✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जाहिरातीमधील चुकीचे मराठी !!

अ
अभिजित - १ यांनी
Wed, 01/23/2013 - 10:00  ·  लेख
लेख
. आजचा सकाळ ( २३/१/२०१३ ) . बहुतेक फक्त ठाणे आवृत्ती . शेवटचे पान . टीप टोप प्लाझा ची जाहिरात. एक वधुपिता आणि त्याची मुलगी. रुबाबदार जोडी. जाहिरात अशी आहे - 'कन्या परक्याचे धन ' मानून घडवलं व्यक्तिमत्व छान सासरी करताना वाटे सार्थ अभिमान ----------------------------------------------- आता कल्पना करा कि पहिल्या दोन ओळी वधूपिता म्हणत आहे. आणि शेवटच्या दोन ओळी ती मुलगी म्हणतेय !! अर्थात ती जाहिरात समोर असेल तर खरी मजा समजेल. इथे त्या लोकांनी "करताना" ऐवजी "पाठवताना" हा शब्द वापरायला पाहिजे होता. तुम्ही अशा जाहिराती पहिल्या आहेत का ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24432 वाचन

💬 प्रतिसाद (157)

प्रतिक्रिया

मध्यंतरी

चिरोटा
Wed, 01/23/2013 - 17:00 नवीन
मध्यंतरी एका बिगर कन्नड भाषिकाने न्यायलयीन अर्जात 'उच्च न्यायालय'ऐवजी 'हुच्च्'(वेडे)न्यायालय' केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पंक्चर काढले जाईल हे शुध्द

आदूबाळ
Wed, 01/23/2013 - 18:44 नवीन
पंक्चर काढले जाईल हे शुध्द लिहिलेले वाचायला आसुसलेला
Puncture आणि Cold Drink हे शब्द देवनागरीत बोर्डावर रंगवायला रंगार्याचे हात थरथरत असावेत. पण हेही एकवेळ क्षम्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पंक्चर काढले जाईल हे शुध्द

इनिगोय
Wed, 01/23/2013 - 19:25 नवीन
पंक्चर काढले जाईल हे शुध्द लिहिलेले वाचायला आसुसलेला तूच चुकीचं लिहिलंयस. ते "पंचर" असं लिहायचं असतं :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नाही हां, पंपचर म्हणतात.

रेवती
Wed, 01/23/2013 - 20:34 नवीन
नाही हां, पंपचर म्हणतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

पंपचर

केदार-मिसळपाव
Fri, 01/25/2013 - 14:27 नवीन
भूचर... खेचर... ह्या पठडीताले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अजून एक

केदार-मिसळपाव
Fri, 01/25/2013 - 17:32 नवीन
आमच्या इकडे 'पन्ग्चर' असेही म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

"अपडेट" रहा? "फॉलो" करा?

बहुगुणी
Wed, 01/23/2013 - 14:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अ प वा द!

धमाल मुलगा
Wed, 01/23/2013 - 16:04 नवीन
तुम्हाला कोणि सांगितलं की मटा हे मराठी वर्तमानपत्र आहे म्हणुन? मटा हे देवनागरी लिपी वाचता येणार्या सर्वांच्या सोयीसाठी चालवलेलं खटलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

आताची नॅनोची अ‍ॅड जाम डोक्यात

सूड
Wed, 01/23/2013 - 14:46 नवीन
आताची नॅनोची अ‍ॅड जाम डोक्यात जाते. 'आगे बढा' हे जाहिरातीतल्या पात्राला उद्देशून असलेलं वाक्य त्यांनी त्याच पात्राच्या तोंडून 'पुढे चालला' असं म्हणवून घेतलंय. मध्यंतरी अजित भूरेंनी मुलाखतीत सांगितलं होतं की अशा जाहिरातींसाठी डबिंग करताना हे चूकीचं मराठी आहे असं सांगण्याचा कलाकारांनी प्रयत्न केला तर हेच अप्रूव्ह होऊन आलंय असं सांगण्यात येतं.
  • Log in or register to post comments

मराठीच्या अभिमानासाठी

एम.जी.
Wed, 01/23/2013 - 14:50 नवीन
मराठीच्या अभिमानासाठी काढलेल्या चित्रपटात [ मी शिवाजीराजे....] जर " मला गर्व आहे मी मराठी असल्याचा..." असे तद्दन चुकीचे वाक्य म्हणत असतील तर जाहिरात कंपन्यांमधे भाषांतर करणार्‍या परप्रांतियांकडून कशाला अपेक्षा ठेवायची...?
  • Log in or register to post comments

बहुतेक गॅरे़जवाले "ऑटो"ऐवजी

बाळ सप्रे
Wed, 01/23/2013 - 15:13 नवीन
बहुतेक गॅरे़जवाले "ऑटो"ऐवजी "अ‍ॅटो" लिहितात..
  • Log in or register to post comments

एकेठेकाणी 'आमच्या येथे शाखारी

रेवती
Wed, 01/23/2013 - 20:34 नवीन
एकेठेकाणी 'आमच्या येथे शाखारी व मौसाहारी पदार्थ मिळतील' असे वाचले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

सवय झालीय

अभ्या..
Wed, 01/23/2013 - 20:53 नवीन
मटण शीख मिळेल. (ते शीग आहे का सीग आहे हे पण माहीत नाही मला) किरेन, जेसीपी व पोकलँड व ट्रावली भाड्याने मिळेल (क्रेन, जेसीबी व पोक्लेन, ट्रॉली/ट्रेलर) अयडिंटी फोटो काढून मिळतील. खास लग्नासाठी नाचणारा घोडा मिळेल. पंचर, पमचर, पन्चर, पंकचर, पचंर. सगळं वाचायची आता सवय झालीय :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

शॉकबसर भरून मिलेल...

खेडूत
Wed, 01/23/2013 - 21:10 नवीन
शॉक बसर राहिले ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बर्‍याच ठिकाणी

पैसा
Wed, 01/23/2013 - 21:17 नवीन
येथे बॉयलर चिकन मिळेल अशी पाटी पाहिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

काल परवाच बांधकाम

इनिगोय
Wed, 01/23/2013 - 15:39 नवीन
काल परवाच बांधकाम व्यवसायातल्या कंपनीची जाहिरात वाचली. "आम्हाला क्रमांक १ चे अग्रगण्य बनवल्याबद्दल आभारी आहोत आम्ही तुमचे".. आता क्रमांक २ चे अग्रगण्य कोण तेही सांगून टाका म्हणावं! म्हणजे आपल्याला ब्वा हा शब्द माहीत आहे म्हणून वापरा, पण वाचकांना मात्र तो नक्कीच माहीत नसणार म्हणून अर्थही सांगून टाका.. असा उद्योग वाटला हा. बाकी वाक्यरचनेबाबत तर __/\__..
  • Log in or register to post comments

मस्त धागा

समीरसूर
Wed, 01/23/2013 - 15:41 नवीन
आवडला. मराठीचं हिंदीकरण तर आता अगदी अंगवळणी पडले आहे. हिंदाळलेली मराठी ही ऐकायला खूप विचित्र वाटते. मस्त चिकन बिर्यानीमध्ये अधून-मधून भेंडीच्या फोडी लागाव्यात तशी... सुविधा - हिंदी शब्द - मराठी प्रतिशब्द सोयी गुफा - हिंदी शब्द - मराठी प्रतिशब्द गुहा विदेश - हिंदी शब्द - मराठी प्रतिशब्द परदेश योगदान - हिंदी शब्द - मराठी प्रतिशब्द माहित नाही करोड - कोटी कमी - कमतरता एका नाटकाचे (मराठी) नाव "या, तुमचीच कमी होती" असे होते. आता बोला! कसलं मराठी नाटक वयात आलं, खड्ड्यात गेलं!! "सासू माझी ढासू" अरे हे काय नाटकाचं नाव झालं? यमक जुळवण्यासाठी काहीही??? बाकी आजकाल मराठी शब्दांचे ज्ञान कमी कमी होत चालले आहे हे खरे. कार्यालयात एकजण (अर्थात पुणेरी) दुसर्‍याला म्हणाला, "अरे तो नं, तो जात्याच खोडसाळ आहे; छळवादी आहे नुसता" तो समोरचा जो मराठी महापुरुष होता त्याच्या चेहर्‍यावरची बारीकशी सुरकुतीदेखील हलली नाही. तो मट्ठासारखा बघत राहिला. मी माझ्या पुणेरी मित्राला म्हणालो कि बाबा रे त्याला कळलेलं नाहीये तू काय म्हणालास ते, पुन्हा सांग त्याला. आता बोला.
  • Log in or register to post comments

योगदान - हिंदी शब्द - मराठी

अमेरिकन त्रिशंकू
Wed, 01/23/2013 - 19:40 नवीन
योगदान - हिंदी शब्द - मराठी प्रतिशब्द माहित नाही वाटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

योगदान मराठी शब्द नाही ??

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 01/23/2013 - 20:31 नवीन
योगदान मराठी शब्द नाही ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

मस्त धागा

सन्जयखान्डेकर
Fri, 01/25/2013 - 18:41 नवीन
योगदान - हिंदी शब्द - मराठी प्रतिशब्द 'वाटा' असा असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

विमानातील "खुर्चीची पेटी" !!

बाळ सप्रे
Wed, 01/23/2013 - 15:47 नवीन
विमानातील "खुर्चीची पेटी" !! विमानक्रमांक ऐवजी विमानसंख्या
  • Log in or register to post comments

+१०००००००००००००. हेपण लै

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 15:47 नवीन
+१०००००००००००००. हेपण लै प्रचलित आणि डोक्यात जाणारे शब्द एकदम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

भाषांच्या सरमिसळीविषयी,

गवि
Wed, 01/23/2013 - 15:56 नवीन
भाषांच्या सरमिसळीविषयी, विशेषतः इतर भाषेतले शब्द घेण्याविषयी तितकंसं तीव्र विरोधी वैयक्तिक मत नसल्याने त्याबाबत पास. :)
  • Log in or register to post comments

सहमत

अभ्या..
Wed, 01/23/2013 - 16:21 नवीन
गविंशी सहमतच शेवटी आलोच जाहिरातीच्या मूळ तत्त्वावर. इटस अ कम्युनिकेशन. आर्ट फॉर पीपल. सांगणारा सांगेल, करणारा करेल, समजून घेणारा घेईल समजून. सगळेच ग्राहक असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हेच...

गवि
Wed, 01/23/2013 - 16:30 नवीन
हेच... चुकीचं भाषांतर, विरामचिन्हाच्या चुका, शब्दशः आणि असंवेदनशील भाषांतर, संदर्भ सोडून दोन भाषांतले शब्द एकत्र आणून अनर्थ करणे हे सर्व नक्कीच खटकण्यासारखं वाटतं पण केवळ अन्य भाषेतला बहुसंख्य समकालीनांना समजेल असा शब्द आपल्या भाषेत मिसळणं हे नक्कीच वाईट नाही. उदा: अ‍ॅडवणे, पेस्टवणे, सीटबेल्ट बांधा म्हणणे, चातुर्यपूर्ण कोट्यांसाठी भाषा मिसळणे (अमूलच्या अ‍ॅड्स हे उत्तम उदाहरण..) हे सर्व आवडतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

गविराज, सरमिसळीबद्दल विशेष

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 16:32 नवीन
गविराज, सरमिसळीबद्दल विशेष प्रतिकूल मत माझेही नाही. बोलताना पाहिजे तसे बोला, पण लिहिताना जरा डोके जागेवर ठेवा, अशा मताचा मी आहे. मुळात अशी हिंदाळलेली मराठी विदर्भ भागातसुद्धा फार आहे असे नाही. डोके जाग्यावर न ठेवता लिहिलेले मराठी पाहिले की डोके फिरते, इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१...

मनराव
Wed, 01/23/2013 - 17:47 नवीन
+१...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मिपाच्या खफ वरील सुचना

चाणक्य
Wed, 01/23/2013 - 16:55 नवीन
नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.
खरं म्हणजे मला हे पण खटकतं. लेखन उडवल्या जाईल च्या ऐवजी लेखन उडवले जाईल, हे जास्त बरोबर वाटत नाही का?
  • Log in or register to post comments

उडवल्या जाईल हे काही

ऋषिकेश
Wed, 01/23/2013 - 17:20 नवीन
उडवल्या जाईल हे काही प्रान्तात बोललेच नाही तर लिहिलेही जाते (बहुदा सोलापूर वगैरे), त्यामुळे हे सवयीने होऊ शकते. अर्थात हे प्रमाण मराठी नाही, मात्र या संस्थळाचा प्रमाण मराठीचा आग्रहही नाही बाकी, (विषय काढलाच आहात म्हणून)प्रत्येक संस्थळावर अशा खटकणार्‍या गोष्टी आहेत. (असा छिद्रान्वेशीपणा करताना) मात्र वृत्तपत्रे व्यावसायिक असतात तर ही सगळीच संस्थळे ही खाजगी आणि हौसेखातर काढली आहेत हे ही ध्यानात घ्यायला हवे. अवांतरःबाकी, अन्यत्र अनेक संस्थळावर असलेले 'आलेले सदस्य' देखील मला खटकते. त्यापेक्षा मिपावरील 'हजर माणसं' हा शब्दप्रयोग अधिक सुयोग्य वाटते, पण अन्यत्र मी त्याकडे दुर्लक्ष करतो कारण त्या सगळ्याच स्थळांवर वाचण्यासारखे बरेच काही सापडते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

नाही

अभ्या..
Wed, 01/23/2013 - 17:32 नवीन
उडवल्या जाईल हे काही प्रान्तात बोललेच नाही तर लिहिलेही जाते (बहुदा सोलापूर वगैरे)
अज्याबात नाही. सोलापूरात हेच वाक्य लिहायचे झाले तर उडवण्यात येईल असेच लिहितात. आणि खटकायच्या बाबतीत : बाहेरच्यांचे खटकते. आपल्या घरातील खटकत नसते हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

आणि खटकायच्या बाबतीत :

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 01/23/2013 - 18:01 नवीन
आणि खटकायच्या बाबतीत : बाहेरच्यांचे खटकते. आपल्या घरातील खटकत नसते हो.
आपला तो बाब्या... ;-) अवांतर :- पूर्वेतिहास बघत हे सगळे प्रतिसाद उडवल्या जाऊ शकतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

उडवल्या जाईल वगैरे मी विदर्भ

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 17:37 नवीन
उडवल्या जाईल वगैरे मी विदर्भ-मराठवाड्यात ऐकलेले आहे. पच्चिम म्हाराष्ट्रात नै बोलत लोकं तसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मान्य आहे

चाणक्य
Wed, 01/23/2013 - 17:51 नवीन
वृत्तपत्रे व्यावसायिक असतात तर ही सगळीच संस्थळे ही खाजगी आणि हौसेखातर काढली आहेत हे ही ध्यानात घ्यायला हवे.
याचे भान आहेच. आणि मिपा वर वाचण्यासरखे भरपूर आहे याचीही जाणीव आहे. म्हणून तर ठाण मांडून आहे ईथे. छिद्रान्वेषीपणा करायचा हेतू नव्हता. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

ह्म्म्म !!

सूड
Wed, 01/23/2013 - 18:00 नवीन
उडवल्या जाईल बद्दल काही बोलू नका बरं. त्याच्याविरुद्ध बोलणार्‍यांचे प्रतिसाद 'उडवल्या' जातात असा स्वानुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

उपस्थित सदस्य

अमेरिकन त्रिशंकू
Wed, 01/23/2013 - 19:43 नवीन
उपस्थित सदस्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

उडवल्या जाईल

अभ्या..
Wed, 01/23/2013 - 17:37 नवीन
आणि याच बाबतीत आपले ज्येष्ठ मिपाकर श्री. पेठकर काकांनी मला खूप छान सांगितले होते. त्यांच्या मते आपले आपण शुध्द लिहिणे हेच सर्वात उत्तम. त्यांचे निर्दोष मराठी लेखनातून सुध्दा बरेच काही शिकण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

भाषा आणि आचरण.

प्रभाकर पेठकर
Wed, 01/23/2013 - 17:45 नवीन
'झी २४ तास' ने काल एका गोष्टीचा 'पर्दाफार्श' केला आणि बातमीवर 'झी २४ तास इम्पॅक्ट' असा शिक्का मारून बातमी दाखविली जाते. असो. 'आलेलो', 'गेलेलो' हे तर इतकं इतकं वापरलं जातं की तेच शुद्ध आहे असं माझं मत बनत चाललं आहे. तेही असो. डेटॉलच्या जाहिरातीत ५-६ वर्षांची मुले क्रिकेट खेळत असतात त्यांचा चेंडू बाजूलाच बांधकाम चाललेल्या इमारतीच्या पाण्याच्या हौदात पडतो. त्या घाणेरड्या पाण्यात उतरायला कोणी तयार नसतं पण एक मुलगा धाडकन उडी मारतो (पाणी कमरे इतकंच खोल असतं) आणि चेंडू बाहेर काढतो. कारण का तो रोज आंघोळीच्या पाण्यात डेटॉल टाकून की डेटॉलच्या साबणाने अंग धूत असतो. त्याला जंतू संसर्ग होऊच शकत नाही. आता प्रश्न असा आहे हे चलचित्र दूरदर्शनवर पाहून दुसर्‍या एखाद्या मुलाने (तो डेटॉल वापरत असेल किंवा नसेल) एखाद्या हौद्यात उडी घेतली आणि पाण्याची पातळी ७-८ फुट असेल आणि त्या मुलाला पोहता येत नसेल तर काय अनर्थ होईल? चुकीची जाहिरात पाहून एखाद्या लहानग्याचा जीव जाऊ शकतो. डेटॉलच्याच दुसर्‍या एका जाहिरातीत त्याच वयाच्या मुलांचा क्रिकेट खेळताना चेंडू एका बाजूला उभ्या असलेल्या ट्रक खाली जातो. एक मुलगा लगेच ट्रक खाली घुसून तो चेंडू बाहेर काढतो. ट्रक खालच्या धुळीची, जळलेल्या तेलाची, वंगणाची त्याला काळजी नसते कारण तो डेटॉलने आंघोळ करत असतो. परंतु, तो मुलगा ट्र्क खाली असताना ट्रक सुरू झाला असता तर?? जाहिरातींच्या ह्या धोकादायक परिणामांना जबाबदार कोण? एका शीतपेयासाठी तरूण मुलं मुली ह्या इमारतीवरून त्या इमारतीवर उड्या मारत, दोरीला लटकत आणि पत्र्याच्या नळकांडीतून ७-८ मजली इमारतीवरून खाली येतात. 'आज काही तुफानी करूया' म्हणणारी ही मुलं काय किंवा अक्षयकुमार काय, शीत पेयं काय किंवा रहदारीतून वेगाने आणि वेडीवाकडी मोटरसायकल चालविणार्‍या त्या जाहिरातीतील तरूण काय सर्वजणांना धोकादायक खेळ खेळायला प्रवृत्त करताना दिसतात. खाली एक बारीक सूचना टाकली की ह्यातील सर्व स्टंट दृष्ये सराईत, पटाईत आणि व्यावसायिक कलाकारांनी केली आहेत आपण प्रयत्न करू नये, की जाहिरातदाराची जबाबदारी संपली? भाषेच्या शुद्धतेबरोबरच आचरणाची शुद्धताही तितकीच (किंबहुना जास्त) महत्त्वाची.
  • Log in or register to post comments

मुलांचे शब्दप्रयोग अनेकवेळा ऐकवत नाहीत.

अनन्न्या
Wed, 01/23/2013 - 18:00 नवीन
माझी पुतणी शाळेतून सायकलने घरी येते, काल घरी आल्यावर ती म्हणाली, मी मिठाईच्या दुकानाशी आल्यावर डचमळले, कोणत्या रस्त्याने येऊ तेच कळेना!!
  • Log in or register to post comments

शिकवणाय्रा शिक्षकांच्या व्याकरण शुध्द्तेचा एक नमुना!!

अनन्न्या
Wed, 01/23/2013 - 18:20 नवीन
मराठीच्या शिक्षिकेने मुलांना वर्गात सांगितले, वडील हा नपुसकलिंगी शब्द आहे. घरी मुलाने पेपर सोड्वताना तोच पर्याय लिहीला. मी त्याला समजावले, त्यावर त्याचे बाईंनी दिलेले स्पष्टीकरण- ते वडील म्हणजे नपुसकलिंगीच!! दुसय्रा दिवशी शाळेत गेले. बाईंचे म्हणणे ते ज्या साठी वापरतो ते शब्द नपुसकलिंगीच!! आदरार्थी बहुवचन त्यांना पटले नाही. 'व्याकरण आम्हीही शिकलोय हो!! काय पण एकेक पालक आहेत!!' एवढे ऐकून परत आले.
  • Log in or register to post comments

परत आलात?

सूड
Wed, 01/23/2013 - 18:23 नवीन
'व्याकरण आम्हीही शिकलोय हो!! काय पण एकेक पालक आहेत!!' हे असलं ऐकून तुम्ही परत आलात? शाळेत मुख्याध्यापक वैगरे प्रकार असतो त्याचीही जाणीव जरा त्या शिक्षिकेला होऊ द्यायचीत की !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

ते सर्व नंतर केलेच हो!!

अनन्न्या
Wed, 01/23/2013 - 18:27 नवीन
मी फक्त शिक्षकांच्या उत्तम? व्याकरणाचा नमुना सांगितला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

काय मूर्ख बाई आहे,

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 19:36 नवीन
काय मूर्ख बाई आहे, मुख्याध्यापकांकडून समजावलेत ते उत्तम. अशा बायांचा त्रास शालेय जीवनात मलाही काहीवेळेस सहन करावा लागला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

पत्र नव्हे कुत्र!

दादा कोंडके
Wed, 01/23/2013 - 18:24 नवीन
कालच 'मटा'त कुणीतरी 'भडास काढली' आणि 'कुण्याच्यातरी गाण्यावर तरुणाई थिरकत होती' ची बातमी होती.
  • Log in or register to post comments

मटावरचीच भडास काढायला गेलं तर

इनिगोय
Wed, 01/23/2013 - 19:30 नवीन
मटावरचीच भडास काढायला गेलं तर एका धाग्याचं पोटेन्शियल आहे त्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

२०१३च्या कालनिर्णय

रेवती
Wed, 01/23/2013 - 20:39 नवीन
२०१३च्या कालनिर्णय क्यालेंडरवर जानेवारी महिन्यातली जाहिरात पाहिल्यास 'का पत्नीच्या यशाच्या मागे पतीचा हात असू शकत नाही' असे काहीतरी लिहिले आहे. एका बाजूला दिया और बाती हम असेही आहे. म्हणजे ही एखाद्या मालिकेची जाहिरात असावी असे वाटते.
  • Log in or register to post comments

रचणे

राही
Wed, 01/23/2013 - 21:02 नवीन
आजकाल 'घडवणे'किंवा 'करणे' ऐवजी 'रचणे' हे क्रियापद वापरले जाते. उदा.इतिहास रचला,रेकॉर्ड रचले इ.
  • Log in or register to post comments

ते आहे ना

पैसा
Wed, 01/23/2013 - 21:16 नवीन
ते फार पूर्वीपासून वापरात आहे ना ग! "आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी" इ. आहे ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

जे पूर्वीपासून वापरात आहे ते

राही
Wed, 01/23/2013 - 23:26 नवीन
जे पूर्वीपासून वापरात आहे ते योग्य अर्थाने म्हणजे कन्स्ट्रक्ट या अर्थाने आहे. नगररचना, मंदिररचना हे शब्द योग्य आहेत. पण इतिहासाच्या बाबतीत तो घडतो किंवा घडवला जातो. रचला जात नाही. तेच विक्रम किंवा रेकॉर्डच्या बाबतीत. नवा विक्रम केला, आधीचा तोडला हे ठीक वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बरोबर

पैसा
Fri, 01/25/2013 - 17:40 नवीन
कविता रचली हे ठीक वाटते, इमारत रचली हेही बरोबर. पण "एखादी कथा रचून सांगतोय" म्हटलं की कल्पनेतलं सांगतोय असाच अर्थ घेतला जातो. इतिहास रचला म्हटले तर तो इतिहास रहात नाही खरे तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

..

ईन्टरफेल
Fri, 01/25/2013 - 20:59 नवीन
आजकाल रचलेला इतिहासच वाचला जातो ! रहि ताई ...............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा