Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

२६ जुलै २००८ ईस्ट-कोस्ट मिपा कट्टा - न्यू जर्सी!

च
चतुरंग यांनी
Tue, 07/29/2008 - 12:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21167 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

च
चतुरंग Tue, 07/29/2008 - 12:44 नवीन

अजूनही भरपूर चित्रे काढलेली आहेत पण जागेअभावी

महत्त्वाची वाटलेलीच इथे डकवली आहेत. मिसळीचा व्हीडियो रेझोल्यूशन जास्त असल्याने फार मोठ्या फाईलसाईजमधे आहे. तो छोटा करुन टाकता आला तर बघतोय. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/29/2008 - 16:25 नवीन

चतुरंग..

छान लिहिला आहेत वृतांत. बाकी फोटो मी माझ्या ओर्कुट प्रोफाइल ला टाकणार आहे. तिथे पहात येतील. तेव्हढा व्हीडीओ टाकाच इथे..मलाही उत्सुकता आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मनिष Tue, 07/29/2008 - 12:48 नवीन

झकास....

मिसळ पाहून तोंडाला पाणी सुटले, धनंजयचे सांदणही झकास...शिवाय पेठकर काकांची पाव-भाजी!!! वा!! चतुरंग - वृत्तांत आवडला. तो मिसळीचा व्हिडीओ टाकता आला तर बघा ना...
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 07/29/2008 - 12:50 नवीन

झकास!

वृत्तांत आवडला. ज्यांच्याबद्दल नेहमी ऐकून असतो ते सर्व सदेह पाहायला मिळाले म्हणूनही जास्त आनंद झाला. त्या गाण्याची ध्वनीफीतही चढवा जमले तर. एकूण कट्टा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 07/29/2008 - 13:22 नवीन

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
आ
आनंदयात्री Tue, 07/29/2008 - 12:55 नवीन

सही रे

जियो मिपाकर्स !!! अटकेपार फडकवला झेंडा !!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 07/29/2008 - 13:02 नवीन

हेच म्हणते

मस्त! मिसळीच्या तर्रीचा रंग अल्टीमेट! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
न
नंदन Wed, 07/30/2008 - 10:56 नवीन

अगदी

असेच म्हणतो. चमचमीत मिसळ काय, पेठकरकाकांची पावभाजी, आम्रखंड आणि सांदण -- क्या बात है! एकंदर धमाल कट्टा झालेला दिसतो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
स
स्वाती दिनेश Tue, 07/29/2008 - 12:55 नवीन

वावा...

धनंजयाचं सांदण मिपा वर आले आणि तेव्हाच म्हटलं की अजून वृतांत कसा नाही आला? तुम्ही सर्वांनी फार मजा केलेली दिसते..आणि खानपान सेवाही जोरदार दिसते आहे.सगळे फोटो मस्त आहेत! छान ,वृतांत आवडला. मिसळीचा व्हिडीओ टाकता आला तर पहा ना..मनिष सारखेच म्हणते,:) स्वाती
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 07/29/2008 - 13:06 नवीन

वाह!!

इस्ट कोस्ट कट्ट्याचे वर्णन आणी इष्टजन यांची भेट घडवल्याबद्दल चतुरंग अनेक धन्यवाद!! मुक्तसुनीत यांनी 'दयाघना' गाण्याची मूळ चीज आणि त्यानंतर गाणे सुरेख म्हटले! चांगलेच छुपे रुस्तुम निघाले. क्या बात है!! गानसुमार!!! धनंजय यांचे सांदण पाकृ त्यातील घटकांमुळे तितकी काही रुचली नव्हती :-) पण हा फोटो पाहून नक्कीच ट्राय केली पाहीजे असे वाटते. जमल्यास हा फोटो त्या पाकृ मधे घालावा. मस्त!! असे नियमीत कट्टे भरु दे व त्याचा वृत्तांत येऊ दे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 07/29/2008 - 13:23 नवीन

यम्म्म्मीईईईए

जबराट .... फोटू पाहून एक बादली लाळ गळालीये ! =P~ सगळ्या अमेरिकनांचे अभिनंदन ... (स्वगत : चल खवीसा , तुही अफ्रिकेत एक कट्टा तर , मेंबर .. मै और मेरी तनहाई :( ) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 07/29/2008 - 23:44 नवीन

असं कशाला? हा घे उपाय!!

चल खवीसा , तुही अफ्रिकेत एक कट्टा तर , मेंबर .. मै और मेरी तनहाई तू ना! तू तुझ्या खोलीत आरसे लावून घे!! फुल साईझ आणि सगळ्या भिंतींवर!!! मग तुलाही एकदम घर भरून पाहुणे आल्यासारखं वाटेल.... मग साजरा कर कट्टा!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Wed, 07/30/2008 - 12:29 नवीन

वा !!!!

आरशे लावणे हा ऊपाय बेष्ट आहे. किमान ३-४ खवीस होतील. हमारे घर मधे हम च पावणे ? ह्यॅ ? नायतर ईथल्याच २-३ डांबरगोळ्या (एका पायावर यायला तयार हायती) घेऊन येतो . जिम मधे आरश्यात पाहुन स्वता:वरच (सोहेल खान सारखा) अत्त्त्त्ती खूष होणारा कुबड्या खवीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
भ
भडकमकर मास्तर Tue, 07/29/2008 - 13:29 नवीन

मस्त

मस्त वृत्तांत.. सर्वांचे फोटो पाहून मजा आली.. बाकीचेही विशेषतः खानपान फोटो अप्रतिम... सर्व पदार्थ माझे अत्यंत आवडते आहेत.... 'दयाघना' गाण्याची मूळ चीज आणि त्यानंतर गाणे सुरेख म्हटले मला मूळ चीजेतले तेवढे "रसूल अल्ला ..." इतकेच येते... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 07/29/2008 - 15:29 नवीन

:)

अमेरीकेतील सर्व मिपा कट्टेकरींचे मनापासून अभिनंदन....! :) सर्व पदार्थांची चित्रे केवळ लाजवाब! आणि हो, आम्हालाही मुक्तरावांचं गाणं अगदी अवश्य ऐकलं पाहिजे एकदा! :) बरं का मुक्तराव, ती बंदिश आम्हीही म्हणतो बर्र का! पूर्वी रागातली आहे.. :) फोटू पाहून सगळ्यांनी अगदी भरपूर धमाल केलेली दिसते असं जाणवतंय! :) असो, मिसळ! महाराष्ट्रातील अनेक चवदार पदार्थांपैकी एक. परंतु सर्वांची राणी शोभावी असा तिचा रुबाब! त्या राणीच्या नावचं हे संकेतस्थळ! फक्त मिपाधर्मे मानणारं, आणि मिपा धर्माचाच प्रचार करणारं! मिपाधर्म वाढवावा, अवघा हलकल्लोळ करावा! संत तात्याबांनी हाच संदेश जगाला देत मिपाधर्म स्थापन केला. आज मिपाधर्म वाढतो आहे, फुलतो आहे! तेच तात्याबांचं स्वप्न होतं! हा वृत्तांत वाचून ते स्वप्न आता सातासमुद्रापारदेखील साकार झाल्याचं कळलं आणि आनंद वाटला. संत तात्याबा आता सुखाने समाधी घेतील! असो, या निमित्ताने, "हिंमत असेल तर स्वत:चं संस्थळ काढून दाखव!" हे ज्यांनी आम्हाला म्हटले होते त्यांनाही आमचा प्रणाम! :) आपले, (सातासमुद्रापार झालेल्या कट्ट्यामुळे आनंदीत झालेले!) संत तात्याबा महाराज, संस्थापक, मिपाधर्म.
  • Log in or register to post comments
श
श्री Tue, 07/29/2008 - 16:10 नवीन

अमेरीकेती

अमेरीकेतील सर्व मिपा कट्टेकरींचे मनापासून अभिनंदन असेच म्हणतो..., पण बाळ यशराज शांत होते कि काहि पराक्रम केले ?
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 07/29/2008 - 17:07 नवीन

:)

पण बाळ यशराज शांत होते कि काहि पराक्रम केले ? हा प्रश्न वरदाला विचारा, तीला घर आवरायला नक्कीच दोन दिवस लागले असतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री
व
विकास Tue, 07/29/2008 - 16:38 नवीन

मस्त!

चतुरंग राव, व्रुत्तांत आणि वृत्तांतामागील चेहरे येथे मांडल्याबद्दल आभार! आणि व्यक्तिगत फ्रस्ट्रेशनही! :''( आम्ही काय मिस केले ते त्यामुळे कळले... अर्थात पर्याय नव्हता म्हणून येऊ शकलो नाही.
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 07/29/2008 - 17:11 नवीन

गाणी चुकली ना आमची

अरे म्हणजे आम्ही बीचवर न गेल्याने मुकत्सुनीत आणि लंबुटांग यांनी गायलेली गाणी ऐकायला नाही मिळाली :(
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 07/29/2008 - 17:48 नवीन

अभिन॑दन

न्यू जर्सी मिपा कट्टेवाल्या॑चे हार्दिक अभिन॑दन! तात्या॑चेही अभिन॑दन!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/29/2008 - 18:31 नवीन

वृत्तांत आवडला !!!

पदार्थांची चित्रे, वृत्तांत, आणि मिपाकर मित्रमंडळी, सबकुछ लाजवाब !!! अमेरीकेतील सर्व मिपा कट्टेकरींचे मनापासून अभिनंदन !!! -दिलीप बिरुटे (आनंदीत)
  • Log in or register to post comments
र
राधा Tue, 07/29/2008 - 19:17 नवीन

मस्त.............

व्रुतांत वाचुन छान वाटला......... यशराज(शितल चा मुलगा) माझा दोस्त आहे......... तेव्हा त्याला काही बोलायच नाही हा , नाही तर पाहुन घेइन.....;)
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 07/29/2008 - 19:20 नवीन

मिसळीच्या

मिसळीच्या कटापासुन ते केळीच्या सांदण पर्यंत सगळी प्रकाशचित्रे पाहुन पोटात भुकेचा डोंब उसळला की. :) चतुरंग यानी वृतांत छान लिहिला असला तरी आम्ही त्यांच्या कोट्या मिस केल्या बर. :) सर्व कट्टेकरींचे मनापासुन अभिनंदन. वरदा आणि तिच्या यजमानाना पेशल धन्यवाद. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 07/29/2008 - 19:45 नवीन

कृतज्ञता

चतुरंगांनी आपल्या खुसखुशीत शैलीत लिहिलेला वृत्तांत आवडला. त्यांनी सर्व डीटेल्स उत्तम मांडलेत. या कट्ट्याच्या आयोजनाचे सर्व श्रेय महिलावृंदाकडे जाते. प्राजु, शीतल, वरदा आणि सौ. चतुरंग यांनी खरोखरच प्रचंड कष्ट केले. आपण केलेले पदार्थ उत्तम असावेत, त्याचा आस्वाद सर्वाना घेता यावा म्हणून घेतलेली मेहनत, आणि इतके उत्तमोत्तम पदार्थ खाल्ल्यानंतर मिळालेल्या दादेनंतरचे त्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य...वरदा आणि समीर यांचे सुंदर , प्रशस्त घर , त्या घरात आम्ही केलेला गप्पा- हास्यविनोदाचा कल्लोळ , छोट्या पोरांचे बागडणे..आनंदाचे कारंजे थुईथुई नाचत होते ! अनामिक आणि धनंजय यांनीसुद्धा वेळात वेळ काढून उत्कृष्ट पाककृती केल्या. अनामिक स्वतः आला नव्हता , पण त्याने आवर्जून आम्रखंड पाठवला होता ! अनामिकाकरता सुचलेल्या ओळी : अनामिका , आम्ही हादडला तुझा आम्रखंड, थेंब तिथे ना कुणी सांडला, दुवा घे उदंड ! :-) आमच्या लहानपणी गणेशोत्सवात सारे कुटुंब एकत्र जमायचे. आजीच्या भवती गोकुळ गोळा व्हायचे. ८७ वर्षे जगलेली आजी शेवटी पणजीसुद्धा झाली होती. अशा प्रसंगी आमच्या एका काकूने उद्गार काढले होते "एकट्या माईंनी पहा केव्हढा मोठा पसारा निर्माण केलाय ! " तात्यांना फोन केला , त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतर मला हा खूप जुना विनोद आठवला !:-) पुण्याचे पेशवे आणि लंबूटांग बस करून मजल-दरमजल करत आवर्जून आले. पेशव्यांची शरीरयष्टी एकदम पहिल्या बाजीरावासारखी आहे ....आवाजात मार खाल्ला रावांनी थोडासा !:-) (ह. घ्या. !) धनंजय बरोबर जातायेता मिळून ८ तास मी गाडीत होतो. (धनंजय आमचा क्याप्टीव आड्यन्स ! =)) ) मला एका मराठी पुस्तकाची आठवण येते : "ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी" दुर्गा भागवतांसारख्या विदुषीबरोबर मारलेल्या गप्पांचा वृत्तांत असे त्याचे स्वरूप. मला वाटते मी एखादी २०-२५ पानांची पुस्तिका नक्की काढू शकेन ! "ऐसपैस गप्पा : धनंजयशी !" एक आनंदात , मित्रांच्या सहवासात घालवलेला सुंदर दिवस.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 07/30/2008 - 00:20 नवीन

नक्की काढ पुस्तक सुनीतराव.

नक्की काढ पुस्तक सुनीतराव.'धनंजय'चे विचार वाचायला नक्कीच आवडेल. कधी कधी मि.पा.वरील त्यांचे प्रतिसाद वाचून ते तर्कट वाटले होते मला पण प्रत्यक्षात मात्र हा माणूस अत्यंत समंजस आणि मृदुभाषी आहे(आणि निष्णात बल्लवाचार्यही ते त्याच्या सांदणावरून कळलेच असेल सगळ्याना). त्यामुळे माझा अंदाज फुल्टू खोटा ठरला. :) त्यांच्या ज्ञानाबद्दल असलेला आदर त्यांच्या प्रत्यक्षभेटीमुळे दुणावला. सुनीतरावदेखील हरहुन्नरी आहेतच. त्यांचे गाणे ऐकून भरुन पावलो. :) सुनीतराव पुढच्यावेळेला जमवा एखादी मैफल. (चिरका आवाज असणारा :) ) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ख
खडूस Tue, 07/29/2008 - 19:59 नवीन

छान वाटले

छान वाटले वाचून. शिकागो साईडला नाही का कुणीच ?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/29/2008 - 20:22 नवीन

भेटण्या आधी..

मी बांधलेले प्रत्येकाचे अंदाज... वरदा : जसा अंदाज बंधला होता तशीच भेटली शितल : कोल्हापूरच पाणी आहे.. तेव्हा वेगळा अंदाज बांधायची गरज नव्हती.. मुक्तसुनित : अंदाज चुकला.. ते तर एकदम बोलके आणि रसिक आहेत. अंदाज होता की, चष्मा लावलेले, आणि चष्म्याच्या काचाच्या वरून पहात बोलणारे असतिल.. हे तर एकदम रसिक आहेत आणि खूप बोलके आहेत. चतुरंग : यांची विडंबने वाचून आणि लेखनातली खोली पाहून वाटले होते की, आपण शिडशिडीत बांध्याचे, थोडेसे पोक्त व्यक्तिमत्व असाल.. चूक. धनंजय : आपल्या बद्दलचा अंदाज होता की, आपण भारदस्त (शब्दशः)व्यक्तीमत्व असाल.... चुकला. पेशवा : याच्याबद्दल बांधलेला अंदाज एकदम बरोबर आला. लंबूटांग : याच्याबद्दलही अंदाज बरोबर होता. - प्राजु - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 07/29/2008 - 21:17 नवीन

भारदस्त

अगं काय तायडे ? धनंजयरावांचा खरडवहीतला (उपक्रमावर बहुदा :? ) हातवारे करणारा भारदस्त काटकुळा फोटो पाहिल नाहीस का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
च
चतुरंग Tue, 07/29/2008 - 21:23 नवीन

प्राजू,

चतुरंग : यांची विडंबने वाचून आणि लेखनातली खोली पाहून वाटले होते की, आपण शिडशिडीत बांध्याचे, थोडेसे पोक्त व्यक्तिमत्व असाल.. चूक. (स्वगत - झालं रंगा, आला सगळ्यांना तुझ्या लेखनातल्या खोलीचा आणि बांध्याच्या जाडीचा अंदाज? तरी सांगत होतो जरा वजन कमी ठेव आणि फार पुढे पुढे करु नकोस तिथे पण नाही जमायचं तुला. :T ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/30/2008 - 02:21 नवीन

अर्थातच

प्रतिभा आणि प्रतिमा ह्यांत गल्लत झाली होती असे दिसते ;-) - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ट
टिउ Tue, 07/29/2008 - 20:45 नवीन

:(

अरेरे! २६ जुलैला मी जर्सीतच होतो...एडिसन जवळ! तुम्हा सर्वानी जाम धमाल केलेली दिसतेय... पुढच्या वेळी मिसळ आणि पावभाजी चापायला अजुन एक जण असणार आहे... :)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 07/29/2008 - 21:34 नवीन

मिसळीला मिसलो !!

नेमका त्या वीकांतला कँपिंगला गेलो होतो त्यामुळे कट्टा मिसलो !! मिसळ आणि पाव - भाजीचे फोटो पाहूनच भूक लागलीय !! -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 07/29/2008 - 21:44 नवीन

फोटोनी पुन्हा आठवणी

खादाडी केलेली आठवते खरी, पण फोटो बघून पुन्हा भूक लागली. मनसोक्त गप्पा मारल्या आणि पुन्हापुन्हा घेऊनघेऊन खाल्ले. डब्यात भरून घरी आणलेली दहीभात आणि पावभाजी, गप्पांची आठवण काढत-काढत तशीच चविष्ट लागली. (निस्त्याची आठवण करत खाल्लेल्या नीरफणसाच्या कापासारखे!) पण या चटक लागणार्‍या गोष्टी एकदा अनुभवल्या म्हणून काही कायमची तृप्ती होत नाही...
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/29/2008 - 22:01 नवीन

सहीच धमाल

सहीच धमाल केलेली दिसते सगळ्यांनी!! वृत्तांत मस्त, फोटोही मस्त!!
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 07/29/2008 - 22:14 नवीन

वा!

:B रंगाशेठ, कुठलाही फाफट पसारा न करता एकदम मुद्देसुद वृतांत आवडला :B ..फोटो बघून जळजळ झाली... X( आणि त्या मिसळिच्या चलचित्रात मध्ये किती तो दंगा ~X( .. एक प्लेट मिसळ आणि १० प्लेटचा दंगा. . असो..छोट्या चमच्याने जास्त फरसाण घ्यायची टिप आवडली.. ;;) त्या मिसळिच चलचित्र केले तसा ज्यांनी ज्यांनी गळा काढला होता त्यांचापण चलचित्र बनवायच नाहीस का.. आता शिक्षा म्हणून त्या सगळ्याना परत गळा काधायला लाव आणि त्याचे चलचित्र इथे द्या.. बाकी प्राजूताईं सारखेच मी पण अंदाज बांधले होते.. ते सगळेच्या सगळे चुकले.. :( असो.. अमेरिकेतल्या पहिल्या यशस्वी कट्ट्या बद्दल सर्व आयोजकांचे आणि भाग घेतलेल्या सर्व मिपाकरांचे अभिनंदन.. वृतांत आणि फोटो बद्दल धन्यवाद.. (वाचक)केशवसुमार स्वगत :थांब पुढच्या महिन्यात ३ दिवसाचा इंटरनॅशनल कट्टा होणार आहे जर्मनीत.. तेव्हा मी गळा काढतो.. तुला ज्ञानेश्वाराच्या रेड्याचा आवाज ऐकायचा होतना? :W
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 07/29/2008 - 23:48 नवीन

वाह वाह ... आम्ही पण येणार !

केसु अगदी १६ आण्याचे बोललास ... >>थांब पुढच्या महिन्यात ३ दिवसाचा इंटरनॅशनल कट्टा होणार आहे जर्मनीत.. तेव्हा मी गळा काढतो.. तुला ज्ञानेश्वाराच्या रेड्याचा आवाज ऐकायचा होतना? मी पण साधारणता "सप्टेंबरच्या शेवटाला" तिकडे हजरी लावीन ... तेवढी कॄपया वाट बघा ... आमचे हे येणे नक्की आहे , बाकी डिटेल्स लवकरच कळवु ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
क
केशवसुमार Tue, 07/29/2008 - 23:51 नवीन

या या..

तेव्हा परत एक कट्टा करू.. काळजी नको डॉनशेठ. (कट्टेबाज)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
पिवळा डांबिस Tue, 07/29/2008 - 23:39 नवीन

कांग्राचुलेशन, रंगाभाऊ!

कांग्राचुलेशन!! तुमचंच नाही तर सहभागी झालेल्या सगळ्याच मिपाकरांच!! तात्याचं नांव काढलंत हो!!:) "एकट्या माईंनी पहा केव्हढा मोठा पसारा निर्माण केलाय ! " खरंच, बघा त्या तात्याने केऽऽऽव्हढा मोऽऽठ्ठा पसारा घालून ठेवलाय!!!:) आणि त्या मराठी साहित्यसंमेलनवाल्यांनाही म्हणावं की बघा मेल्यांनो, मराठी माणसं (मराठी असूनही!!) कसा गुण्यागोविंदाने आणि उत्साहात समारोह साजरा करतात ते!! शिका म्हणावं मिपाकरांकडून काहीतरी!!!:) जवळजवळ सगळेच एकमेकांना प्रथम भेटत होते त्यामुळे थोडी औपचारिकता होती ती पाचेक मिनिटात संपली! शाब्बास! इसकू बोलता है मिपाकर!!! चतुरंग यांनी पेठकरकाकांची पावभाजी आणतो असे कबूल केले! पेठकरकाका, रॉयल्टी वसूल करा!! सोडू नकात!!:) पण बाळ यशराज शांत होते कि काहि पराक्रम केले ? हा प्रश्न वरदाला विचारा, तीला घर आवरायला नक्कीच दोन दिवस लागले असतील. असू दे! डांबिसकाकू म्हणत्येय की, "वरदेलाही आता घर चाईल्डप्रूफ करायची सवय व्हायला हवी!!" (वरदा, हे काकू म्हणत्येय ते जसंच्या तसं लिहितोय हां! मी काही म्हणत नाहिये!!) :) (तात्या आणि पिडाकाकांची इथे फार आठवण झाली! ) चला, कशाने का होईना, पण आमची आठवण आली ना! आम्ही भरून पावलो!!! (स्वगतः तिच्यायला, आम्रखंडाबरोबर "ते" पेय घ्यायला आम्हाला काय पिसाळलेला कुत्रा चावला नाहीये!!!!) चतुरंग याच्या पत्नी व मुलगा हे नॉन मिपाकर हजर होते. का रे रंगोबा, बाकी सर्व हजर असलेले समस्त मिपाकर आणि नॉन-मिपाकर फोटोत दिसतात आणि तुझी फॅमिली मात्र पद्धतशीररित्या बरी वगळलीस रे!! ते काही चालणार नाही!! बघितलंत इतर मिपाकरांनो, ह्या चतुरंगाने तुम्हाला कसं गंडवलं ते!!!:) असो. मस्त वृत्तांत आणि मस्त फोटो!! आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद!! अरे वेस्टकोस्टवाल्यांनो, बघा, बघा जरा!!!! ती रॉकी माऊंटनपल्याडली घाटावरची मंडळी कट्टे भरवून र्‍हायली!! आम्ही बोलवून बोलवून थकलो तुम्हाला!! आतातरी काही मनावर घ्या!!! :)) आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 07/29/2008 - 23:46 नवीन

हा हा हा..

तिच्यायला, आम्रखंडाबरोबर "ते" पेय घ्यायला आम्हाला काय पिसाळलेला कुत्रा चावला नाहीये!!!! डांबिसशेठ अगदी मनातून आलयं (हहपोदु)केशवसुमार स्वगतः कुत्र्याला काही चॉईस आहे की नाही ..;) पिसाळलेला असला तरी तुम्हाला नाही चावणार... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 07/30/2008 - 00:08 नवीन

आयला हे बरंय!

स्वगतः कुत्र्याला काही चॉईस आहे की नाही .. पिसाळलेला असला तरी तुम्हाला नाही चावणार... तुम्हीच जोक मारताय आणि तुम्हीच खदखदून हसताय!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
च
चतुरंग Wed, 07/30/2008 - 00:26 नवीन

ह ह पु वा!!!

तिच्यायला, आम्रखंडाबरोबर "ते" पेय घ्यायला आम्हाला काय पिसाळलेला कुत्रा चावला नाहीये!!!! हे म्हणजे एकदम सात्विक संताप म्हणतात ना तसं आलंय! स्वगतः कुत्र्याला काही चॉईस आहे की नाही .. पिसाळलेला असला तरी तुम्हाला नाही चावणार... आणि केसुशेठचं स्वगत वाचून माझी गत येड्यासारखी झाली! मला नीट हसताही येईना एवढे जोरात उसळी मारुन हसू आले!! =)) =)) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
च
चतुरंग Wed, 07/30/2008 - 00:20 नवीन

पिडाकाका,

अरे वेस्टकोस्टवाल्यांनो, बघा, बघा जरा!!!! ती रॉकी माऊंटनपल्याडली घाटावरची मंडळी कट्टे भरवून र्‍हायली!! आम्ही बोलवून बोलवून थकलो तुम्हाला!! आतातरी काही मनावर घ्या!!! हे बाकी खरं आहे हां! पहिला मान आम्ही पटकावला हे नि:संशय! (स्वगत - 'बोलवून बोलवून थकले आणि ग्लेनफिडिचला लागले!' अशी नवीन म्हण होईल का? :P ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 07/30/2008 - 00:21 नवीन

वॉव!

आत्ताच मिसळीचा व्हिडिओ बघितला.....ग्रेट! मिपा कट्टा सातासमुद्रापार नेल्याबद्दल सर्व इस्ट कोस्ट मिपाकरांचे अभिनंदन! चतुरंगजी, कट्ट्याचा वृत्तांत अन् छायाचित्रे एकदम सही. पावभाजी, मिसळ, आम्रखंड अन् सांदण.....खादाडी जोरदार झालेली दिसतेय :) बाकी मीदेखील प्रत्येकाबद्दल बांधलेले अंदाच चुकले.....अगदी नॉर्थ-साऊथ पोल प्रमाणे :) आणि प्राजुताई, कोल्हापुरी मिसळ बनवताना आवाज पुणेरी का काढला? असो, पुनश्च सर्वांचे अभिनंदन! - ब्रिटिश टिंगी (स्वगत : युकेत परत एकदा कट्टा बनवण्याची वेळ आलीये. केसु, ऐकताय ना? मागच्या वेळेसारखी कलटी मारु नका आता.)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 07/30/2008 - 00:36 नवीन

आणि हो,

लंबुटांग ७ ते ८ फुट उंचीचा दिसतोय.....हायहील्स घातले होते काय त्याने? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
प
प्राजु Wed, 07/30/2008 - 02:54 नवीन

आणि

आणि प्राजुताई, कोल्हापुरी मिसळ बनवताना आवाज पुणेरी का काढला? काय करणार, पुणे आकाशवाणीवर काही काळ काम केल्याचा हा परिणाम आहे.. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
च
चित्तरंजन भट Wed, 07/30/2008 - 02:09 नवीन

सुपरहिट

वाव्वा. वृत्तान्त, कट्‍टा, विडिओ अगदी सुपरहिट. पुढच्या कट्ट्यासाठी शुभेच्छा. सांदण करून बघावेच लागेल. उत्तम दिसते आहे.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 07/30/2008 - 04:09 नवीन

असेच..

...म्हणतो! सांदण करून बघावेच लागेल. उत्तम दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्तरंजन भट
च
चित्रा Wed, 07/30/2008 - 05:24 नवीन

छान वृत्तांत आणि फोटो

सांदणे खूपच मस्त! आणि सर्वांचे फोटो पाहून प्रसन्न वाटले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सखी Wed, 07/30/2008 - 08:15 नवीन

असेच म्हणते

सांदणे व मिसळ खूपच मस्त! आणि सर्वांचे फोटो पाहून प्रसन्न वाटले! - प्राजु व्हिडीओ पण छान आला आहे गं, छान वाटले सर्वांना हसतखेळत बघताना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
ब
बबलु Wed, 07/30/2008 - 03:14 नवीन

आई शप्पथ !!! सही रे सही.

पावभाजी, मिसळ, आम्रखंड, सांदण --- मजा आहे लेको ! अरे वेस्टकोस्टवाल्यांनो, बघा, बघा जरा!!!! वेस्टकोस्टला आता कट्टा करायलाच पाहीजे राव. मी पुढाकार घ्यायला तयार आहे. अस्मादिकांचे वास्तव्य सांता क्लारा ला असते (दक्षीण खाडी ..South Bay). वासोना पार्क (Los Gatos) ला जाऊ. मिसळ-पाव खाऊ. ऊंडारू. खेळू. काय म्हणता ?? कोण कोण आहे तयार .... वेस्टकोस्टवाले ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा