✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पत्रिका

स
सूड यांनी
Mon, 08/06/2012 - 00:06  ·  लेख
लेख
दर रविवारप्रमाणे हाही रविवार आला किंवा 'उजाडला' म्हणा. कारण रविवारी उन्हं वर आल्याशिवाय योगेशराव कधी उठल्याचं आठवत नाही असं त्यांच्या सौ. योगिनीबै वेळ मिळेल तेव्हा आणि येईल त्याला, तिला ऐकवत असत. तर, आजच्या रविवारी काहीतरी मस्त मेनू ठरवावा हा विचार करत योगेशराव हॉलमधल्या सोफ्यावर लोळत पडले होते. खरंतर मेनू काय ठरवावा यापेक्षा तो आपल्या अर्धांगिनीला कसा सांगावा याचा विचार अधिक चालला असावा. कारण रविवारचा असा काही प्लान ऐकला की योगिनीबैंचा ठरलेला ट्रॅक होता, तो वाजायला सुरु व्हायचा. म्हणजे,'मी माझा सैंपाक करुन घेते, मग आणा काय हाडं चघळायला आणायची असतील ती !! रविवार म्हणजे मेलं नुसतं वाढीव काम. त्यात दोन्ही कार्टी बापावर गेलीयेत. हाडं चघळायची म्हटलं की भारी चेव येतो' इत्यादि इत्यादि. आताशा ही वाक्य त्यांच्या शेजार्‍यांनापण पाठ झाली होती. योगेशराव आपला प्लान कसा सांगायचा या विचारात होते आणि फोन वाजायला सुरुवात झाली. योगेशराव ढिम्म पडून राह्यले. आतून त्यांचे चिरंजीव आले. "बाबा फोन वाजतोय" "हो मी ऐकतोय", योगेशराव. ''बाबा फोन उचला, नाहीतर आई वैतागेल", असं बोलून चिरंजीव हॉलमधल्या दुसर्या सोफ्यावर आडवे झाले. "अरे येवढी आईची भीती वाटत असेल तर तू उचल, सालं मेलं कोंबडं आगीला..." येवढं वाक्य पूर्ण करणार तोच योगिनीबै सैंपाकघरातून तणतणत आल्याचं पाह्यलं आणि पुढले शब्द योगेशरावांनी जीभेवरुन पडजीभेवर ढकलले. "बाप-लेक दोघे आहेत इथे पण एकजात कुणी फोन उचलेल तर शपथ!!" असं म्हणत योगिनीबैंनी फोन उचलला आणि त्यांचा तारसप्तकात लागलेला आवाज मध्यसप्तकातल्या सा वर आणून 'हॅलो' म्हणाल्या. "हॅलो, मी पोतदार बोलतोय, सम्याचा बाबा. ओळखलं का ?" पलिकडून आवाज आला. "इश्श्य, असं कसं ओळखणार नाही सुमा काय म्हणत्येय. बरीये ना ?" योगिनीबै. "हो, हो. ती बरीये. पण मी आज जरा तुमच्याकडे येईन म्हणत होतो......सम्याची पत्रिका घेऊन" "या की, त्यात असं सांगायला का हवंय !! कधीपर्यंत येताय ?" "दीड-दोन तासांनी येतो." ठीकै म्हणून योगिनीबैंनी फोन ठेवला आणि आत निघाल्या त्या 'महेलों का राजा मिला के रानी बेटी राज करेंगी' असं गाणं गुणगुणत. योगिनीबैंची मोठी लेक शर्वरी लग्नाची होती आणि तिच्यासाठी हे स्थळ असेल तर नाव ठेवायला जागाच नव्हती. सम्या म्हणजे पोतदारांचा समीर, तो दहावी बारावीच्या मुलांचे क्लासेस घेत असे. दोन तीन ठिकाणी शाखा होत्या क्लासच्या. क्लासेस व्यवस्थित चालतही होते. झालंच तर पोतदारांची दागिन्यांची पेढी होती. सगळं कसं छान !! योगिनीबैंची मुलगीही दिसायला देखणी, शिकलेली. ती आणि तिची एक मैत्रीण असं दोघी मिळून एक ब्युटी पार्लर चालवत होत्या. शरीलाही सम्याने नकार देण्याचा प्रश्न नव्हता. आता पत्रिका घेऊन येत होते म्हणजे मुलगी आवडल्याशिवाय का !! असा विचार चालू असताना योगिनीबैंच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडावा तसं झालं. कारण ते पत्रिका घेऊन येतायेत म्हणजे यांच्या लेकीचीही पत्रिका मागणार की. 'शरीची पत्रिका कुठाय' असं स्वतःशी पुटपुटल्या आणि नंतर हेच वाक्य मोठ्यांदा म्हणाल्या. हे वाक्य ऐकून योगेशराव अंथरुणातून ताडकन उठून बसले. कारण आठवडाभरापूर्वी एक मुलगा सांगून आला होता, त्याची आणि शरीची पत्रिका जुळतेय का बघायला तेच दोन्ही पत्रिका घेऊन बर्व्यांकडे गेले होते. आल्यानंतर पत्रिका कुठे ठेवली हे त्यांना अजिबात आठवत नव्हतं आणि आपली बायको आता घर डोक्यावर घेणार हे त्यांनी ओळखलं नसतं तर नवल !! त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. योगिनीबैंनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. मातापित्यांचा तो सुसंवाद चालू असताना चिंरंजीव गुपचूप उठून स्वतःच्या खोलीत गेले. पुढल्या गोष्टींचा त्यालाही अंदाज आला. आपल्या रविवाराचं मातेरं होऊ नये म्हणून त्याने पळ काढला. इकडे पत्रिका कुठे ठेवली याची शोधाशोध सुरु झाली. कपाट धुंडाळून झालं. फडताळं, धान्याचे डबे, सिलिंडर एंट्री बुकाची पिशवी, सुटकेस, ट्रंका सगळं शोधलं पत्रिका काही केल्या मिळेना. शेवटी योगेशरावांना बाहेर पिटाळलं. जन्मवेळ, जन्मस्थळ सगळं लक्षात होतंच. आता कंप्युटराईज्ड पत्रिका करवून आणा म्हणाल्या. काही झालं तरी हे स्थळ हातचं घालवायचं नव्हतं. पण जिच्यासाठी ही पळापळ चाललीये ती कुठे होती. ती सकाळीच उठून पार्लरला निघून गेली होती. रविवार म्हटल्यावर गर्दी असणार त्यामुळे रोजच्यापेक्षा लवकर निघाली होती घरातून. एका क्लायंटच्या भिवया कोरत होती तोवर तिचा फोन वाजला. दातात दोर्‍याचं एक टोक आणि दोन हातात दोर्‍याची दोन टोकं असं करुन नीट काम चाललं होतं. आता मध्येच डिस्टर्बन्स नको म्हणून तिने दातात दोरा तसाच धरुन मैत्रिणीला म्हणाली, "उर्मे, बघ गं कोणाचा जीव चाल्लाय". उर्मीने कॉल अटेंड केला " हं बोला काकू, अहो शरी आयब्रोज करतेय." "तिला म्हणावं हातातलं काम टाकून घरी निघून ये." योगिनीबै म्हणाल्या. "का, हो ? काही सिरीयस ? ...एक मिनीट." असं फोनवर बोलून उर्मी शरीकडे वळली. "शरे, अगं काकूंचा कॉल आहे. हातातलं काम टाकून ये म्हणतायेत." "तिला म्हणावं, काय झालं? घराला आग लागल्यासारखं का करतेय." हे दातातला दोरा तसाच ठेवून म्हणाली असली तरी फोनवर ऐकायला जाईल एवढं स्पष्ट होतं. हे वाक्य ऐकून योगिनीबैंनी फोन खाडकन आपटला. शरी उर्मीकडे काम सोपवून निघाली. घरी आल्यावर सगळं समजलं. या सगळ्या गोंधळात दोन तास सहज निघून गेले, दारात बाईकचा आवाज आला. योगेशराव पत्रिका बनवून घेऊन आले की काय बघायला योगिनीबै दारात गेल्या. बघतात तर काय, पोतदार आले होते. आता काय करावं हा मोठा प्रश्न त्यांना पडला. चहापाणी, पोहे असं एकेक हळूहळू आवरत तासभर कशीतरी वेळ मारुन नेली. पण योगेशरावांचा काही पत्ता नव्हता. तरी नशीब म्हणजे अजून सम्याच्या बाबांनी पत्रिकेचा विषय काढला नव्हता. आता ते कधीही तो विषय काढतील अशी लक्षणं दिसत होती, तेवढ्यात योगेशराव आले आणि योगिनीबैंचा जीव भांड्यात पडला. योगेशरावांना बघून सम्याच्या बाबांनी अगदी उभं राहून नमस्कार वैगरे केला. ते असं का वागतायेत हे कळण्याच्या आतच म्हणाले," बरं झालं तुमची भेट झाली योगेशराव. एकट्यानं आमंत्रणं देत फिरायचं म्हणजे त्रास होतो." योगेशरावांच्या चेहेर्‍यावर प्रश्नचिन्ह बघून ते म्हणाले." सम्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलोय. लग्नाला यायचं बरं का !!" आता योगिनीबैंचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत

प्रतिक्रिया द्या
11032 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

मस्त लेखनशैली!

संजय क्षीरसागर
Mon, 08/06/2012 - 00:42 नवीन
पण शेवट म्हणजे निव्वळ सूड!
  • Log in or register to post comments

मस्तं कथा.

प्रभाकर पेठकर
Mon, 08/06/2012 - 01:21 नवीन
मस्तं. आवडली कथा. जन्मपत्रिका आणि लग्नपत्रिका. समजुतीचा घोटाळा. पण कथा मस्तं, विनोदी आणि प्रवाही झाली आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

आवडेश .

जेनी...
Mon, 08/06/2012 - 01:30 नवीन
:) आवडेश .
  • Log in or register to post comments

३६ गुण......

जयनीत
Mon, 08/06/2012 - 02:53 नवीन
एकदम मस्त पत्रिका जुळवलीय.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Mon, 08/06/2012 - 05:30 नवीन
छान जमलय.
  • Log in or register to post comments

एकदम मजेशीर

वीणा३
Mon, 08/06/2012 - 06:24 नवीन
एकदम मजेशीर :)
  • Log in or register to post comments

हं! बसवला टेंपोत म्हणतात ते

स्पंदना
Mon, 08/06/2012 - 06:30 नवीन
हं! बसवला टेंपोत म्हणतात ते याच प्रकाराला का? भारी!
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/06/2012 - 06:34 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

ओ बुवा, रेवतीआजै टेंपोत बसवला

५० फक्त
Mon, 08/06/2012 - 08:08 नवीन
ओ बुवा, रेवतीआजै टेंपोत बसवला म्हणजे हेच का असं विचारत आहेत, मयत(रि) पेटित बसवल्याची स्माईली काय टाकताय तुम्ही. असो, बाकी श्री. सुड, सौजन्य संवत्सर असले तरी एवढं सौजन्य अपेक्षित नव्हतं. असो. यो आणि यो, दोघंही आयटित आहेत का रे कामाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवा म्हणजे आत्मा, ते पेटीत

प्रचेतस
Mon, 08/06/2012 - 08:59 नवीन
बुवा म्हणजे आत्मा, ते पेटीत बसणार नाहीत तर काय ट्यांपोत बसणार काय? बाकी कथा आवडली. एकदम खुसखुशित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

ओ ५० ,नीट वाचाकी राव ... रेवा

जेनी...
Mon, 08/06/2012 - 09:01 नवीन
ओ ५० ,नीट वाचाकी राव ... रेवा आज्जी नै ,अपर्णा ने टेंपोची पोश्ट टाकलीय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

छान लिहिलंय

अमित
Mon, 08/06/2012 - 07:08 नवीन
आवडलं
  • Log in or register to post comments

चान चान

स्पा
Mon, 08/06/2012 - 08:03 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments

शेवट भारी ए एकदम!! खदखदुन

शिल्पा ब
Mon, 08/06/2012 - 08:11 नवीन
शेवट भारी ए एकदम!! खदखदुन हसले.
  • Log in or register to post comments

तुझी पत्रिका व्यवस्थित जपून

किसन शिंदे
Mon, 08/06/2012 - 08:15 नवीन
तुझी पत्रिका व्यवस्थित जपून ठेव नाहीतर ऎनवेळी गोंधळ उडायचा. ;)
  • Log in or register to post comments

एकदम मस्त

चित्रगुप्त
Mon, 08/06/2012 - 09:36 नवीन
एकदम मस्त रंगवली आहे कथा. अनपेक्षित शेवट, हे खासच. पोतदार निघून गेल्यावर घरात झडलेले संवाद-सत्र पण थोडे टाकायला हवे, असे वाटले. (मिपावरील नाडी-ज्योतिष इ. वरील धाग्यांमुळे 'पत्रिका' याचा एकच अर्थ डोक्यात बसलेला आहे, याचा छान वापर तुम्ही केलात).
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Mon, 08/06/2012 - 09:38 नवीन
मस्तच :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

छान

sneharani
Mon, 08/06/2012 - 10:26 नवीन
छान जमलीये! :)
  • Log in or register to post comments

आवडेश

सोत्रि
Mon, 08/06/2012 - 10:38 नवीन
आवडेश! पत्रिका एकदम जमून आली आहे. :-) -(पत्रिका बाळगून असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

मस्त

रणजित चितळे
Mon, 08/06/2012 - 10:39 नवीन
पत्रिका पटली. आवडली कथा
  • Log in or register to post comments

मस्त

चावटमेला
Mon, 08/06/2012 - 11:02 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

हात तिच्या...

अमृत
Mon, 08/06/2012 - 11:04 नवीन
असं होय... :-) मजा आली वाचुन... अमृत
  • Log in or register to post comments

बशविला पत्रिकेत !! सूड, मग

सुहास..
Mon, 08/06/2012 - 11:09 नवीन
बशविला पत्रिकेत !! सूड, मग मनावर घेतलेले दिसतय ;)
  • Log in or register to post comments

मस्त

मी_आहे_ना
Mon, 08/06/2012 - 11:14 नवीन
हाहाहाहा, मस्त शेवट.
  • Log in or register to post comments

हा हा हा हा...! खुसखुशीत रे!

प्यारे१
Mon, 08/06/2012 - 11:20 नवीन
हा हा हा हा...! खुसखुशीत रे!
  • Log in or register to post comments

खुसखुशीत

जाई.
Mon, 08/06/2012 - 11:40 नवीन
खुसखुशीत
  • Log in or register to post comments

मस्त "सूड"!!!!!! एक लंबर

बॅटमॅन
Mon, 08/06/2012 - 12:07 नवीन
मस्त "सूड"!!!!!! एक लंबर :)
  • Log in or register to post comments

सुन्दर.. शेवट वाचुन खुप हसले

किचेन
Mon, 08/06/2012 - 14:03 नवीन
सुन्दर.. शेवट वाचुन खुप हसले
  • Log in or register to post comments

मस्तच अभिज्ञ.

अभिज्ञ
Mon, 08/06/2012 - 14:20 नवीन
मस्तच अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

हा हा हा...

स्मिता.
Mon, 08/06/2012 - 14:25 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

मस्त रे सूड . पण कथा मागे

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 08/06/2012 - 14:51 नवीन
मस्त रे सूड . पण कथा मागे कुठेतरी ऐकलेली वाटली ;-)
  • Log in or register to post comments

भीरीच

मन१
Mon, 08/06/2012 - 14:51 नवीन
शेवटचा पंच भारीच...
  • Log in or register to post comments

मोठ्या आशेनं धागा उघडला तर हे

रेवती
Mon, 08/06/2012 - 18:31 नवीन
मोठ्या आशेनं धागा उघडला तर हे मनोरंजक लेखन हाती पडलं. ;)
  • Log in or register to post comments

=))

स्पा
Mon, 08/06/2012 - 18:54 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

योग.

प्रभाकर पेठकर
Tue, 08/07/2012 - 19:14 नवीन
मोठ्या आशेनं धागा उघडला तर हे मनोरंजक लेखन हाती पडलं. तुमच्या पत्रिकेत आज मनोरंजनाचा योग होता म्हणायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हा हा हा मस्त !!

नाना चेंगट
Mon, 08/06/2012 - 18:39 नवीन
हा हा हा मस्त !!
  • Log in or register to post comments

वा.. वा

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 08/06/2012 - 19:05 नवीन
मस्तच...
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Tue, 08/07/2012 - 19:19 नवीन
मस्तच! एकदम खुसखुशीत कथा! सुडक्या सध्या सगळीकडे पत्रिकाच दिसतायत का रे? ;)
  • Log in or register to post comments

कथा मस्त... पत्रिका पत्रिका

गणेशा
Tue, 08/07/2012 - 21:52 नवीन
कथा मस्त... पत्रिका पत्रिका पत्रिका ... विचार काही सोडत नसेल ना आता...
  • Log in or register to post comments

गमतीदार आणि निखळ विनोदी कथा.

नगरीनिरंजन
Wed, 08/08/2012 - 11:19 नवीन
गमतीदार आणि निखळ विनोदी कथा. आवडली!
  • Log in or register to post comments

ही ही ही!!

कवितानागेश
Wed, 08/08/2012 - 11:43 नवीन
ही ही ही!! :D
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Wed, 08/08/2012 - 12:06 नवीन
कथा आवडली :)
  • Log in or register to post comments

मस्तच!

sagarpdy
Wed, 08/08/2012 - 13:17 नवीन
मस्तच! :D
  • Log in or register to post comments

हा हा हा.. मस्त. आवडली.

मेघवेडा
Wed, 08/08/2012 - 13:29 नवीन
हा हा हा.. मस्त. आवडली. :)
  • Log in or register to post comments

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 08/08/2012 - 14:27 नवीन
मस्त मस्त मस्त
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा