✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अरे पावसा पावसा, तु आहेस तरी कुठं !!!

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Mon, 07/21/2008 - 10:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25087 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Mon, 07/21/2008 - 10:54 नवीन

अप्रतिम!

दिलीपराव पावसाची मनधरणी आवडली. पावसाच्या कविताही आवडल्या. हा सर्व गोफ तुम्ही अतिशय प्रभावीपणाने गुंफलाय. आता इतके होऊनही पाऊस नाहीच आला तर त्याच्यासारखा करंटा तोच ...अजून दुसरे काय म्हणू! ह्याच पावसाचा पत्ता शोधताहेत आमचे एक मित्र जयंतराव कुलकर्णी! मीही त्या पावसाला आवाहन करतो येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठ्ठा!! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 07/21/2008 - 10:56 नवीन

सुरेख!

बिरूटेशेठ, सुरेख!! देवा, पाऊस पाऊस तुझ्या डोयातले आंस दैवा, तुझा रे हारास जीवा, तुझी रे मिरास. बहिणाबाईंचा तर जबाबच नाही..... ढगांचा पांगण्यामुळे धरित्रीचे दु:ख पेटले आहे, आणि ते दुखः केवळ पावसानेच विझणार आहे. पावासाच्या शोधात असलेला शेतक-याला वेड लागण्याची वेळ आली आहे. बेभानपणे पडणारा पाऊस दूर कुठेतरी गेलेला आहे. आणि त्याची परिणीती दु;खात होते. दिवसभर लागणारी झड, दिवस-दिवस चालत असायची, 'आता थांब रे बाबा, अशी विनवणी करण्याची वेळ आणणारा पाऊस हरवला आहे. डोहांच्या काठावर नाचणारा मोर, मना-मनातून वाहणारे पावसाचे झरे, झाडांनी अलगद टिपून घेतलेले पावसाचे थेंब, मोहरुन लाजणारे वृक्ष, काळेभोर झालेले आकाश....हे सारं स्वप्नवत वाटत आहे. आणि तुमचाही जबाब नाही..... लगे रहो.... -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 07/21/2008 - 11:16 नवीन

ढग पांगले

ढग पांगले पांगले, हाक पावसाला द्या रे दु:ख पेटले भुईचे, कुणी विझवाया या रे वा! सुरेख...! आता भरपूर पाऊस होऊ दे !!! अजून दोन महिने शिल्लक आहेत. चांगला गडगडात होऊ दे, जोरदार पावसाच्या वर्षावात भरपूर पावसाची गाणी येऊ दे, पावसाबरोबर रेंगाळणा-या आठवणी येऊ दे. तिच्या आठवणी चिंब होउन लगडत आहेत. काळ्याभोर ढगांच्या प्रवासात माझाही निरोप तिच्यापर्यंत जाऊ दे......मस्त पैकी कांदे भजे, वडे, वाफाळलेला चहा, असा बेत होऊ दे, नक्की होणार! :) बिरुटेशेठ, पावसाचे वर्णन, त्याची आळवणी, त्याचा विरह हा निरनिराळ्या काव्यपंक्तिंच्या आधारे आपण अगदी सुरेख टिपला आहे! सुंदर लेख, क्या बात है...! एरवी, आमच्या मुंबईची त्रेधातिरपीट उडवणारा पाऊस सध्या मुंबईकरांवरही रुसला आहे! :( आपला, (पावसाचा विरह सहन न होणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 07/21/2008 - 11:26 नवीन

सुंदर लेख

डॉ.दिलीपजी, सुरवाती पासून शेवट पर्यंत वाचत गेलो आपला लेख. खूप संदर लेख आहे.पाऊस नाही ह्याचं दुःख खरंच डोळ्यात मात्र पाणी आणतं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 07/21/2008 - 11:27 नवीन

वा..

डॉ.साहेब, पावसाची आळवणी , कविता आणि त्यावरील तुमचे चिंतन..सारेच आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Mon, 07/21/2008 - 13:23 नवीन

पाउस

आम्हि मुम्बैकर लोकलमधे अड्कलो, पाण्यामधे चालत घरि जावे लागले  तरि चालेल प ण पाउस येउदे. तशिहि २६ जुले जवळ येतिय.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 07/21/2008 - 13:43 नवीन

संवेदना

प्रा. डॉ. तुमची कळवळ, तुमची संवेदना जी उतरली आहे लेखात. जीव कसावीस होतोय.
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/21/2008 - 13:47 नवीन

वा वा क्या

वा वा क्या बात है सर !!! मस्त जमले आहे मनोगत.... आवडले ! आभाळ भरुन येते पुष्कळ पहिल्यासारखी बरसात नाही. नक्षत्रामागून नक्षत्र सरतात तरीही मृदगंध दरवळत नाही. गावाकडला गलबला पुसट ऐकायला येतो डोंगराकडून अंधार्‍या रात्री प्राण कासावीस होतो. जुन्या आठवणी स्मरून. मनातल्या ओळी ! राज जैन प्रत्येक क्षण शेवटचा !!!....
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 07/21/2008 - 17:47 नवीन

खरच

सगळे पावसात अडकून पडलो तरी चालेल पण पाऊस येऊदेत..... दुष्काळाच्या भितीने कासावीस झालेली वरदा "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 07/21/2008 - 18:19 नवीन

खूप छान...

खूप छान लिहिले आहे. वेगवेगळ्या कवींच्या ओळी मस्त गुंफल्या आहेत एका धाग्यात. झाडाच्या हिरव्या गाई तहानलेल्या पहिल्या पावसात पानांनी शहारत उचलतात डो़ई वर, झेलतात सरी. सुंदर कल्पना. बिपिन.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 07/21/2008 - 18:20 नवीन

उत्तम काव्यात्म चिंतन

लेख आवडला. त्यातली आर्तता भिडली. माणसाच्या दु:खतून आणि वेदनेतून काव्य निर्माण झाले म्हणतात त्याचा प्रत्यय आला ...
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 07/22/2008 - 01:25 नवीन

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
सुचेल तसं Mon, 07/21/2008 - 19:52 नवीन

सुंदर

सुंदर लेख!!! पावसाशी संबंधित काव्यपंक्ति अगदी चपखल बसवल्या आहेत. हे "३६" चं गणित खरं ठरतं की काय अशी भिती वाटायला लागली आहे. "दूर दूर नभपार....... डोंगराच्या माथ्यावर......" "निळे निळे गार गार..... पावसाचे घरदार!!!" ह्या संदिप खरेच्या कवितेत सांगितलेल्या पावसाच्या पत्त्यावर जाऊन त्याला ओढुन घेऊन यावसं वाटतयं..... http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 07/21/2008 - 19:57 नवीन

सुंदर कवितांच्या आठवणी

फारच सुंदर लिहिले आहे. घाईने एकदा वाचून असा नेहमीसारखा साचेबंद प्रतिसाद देतो आहे, याबद्दल मलाच काहीतरी वाटते आहे. पण पुन्हा-पुन्हा वाचल्याशिवाय समाधान होणारच नाही, आणि प्रतिसाद द्यायचे मागेच राहील.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Mon, 07/21/2008 - 20:50 नवीन

मला तर

मला तर माझ्या भावना आवरत नाहीत. जर पाउस पडला नाही तर, ह्या कल्पनेच रडायला येते. दुष्काळात होणारे गुरांचे आणि माणसांचे हाल पाहीलेत मी. बरस रे वरुणराजा ! पडु दे तुझी क्रुपादुष्टी आम्हा लेकरावर !! भाकतो करुणा तुझी ! सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 07/22/2008 - 00:34 नवीन

वाहवा!

यंदा महाराष्ट्रात पावसाने तोंडाला फेस आणला आहे असं कळतं. पावसामुळे आठवणींचे अनेक ढग दाटून आले ते या स्फुटाच्या रूपाने बरसले आहेत. स्फुट आवडले. पावसाच्या एखाद्या कार्यक्रमाचे निवेदन केल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/22/2008 - 00:57 नवीन

+१

पावसाच्या एखाद्या कार्यक्रमाचे निवेदन केल्यासारखे वाटले. असेच म्हणतो. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
च
चतुरंग Tue, 07/22/2008 - 00:52 नवीन

वा वा बिरुटेशेठ!

पाऊस न येणं हे शेतकर्‍यासाठी किती हलाखीचं असतं याची वेदना पोहोचवलीत! उन्हाच्या तलखीनं अंगाची काहिली होत असताना पावसाचा शिडकावा काय जीवनदाता असतो हे सांगणारा हा गद्य-पद्याचा गोफ आपण अत्यंत उत्कटतेने विणलाय. भुईच्या कुशीतून रोपांची जपणूक करणार्‍या ह्या पर्जन्याला आता तरी पान्हा फुटू दे, तुमची प्रार्थना सफल होऊ दे!! चतुरंग
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 07/22/2008 - 01:22 नवीन

असेच

म्हणतो. लेख आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चित्रा Tue, 07/22/2008 - 01:39 नवीन

लेख

मनापासून आवडला. (आवडला, म्हणण्यापेक्षा मनापर्यंत पोचला). सध्या महाराष्ट्रात क्लेशकारक परिस्थिती आहे - लवकर भरपूर पाऊस व्हावा, अशी इच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/22/2008 - 21:15 नवीन

आभार !!!

आमच्या मनातली सल आपल्याला आवडली आपल्या प्रतिसाबद्दल आपले आणि वाचकांचेही मनापासून आभार !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 07/22/2008 - 23:50 नवीन

खुपच सुंदर लेख.

कवितांची पेरणी करत लावणी केलेला लेख आवडला निसर्ग राजाला विनवणी करू या पाऊस पडु आणि सगळ्यां तृप्ती लाभु दे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा