मजा वाटली वाचून!
शालांत परीक्षा (आमच्या वेळी ११वी होते.) मार्च १९६८ ला पास झाल्याला मला ह्यावर्षी ४० वर्षे पूर्ण झाली. पण हे असले एकत्र भेटणे वगैरे आमच्या नशिबात नाही बॉ. अधून मधून कुणी तरी एखाद दुसरा भेटतो.चार सुखदु:खाच्या गोष्टी बोलतो आणि आपापल्या वाटेने निघून जातो. पण स्वाती तू सांगितलेली मजा वाचून मनात विचार आला की आम्ही का बरे असे नाही भेटलो?
असो. छान आठवण लिहिलेस.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
लकी आहेस की तुझे सगळे फ्रेंडस आहेत अजुन तिथेच्...माझ्या ग्रुप चं कुण्णीच नाही भारतात :(
प्रत्येकाला बाईंनी केक भरवला. फोटोंचा धमाका उडाला
आम्हालाही पाहू ना थोडे फोटो
अचानक ओंजळीत आलेले हे आनंदक्षण म्हणजे ह्या भारतवारीत मिळालेला मोठ्ठा बोनस!
खरच गं सगळे जण नुसते ओर्कुटवर भेटले तरी खूप वाट्टं मला तर प्रत्यक्ष भेटल्यावर किती छान वाटलं असेल्.....सॉल्लीड
मस्तच लिहिलयस एकदम सहज.....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
स्वाती, सद्ध्या सगळ्यांनाच 'नॉस्टॅल्जिया' झालेला दिसतो आहे. काल परवा १-२ छान कविताही आल्या आहेत मिपा वर.
मला १० वी पास झाल्याला पुढच्या वर्षी २५ (२५!!!!!!) वर्षे पूर्ण होतील. आम्हीही काही मित्र जमवाजमवी करतो आहोत. बघु तुमच्या सारखी धमाल करत येते का?
बिपिन.
वा...मस्तच जमलाय लेख! मित्र-मैत्रिणींना भेटल्याचा आनंद लेखातल्या अगदी ओळी-ओळीतून दिसतोय!
खूप आवडलं तुमचं गेट-टुगेदर..! अशा अनपेक्षीतच गाठी-भेटी जास्त छान होतात का..! :) आम्ही इतक्या वेळा ठरवलं पण कधी जमलंच नाही..बहुधा, २५ वर्षांनीच जमेल! :)
अजून मजा येऊ शकली असती, पण वेळे अभावी तेंव्हा तेथे नव्हतो :-(
तेंव्हा असले लेख लिहून माझ्या सारख्या पामराला त्रागा करण्यास लावल्याबद्दल आभार! ~X(
बाकी आता फोटोची लिंक व्यनिने पाठव. :W
आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद! :-)
वर्णन आवडले.
(काही गुप्तहेर सर्वांच्या वयाच्या नोंदी करण्यात गुंतलेले आहेत, असे दिसते ;-))
(स्वगतः मिसळपावावर चाळिशी च्या आसपास असणार्यांची संख्या लक्षात घेता येथे चष्मे विकण्याचा धंदा सुरू करावा का?)
- सर्किट
काही गुप्तहेर वयांच्या मागावर का असतात हो?
संबोधन कुठले वापरावे, ह्याचे योग्य निर्णय घेणे सोपे पडावेत म्हणून. बाळे/ताई/मावशी/आजी किंवा बाळ/भौ/काका/आजोबा.
मागे एकदा कुणाला तरी काका म्हटल्यावर ते यवढे उखडले, की मी हल्ली ताकही फुंकून पितो.
- सर्किट
गंडलो ना मी!!!
मी त्यांच्या पहिल्या वाक्यांबद्दल बोलत होतो.
मीच त्यांना काका म्हणतो. (आणि ते चिडत नाहीत हे माझं नशीब, नाहीतर काय काय ऐकावं लागलं असतं देव जाणे! )
आम्ही कुण्णाला कुठल्याही चष्म्यातून पहात नाही. :-)
(स्वगतः मिसळपावावर चाळिशी च्या आसपास असणार्यांची संख्या लक्षात घेता येथे चष्मे विकण्याचा धंदा सुरू करावा का?)
ए ए आर पी कडून डिसकाउंटमधे मिळतात वाटते! =))
(स्वगतः मिसळपावावर चाळिशी च्या आसपास असणार्यांची संख्या लक्षात घेता येथे चष्मे विकण्याचा धंदा सुरू करावा का?)
आम्ही तर दहावीपासूनच (हुशार दिसण्यासाठी) चष्मा लावायला सुरूवात केली ... १० वर्षांपूर्वी
:B अदिती
वैद्यबाईंच्या घरी जमून केलेला दंगा.. विकास एम एस करायला अमेरिकेला निघाला तेव्हा त्याला दिलेला निरोप,संजूने केलेली झक्कास पावभाजी,फक्त सगळ्या मुलींनीच एकदा रात्री बाईंकडे जमून पाहिलेला इजाजत,सुजाताचं म्युरल पहायला मुलुंडला गेलेल्या मी आणि वैद्यबाई,मनीषाकडे गोरेगावला केलेली धमाल,आमच्या घराच्या गच्चीत रात्रभर जागवलेली कोजागरी,पावसाळ्यातली माथेरान सहल आणि ऍमब्युलन्स मधून केलेली दिवेआगरची ट्रीप
वा!!! भलताच active दिसतोय तुमचा ग्रुप. ग्रुपमधले काही लोक तरी असे उत्साही हवेत.
http://sucheltas.blogspot.com
स्वाती ताई,
तुम्हाला झालेला आनंद शब्दातुन व्यक्त होतो आहे, खुप छान वाटले असेल तुम्हाला खरंच खुप छान वाटते शाळेतील मित्र मैत्रीणी भेटल्याकी अगदी जवळचे नाते तयार झालेले असते कितीही काळ लोटला तरी त्यातील ओलावा टिकुन राहतो .
ऑर्कुट कृपेमुळे का होईना पण अजूनतरी शाळेतले बरेच जण संपर्कात आहेत.
अवांतरः बाकी वर्गातले बरेच जण सध्या अमेरीकेतच आहेत. कदाचित हा गेट टुगेदर अमेरीकेतच करता येईल. काय म्हणतेस? बराबर का नाही.
पुण्याचे पेशवे
लिखाणातून ओसंडून वाहणारा तुमचा उत्साहच सांगून गेला की तुम्ही किती अन काय काय मजा केलीत!:)
आमच्या १० वी च्या बॅचचे स्नेहसम्मेलन मागल्यावर्षी झाले आमच्या शाळेत. मी जाऊ शकलो नव्हतो पण नंतर मित्रांकडून साद्यंत वृत्तांत कथन करुन घेतला होता त्याची आठवण झाली!
चतुरंग
लिखाणातून ओसंडून वाहणारा तुमचा उत्साहच सांगून गेला की तुम्ही किती अन काय काय मजा केलीत!
असेच म्हणतो..!
स्वाती, इतक्या वर्षांनंतर तुम्ही सगळे एकत्र भेटलात, धमाल-मजा केलीत याचं हे खरंच कौतुकास्पद आहे! :)
आपला,
(दहावी पास - १९८४ - ६७.२८ %) तात्या.
:)
स्वाती ..
खूप भाग्यवान आहात दहावीच्या पंचविशीला इतका दंगा करता आला म्हणून :)
आता दहावीवच्या चाळिशी आणि पन्नाशीलाही असेच काही करता यावे ह्या शुभेच्छा !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
नशिबवान आहात स्वाती ताई. आमच्या नशिबी हे सूख नाही. म्हणजे शाळू सोबती न भेटल्याचं दु:ख नाहिये. त्यांना बरीच वर्ष मिस करून नंतर भेटल्याची मजा अम्हाला नाही. ते सगळे नालाकय जाता येता कायम, कुठेही भेटत असतात :) माझी शाळा घराजवळच असल्याने आजूबाजूला रहाणार्या सगळी डांबरट कर्ट्यांना आई-बाबांनी लक्ष ठेवता यावं म्हणून त्याच शाळेत घातलं होतं. त्यामुळे अजूनही घराबाहेर पडलं की कुणी ना कुणी जोश्या XXXXXX म्हणून हाक मारतच :)
रौप्यमहोत्सवी आठवणींचा सुरेख लेख फारफार आवडला. वैद्यबाई, गोडेबोलेबाई, जोशीबाई आणि गुप्तेबाईंसारख्या शिक्षिका तुम्हाला लाभल्या. तुम्ही फार भाग्यवान आहात.
आमच्या १० वीच्या वर्गाची सुद्धा २५शी साजरी करण्याचा माझा विचार होता.
त्याप्रमाणे मी एक/दोघांना भेटलो होतो, परंतु दैनदिन जीवनातच ते इतके त्रस्त आणि व्यस्त होते की काळाचे बंधन अथवा अप्रुप असते हेच मला त्यांच्या कडे बघुन समजु शकले नाही. ( मी उपजिवेकेसाठी ८०० किमी दुर राहत होतो.)
माझ्या बर्यापैकी वर्गमैत्रिणींच्या मुला/मुलीचे लग्न झाले होते याचेही मला अप्रुप वाटत होते.
मात्र आजही गावाकडे गेल्यावर शाळा बघुन येतो. काळ कसा पुढे जात असतो याची जाणिव होत असतो.
एकाच बाकावर बसणार्या लोकांचे जग इतके बदलु शकते अथवा विभिन्न असु शकते यावर विश्वास बसु शकत नाही.
१० वीची आठवण झाली म्हणजे खेड्यात राहण्याचा बराच तोटा असतो हेही मनाला वाटत असते.
आज बर्यापैकी शिक्षक काळाच्या पडद्याआड गेले आहे, काही वर्गमित्रही दगावले आहे आणि काहीची वाताहत झाली आहे.
तरीपण, कोई लौटादे मुझे बिते हुये दिन असे म्हणावेसे वाटते....
वा वा वा!
लै मजा केलेली दिसते.. :)
वर म्हटल्याप्रमाणे तुमच्या लिखाणातच इतका उत्साह आणि आनंद जाणवतो आहे की बस्स!
बाय द वे, इतक्या वर्षांनंतर प्रत्येकाला ओळखलंत का? ;)
एक विचारू का? तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं का? (नाहि नाहि ते प्रश्न विचारू नकोस) ;) ;)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
पक्याराव्,कलंत्रीजी,ऋषीकेश
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
कोई लौटादे मुझे बिते हुये दिन असे म्हणावेसे वाटते....
अगदी खरं..
बाय द वे, इतक्या वर्षांनंतर प्रत्येकाला ओळखलंत का? एक विचारू का? तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं का?
:) हो.. न ओळखायला काय झालं? सगळे एकमेकांना अगदी ओळखून आहेत,;)
स्वाती
प्रतिक्रिया
वा! छान!
आनंदक्षण
सह्ही गं स्वाती
स्वाती,
२०११
वा...मस्तच
वा!!
अजून मजा आली असती...
एकदम मस्त...
ह्म्म्म्म.....
स्वाती,
संबोधनांसाठी
ह्म्म...
काय म्हणतोस?
आई ग्ग!!!
आम्ही...
(स्वगतः
वैद्यबाईं
मस्तच
वर्णन आवडले.
सुंदर लेखन.
पेशवे
नक्कीच.
स्वातीताई,
लिखाणातून
छान
मस्त लेख!
भाग्यवान
मस्तच
नशिबवान आहात
जोश्या...
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद!
भाग्यवान आहात
सहमत
धन्यवाद.
छान लेख
७९ च्या वर्षाची १० वी ची मुले.
वा!
आभार..