Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अभिनंदन पुणे आणी पुणेकर्स

ट
टारझन यांनी
Wed, 08/20/2008 - 12:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11957 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

अ
अनिल हटेला Wed, 08/20/2008 - 13:15 नवीन

टा-या

टा-या !!! तुस्सी ग्रेट हो ..!!! आय मीन सरदार नही !!!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/20/2008 - 13:32 नवीन

एक जुना विनोद

एक खूप शिळा विनोदः पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. पण विद्या सध्या सासरी गेली अहे. (सूचना: आम्हाला गावा-गावांतील वादात काडीमात्रही इंण्टेरेस्ट नाही. पुणे ही स्यान होजेची सिस्टर सिटी आहे.) -- वैद्य
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 08/20/2008 - 13:40 नवीन

वैद्य बुवा

वैद्य बुवा !! का परत उकरून काढताये वाद ? तुम्ही कितीही आरडा ओरडा केला काय उपयोग नाय !!! म्हणुन आपला काढा घ्या आणी निवांत पडा बघु !!! पुणे ती विद्या ते सासर आम्ही बघुत ..... तुम्ही तुमचे उद्योग बघा.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 08/20/2008 - 13:45 नवीन

' हा 'वैद्य'

' हा 'वैद्य' म्हणजे मुळचा सर्कीट आहे. सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
स
सखाराम बाइंडर Wed, 08/20/2008 - 15:04 नवीन

येडा झाला

येडा झाला तु गटण्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
अ
अभिज्ञ Wed, 08/20/2008 - 20:56 नवीन

टा-या मस्त रे....

सर्व पुणेकर जनतेचे अभिनंदन. मागच्या धाग्यात पुणेकरांविषयी बरीच गरळ ओकण्यात आली, त्यातल्या काहि प्रतिक्रियांना हा आमचा प्रतिसाद. प्रेषक अमोल केळकर ( रवी, 08/17/2008 - 13:00) . पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात "पुणेकरांनी काय खायचे आणि नाही हा पुणेकरांचा वैयक्तिक प्रश्न आहे." महाराष्ट्रातील जनतेला त्याने काय फ़रक पडतो? प्रेषक अविनाश ओगले ( रवी, 08/17/2008 - 13:08) . एकदा एका पुणेकराच्या घरी गप्पा मारत बसलो असता ते 'बसा, चहा घेऊन येतो.' असे म्हणत आत गेले. मी चहाची वाट पहात बसलो. ते आत चहा पिऊन तोंड पुसत बाहेर आले. निरोप देतांना पुढच्या वेळी जेवायलाच या असे म्हणाले. कमाल आहे.तुम्ही लोकांच्या घरी चहा प्यायला जाता कि कामाकरिता? अहो, हे तर काहीच नाही प्रेषक सर्वसाक्षी ( रवी, 08/17/2008 - 13:09) . पुण्यात वाण्याच्या दुकानाला 'मिनी मार्केट' म्हणतात मोठ्या दुकानाला 'सुपर मार्केट' म्हणतत ४ मजली इमारतीला 'हाईट्स' म्हणतात ७ मजली इमारतीला 'टॉवर' म्हणतात याहून उंच इमारत असेल तर गच्चीवर लाल दिवा लावतात! हा पुणेकरांचा वैयक्तिक प्रश्न आहे.महाराष्ट्रातील जनतेला त्याने काय फ़रक पडतो? पाव शॅम्पल .. प्रेषक अरुण वडुलेकर ( रवी, 08/17/2008 - 15:30) . पाव शॅम्पल किंवा शॅम्पल पाव हा पदार्थ फक्त पुण्यातच मिळतो. पुण्यात पोलिसचौकीला गेट म्हणतात. पुण्यात शाळा हा शब्द कसा वापरला जातो हे पुण्याला जाऊनच अनुभवावे. हा पुणेकरांचा वैयक्तिक प्रश्न आहे.महाराष्ट्रातील जनतेला त्याने काय फ़रक पडतो? लै भारी विषय प्रेषक अनिकेत केदारी ( रवी, 08/17/2008 - 19:25) . १. मी एम आय टी कॉलेजमध्ये नवीन आलो होतो तेव्हाची गोष्ट . पुणेकर मित्र म्हणाला चल चहा पिउन येउ. मी गेलो. साला त्याने नंतर चहाचे सुट्टे ३ रुपये मागुन घेतले. २. पत्ता सांगण्यात अतितत्पर ... ३. आणि त्यांचे गाडी चालवणॅ म्हणजे....शब्दच नाहीत काय पण कौतुक.फ़ुकटच्या सवयी सोडा.एखाद्याने स्वत: पुणॆकराला चहा पाजला असता. चेन ,स्पोक ,ओव्हरॉइल आणि मूळव्याध प्रेषक विजुभाऊ ( सोम, 08/18/2008 - 00:17) . पुणेरी पाट्या हा फक्त पुण्यातच भेटणारा प्रकार परवा स्टेशन जवळ एक पाटी पाहिली सायकल दवाखाना आमचे येथे सायकल रीपेर करुन मिळेल ओव्हरओईल चेन स्पोक दुरुस्त करुन मिळेल "मुळव्याधीवर रामबान औषध मीळेल" सायकलची चेन ,स्पोक ,ओव्हरॉइल आणि मूळव्याध यांची दुरुस्ती एकाच ठिकाणी होणारे जगातले हे एकमेव ठिकाण असेल हा पुणेकरांचा वैयक्तिक प्रश्न आहे.महाराष्ट्रातील जनतेला त्याने काय फ़रक पडतो? हिंदी प्रेषक स्वांतसुखाय ( सोम, 08/18/2008 - 04:24) . ..... काहिच्या काहि प्रतिसाद. आणखी एक.. प्रेषक प्राजु ( सोम, 08/18/2008 - 06:04) . ४) पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात या पॅटिस नामक पदार्थाला फक्त (आणि फक्त) पुण्यातच पॅटिस म्हणतात इतर शहरातून याला व्हेज पफ्फ असे म्हणतात. - (सर्वव्यापी)प्राजु "पुणेकरांनी काय खायचे आणि नाही हा पुणेकरांचा वैयक्तिक प्रश्न आहे." महाराष्ट्रातील जनतेला त्याने काय फ़रक पडतो? उगाच लिहायचे म्हणुन काहिहि लिहायचे,झाले. स्वयंघोषित मोठेपणा प्रेषक मराठी_माणूस ( सोम, 08/18/2008 - 10:34) . विद्येचे माहेघर , सांस्कृतिक राजधानि , चोखंदळ रसिक ईत्यादि. अरे पण हे कोणि ठरवले ? स्वतः च ठरवयाचे , स्वतः च आवर्जुन वारंवार वापरायचे (लिहिताना, बोलताना) आणि असे दाखवायचे कि हे सगळ्याना मान्य आहे . असल्या फ़ालतु टिकांना उत्तरे देण्यास पुणेकर बिलकुल बांधील नाहि. ह्या असल्या जळक्या प्रतिक्रियांना पुणेकर फाट्यावर मारतात. पूर्वेचं ऑक्सफर्ड! ;-) प्रेषक एक षष्ठांश गोरी यमी ( सोम, 08/18/2008 - 15:41) . असूया? आणि पुण्याबद्दल?? ही ही ही! अरे देवा, असूयेला तरी काही चॉईस असावा की नाही? तात्यांनू, लई भारी बोल्लात पहा. मला एक समजत नाही लोकमान्य टिळक पुण्यात राहिले (कोकणात जन्माला आले) यात आजच्या पुणेकरांचं काय कर्त्तृत्व? मग तुम्ही येउन रहा पुण्यात. तुम्हाला कोणी नाहि म्हंटलेय? उगाच काहिहि. काही मुद्दे प्रेषक घाटावरचे भट ( मंगळ, 08/19/2008 - 01:18) . ६) पुणे हे कोणत्याच बाबतीत आदर्श शहर नाही, किंवा माझा ते तसं आहे असा दावाही नाही. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं कौतुक करायलाच हवं. केवळ नावं ठेवण्यासाठी नावं ठेवायची ह्याला काही अर्थ नाही. ह्याला म्हणतात समंजसपणा. आम्हिहि हेच म्हणतो. पुणेकर हे देवालाही न उलगडलेले कोडे आहे. प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 08/19/2008 - 09:07) . रणजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या नावाखाली पी वाय सी ची टीम उतरवणारे पुणेकरच. हा पुणेकरांचा वैयक्तिक प्रश्न आहे.महाराष्ट्रातील जनतेला त्याने काय फ़रक पडतो? टिम सिलेक्षन हे बोर्ड करते.पुणेकर नाहि.आता सगळि प्रतिभा पुण्यात एकटवली असेल तर त्याला पुणेकर तरी काय करणार? अन बोर्ड हि? पुणेकराला पुणे (आणि नाईलाजाने मुम्बै )सोडुन इतरत्र मागास भागातले लोक रहातात असे वाटते. पुणेकर हे पुण्याच्या विकासाच्या बाबतीत जागरुक असतात.बाकिच्या शहरांनीहि ह्याचे अनुकरण करावयास हरकत नाहि. ऍल्युमिनियम ची ओसरी करुन तेथे मिळणार्‍या तीन चमचे चाला अमृततुल्य नाव देणारे आणि खुन्या/ पासोड्या / दगडुशेठ /जिलब्या/ सोन्या /हत्ती / माती अशी फासेपारध्यांच्या नावासारखी देवा ची नावे ठेवणारे पुणेकर हे देवालाही न उलगडलेले कोडे आहे. परत तेच.हा पुणेकरांचा वैयक्तिक प्रश्न आहे.महाराष्ट्रातील जनतेला त्याने काय फ़रक पडतो? सायन,धारावी,बांद्रा,पारले,एल्फ़िंस्टन रोड,.....वगैरे नावं "पारलेकर मुंबईकरांना" कशी काय आठवत नाहि बुवा. अनिल हटेला ... प्रेषक खादाड_बोका ( मंगळ, 08/19/2008 - 22:08) . पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी? त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . हा हा हा. बोकोबा तुमच्या नागपुरच्या संघ कार्यालयाचे संचालन पुण्याच्या मोतीबागेतून होते बर. माझा आवडता विषय प्रेषक ऍडीजोशी ( मंगळ, 08/19/2008 - 11:51) . च्यायला नेमक्या ह्याच टॉपीक च्या वेळी काम वाढल्याने गप्प बसावं लागलं. असो. आता टाकतो तेल. माझा आवडता विषय?????? काय च्यायला एकेकाच्या आवडि असतात. चालु देत. आता टाकतो तेल---------. वा जोशीबुवा. मुंबईकरांचे नाव राखलेत. मी प्रेषक अनामिक ( मंगळ, 08/19/2008 - 21:39) . आणि राहता राहिला पुणे श्रेष्ठ असल्याचा प्रश्न तर ते कुणीही मान्य करेल, फक्त तुमच्या पुणेरी लोकांचा इतर लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोण काय तो बदला! (विदर्भातला) अनामिक. नेक्स्ट.. ऐकदा नागपुर पहा... प्रेषक खादाड_बोका ( मंगळ, 08/19/2008 - 22:49) . पुणेकरांनो, ऐकदा येवुन नागपुर पहा..म्हणजे तुम्हाला वाटेल, "सगळीकडे ऊणे....हेच काय आपले पुणे"? पुणेकर नाहि जात हो कोणाला आमंत्रण द्यायला कि "या पुण्याला" म्हणुन. तरिहि लोक येतातच ना? अरे अजून प्रेषक विसोबा खेचर ( बुध, 08/20/2008 - 07:30) . अरे अजून संपली नाही का पुण्याची अन् पुणेकरांची टकळी? बरं बुवा, आम्ही हारलो, पुणेकर जिंकले! पुणंच सर्वात गिरेट! मग तर झालं!? आपला, (फॉकलंडरोडवरचा मुंबईकर) तात्या. तात्या,हि सरळ सरळ पार्शिलिटि झाली. (पुण्याचा ज्वाज्वल्य अभिमानी.)अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 08/20/2008 - 21:47 नवीन

सडेतोड रे .. जियो रे जियो ....

अभिज्ञ ... सगळे १०० मुद्दे एकाच गुद्द्यात फोडून काढलेस बघ... जबरा ... आता वाद घालायला ना तेल ना ताकत उरलीये कोणाला ... अभिनंदन -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 08/21/2008 - 23:36 नवीन

बापरे!!!

बापरे!!! उत्तरे वाचून एक जाणवले पुणेकरांना फारच बॉ "वैयक्तीक प्रश्न" आहेत! कुणीतरी सोडवा रे त्यांचे प्रश्न ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
ट
टारझन गुरुवार, 08/21/2008 - 23:45 नवीन

आमचे वैयक्तिक प्रश्न आम्हीच सोडवू

बरंका कृषीकेश राजे..... वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी कोणी बाहेरच्यांनाअ बोलावत नाही ... वैयक्तिक म्हंटलं त्यातच सग्ळं आलं नाही का ? असो ... इनो घेणे न घेणे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.. त्यात पुणेकर मदतीस असमर्थ आहेत .. कळावे लोभ नसावा -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 08/21/2008 - 23:46 नवीन

गरज नाही

आमचे प्रश्न सोडवायला आम्ही समर्थ आहोत. तुम्ही स्वतःची काळजी करा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Sat, 08/23/2008 - 09:18 नवीन

वैयक्तिक?

"सार्वजनिक" स्थळावर मांडलेले "वैयक्तिक" प्रश्न होते म्हणून बोललो.. असो.. चालु द्या तुमचं.. मधे पडल्याबद्दल स्वारी बरं का लोक ह. घ्यायच्या(समोर विंकिंग स्मायली टाकून देखील) पलिकडे गेलेले दिसतात :) -('मिसळ'लेला मराठी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
न
निळु Fri, 08/22/2008 - 11:06 नवीन

चेन ,स्पोक

चेन ,स्पोक ,ओव्हरॉइल आणि मूळव्याध प्रेषक विजुभाऊ ( सोम, 08/18/2008 - 00:17) . बरोबरच आहे, पुण्यात सायकल चालवून मूळव्याध होणे अटळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
ए
एक Wed, 08/20/2008 - 21:52 नवीन

अरे या सदशिवपेठ्या ला विसरलास..

.मी तर एकारान्त पण आहे..
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 08/20/2008 - 22:09 नवीन

पुणेकर

आम्हाला पुण्याचा अभिमान आहे. याचा अर्थ आम्ही इतर शहरांचा द्वेष करतो असे नव्हे. पण उगाच पुण्याला नावे ठेवून डिवचू नका. कारण किती झाले तरी पुणेकर ते पुणेकर, कुणाच्या बापाचे ऐकणार नाहीत. -पासोड्या इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 08/20/2008 - 22:35 नवीन

मस्तच!!

अभिज्ञ!! सॉलिड रे भाऊ!! इनूभाव, करेक्ट हे!! :) कोणीही काहीही म्हटले तरी पुणे ग्रेट ही वस्तुस्थिती बदलत नाहीच!! :) जलनेवाले, जला करें!! >:)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 08/20/2008 - 23:15 नवीन

आता पुन्हा?

माझ्या मित्र, मैत्रिणिंनो, मला वाटते आता चिक्कार चर्चा झालिये. वाद हा संपवण्यातही शहाणपण असते. बघा पटतयं का? रेवती
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका Wed, 08/20/2008 - 23:19 नवीन

स्वतःचेच अभिनंदन....स्वतः

स्वतःचेच अभिनंदन....स्वतः... हे फक्त पुणेकरच करु शकतात.. =)) =)) =)) =)) भयंकरच आहे बा हे पुणेकर....
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 08/21/2008 - 00:39 नवीन

बरं बरं

काय बे बोक्या ... वर अ-पुणेकर आणि मधले लोक (म्हणजे कोणतेही मत नसणारे) सगळ्यांचच अभिनंदन केलं आहे ... मराठी वाचनाचे खास क्लास बोक्यांसाठी सुरू केलेत म्हणे मास्तरांनी ? जा तु तिकडे... फायदा होइल -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड_बोका
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/21/2008 - 21:13 नवीन

हाण तिच्यायला..

टारझन भाऊचे दणदणीत उत्तर... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
य
यशोधरा Wed, 08/20/2008 - 23:31 नवीन

हो गं

हो गं रेवती, हे फक्त आपापसात जरा मज्जा :)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 08/20/2008 - 23:40 नवीन

अर्रे लै भारी!

अभिज्ञ, जमलयं तुला! एकदम गोल्ड मेडल रिप्लाय! बोकोबा, स्वतःचेच अभिनंदन....स्वतः... हे फक्त पुणेकरच करु शकतात.. बरोबर आहे.....याचा अर्थ तुम्ही आमचे अभिनंदन करु इच्छित नाही! असो, आम्ही मात्र अ-पुणेकरांचेही अभिनंदन करतो बरं का. स्वगत : मृगनयनीच्या भाषेत - मी आपल्या मताचा आदर करतो (यानंतर एक छद्मी हास्याची स्मायली समजावी)
  • Log in or register to post comments
प
पान्डू हवालदार गुरुवार, 08/21/2008 - 02:53 नवीन

पुणेरि पट्या :) :) :) :) :)

फाक्त पुण्यातच अश्या पाट्या दिसतात :) :) :) :) :) http://www.busybeescorp.com/puneripatya/
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 08/21/2008 - 21:28 नवीन

त्रिवार अभिनंदन !!!

अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! चला पुणेकर्स आता गुमान घरी जावा आणि चैनीत शिक्रण खाऊन आजचा दिवस साजरा करा !!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 08/21/2008 - 23:28 नवीन

फूकटचे सल्ले

चला पुणेकर्स आता गुमान घरी जावा आणि चैनीत शिक्रण खाऊन आजचा दिवस साजरा करा !!! आम्ही आमच्या मर्जीचे मालक आहोत. शिक्रण खाऊ नाहीतर श्रीखंड. तुम्हाला परवडत असेल तर केळं खा, आणि गप घरी जाऊन बसा! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ट
टारझन गुरुवार, 08/21/2008 - 23:48 नवीन

मेलो ...

तुम्हाला परवडत असेल तर केळं खा, आणि गप घरी जाऊन बसा! =)) =)) =)) मेलो.... बाकी केळं मधला ं काढा आणि फक्त केळ खा =)) पुरण्या लागेस्तो... =)) इनूभौ .... जबराट .. पुणेरी ष्टाइल ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
भ
भाग्यश्री Fri, 08/22/2008 - 00:04 नवीन

अरे काय

अरे काय भांडताय.. बास की आता.. माहीती आहे आपण महान.. उगीच शब्दाने शब्द वाढतात झालं..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/22/2008 - 00:13 नवीन

वा! छान

वा! छान धागा आहे! चालू द्या! जय पुणे....! पुण्याचा विजय असो, पुणेकरांचा विजय असो..! (पुणेविषयक कौतुक भरल्या चर्चांची, तोंड दाबून हासत दुरूनच गंमत पाहणारा गेटवे ऑफ इंडियावरचा मुंबईकर) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 08/22/2008 - 00:27 नवीन

धन्यवाद!

पुण्याचा विजय असो, पुणेकरांचा विजय असो..! स्वत:ला मुंबईकर समजणार्‍या ठाणेकरांचाही विजय असो! ;) (प्युअर पुणेकर) टिंग्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
कोलबेर Fri, 08/22/2008 - 00:32 नवीन

विजय असो..

स्वत:ला मुंबईकर समजणार्‍या ठाणेकरांचाही विजय असो! आणि स्वत:ला ब्रिटीश समजणार्‍या पुणेरी टिंग्यांचा देखिल विजय असो ;) कृ.ह.घ्या! -कोलबेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
अ
अभिज्ञ Fri, 08/22/2008 - 00:33 नवीन

टिंग्या,जबरदस्त...

टिंग्या,जबरदस्तच रिप्लाय. बॅकहँड क्रॊसकोर्ट... अभिज्ञ. अवांतर- आंग्लांनी बांधलेल्या "गेट वे" सारख्या निरुपयोगी वास्तु पेक्षा एकेकाळी समस्त देशावर राज्य केलेला आजचा भग्न अवस्थेतला " शनिवारवाडा" कधीहि जास्तच प्रेरणादायक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
इ
इनोबा म्हणे Fri, 08/22/2008 - 00:59 नवीन

शाब्बास रे टिंग्या!

स्वत:ला मुंबईकर समजणार्‍या ठाणेकरांचाही विजय असो! =)) टिंग्या दादा की जयऽऽ अवांतर- आंग्लांनी बांधलेल्या "गेट वे" सारख्या निरुपयोगी वास्तु पेक्षा एकेकाळी समस्त देशावर राज्य केलेला आजचा भग्न अवस्थेतला " शनिवारवाडा" कधीहि जास्तच प्रेरणादायक. अगदी बरोबर बोललास रे अभिज्ञा! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ट
टारझन Fri, 08/22/2008 - 00:47 नवीन

असेच म्हणतो

पुण्याचा विजय असो, पुणेकरांचा विजय असो..! =D> =D> =D> =D> =D> > वा तात्या सुंदर आहे गेट-वे-ऑफ-इंडीया (मनापासून म्हणतो), ताजमहाल सुंदर आहे, चारमिनार सुंदर आहे, पॅरिस लंडन सुदर आहे, मयामी बिच (अति)सुंदर आहे, आख्खी अफ्रिका सुंदर आहे. पण मला माझ्या पुण्याचा सगळ्यात जास्त अभिमान आहे. आणि तो राहील. अवांतर : ठाणेकर मुंबैकर कसे बरं ? ठाणे-मुंबै मर्ज झाली काय ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ख
खादाड_बोका Fri, 08/22/2008 - 02:10 नवीन

अभिज्ञ ...

भर दुपारी काही घेतले तर नाही ना बॉ ? कि तुझ्या चारोळी ऐवढ्या मेंदुस सुज आल्याने अशी विधाने करतोय ?? =)) =)) आज "गेटवे ऑफ इंडीया" पेक्षा "शनीवारवाडा"(पुण्याचा) तुम्हाला छान वाट्तो. उद्या म्हणशील की तुमच्या घरची भांडेवाली ऐश्वर्यापे़क्षा छान दिसते ? का बॉ ? तर म्हणे पुण्याची आहे. लवकर सुधरा ....नाहीतर कठीण आहे बॉ
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 08/22/2008 - 09:36 नवीन

सिरियस्ली खरं बोलला बोका

उद्या म्हणशील की तुमच्या घरची भांडेवाली ऐश्वर्यापे़क्षा छान दिसते ? सहमत आहे ... आणि हा बोका अभिशेक बच्चन पेक्षा चांगला दिसतो -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड_बोका
अ
अनिल हटेला Fri, 08/22/2008 - 07:33 नवीन

तुमच्या

तुमच्या घरची भांडेवाली ऐश्वर्यापे़क्षा छान दिसते ? का बॉ ? तर म्हणे पुण्याची आहे. आरे बोकोबा!! आता सुंदर कुणी का वाटेना ज्याचा त्याचा प्रश्न आहे नाही का ? आणी शनिवारवाडा च आम्हाला जास्त आवडतो ..... काय म्हनण आहे तुमच? ह्यामुळे सुद्धा त्रास होतोये का? अवांतर : मला वाटल होत आता तरी शांत बसतील मंडळी .पण नाय !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/22/2008 - 10:31 नवीन

टार्या (हे

टार्या (हे मुद्दामून असं लिहिलं आहे कारण पुण्याबाहेरच्या कोणाला मराठी येत नाही अशी काही करोलरी असेल तर उगाच ती चुकीची नको ठरायला.), तू माझं अभिनंदन केलं आहेस पण का ते कळलं नाही! त्यापेक्षा नानाला सांग, तो चांगला ठराव लिहितो. काही शिकता नाही आलं तर हसायला तरी येतं. तुझं अभिनंदन म्हणजे एकदमच निराधार वाटतंय. त्यापेक्षा ते काढून टाक. आणि मला या पुणेकर आणि पुण्याच्या अभिनंदनाच्या वादावादीत/भांडणात किंवा जे काय आहे त्या कशातही काडीमात्र रस नाही! मी काय आईनस्टाईनची बहिण का लतादिदींची नात का टी. चंद्रशेखरची सहकारी की मला कशाबद्दल अभिमान असावा आणि मी त्यावरून भांडावं? यमी / अदिती (from the middle of nowhere)
  • Log in or register to post comments
श
शेखर Fri, 08/22/2008 - 10:36 नवीन

करोलरी म्हणजे काय हो

>> पुण्याबाहेरच्या कोणाला मराठी येत नाही अशी काही करोलरी असेल करोलरी म्हणजे काय हो? ;) शेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/22/2008 - 11:56 नवीन

करोलरी

>> करोलरी म्हणजे काय हो? १. धम्याला विचारा, त्याचं गणित चांगलं आहे. (स्वगतः तो मला आता झोडून काढणार आहे, शाब्दिक!) २. त्यानी उत्तर नाही दिलं तर, "गुगल जिंदाबाद"! ;-) ३. ते वाचायचं नसेल तर "वाविप्र" मधे हा प्रश्न टाकता येतोय का पहा. ४. नाहीतर पुणेकरांना विचारा, शब्द इंग्लीश आहे पण म्हणून त्यांना माहित असू नये असं थोडीच आहे. पुणं हे विद्येचं माहेरघर आहे, त्यांना गणित आणि इंग्लीश येत असणारंच (कदाचित जन्मापासूनच!). ५. आणि तुम्हाला येत नाही असं सुचवून तुम्ही बहुदा पुणं आणि पुणेकरांचा अपमान केला असणार (असा माझा तर्कट) तर आता तोफखान्याला सामोरं जायला तयार रहा! :-D (गणित आणि इंग्रजीपण थोडं थोडं येणारी) यमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
ध
धमाल मुलगा Fri, 08/22/2008 - 12:04 नवीन

१. धम्याला

१. धम्याला विचारा, त्याचं गणित चांगलं आहे. शुक शुक..ए यमे, जरा तुझा पेपर दाखव ना, करोलरीचं उत्तर द्यायचंय...तुला येतंय ना? मग सांग ना पटकन. -(कॉपी बहाद्दर) ध मा ल. (स्वगतः तो मला आता झोडून काढणार आहे, शाब्दिक!) (माझं स्वगतः ऊठसुठ जिमच्या पावत्या दाखवत फिरणार्‍या टग्या पैलवानांशी शाब्दिक देखील पंगा घ्यायला मला काय वेड लागलंय? उगाच कुठं हाडं मोडुन घ्यावी आपली? हात दाखवुन अवलक्षण! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
वेलदोडा Fri, 08/22/2008 - 11:48 नवीन

तात्या

तात्या , तुम्ही दोन्ही बाजूने बोलता...कंसातील वाक्ये टाकून वादाला खतपाणी घालत आहात.
  • Log in or register to post comments
L
limbutimbu Sat, 08/23/2008 - 16:24 नवीन

आलो, मी आलो! काय म्हणतय पब्लिक????

एक मात्र खर, पुण सोडुन बारा गाव फिरुन आलो, कुठेही गेल अन मी पुणेकर हे अस म्हणल की झालच समोरच्याच पित्त की कायसे से म्हणतात ना ते खवळत! त्यातुन आम्ही एकारान्त! (नुस्ते [भयं]कर नाही) ते कळ्ळे की मग काय विचारूच नका! :D समोरचा दचकलाच पाहिजेल, दचकला नाही तर "सुशिक्षित अडाणी" समजावा त्याला! कारण पुण्याची महती पुण्याबाहेरच्यान्ना शाळाकॉलीजात नाही शिकवली जात! ती अनुभवान शिकायला लागते! जे अनुभव घेतात, ते (नाके मुरडत का होइना) पुण्यातच स्थाईक होण मोस्टली पसन्द करतात ज्यान्ना अनुभव घेता येत नाहीत, ते सान्गोवान्गीच्या बाजरगप्पा ऐकुन आपला पुण्याबद्दलचा कन्डू शमवुन घेतात! :P पण अस आहे तरी काय पुण्यात विशेष????? वर कोणतरी म्हणलय की पुणे माहेर असलेली विद्या सासरी गेली! आता कोणत्या सासरी गेली यावर सोईस्कर मौन! गावोगावी पसरलेल्या "शिक्षणसम्राटान्नी" शिक्षणाचा बाजार मान्डून "विद्या" देशोधडीला लावली यावर यान्ची आळी मिळी गुपचिळी, अन म्हणे विद्या सासरी गेली! मी तर म्हणतो की भले जगातले सगळे रस्ते रोमला जात अस्तील... पण रोमला जाणारे सगळे रस्ते, पुण्याहून सुरू होतात! उगाच नाही "पुणे तिथे काय उणे" अस (यमक जुळविण्यापुरत) म्हणत! अर्थात ते समजायला तेवढ "हे" पाहिजे ना!!!! गाढवाला गुळाची चव काय बरे असणार?????? आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा