना विचार सुरु करण्यासाठी पूरक आहेत. चला, लागतो कामाला... आणखी माहिती मिळवून तुम्हाला सांगतो.
आपला,
(आभारी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
प्रतिक्रिया
सकाळ
मिटकॉन
प्रादेशिक!
कदाचित थोडं अवांतर
बेअरफुट
धन्यवाद!