✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रस्ता

स — सांजसंध्या, Fri, 03/02/2012 - 08:42
रस्ता जन्मापासून खातो आहे , आजवरी खस्ता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता कधी देखणा.. प्रशस्त होता, सांगते हो कोणी दोन कडेला उभारली ही टप-यांची लेणी ऐश्वर्याच्या गालाहूनी मऊ म्हणे होता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता टप-यांपुढे उभी राहते, रिक्षांची सेना बसथांब्यावर कुत्रे बसते, उतारूंची दैना उरली आणिक, जागा म्हणूनी, पथा-याही आल्या सोय झाली, गं भाजीची, बायका म्हणाल्या शिस्त बिस्त, कधी इथे, कुणी पाळीत होता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता उरल्या सुरल्या.. जागेमधूनी, लागती शर्यती पळा पळा हो, कोण पुढे ते, स्वार कसे धावती पल्याड जाण्या, सज्ज होते, पिकलेले एक पान खबरदार, जर जाल पुढे तर, चिरडतील हो छान मातीचा होता, . तेव्हा हा सम़ंजस होता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता तिथेच भरते रस्त्याकडेला, चिमण्यांची शाळा भेदरलेल्या नजरा, आणिक वाहनांच्या माळा भयाण वेगे चाकरमानी, उडवितात गाड्या वेगापुढती विवेक बुडे जो , आवरा हो नाड्या वाहनांपेक्षा जीवन जेव्हां स्वस्त होत जाता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता संध्या 01 Feb 2010

प्रतिक्रिया द्या
2771 वाचन

💬 प्रतिसाद (20)

मिपावर स्वागत आहे....

लीलाधर
Fri, 03/02/2012 - 09:00 नवीन
कविता फारच छान झाली आहे.. पुढील लेखनास शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

ही कविता पाहून मला तुमच्याच

प्रचेतस
Fri, 03/02/2012 - 09:17 नवीन
ही कविता पाहून मला तुमच्याच फळा ह्या कवितेची आठवण झाली. यमकाला यमक जुळले जिथे, कवितेची नवी जिलबी पडली तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

चतुर चाणक्य, आभार

सांजसंध्या
Fri, 03/02/2012 - 09:27 नवीन
चतुर चाणक्य, आभार आपले. वल्ली, गैरसमजास औषध नोहे. फळा ही कविता माझी नाही . मायबोली आणि ऑर्कुटवर याच नावाने आहे पहा ही कविता.
  • Log in or register to post comments

अहो ताई, मी कुठे म्हणालोय फळा

प्रचेतस
Fri, 03/02/2012 - 09:31 नवीन
अहो ताई, मी कुठे म्हणालोय फळा ही कविता तुमची आहे? मी चतुरचाणक्यांना तो प्रतिसाद दिलाय. तुम्हास नोहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

हो हो.. ते आलेलं लक्षात. (

सांजसंध्या
Fri, 03/02/2012 - 09:35 नवीन
हो हो.. ते आलेलं लक्षात. ( स्मायली कल्पावी )
  • Log in or register to post comments

पर्वापासुन खातो आहे गरमगरम

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/02/2012 - 09:51 नवीन
पर्वापासुन खातो आहे गरमगरम पास्ता वल्ली...या...आजची नविन डिश करु दोघे नाश्ता कडक भाजणी-खमंग मसाला,वरती हे लोणी दोन ग्लासात भरु पिण्याला गोव्याची फेणी पर्वाच्या त्या पावाहुनी हा मऊ म्हणे होता वल्ली...या...आजची नविन डिश करु दोघे नाश्ता मिपावरती उभी रहाते काव्यांची सेना कुठ्ठेही जा तर हेच भेटती,अमुची ही दैना उरली-सुरली जागा व्यापुन फुटपाथवर आल्या जुन्या कविंनी पाहुन यांना केला सूं...बाल्या अहो ''धनाजी'' सामान* घेऊन या जरा आता असह्य झाले तरी खातो,आहे हा पास्ता उरल्या सुरल्या पिठामधुनी पाडु किती जिल्बी? स्टंम्प वाचण्या पाय घालता झालो पुरता एल्बी..! जिल्बी खाण्या सुसज्ज होते, जरी तुटो मान खबरदार जर खाल पुढे तर,डबडे देऊ छान... :-p कुंथुन कुंथुन कितिही केले, त्वरे नाही होता आंम्ही दिली परगोलॅक्स,वल्ली द्या जमालगोटा ;-) तिथेच पल्याड रस्त्याकडेला जिल्ब्यांचा गाळा भरलेला तो तांब्या आणिक,टाकायचा चाळा भायाण वेगे काव्यमुनीही टाकतात जिल्ब्या उन्हाळ्यातल्या उष्म्यावरती थंडगार कुल्फ्या कवितांपेक्षा कवी-जेंव्हा स्वस्त होत जाता असह्य जाहले तरी खातो आहे हा पास्ता.. ता.क. सामान*- धनाजींची ''माझं हे सामान सखू'' ही कविता... (धनाजीस णम्र इनंती काव्य विभागात लवकर लिहिते व्हा ;-) )
  • Log in or register to post comments

_/\__/\__/\_ भटजी, तुमच्या

प्रचेतस
Fri, 03/02/2012 - 09:58 नवीन
_/\__/\__/\_ भटजी, तुमच्या अफाट काव्यप्रतिभेला आमचा मानाचा मुजरा. येणारच होतो मी खाण्यास पास्ता त्याआधीच तुम्ही मात्र अडवला रस्ता येणारच होतो मी खाण्यास पास्ता पण संपवला तुम्ही, आता बसलोय नुस्ता. येणारच होतो मी खाण्यास पास्ता आता तरी शिल्लक ठेवायचा द्या मला वास्ता. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@भटजी, तुमच्या अफाट

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/02/2012 - 10:03 नवीन
@भटजी, तुमच्या अफाट काव्यप्रतिभेला आमचा मानाचा मुजरा.>>> Image removed. फाटलो.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दंडवत हो भटजीबूवा. !!! त्या

धन्या
Fri, 03/02/2012 - 11:32 नवीन
दंडवत हो भटजीबूवा. !!! त्या स्मायली कुठून आणता आणि त्या इथे कशा टाकता ते जरा आम्हालाही शिकवा राव. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

--^-- आमचाही दंडवत घ्या

पाषाणभेद
Sat, 03/03/2012 - 07:05 नवीन
--^-- आमचाही दंडवत घ्या भटजीबुवा. खतरनाक रचना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अरे या अत्रुप्त आत्माला आवरा

पियुशा
Fri, 03/02/2012 - 12:41 नवीन
अरे या अत्रुप्त आत्माला आवरा रे कुणीतरी,हल्ली गाडी एकदम सुसाट सूटलीये याची ;) Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+१

वपाडाव
Fri, 03/02/2012 - 18:36 नवीन
सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

जबराट!!

मोहनराव
Fri, 03/02/2012 - 19:42 नवीन
जबराट!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अत्रुप्त आत्मा आपल्यासारख्या

सांजसंध्या
Fri, 03/02/2012 - 09:44 नवीन
अत्रुप्त आत्मा आपल्यासारख्या सिद्धहस्त कवीला या कवितेचे विडंबन करावेसे वाटले हा सन्मानच समजेन मी.. आभार :)
  • Log in or register to post comments

@आपल्यासारख्या सिद्धहस्त

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/02/2012 - 09:49 नवीन
@आपल्यासारख्या सिद्धहस्त कवीला या कवितेचे विडंबन करावेसे वाटले हा सन्मानच समजेन मी.. आभार>>> आपल्या दिलखुलास प्रतिसादास आमचा विनम्र सलाम :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

कविता आणि विडंबन दोन्हीची

स्वातीविशु
Fri, 03/02/2012 - 17:26 नवीन
कविता आणि विडंबन दोन्हीची जुगलबंदी आवड्ली आहे.:)
  • Log in or register to post comments

पुढील कवितेच्या प्रतिक्षेत!!

मोहनराव
Fri, 03/02/2012 - 19:46 नवीन
Image removed. पुढील कवितेच्या प्रतिक्षेत!! ;)
  • Log in or register to post comments

आपल्या सर्वांचे आभार

सांजसंध्या
Fri, 03/02/2012 - 20:41 नवीन
आपल्या सर्वांचे आभार :)
  • Log in or register to post comments

लय भारी

कान्होबा
Sun, 03/11/2012 - 19:22 नवीन
एकदम छान.
  • Log in or register to post comments

क्या बात है !

चौकटराजा
Sun, 03/11/2012 - 20:01 नवीन
सांजसंध्या, परफेक्ट टेन. माणूस झाला सस्ता तरी पाळतो शिरस्ता यातून बोध घेउन आपला वाहतो हा रस्ता
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा