काय करावे या किड्याला ?
काय करावे या किड्याला
साला लिहिता लिहु देत नाही
डोक्यात बरेच येत असते
पण डोळ्यांना पाहु देत नाही.
सुचत असते पान उघडल्यावर
'हे'...'हे'...लिहायचे..
पण बसले एकदा लिहायला
की..ते-तेच का रहायचे..? :-(
कुठे जातो विरुन एकदम
लेखनाचा अट्टाहास..?
का होतो मनात मात्र
लिहुन झाल्या सारखा भास?
या वैतागावर मी नक्की
उपाय काय शोधू..?
दुष्ट माझ्या या प्रतिभेला
कुठल्या तळातुन खोदू?
माहितीये मला तीही लाबाड
माझ्या इतकिच आळशी आहे.
खालच्या बाजुनी भोक पडलेली
ती पाण्याची कळशी आहे.
वरुन मेली भरलेली
ती कल्पनांशी जुळते
जमिनीवर टेकली,उचलली काय..
सारखी खालुन गळते.
म्हणुनच साला होत असतो
कल्पनांचा अव्याहत र्हास
साठा मात्र होत नाही
हाच आहे खरा त्रास...
लै भारी भटजीबुवा. वरुन मेली
ठिक हाय वल्लीशेठ..पण,,,,
तो बोळा बिळा काय लाउ नका,
बाकीचे हसतात, हसू द्या, तंबु
@-तुंबल्यानंतर फटकन
ऐकदम झक्कास्,लै आवड्ली
मस्त!!!
...
अरेरे !!काही सुलभ
@-अरेरे !!काही सुलभ>>> पुढे
अरेच्च्चा !! हे राहीलच का इथं
@अरेरे !! फार वाईट वाटले ...
छान कल्पनेतले काव्य आहे.
मजेशीर कविता --टुकुल
झक्कास !
@ती प्रतिभा का कोण ती भेटली