Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आपल्याला तर बुवा नाही पटत....तुम्हाला काय वाटतं?

ऐ
ऐका दाजीबा यांनी
Sat, 07/19/2008 - 16:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20396 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

स
सुनील Mon, 07/21/2008 - 08:51 नवीन
१८९८ साली जर्मन चान्सेलर बिस्मार्क ह्याला काही पत्रकारांनी विचारले की २०व्या शतकातील जगावर प्रभाव टाकणारी सर्वात महत्वाची घटना (event) कुठली असेल. एका क्षणाचाही विलंब न लावता बिस्मार्क उत्तरला - "अमेरिकन लोक इंग्रजी बोलतात ही". वरकरणी अगदी साध्या सोप्या वाटणार्‍या ह्या वाक्यात फार मोठा अर्थ दडला आहे. १७-१८ व्या शतकात युरोपातील अनेक देशांतून असंख्य लोक अमेरिकेत येऊन स्थाईक झाले. डच लोकांनी न्यू यॉर्क परिसरात वस्ती केली (न्यू यॉर्कचे पूर्वीचे नाव न्यू अम्स्टरडॅम असेच होते). स्कॅन्डेनेवियन मंडळीना मिनेसोटा जवळचे वाटले (हवामानामुळे असावे!) तर फ्रेन्च लुइझियानात स्थिरावले. येताना ही सगळी मंडळी आपापली भाषा आणि संस्कृती घेऊनच आली होती. सुरुवातीच्या १-२ पिढ्यांनी आपापल्या भाषा टिकवल्यादेखिल असतील, पण पुढे मात्र सरमिसळ झाली. आणि ह्या सरमिसळीतूनच पुढे "गोरा अमेरिकन" हा प्राणी जन्माला आला. आज सॅन फ्रान्सिस्कोतील एखादा लोम्बार्डो किंवा लॉस एन्जेलीसमधिल एखादा श्मिड्ट हे केवळ नावापुरतेच इटालियन वा जर्मन उरले आहेत! त्यांची खरी ओळख ही गोरा अमेरिकन हीच! मनात विचार येतो - जर ह्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांनी आपापल्या भाषा टिकवल्या असत्या तर आजची अमेरिका बनली असती? की अमेरिका ही युरोपचीच एक प्रतिकृती झाली असती? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 07/21/2008 - 12:47 नवीन
शेवटी आपल्या त्रिज्येबाहेर लोकांना समजत नाही हेच खरं. विकास आणी छोट्या !!!!! सहमत !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Mon, 07/21/2008 - 15:02 नवीन
चर्चा चांगलीच रंगली आहे....:-) मला मंगला गोडबोलेंचं "आणि मी..." आठवलं. त्यात पु.लं.वर एक छान लेख आहे. त्यात लेखिकेनी पु.लं.वर असणारी त्यांची भक्ती, त्यांच्या लिखाणाची शैली इत्यादि बाबींवर लिहीलं आहे. लेखाच्या अंतिम टप्प्यात, लेखिकेनी अशी काळजी व्यक्त केली की आमच्या पिढीचं हे पु.ल. प्रेम, त्यांच्या लिखाणातील ताकद पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल की नाही? त्यांची काळजी अगदी बरोबर होती. कारण बरेचसे मराठी लेखक कालानुरुप विस्मरणात गेले. पण पु.लं. सारख्या लेखकाचं लिखाण हे कुठल्याही वयातल्या, पिढीतल्या व्यक्तिला नेहेमी आवडत राहिल. मी जेव्हा "व्यक्ति आणि वल्ली" पहिल्यांदा वाचलं, तेव्हा त्याचं पहिलं प्रकाशन होऊन किमान तीन दशकं तरी उलटुन गेली होती. पण मला त्या पुस्तकानी प्रचंड भुरळ घातली. माझे चुलत/आत्ये भाऊ, बहिणी ह्यांना कुणालाही (सगळे मराठी माध्यमातले होते तरीही) वाचनाचं वेड लागलं नाही. जेव्हा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की, ह्याचं १००% श्रेय माझ्या आई-वडिलांना जातं. त्यांनी मराठी पुस्तकं वाचायला, निबंध स्पर्धेत भाग घ्यायला मला नेहेमी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे लहानपणापासुनच माझ्या मनात मातृभाषेबद्दल प्रेम निर्माण झालं. जर मला इंग्लिश माध्यमाच्या शाळेत टाकलं असतं तर मराठी वाचनाची एवढी आवड निर्माण झाली असती की नाही ह्याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे पालक ह्या भुमिकेतुन त्यांनी त्यांचं काम चोख बजावलं होतं. आता पुढच्या पिढीच्या मनात मराठीबद्दल आवड उत्पन्न करायची जबाबदारी निश्चितच आपली आहे. ह्याचा अर्थ असा नाही की इतर भाषा शिकायच्याच नाहीत. आजकाल बव्हंशी मुलं इंग्लिश माध्यमात शिकतात. कदाचित ती काळाची गरज असेल. पण त्यांना आपल्या मराठी भाषेची, संस्कृतीची, इतिहासाची माहिती करुन देणं हे आपलच काम आहे. त्यानंतर जर त्यांना त्यात गोडी उत्पन झाली तर आनंदाची गोष्ट आहे आणि नाही झाली तरी आपल्याला एवढं समाधान राहिल की आपण प्रयत्न तर केले. १००% शुद्ध मराठी बोलणं आजच्या काळात फार अवघड आहे. मधुन मधुन हिंदी, इंग्लिश शब्द येणारच. त्यात काही वावग नाही. पण एवढी काळजी घेतली पाहिजे की उलट परिस्थिती तर होत नाहीयेना... परवा मराठी सारेगमपा पाहिलं आणि छान वाटलं की नव्या पिढीतल्या मुलांना मराठी गाण्यांची आवड आहे. एक तर गुजराती (पटेल) मुलगी आली होती आणि तिनी अगदी शुद्ध मराठीत दोन गाणी म्हटली. अजुन एक जाणवलेली गोष्ट म्हणजे संदिप-सलीलच्या कार्यक्रमांनी सगळ्या पिढीतल्या लोकांना मराठी कवितांची आणि गाण्यांची गोडी लावली. अगदी वय वर्षे ८ पासुन ते ८० पर्यंत सर्व वयोगटातील लोक (ह्यामधे इंग्लिश माध्यमातील मुलं सुद्धा आलीच...) ह्या कार्यक्रमाला तुफान गर्दी करतात. "कविता" हा प्रकार मला आधी अगदी अगम्य वाटायचा. पण संदिपच्या कविता एकल्यावर वाटलं की - अरे आपल्यालाही कविता कळू शकतात. त्याच्याच नाही तर इतर कवींच्या देखील (बा.भ.बोरकरांची "संधीप्रकाशात अजुन जो सोने तो माझी लोचने मिटो यावी" ही कविता संदिप-सलीलच्या कार्यक्रमात एकल्यापासुन एकदम आवडायला लागली.) ह्यासारखे कार्यक्रम नक्कीच मराठीला जिवंत ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. प्रश्न आहे तो फक्त आपल्या सहभागाचा. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 07/21/2008 - 15:10 नवीन
प्रतिसाद आवडला. यात काही महत्वाचे मुद्दे आहेत जे येथे मराठीच्या बाजूने अथवा चर्चेच्या सुरवातीच्या मूळ उदाहरणात ज्यांना काहीतरी चुकले आहे असे वाटते त्यांना मांडायचे आहेत - त्यात अर्थात मी पण आहेच :)
  1. आता पुढच्या पिढीच्या मनात मराठीबद्दल आवड उत्पन्न करायची जबाबदारी निश्चितच आपली आहे. ह्याचा अर्थ असा नाही की इतर भाषा शिकायच्याच नाहीत.
  2. आजकाल बव्हंशी मुलं इंग्लिश माध्यमात शिकतात. कदाचित ती काळाची गरज असेल. पण त्यांना आपल्या मराठी भाषेची, संस्कृतीची, इतिहासाची माहिती करुन देणं हे आपलच काम आहे. त्यानंतर जर त्यांना त्यात गोडी उत्पन झाली तर आनंदाची गोष्ट आहे आणि नाही झाली तरी आपल्याला एवढं समाधान राहिल की आपण प्रयत्न तर केले.
  3. १००% शुद्ध मराठी बोलणं आजच्या काळात फार अवघड आहे. मधुन मधुन हिंदी, इंग्लिश शब्द येणारच. त्यात काही वावग नाही. पण एवढी काळजी घेतली पाहिजे की उलट परिस्थिती तर होत नाहीयेना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
व
विसोबा खेचर Tue, 07/22/2008 - 07:16 नवीन
मला इतकंच म्हणायचं आहे, की मुलांना इंग्रजी जरूर शिकवा, पण आपल्या मातृभाषेला विसरू नका. मावशी श्रीमंत आहे म्हणून आईला विसरू नये. तुम्हाला काय वाटतं? खरं आहे तुमचं म्हण्णं आपला, (मराठी) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पक्या Tue, 07/22/2008 - 09:09 नवीन
वा तात्या, थोडक्यात पण चांगला प्रतिसाद दिलात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ग
गणा मास्तर Tue, 07/22/2008 - 09:09 नवीन
विनाकारण इंग्रजी बोलणे बिलकुल पटत नाही. पण आपला समाज आहे गतानुगतिक. 'स्टेटसच्या'खोटया कल्पनेपायी इंग्रजीचे महत्व अनाठायी वाढत आहे. इंग्रजीचे महत्व कोणी नाकबुल करणार नाही, पण त्यापायी मायबोलीला डावलणे कितपत बरोबर? लोक मराठीत बोलणे टाळतात याची मला वाटलेली कारणे १ इंग्रजीमाध्यमातुन शिक्षण. मराठी माध्यमातुन शिक्षण घेउन आपले भले होणार नाही, इंग्रजी कधीच येणार नाही असा हल्ली सरसकट सगळेच विचार करतात. खरेतर द्विभषिकत्व अवघड नाही, पण मराठी माध्यमाच्या शाळांत इंग्रजी संभाषणा कौशल्य शिकवले जात नाही. (अर्थात काही अपवाद आहेत) २ भाषेबद्दल प्रेम नाही. मायबोलीचा अभिमान, प्रेम नसणे. मराठीवाचुन अडत नाही मग कशाला मराठी शिका, बोला असा विचार करणारे पुष्कळ. यातच काही लोकांना इंग्रजीतुन बोलणे 'स्टेटस सिंबॉल' वाटते. ३. हिंदीचे आक्रमण परप्रांतीयांची वाढती संख्या, हिंदीतील विविध वाहिन्या आणि चित्रपट यामुळे दोन मराठी माणसे एकमेकांना भेटली तरी हिंदीत बोलतात, विशेषकरुन मुंबईत. आता यावर मला वाटत असलेले उपाय १ मराठीमाध्यमातुन शिक्षणाचे महत्व पालकांना पटवुन देणे.मराठी माध्यमाच्या शाळांत चांगले इंग्रजी संभाषणा कौशल्य व श्रवण कौशल्य शिकवणे. ( विलेपार्लेच्या मिनल परांजपेचा 'फंक्शनल इंग्लीश' हा कार्यक्रम सर्व शाळांत राबवायला हवा). लोकसत्ताच्या सहसंपादीका शुभदा चौकर यांची 'मित्र मराठी शाळांचे' ही संघटना पालक प्रबोधनाचे चांगले काम करत आहे, अशा संस्थाना मदत करणॅ. २ मराठीबद्दल प्रेम आपुलकी निर्माण करणे. लग्न , वाढ्दीवस अशा प्रसंगी मराठी पुस्तके भेट देणे, मराठी नाटके चित्रपट पहाणे. ३.परप्रांतीयाशी बोलताना मराठीतुन बोलणे, म्हणजे ते लोकही अपरिहर्यतेने मराठी शिकतील. (अर्थात राक्षसीपाणा अपेक्षित नाही) मराठी भाषा टिकावी समॄद्ध व्हावी असे इथल्या सगळयांनाच वाटते. मग आपण याबाबतीत काहीतरी विधायक का करु नये? वेगवेगळे उपाय का सुचवु नयेत. तर मग मराठीच्या संवर्धनासाठीचे तुमचे विचार सांगा बरे.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 07/22/2008 - 23:28 नवीन
येथे असलेला अनिकेत केदारींचा (क्षमस्वचा) प्रतिसाद आणि त्यावर मी लिहीलेला खालील प्रतिसाद कोठे गेले? तुमचा दोनदा प्रकाशित झालेल्या प्रतिसादातील एक प्रतिसाद मी आत्ताच अप्रकाशित केला आहे. त्यात जर काही वेगळे होते जे आपल्याला येथे असायला हवे असे वाटले तर येथे अथवा खरडीने/व्य. नि. ने कळवा आणि मी तो प्रकाशित करेन अथवा काही काळाने तो मिटवून (डिलीट करून) टाकेन. धन्यवाद विकास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
न
नाखु Tue, 07/22/2008 - 11:55 नवीन
दै सकाळ मध्ये एक सुंदर सदर आहे "या पाटीमागे दडले काय?" यात एक पाटी होती "पूना" नाही पुणे म्हणा.. पाटीकारास एकाने (श्री दुबे) नी विचारले काय फरक पडतो ????? ऊत्तर दिले "तुम्हाला डुबे /डोबे " म्हटले तर चालेल का ? स्वातन्त्र्य जरुर असावे पण मातॄभाषेचा न्युनगंड असु नयेच... मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 07/23/2008 - 00:20 नवीन
वरती मिपावरच्या ज्ञानी आणि अनुभवी मंडळींनी आपापले विचार मांडले आहेत. त्यामुळे आम्ही त्यावर काय बोलणार? तसेच सध्या महाराष्ट्रातल्या मराठी मंडळींची याबाबत काय स्थिती आहे हे तेथे हजर नसल्याने आम्हाला फर्स्टहँन्ड माहिती नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित नाही. पण एक मराठी माणूस म्हणून आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे. आमचा एक इंग्लंडात रहाणारा मराठी मित्र आहे. त्याने एका चिनी मुलीशी लग्न केले आहे. (हे काल्पनिक नाही, सत्यकथा आहे!) त्यांना इंग्लंडातच झालेला एक मुलगा आहे जो बाहेर अस्खलित इंग्रजी वातावरणात (ऑक्सफर्ड) वाढतो आहे. आता पालक म्हणून आपल्या मुलाच्या हिताचा जर प्रथम विचार करायचा तर त्यांनी आपल्या मुलाला कोणती भाषा शिकवण्यावर भर द्यायला हवा? मँडरिन, मराठी की इंग्रजी? कुणी याल का, सांगाल का? पटवाल का या अडाण्याला?
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Wed, 07/23/2008 - 01:16 नवीन
>>मुलाच्या हिताचा जर प्रथम विचार करायचा तर त्यांनी आपल्या मुलाला कोणती भाषा शिकवण्यावर भर द्यायला हवा? मँडरिन, मराठी की इंग्रजी? अगदी अशीच नाही पण साधारण अशी एक केस माझ्याही पहाण्यात आहे. माझी येथिल (यू एस. ) एक मैत्रिण तेलगू भाषिक आहे. तिचा नवरा तमीळ भाषिक आहे. त्यांची मुलगी (वय ७ ) तेलगू , तमीळ आणि इंग्लीश या तिन्ही भाषा उत्तम जाणते व बोलते. ती आईशी बोलताना तेलगू बोलते आणि वडीलांशी तंमीळ्. अजून एक मैत्रिण जी मराठी आहे पण नवरा तमीळ आहे त्यांची मुलगी (वय २ वर्ष) मराठी आणि इंग्लीश दोन्ही समजते आणि बोलायचा प्रयत्न करते. मैत्रिणीला तमीळ अजिबातच येत नसल्याने घरात तमीळ बोलले जात नाही. पण मैत्रिण मात्र मुलीशी मराठी बोलते आणि वडील इंग्लीश. (उलट वडीलच आता आईमुलीचा मराठी संवाद ऐकून ऐकून थोडेफार मराठी समजू लागले आहेत.) याच धर्तीवर डांबीस काकांच्या मित्राचा मुलगा आईवडीलांच्या भाषा बोलू / समजू शकेल अर्थात घरात त्या भाषा सतत त्याच्या कानावर पडल्या तर . ईश्वरी
  • Log in or register to post comments
स
सैरंध्री Wed, 07/23/2008 - 10:30 नवीन
मुलांना इंग्रजी जरूर शिकवा, पण आपल्या मातृभाषेला विसरू नका. सहमत आहे. सैरंध्री
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 07/23/2008 - 13:26 नवीन
जे प्रसंग वर्णन केले आहेत , ते महराष्ट्रातिल आहेत असे वाटते. इथे तरि मराठि माणसानि मरठित बोलावे हि अपेक्षा करणे चुकिचे नाहि. परदेशातल्या समस्यांचि इथे गल्लत होत आहे.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 07/23/2008 - 07:37 नवीन
जे प्रसंग वर्णन केले आहेत , ते महराष्ट्रातिल आहेत असे वाटते. इथे तरि मराठि माणसानि मरठित बोलावे हि अपेक्षा करणे चुकिचे नाहि. परदेशातल्या समस्यांचि इथे गल्लत होत आहे. अगदी सहमत. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
द
दनिलेश Sun, 07/27/2008 - 22:11 नवीन
आपण इथे कितिही चर्चा केली तरी शेवटी वेळ आल्यावर तसेच वगतो...... नको तिकडे "इन्ग्लिश" वापरतो........ आपल्या मुलान्ना "इन्ग्लिश" शाळेत पाठवतो......... आणी उरलेल्या वेळेत "इन्ग्लिश" नको म्हणून चर्चा करतो......
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा