✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चुंबकीय क्षेत्र आणि प्राण्यांची उभी रहाण्याची दिशा

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Tue, 08/26/2008 - 14:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28082 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Tue, 08/26/2008 - 15:52 नवीन

कॉरिओलिस - कंपास

>>तो कोन पण बदलतो का? (भौगोलिक आसाचा कोन ७२००० वर्षांच्या चक्रामधे २२.५-२५ अंश एवढा बदलतो, सध्या २३.५ अंश आहे.)<< बदलत असावा. वीकिवर बरीच माहिती आहे. >>मी अलिकडेच एक चुंबकीय कंपास पाहिलं, ते (भौगोलिक) उत्तरेकडे (चुंबकीय) उत्तर दाखवत होतं, म्हणून मी फसले असणार<< अनेकदा कंपासची खालची तबकडी स्थिर असते आणि सुई फिरणारी असते. अश्या वेळी चुंकसुई जेव्हा उत्तर दिशा दाखवते तेव्हा हातातले दिशादर्शक त्याप्रमाणे फिरवून घ्यायचे असते. आणि उत्तरेला उत्तर मिळवायची असते. (म्हणजे उत्तर बरोबर येते :)). आपण पाहिलेला कंपास तसाच असेल आणि आपली फसगत झाली असेल. (की-चेन वगैरे प्रकारात असणार्‍या कंपास मध्ये, सुई आणि देशा लिहिलेली तबकडे एकत्र चिकटवलेली असते.) >>माझ्या मते ते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जे कोरिऑलिस बल (coriolis force) तयार होते त्यामुळे असावं. << बरोबर आहे. माझी चूक झाली बहुधा. माझ्या डोळ्यांसमोर फक्त पुस्तकातली आकृती होती..तपशीलात घोटाळा झाला. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विदुषक Tue, 08/26/2008 - 15:59 नवीन

तो कोन पण

तो कोन पण बदलतो का? (भौगोलिक आसाचा कोन ७२००० वर्षांच्या चक्रामधे २२.५-२५ अंश एवढा बदलतो, सध्या २३.५ अंश आहे.) जालावरील महीती नुसार १. भौगोलिक आस आणी चुम्बकिय आस ह्यात सध्या साधारण ११.९ अन्शाचा कोन आहे http://en.wikipedia.org/wiki/Image:Geomagnetisme.svg २. चुम्बकिय ध्रूव आपले स्थान सतत बदलत असतो .. साधारणतः ११कीमी ... ३. पृथ्वी चे चूम्बकीय बल कमी होत आहे मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ Wed, 08/27/2008 - 10:07 नवीन

मिथ

पृथीचे चुंबक क्षेत्र हे चक्रीवादळांच्या दिशेवर सुद्धा परिणाम करत असते असे वाचलेले आठवते. उत्तर गोलार्धात चक्रीवादळे घडाळ्याच्या दिशेने (की >> उलट?) असतात तर दक्षीण गोलार्धात त्या उलट हे एक मिथ आहे. लोक टॉयलेट /कमोड मध्ये गोल फिरणार्‍या पाण्याच्या दिशेबद्दल ही असेच समजतात. पण ते केवळ समज आहेत. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ऋ
ऋषिकेश Tue, 08/26/2008 - 16:50 नवीन

चालती बस

चला चालत्या बस मधे झोपायला नको.. बस कधी दक्षिणोत्तर होईल सांगता येत नाहि ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Tue, 08/26/2008 - 17:03 नवीन

यम

माझा दादा सांगयचा की दक्षिणेकडे पाय करुन झोपल तर यम येतो. लहानपणी ते खर वाटयचा . 8} --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/26/2008 - 17:06 नवीन

>> माझा दादा

>> माझा दादा सांगयचा की दक्षिणेकडे पाय करुन झोपल तर यम येतो. खरोखर आला का, का तुम्ही पायाला "नाईट गॉगल" लावून, पायाखाली उशी ठेऊन त्याला चकवलंत? >> लहानपणी ते खर वाटयचा . म्हणजे आता तुम्ही मोठ्या झालात का? (ह.घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्नेहश्री
प
प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2008 - 17:20 नवीन

चुंबकिय परीणाम...

आपल्या शरीराचेही चुंबकिय क्षेत्र असते(म्हणे). त्या चुंबकिय क्षेत्राचा उत्तर धृव आपल्या डोक्याकडे आणि दक्षिण धृव पायाकडे असतो (म्हणे). आता चुंबकिय नियमांनुसार असमान धृवात आकर्षण आणि समान धृवात अपाकर्षण होते (प्रुव्ह्ड). त्यामुळे आपण दक्षिणेकडे पाय करून झोपल्यावर दोन समान धृव एकाच ठीकाणी आल्यामुले त्यात अपाकर्षण होऊन रक्ताभिसरणास विरोध होतो. परिणाम स्वरूप आरोग्य नीट राहात नाही. म्हणून दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. मृतदेहास दक्षिणेकडे पाय करून ठेवतात त्यामुळे प्रेत सडण्याची क्रिया मंदावते (दूरचे नातेवाईक यायचे असतात). मृतदेहास उत्तरेकडे पाय करून ठेवल्यास प्रेत लवकर सडू लागते. (म्हणे) दक्षिणेकडे पाय करू नये की डोके करू नये असा अनेकांना संभ्रम असतो. त्यामुळे पूर्व-पश्चिम झोपवे असा सोयिस्कर नियम ते बनवितात (असे मला वाटते). पुजा सांगणार्‍या गुरूजींनी 'दक्षिणे'कडे डोळे ठेवू नयेत.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 08/26/2008 - 17:41 नवीन

पुजा

पुजा सांगणार्‍या गुरूजींनी 'दक्षिणे'कडे डोळे ठेवू नयेत.
=)) काका, म्हणजे तुम्ही त्यांच्या पोटावरच मारताय की... असं नका हो करु, हवं तर पाठीवर मारा पण पोटावर नको :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2008 - 17:45 नवीन

मनोभावे...

अरे! म्हणजे मनोभावे पूजा सांगावी. दक्षिणेचा अंदाज घेत थोडक्यात आटपू नये, हो! बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मनिष Tue, 08/26/2008 - 17:42 नवीन

मी हे असेच

मी हे असेच ऐकलेले आठवते, पण मुतदेह सडणे वगैरे माहित नव्हते!
पुजा सांगणार्‍या गुरूजींनी 'दक्षिणे'कडे डोळे ठेवू नयेत.
:=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रशांत Wed, 08/27/2008 - 10:30 नवीन

चुमबकिय परिणाम

प्रशांत उत्तेरेकडे तोंड करुण अभ्यास केल्यास चांगला होतो..........? खरे कि खोटे..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
१
१.५ शहाणा Tue, 08/26/2008 - 19:00 नवीन

डोके

आपल डोके अर्धवट कोठेही केले तरी चालेल.......
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 08/26/2008 - 19:27 नवीन

उरलेल्या

उरलेल्या अर्ध्या भागाचे काय करायचे भौ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: १.५ शहाणा
ख
खादाड_बोका Tue, 08/26/2008 - 19:02 नवीन

चुंबकीय क्षेत्र...

चुंबकीय क्षेत्र...काय डोमले ठेवले त्याच्यात ? डिस्कव्हरी चॅनेलवर प्रुव्ह केले आहे की ह्याचा माणसाच्या शरीरावर काही परीणाम होत नाही. त्यामुळे चुंबक चिकीत्सा हे एक थोतांड ठरते. त्यापेक्षा हे प्रुव्ह झाले आहे की चुंबन चिकीत्सेने माणुस ज्यास्त ताजातवाना व खुश राहातो.(हं. घ्या.) ;) ;) चुंबन चिकीत्सा जिंदाबाद....
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 08/26/2008 - 19:07 नवीन

त्यापेक्ष

त्यापेक्षा हे प्रुव्ह झाले आहे की चुंबन चिकीत्सेने माणुस ज्यास्त ताजातवाना व खुश राहातो कुणी केले? कधी केले? कसे केले? तुमचा सहभाग किती? कसा? पुर्वतयारी काय करावी लागली? लागते? जेवण किती वेळ आधी केले तर चालते? ताजा झाला म्हणजे नक्की काय झाले? नीट उस्तवार करुन सांगा हो अज्ञ लोकांना. अर्धवट सांगितल कि कळत नाही मग चुकीचे प्रयोग झाल्यास कोण जबाबदार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड_बोका
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/26/2008 - 22:22 नवीन

>> ... चुकीचे

>> ... चुकीचे प्रयोग झाल्यास कोण जबाबदार? हरकत नाही, इग नोबल पुरस्कार मिळेल. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सुनील Tue, 08/26/2008 - 19:04 नवीन

शंका

मूळ चर्चाविषय प्राण्यांची उभी रहाण्याची दिशा असा असताना, चर्चा झोपण्याबद्दल का होते आहे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 08/26/2008 - 19:08 नवीन

प्राणी उभे

प्राणी उभे राहुन आराम करतात तर माणसे झोपुन म्हणुन (एवढे मनावर नका घेवु हो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/27/2008 - 10:43 नवीन

>> प्राणी

>> प्राणी उभे राहुन आराम करतात तर माणसे झोपुन म्हणुन अनेक प्रकारचे प्राणीपण झोपून आराम करतात. मूळ लेखात पण हरणांच्या झोपण्याचा उल्लेख आहे! नाना तुम्ही माझ्या कमेंट्स मनावर नाही घेत आहात. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 08/27/2008 - 11:05 नवीन

मी आरामा

मी आरामा बद्दल लिहिले होते झोपे बद्दल नाही आराम आणि झोप यात फरक आहे व तो तुम्हाला मान्य असावा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ Tue, 08/26/2008 - 19:08 नवीन

माणूस इलेक्ट्रीकली न्यूट्रल असतो

माणूस इलेक्ट्रीकली न्यूट्रल असतो, हे काही विशिष्ठ परिस्थीतच शक्य असते. मानवी शरीरावर स्टॅटीक इलेक्ट्रीसीटी चार्जेस असतात. साधारणत: कोरड्या हवामानात मानवी शरीरावर ११ ते १८ के व्ही एवढे स्टॅटीक इलेक्ट्रीसीटी चार्जेस असतात. त्वचेच्या प्रकारानुसार काहींच्या शरीरावर ते जास्तही असतात. या चार्जेस मुळेच कॉम्प्युटर प्रोसेसर वगैरे नाजूक सेन्सेटीव्ह चिप्स उडु( जळु) शकतात, अवांतरः आता ४४० व्होल्ट की लडकी वगैरे हे वेगळेच प्रकरण आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/26/2008 - 19:11 नवीन

इलेक्ट्रीकली न्यूट्रल!

पण एकूण मिळून न्यूट्रलच असणार, नाहीतर काय काय मजेशीर गोष्टी होतील याचा विचार करा (आणि विजुभौ, एक काव्य/कथा/पोथी लिहाच). (न्यूट्रल) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अवलिया Tue, 08/26/2008 - 19:13 नवीन

आता ४४०

आता ४४० व्होल्ट की लडकी वगैरे हे वेगळेच प्रकरण आहे ४४० व्होल्ट की लडकी इलेक्ट्रीकली कशी असते? ४४० व्होल्ट की लडकी काही विशिष्ठ परिस्थीतच काय करु शकते? ४४० व्होल्ट की लडकीच्या शरीरावर स्टॅटीक इलेक्ट्रीसीटी चार्जेस असतात का? ४४० व्होल्ट की लडकी कोरड्या हवामानात काय करते? ४४० व्होल्ट की लडकी च्या चार्जेस मुळेच कोणते नाजूक सेन्सेटीव्ह भाग उडु( जळु) शकतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/26/2008 - 19:21 नवीन

४४० व्होल्ट की लडकी

माझ्या मते हे अनुभवाण्याची गोष्ट आहे, सांगण्याची नाही. पण विजुभौ खुलासा देतीलच! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विजुभाऊ Wed, 08/27/2008 - 10:02 नवीन

खुलासा

४४० व्होल्ट की लडकी माझ्या मते हे अनुभवाण्याची गोष्ट आहे, सांगण्याची नाही. पण विजुभौ खुलासा देतीलच! दोन ध्रुवां मधे असणार्‍या पोटेंशीयल डिफ्रन्स ची परीणीती असते बाकी दोन ध्रुवांमधे असणार्‍या विभवांतराला वोल्टेज म्हणतात. हे त्या दोहोत असणार्‍या अंतराच्या व्यस्त प्रमाणात आणि आकर्षणाच्या समप्रमाणात असते. अवांतर : अधुन मधुन इलेक्ट्रीक डिस्चार्ज झाल्यास विद्युत घट पुन्हा चार्ज करुन घेता येतात. विद्युत घटांच्या बाबतीत डिस्चार्ज आणी रीचार्ज या अत्यावश्यक गोष्टी आहेत. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ख
खादाड_बोका Tue, 08/26/2008 - 19:58 नवीन

चुंबन चिकीत्सा ..

नाना, मी तर चुंबन चिकीत्सेचा पंखा आहो. तुम्ही जेव्हाही कराल, तेव्हा चांगल, तोंड धुवाल, म्हणजे समोरचा बेशुध्द होणार नाही. :D चुंबन चिकीत्सा जिंदाबाद....
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 08/26/2008 - 20:02 नवीन

परत तेच

परत तेच नीट सांगा ना राव तोंड बाहेरुन धुवायचे की आतुन? तुम्ही अर्धीच माहिती देता अन मग मी फसलो म्हणजे ? तुम्ही याल का नंतर फसलेली सेटलेमेंट करुन समजुन द्यायला कि जावु दे यावेळेस नाहि जमले पुढिल वेळेस नक्की जमेल म्हणुन? काय राव ? समजुन घ्या माहित नाहि म्हणुन विचारतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड_बोका
ख
खादाड_बोका Tue, 08/26/2008 - 20:11 नवीन

नाना....

जाऊ द्या...लिहीण्यापेक्षा प्रात्यंक्षीक करुन दाखवायला तयार आहो मी. फक्त एक सुंदर ललना लागेल त्याकरीता. तुमची आवड मात्र वेगळी असु शकते... ;) ;) चुंबन चिकीत्सा जिंदाबाद........
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 08/26/2008 - 21:27 नवीन

ही ती कॅलिफोर्निया मधील जागा...

ही ती कॅलिफोर्निया मधील जागा, फोटो पाहण्यासारखे आहेत. पण मला स्वत:ला या जागी (थोडासा तोल जाण्यापलिकडे) फार काही विचित्र अनैसर्गिक जाणवलं नाही, मुळात वास्तू बांधतांनाच चलाखी करून तिरकी बांधली असावी असं वाटलं, पुन्हा गेलो की जास्त लक्ष देऊन पाहीन. ह्या ठिकाणी तिकिटे आणि इतर वस्तू (कार स्टिकर्स, टी शर्टस वगैरे) भरपूर महाग आहेत, तेंव्हा कमाई चांगलीच होत असणार!
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 08/27/2008 - 00:52 नवीन

चुंबकिय क्षेत्र..

आदिती वा इथले कोणीहि तज्ञ, माझ्या माहितीप्रमाणे पुण्याजवळ कानिफनाथाचे एक गुहा कम मंदिर आहे.त्या मंदिरात/गुहेत सरपटतच प्रवेश करावा लागतो. त्या मंदिरात/गुहेत गेल्यावर जर चुंबक टांगला तर तो दक्षिणोत्तर दिशेत स्थिर न राहता दुस-याच कोनात स्थिर राहतो. (फक्त ऐकीव माहिती) बुलढाण्याजवळिल "लोणार" सरोवराच्या आसपास पण असाच प्रकार अनुभवायास येतो, ह्यावर काहि शास्त्रीय कारणीमिमांसा आहे का? अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/27/2008 - 10:22 नवीन

>> (फक्त

>> (फक्त ऐकीव माहिती) बुलढाण्याजवळिल "लोणार" सरोवराच्या आसपास पण असाच प्रकार अनुभवायास येतो, मी हे बघितलेलं आहे. पण ते एका मंदिरात होतं, बहुतेक मारुतीचं आहे. या सगळ्यांचं कारण एकच, प्रचंड चुंबकिय क्षेत्र! तो लोणारचा जो मारुती (मूर्ती) आहे, तोच एक मोठा चुंबक आहे. तुम्ही सांगितलेल्या कानिफनाथाच्या मंदिरातपण कुठेतरी असाच प्रचंड चुंबक असणार. त्यामुळेच टांगलेला चुंबक दुसय्राच कोनात स्थिर रहाणार. लोणारच्या तळ्याचा/खड्ड्याचा उगम प्रचंड अशनी पडल्यामुळे झाला. तेव्हा अतिशय जास्त दाब, तापमान अशा स्थितीमुळे अतिशय बलशाली चुंबक तयार होऊ शकतात; लोणारच्या मारूतीची मूर्ती अशाच दगडातून काढली असणार, त्यामुळे त्याच्या प्रचंड, नैसर्गिक चुंबकीय बलाचं स्पष्टीकरण देता येतं. अवांतर: माझ्या शेवटच्या वर्षाच्या भौतिकशास्त्राच्या प्रयोग परीक्षेत एक्सटर्नल परीक्षक खिशात चुंबक घेऊन फिरत होते. माझा प्रयोग चुंबकीय क्षेत्रांबद्दलच होता. ते शेजारी उभे राहिल्यावर उत्तरं विचित्र यायला लागली. मी त्यांना जरा थोडं लांब उभं रहाण्याची विनंती केली. आणि मग हे माझ्या लक्षात आलं. त्याबद्दल मला त्यांनी मला तोंडी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण दिले. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा