ती खोली
माजघराच्या डाव्या बाजूची ती खोली
बंदच असते आजकाल
खूप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून
-------
त्या खोलीत एक टोपली आहे
जुन्या खेळण्यांनी भरलेली
डालडाच्या मोठ्ठ्याश्या डब्यात
काठोकाठ भरलेल्या गोट्या आहेत
मी जिंकून आणलेल्या
फक्त त्यांचे रंग धुसर झाले आहेत आता
आरपार रंगीत जग दिसायचे
तसे दिसत नाही आताशा
-------
बरीच धूळ जमलीये त्या टोपलीवर
धुळीखाली ते गर्द निळ्या रंगाचे विमान आहे
खर तर एक पंख तुटलाय त्याचा
पण जरा जोरात धक्का दिला तर
खुरडत खुरडत चालते कधी कधी
-------
एक माकडही आहे
चावी दिल्यावर इवलासा ढोल वाजवणारे
आताही चावी दिल्यावर
हातातल्या इटुकल्या काड्या
वरखाली करते
पण आता काड्यांखालचा
तो ढोल तेवढा निखळून पडलाय
-------
खरंच
खुप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून
------
त्या टोपलीत
कायम हसणारा एक बाहुला होता
गोंडस, निरागस...गोबर्या गालांचा
आडवं केलं की
शहाण्या बाळासारखा झोपणारा
आणि बसवलं की
निळे डोळे मिचकावून पुन्हा हसणारा
कुठे गेला कुणास ठाऊक....
बरेच दिवस शोधतोय
-------
खरंच
खुप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून
।- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२९/०१/२०१३)
मिका!
चायला .......
चायला ++
सुरेख, आठवणींना लाभलेली 'खोली
आई ग्ग... मिका.. तू कविता
+१
अगदी अगदी
+ १
मस्त.
मनापासून आवडली.
वा..!
'रम्य' बालपणाच्या आठवणीत
आह
हल्ली मलाच नव्हे तर
अंगावर काटा काढलात .
त्या टोपलीत कायम हसणारा एक बाहुला होता गोंडस, निरागस...गोबर्या गालांचा आडवं केलं की शहाण्या बाळासारखा झोपणारा आणि बसवलं की निळे डोळे मिचकावून पुन्हा हसणारा कुठे गेला कुणास ठाऊक.... बरेच दिवस शोधतोयअंगावर काटा आणि भयानक अस्वस्थ करणारा अनुभव.अंगावर काटा आणि भयानक अस्वस्थ
खूपच आवडली
अगदी!
खरच होती रे अशी एक खोली.. खरच
अपतिम
सहमत
दाटून कंठ येतो
मिका
अप्रतिम!!!!!!!!!
वाह!!
और क्या बोलेगा? +1 टू किसन
+१
नितांत सुंदर !!!
(No subject)
अतिशय सुंदर!!
आज, सर्व महत्त्वाची कामे
आज, सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून आठवणीतल्या ह्या सर्व खेळण्यांशी हळूवार खेळत बसावे असे वाटते आहे.पण खेळता येत नाही म्हणूनच अतिशय अस्वस्थ वाटते. कविता आतवर हलवून गेली.वा !
छे... चुकलेच
वा !!!
मिका तुमच्या खोलीतली खेळणी
सुरेख
वा:
रडवलंत मिका.
क्षमस्व!!
लिहीते रहा मिका.
किवता मनापासून आवडली.
क्लास! रिग्रेशन मस्त टिपलंय!
लईच सेन्टी मारलाय रे
बर्याच दिवसानी येथे आलो..
खतरनाक!
अ....प्र....ति....म
आज इतक्या वर्षांनी पुन्हा
(No subject)
मिका
तोडलस मित्रा...!!!!!