ती कविता इथेच जर राहिली असती तर तिला एवढी प्रसिद्धी मिळाली असती का? :) अहो तिच्यावर इथे इतका काथ्याकूट झाला म्हणूनच तर ती इतक्या लोकांनी वाचली, हे खरं की नाही?
उलटपक्षी ती अप्रकाशित करून पंचायत समितीने तिला अधिकच प्रसिद्धी मिळवून दिली आहे!
खरं की नाही चिन्मयी ताई? काय म्हणता विनायकराव, आम्ही बोलतोय ते चुकीचे आहे का? :)
झाल्या प्रकाराची नोंद हंगामी पंचायत समितीने घेतलेली आहे. असे प्रकार भविष्यात घडू नयेत ह्यासाठी पंचायत समिती कार्यशील राहील. ह्या संकेतस्थळाचे वय बघता सदस्यांकडूनही संयमरूपी मदतीची अपेक्षा आहे.
आपापली मते प्रामाणिकपणे इथे नोंदवणार्या सर्व सदस्यांचे आभार!
-मिसळपाव पंचायत समिती
कवीता दोन दीस पडून होती कोनीबी वाचीत नव्हतं
कशाला काल्ढी कवीता .
कवीता पून्हा टाका जागेवर,ह्या सगळा काथ्याकूट बी काढून टाका.
असा जर आजच्या आज नै झालं तर पंचायत समीती म्होरं मी अन अन्नासाहेब हजारे आमरण उपोशनाला बसू
हीच नोटीस समजून कारेवाही करावी ही इनंती.
बाबूराव
राळेगण शिद्धी.
ही कविता माझी आहे. ती मनोगतावरून गेल्यावर इतरत्र घालू नये असे मीच सांगितले होते तरीही ती कविता येथे घालण्यात आली. माझे आडनाव जोशी नाही. ज्या पोष्टमन"काकां"नी ती कविता येथे घातली त्यांनीच चिन्मयी जोशी असे नाव घेऊन आपली जळजळ व्यक्त केली आहे. त्यांच्यापासून सावध असावे.
ही कविता एका व्यक्तीवर लिहिली होती आणि असे हिणकस प्रकार माझ्याकडून भविष्यात घडणार नाहीत. परंतु माझ्या नावाने असे लिहून जर कोणी घाणेरडेपणा करत असेल तर ती मी नाही हे निश्चित.
विनायक काका आणि रोहिणी काकूंनी वरील प्रकार इतरत्रही केला होता हे ही येथे विसरून चालणार नाही. मिसळपाव पंचायत समितीवर माझा पूर्ण विश्वास आहे.
- चिन्मयी गोरे.
हे प्रकरण वाटतंय इतके साधे नाही असे दिसतेय. ह्यातले बोलविते धनी वेगळेच दिसताहेत. चांगले चाललंय कोंबड्या झुंजवणे!
आता इथे प्रतिसाद देणारा,लिहिणारा जो /जी कोणी असेल त्यांच्या बद्दल मनात शंका राहणार हे नक्की. ही व्यक्ती खरी तीच आहे (ज्या नावाने प्रतिसाद देत आहे) की तोतया?
इथे वेगवेगळ्या नावाने लिहिणारे बरेच लोक असल्यामुळे खरे कोण आणि खोटे कोण हे कळणे कठीण होऊन बसलंय! अरे बाबांनो अन बायानो स्पर्धा करा,टीका करा पण उजळ माथ्याने समोर या. असे आडून वार करू नका. त्यामुळे आमच्यासारख्यांचा निष्कारण गोंधळ होतोय. टीका विधायक असू दे अन स्पर्धा निरोगी असू दे! एकमेकावर कुरघोडी करण्यात कसली धन्यता मानताय?
हर हर! काय दिवस आलेत?
हे वाचून आनंद झाला. हेच तुमचे मिसळपाव वर स्वागत आहे. येथे मनमोकळेपणाने लेखन करा.
खरंच , अगदी नि:संकोचपणे करा. मतभेद असले तरी दिलखुलास असावेत.
प्रकाश घाटपांडे
प्रसव ही कविता ज्यांची होती त्या कवयित्रीने येऊन हा वाद बंद करण्याचे आवाहन केल्यानंतरही या चर्चेत होणारे व्यक्तिगत वाद आणि आरोप यांना पूर्णविराम देण्यासाठी सदर चर्चा बंद करण्यात येत आहे.
कृपया, सदस्यांनी आपली प्रतिभा साहित्यनिर्मितीकरता खर्च करावी, जुने वाद उकरून काढण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या स्थळाचा वापर करू नये.
- मिसळपाव पंचायत समिती.
प्रतिक्रिया
आता सांगा बघू,
नोंद
मी राह्येलो
सर्वांना आवाहन
लय भारी
नवीन वळण कि पुर्णविराम
गुढ वाढत चाललेय!
आता पुरे
खरचं पुरे
सही
चर्चा सध्या बंद करण्यात येत आहे.