Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भारनियमनाचा भार

द
देवदत्त यांनी
Sat, 08/23/2008 - 13:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7479 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Sat, 08/23/2008 - 14:01 नवीन

सध्या

सध्या माझ्या इथं सकाळी २ आणि संध्याकाळी २ असे मिळुन ४ तासांचे भार नियमन चालु आहे !!!! (त्रस्त ठाणेकर) ~X( मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sat, 08/23/2008 - 14:16 नवीन

अरेच्चा..

आमच्याकडे ३+३ = ६ तास..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विसोबा खेचर Sat, 08/23/2008 - 14:20 नवीन

मग पाऊस

मग पाऊस कमी पडल्याने वीज अपुरी असल्याचे कारण पुढे करून पुन्हा तीनही ठिकाणी भारनियमन सुरू केले. तर गेल्या महिनाभरात जोरदार पाऊस झाल्याने तो तोटा भरून निघाला असे म्हणून भारनियमन बंद केले. आता नवीन कारण आहे की, 'आम्हाला वीज नियमित नाही मिळत म्हणून आम्ही भारनियमन टाळू शकत नाही.' खरं आहे, हाच प्रकार सध्या सुरू आहे! क्षमा करा, परंतु स्पष्टच सांगायचं झालं तर महावितरणचे सध्या जे काही चालू आहे त्याला "भिकारचोटपणा" हा एकच शब्द माझ्या मते लागू आहे. आज पुण्या-ठाण्या-डोंबिवली-कल्याणसारख्या शहरात ५-५ तास वीज नसते. खेडोपाडी १२-१२ तास वीज नसते. साला माणसाने कामधंदा करायचा तरी कसा? सर्व लोकांनी रस्त्यावर उतरून सदर भारनियमाकरता जबाबदार असणार्‍या मंडळींना, मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि इतर बेजबाबदार आणि नियोजनशून्य अधिकारी वर्ग या सर्वांना भररस्त्यात हंटरने बडवणे हा एकच उपाय मला योग्य वाटतो! तसेच मराठी माणसांचे कैवारी असलेले मनसेचे राज ठाकरे यांना एक मुंबई सोडली तर उर्वरीत सर्व महाराष्ट्र भारनियमांच्या झळांनी होरपळत आहे हे दिसत नाही याची अंमळ मौज वाटते! मुंबईतला माणूस तेवढा मराठी, त्यामुळे त्याच्यावर अन्याय होता कामा नये. उर्वरीत महाराष्ट्रात राहणारी माणसे बहुधा मराठी नसावीत त्यामुळे त्यांनी भारनियमाचा त्रास सोसला तरी चालेल, परंतु मुंबईच्या मराठी माणसाला भारनियमाचा त्रास होता कामा नये! राजसाहेब स्वत:देखील मुंबईतच रहात असल्यामुळे मुंबईच्या भारनियमाचा मुद्दा ते बहुधा सोयिस्करपणे उपस्थित करत नसतील! ;) असो, शिवसेनेचा विजय असो, मनसेचा विजय असो आणि हो, फक्त मुंबईतल्याच मराठी माणसाचा विजय असो..! :) आपला, (भारनियमनग्रस्त) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनिष Sun, 08/24/2008 - 12:23 नवीन

तात्यांशी सहमत

तात्यांशी १०१% सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
द
देवदत्त Sun, 08/24/2008 - 14:00 नवीन

सहमत

तात्या तुमच्याशी सहमत. तसेच मागे जेव्हा किरीट सोमैय्या ह्यांनी भांडुप-मुलूंड येथील भारनियमनाविरूद्ध पाउल उचलले होते त्या वादाच्या निकालाच्या वेळी तर ते स्वतः व इतर नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे मग नेमका उपाय कसा योजिला जाईल असेच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अनिरुध्द Mon, 08/25/2008 - 23:22 नवीन

एकदम सहमत

आपण बुवा तात्यांशी एकदम सहमत. लय भारी. मुख्यमंत्री, उर्जामंत्री, केंद्रिय उर्जामंत्री या सा-यांना अक्षरशः भर रस्त्यात नागवं करुन (वाचकांची क्षमा मागून. असेच विचार सगळ्यांच्या मनात असणार) चाबकाचे फटके दिले पाहीजेत. नियोजन शून्य कारभार - अशिक्षीतांचा राजकारणात नको तितका सहभाग, त्यामुळे जनता गेली चुलीत (राजकारण गेलं चुलीत) आम्ही आमच्या पोळ्या भाजून घेणार. जनता भारनियमनाने, उकाड्याने भाजली तरी चालेल. वास्तविक मी जेव्हा साता-याला सज्जनगडावर जातो तेव्हा तिथे दिसणा-या ज्या पवनचक्या आहेत त्या पाहून माझ्या मनात कायम एकच विचार येतो की, या पासून निर्माण होणारी वीज कुठे जाते? कमीत कमी आसपासच्या लोकांनातरी त्याचा फायदा होऊ द्यावा. पण हे राजकारणी ती वीज विकून त्याचे पैसे करतात. यालाच लोकशाहीचं दुर्दैव म्हणतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विनायक प्रभू Sun, 08/24/2008 - 11:29 नवीन

करझाइ

४५० कोटी रुपयात किति विज निर्माण झाली असती बाबा? मुलाने प्रश्न विचारला. आजकाल पटच काढ्तो लेकाचा. एका दाढीने दुसर्या दाढीला पैसे दिले त्याला मी काय करणार बाबा.असो. किति झाली असती. ओवर तो एक्स्पर्टस. विनायक प्रभु.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 08/24/2008 - 11:34 नवीन

सरकारचा केवळ नालायकपणा!

धुंद ते मुंबईत सगळे, वीजपाणी सांडती प्रश्न विझलेल्या दिव्यांचा, फोड रे मटका -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Sun, 08/24/2008 - 17:31 नवीन

उर्वरीत

उर्वरीत महाराष्ट्रात राहणारी बहुधा माणसे नसावीत त्यामुळे त्यांनी भारनियमाचा त्रास सोसला तरी चालेल,पूने मुंबई व पवारांची बारामती हेच आमचे धेय यांचा विकास बाकी भकास
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 08/24/2008 - 19:40 नवीन

दिवस-रात्र एकदिवसीय सामने

उर्वरीत महाराष्ट्रात राहणारी बहुधा माणसे नसावीत उर्वरीत महाराष्ट्र कशाला हो? हे जे दिवस-रात्र एकदिवसीय सामने होतात, किंवा २०-२० जे फक्त रात्रीच होतात भारतात सगळीकडेच होतात की. आणि वीजेचा प्रश्न हा फक्त एका शहराचा/ राज्याचा नाही आहे. मग ह्या खेळांत वीजेचा अपव्यय का होऊ देतात? ती वीज वाचवून कितीतरी भारनियमन वाचविता येईल :)
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 08/24/2008 - 20:02 नवीन

नियोजनाचा अभाव....

नियोजनाचा अभाव यामुळे जनतेला सोसावे लागत आहे. सौर उर्जा , पवन उर्जा याद्वारे ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर वीजेची गरज भागवता येईल. हे एक उदाहरण वाचा : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3386854.cms आर्थिक गुंतवणुक करावी लागेल , पण इंधनाचे वाढते दर पाहता ते आवश्यक ठरेल. वैयक्तिक पातळीवर सी एफ एल ( compact fluorescent lamp) वापरुन आपण वीज वाचवु शकु. ग्रामीण भागातले १२-१४-१६-१८ तास असलेले भारनियमन पाहता ,सर्वत्र केबल वाहिन्यांवर बंदी टाकायलाही काय हरकत आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/24/2008 - 20:37 नवीन

हे जे

हे जे उदाहरण आहे त्यातले आकडे जर का योग्य असतील तर कोण जाईल सरकारी वीज मागायला? अर्थात सगळीकडे वारा नसतो हेही खरं! पण मला त्या बातमीतले आकडे थोडे जास्त exaggerated वाटतात. >>वैयक्तिक पातळीवर सी एफ एल ( compact fluorescent lamp) वापरुन आपण वीज वाचवु शकु. LED (light emitting diodes) त्याहीपेक्षा भारी! चोकचा प्रश्नच नाही, त्यामुळे आणखी वीज वाचेल. (सध्या त्यांची किंमत बरीच जास्त आहे, पण साधारण ५ वर्षांनंतर 'वसुली' सुरू होते.) रस्त्यांवर जर एल.ई.डी. वापरले तर लाईट पल्युशन पण कमी होईल (सगळे ऍस्ट्रॉनॉमर्सपण खूष होतील). डी.सी. उपकरणं वापरूनही वीजेची बचत होऊ शकते, विशेषतः सौर ऊर्जा आणि/किंवा इन्हर्टर वापरले तर! वीजेवरच्या गीझरऐवजी गॅस-गीझर वापरता येईल, सौर-ऊर्जातर उत्तमच! लिफ्ट खूपच जास्त वीज खाते, त्यामुळे जिने चढा/उतरा, आरोग्य सांभाळा आणि वीजही वाचवा. तसंच घरात मायक्रोवेव्ह वापणारे शक्यतो गॅस वापरू शकतात. >> ग्रामीण भागातले १२-१४-१६-१८ तास असलेले भारनियमन पाहता ,सर्वत्र केबल वाहिन्यांवर बंदी टाकायलाही काय हरकत आहे. जरूर! याबरोबर, जाहिरांतींचे बोर्डस, सर्व प्रकारची विद्युत-रोषणाई यांच्यावरही बंदी घालता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
क
कुंदन Mon, 08/25/2008 - 11:33 नवीन

LED

>>LED (light emitting diodes) त्याहीपेक्षा भारी! चोकचा प्रश्नच नाही, त्यामुळे आणखी वीज वाचेल. यमी ताई , थोडी अजुन माहिती द्याल का या बद्दल.... जसे : --कुठे मिळतील चांगल्या प्रतीचे LED ( चायना मेड नकोत )? --साधारणतः किमती किती आहेत अशा प्रकारच्या LED च्या ? -- घरगुती वापरात यांचा वापर कुठे कुठे करता येउ शकतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/25/2008 - 12:51 नवीन

थोड्याश्या विषयांतराबद्दल क्षमस्व!

>> कुठे मिळतील चांगल्या प्रतीचे LED ( चायना मेड नकोत )? माझा एक मित्र डीलर आहे LED चा! (माझ्या माहितीचा हा उगम.) दोन आठवड्यापूर्वीच त्यानी काही असे एलीडीज दाखवले. माझ्या आठवणीप्रमाणे ते सगळे जर्मन बनावटीचे आहेत. >> साधारणतः किमती किती आहेत अशा प्रकारच्या LED च्या ? साधारण हजार-दीड हजाराच्या आसपास ~६ वॉटचे दिवे आहेत. अजून माहिती हवी असेल तर त्याला विचारता येईल. पण सध्या त्यांची किंमत बरीच जास्त आहे. मी कॉलेजात असताना आपले साधे लाल LED १०-१५ रुपयांना होते, हल्ली दीड-दोन रुपयांत येतात. कदाचित तशीच या LEDजचीही किंमत खाली येईल. सी.एफ.एल. साधारण ३-४ वर्ष चालतात, LEDज पाचेक वर्ष चालतातच. LEDजचा सगळ्यात मोठा फायदा असा की ते डी.सी.वर चालतात. त्यामुळे सौर ऊर्जेवर (समजा) बॅटरीज चार्ज केल्या तर त्यावरच हे दिवे चालवता येतात. पुन्हा डी.सी. -> ए.सी. असा बदल करायला लागणार नाही. ६ वॉटचे दिवे वाचन (किंवा तत्सम कार्य) सोडून इतर सगळ्यासाठी साधारण १०x८ फूटच्या खोलीसाठी पुरेसे वाटले. उदा: स्वयंपाकघरात ६ वॉट पुरेसे होतील. एकेक वॉटच्या ६-८ दिव्यांची ओळ कॉरीडोर्स, जिने यांच्यात पुरेशी होईल असं वाटलं. स्पॉटलाईट्स, टेबललँप म्हणून तर एक वॉट पण पुष्कळ आहे. त्यांत निळे, पांढरे आणि पिवळट अशा शेडस् होत्या. त्याचा विचार असा आहे की, सोसायट्यांमधे जिन्यात/कॉरीडॉर्समधे ट्यूब्/सी.एफ.एल. ऐवजी हेच दिवे लावायचे. आमच्या घरासाठीही आम्ही त्याचा विचार करत आहोत. त्या दिव्यांची फिटींग्स कशी असावीत यावर आमची बरीच चर्चाही झाली. >> घरगुती वापरात यांचा वापर कुठे कुठे करता येउ शकतो ? सगळीकडे! अगदी पॉश इंटीरियर जरी असेल तरी त्याला साजेश्या शेड्सचे दिवे मिळतील. आणि त्यांची फिटींग्सपण वेगवेगळ्या आकारात येतात. २ वॉटचे ३ दिवे आणि त्याला वेगवेगळी भिंग लावून त्याचा उजेड छोट्या खोलीततरी नीट पसरला. मोठ्या खोलीत दोन दिवे लावायला लागतील, एवढंच! आमच्या हॉलमधे आम्ही ११ वॉटचा सी.एफ.एल. वापरतो. आम्हाला ६ वॉटचा दिवा पुरेसा वाटला, अर्थात (पुस्तकांचं, कागदांचं) वाचन करायचं असेल तर तेवढ्यासाठी आम्ही नेहेमीची ट्यूब वापरतो. (हायटेक-पर्यावरणवादी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
द
देवदत्त Sun, 08/24/2008 - 20:44 नवीन

२४ तास?

ग्रामीण भागातले १२-१४-१६-१८ तास असलेले भारनियमन पाहता ,सर्वत्र केबल वाहिन्यांवर बंदी टाकायलाही काय हरकत आहे. १२-१८ तास... अहो मला तर असे वाटते, की नंतर तिकडे २४ तास भारनियमन आणि तरीही इतरांना वीज पाहिजे म्हणून ह्यांनीही पैसे भरायचे असे नको व्हायला :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
प
प्रकाश घाटपांडे Sun, 08/24/2008 - 20:55 नवीन

नियमन

तुम्ही भारनियमन करुन वीज वाचवा आम्ही चोरलेली/गळकी वीज त्या अकाउंटला खर्च करु. तुम्ही कणाकणाने बचत करा आम्ही मणामणाने नासाडी करु. खायला काळ आन भुईला "भार" झालेल्यांचे "नियमन" कसे करणार? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/25/2008 - 12:59 नवीन

>> तुम्ही

>> तुम्ही कणाकणाने बचत करा आम्ही मणामणाने नासाडी करु. म्हणून आम्ही काहीच करू नये असं तुमचं मत असेल तर मी तुमच्याशी सहमत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अमोल केळकर Mon, 08/25/2008 - 13:15 नवीन

वीजेची

वीजेची मागणी लक्षात घेता मुंबईकरांनी ही थोडासा भार उचलणे आवश्यक आहे. खालील काही उपाय सरकार नक्किच करु शकते. १) दक्षिण मुंबईत कामाची वेळ सोडुन ( स.९ ते सं ७ ) सकाळी/रात्री १ तास भारनियमन करणे २) दुपारच्या वेळी उपनगरात भारनियमन करणे ३) शनिवार/ रविवार सोडुन रात्री ९ नंतर मॉल्स बंद करणे ४) रस्त्यावरच्या मोठ्या जहिरातीसाठी लागणारे दिवे रात्री १२ नंतर बंद करणे यातुन बरीच वीज वाचली जाईल . ( मुंबईला वीज पुरवठा करणारे टाटा पॉवर/ रिलायन्स उर्वरित महाराष्ट्राला देखील वीज देऊ शकणार नाहीत का?) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 08/25/2008 - 13:32 नवीन

मूंबई चे विजेचे भारनियमन

मूंबई ला विजेचे भारनियमन केले तर खुप आरडाओरड होइल आणि कार्यवाहि करणे भाग पडेल म्हणून ते केले जात नाहि. लांबच्या भागात , खेड्यापाड्यात केले आणि आरडाओरड झाला तरि त्याची त्वरीत दखल घेण्याचि गरज नसते. भारनियमनाचा निर्णय घेणारे पण मूंबई त असल्यामुळे त्याना झळ पोहचु नये हे दुसरे कारण. सरकारी विश्राम गॄहात जर कोणी मंत्रि संत्रि उतरला असेल तर त्या भागात त्या दिवसपुरते भारनियमन रद्द केले जाते हा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा