ती कविता मी वाचली आहे.
शास्त्रज्ञांच्या कल्पनाशक्तीला आणि सौंदर्यानुभवाला कमी लेखण्यात त्यांचाही हातभार आहे. (मला जाणवतो नेमका तोच खरा सौंदर्यानुभव - तू ज्याला सुंदर म्हणतो तो रुक्षपणा, असे काही.)
असो. काय करणार. त्यांच्या प्रतिभेला मी मानतो.
शास्त्रज्ञांच्या कल्पनाशक्तीला आणि सौंदर्यानुभवाला कमी लेखण्यात त्यांचाही हातभार आहे.
आज ती कविता माझ्याकडे नाही. पण आठवणीत अजूनही ताजी आहे. त्यात शास्त्रज्ञांच्या कल्पनाशक्तीला कमी लेखले आहे असे मला तेव्हा जाणवले नव्हते. आताही तसे वाटत नाही. चांदण्यांचे सौंदर्य, त्यातून या प्रचंड व्यवस्थेच्या निर्मिकाची संकल्पना आणि त्या कल्पनेतले सौंदर्य हा माझा सार्वभौम अनुभव आहे , असा काहीसा भाव मला त्या कवितेमधे वाटला.
जसे बॉलीवूड मधला फेवरीट ड्वायलॉग असतो ना , तेरे बडे होनेसे मैं तो छोटा नही हो जाता :-) )
>>स्वतःला पडताळा आल्याशिवाय, सर्वांनी पडताळून डॉक्युमेंट केल्याशिवाय कशावरही विश्वास न ठेवण्याची सवय अंगी लागली......
त्याचबरोबर आपल्याला जे दिसत नाही (एक्स रे, गॅमा रे, वगैरे) ते प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकतं याची विनयपूर्वक जाणीवही झाली...>>
आजचा दिवस सत्कारणी लागला इतकं सुंदर स्फुट वाचून. केवढा संतुलीत विचार. केवढी सुसंस्कृत भाषा, श्लोक.
प्रियाली यांचा प्रतिसाददेखील आवडला - की नास्तिक कोणीही नसतो फक्त श्रद्धा वेगवेगळ्या ठिकाणी रुजलेल्या असतात.
माझ्यासारख्या एका क्षुद्र जीवाकडे लक्ष द्यायला त्याला मुळीच अवसर असणार नाही. मी त्याची प्रार्थना करीत आयुष्य घालवतोय की माझी कर्मं करीत जीवनकाल कंठतोय याला त्याच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही......
तुम्ही देव माना , नका मानू . मूर्तिपूजा करा , नका करू तो तुमचा प्रश्न आहे . देवाला तुमच्याकडे लक्ष द्यायला अवसर नाही हा गैरसमज आधी काढून टाका . तुमच्या प्रत्येक छोट्या - मोठ्या , चांगल्या - वाईट कर्मांची नोंद त्याच्याकडे आहे आणि असणार आहे .
ईश्वराचं अस्तित्व मी नाकारीत नाही, पण मला स्वतःला अनुभव आल्याखेरीज मी त्यावर विश्वास ठेवणार नाही......
आणि जो मला त्याच्या अनुभव देऊ शकत नाही त्याला मी संत वा महात्मा मानू शकत नाही, मग तो वाटेल ती बडबड करीत असो.......
अवश्य .पण तुम्हाला अनुभव येण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय हे महत्वाचं आहे . असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं होणार नाही . देव तुमचा नोकर नाही . अनुभवासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार .
मी भारावल्यासारखी मान डोलावली
exactly . मूर्तीपूजेचा हाच उद्देश आहे .तुम्हाला मूर्ती दिसतेय म्हणून तुम्ही भारावू गेलात . जर काहीच दिसल नसतं तर हा भारावलेपणा आला असता का ? नाही ना . निर्गुण स्वरुपाची उपासना सोपी नाही . म्हणून तर मूर्तीपूजा सांगितली आहे .
ईश्वर जर असलाच तर तो हत्तीचं मुख आणि मानवी धड या स्वरूपात असेल यावर तर काडीचाही विश्वास नाही.
ह्याच्या मागचं अध्यात्मिक रहस्य खूप मोठं आहे . ते शोधून काढलं कि लॉजिक पटेल .
गाडगे बाबांचं उदाहरण देणार्यांना गाडगेबाबा सतत 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' म्हणत असत ह्याचा विसर पडला का ? एखाद्या पदार्थाला मस्त फोडणी दिली तर माणूस आवडीने ४ घास जास्त खातो आणि जेवल्याचा आनंद मिळतो . तसंच कर्म करताना नामस्मरणाची , ईश्वरभक्तीची फोडणी दिली कि त्याला एक भारदस्त अर्थ प्राप्त होतो .
पण आपण प्रत्यक्षात एकाकीच असतो! एकटेच जगतो आणि निघायची वेळ झाली की एकटेच निघून जातो
अगदी खरं . देव सोडून दुसरं कोणीही आपल्या बरोबर नसतं . म्हणून मी हि लग्न केल नाही आणि करणार हि नाही . ती संसाराची कटकट करण्यापेक्षा ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न केले तर इथून जाताना नक्कीच काहीतरी घेवून जाता येईल . आणि तसंहि इथं परत कुणाला यायचय म्हणा . मृत्यूलोकाला कायमचा टाटा बायबाय करायचा आता.:-)
शालेय शिक्षण हे याच प्रकारचे असते. एक गुरू जे सांगतो ते ऐकायचे, लक्षात ठेवायचे
शाळेत शिकवणारे कधीही गुरु नसतात . ते फक्त शिक्षक असतात . 'गुरु' हि पूर्णपणे अध्यात्मिक संज्ञा आहे . उठसुठ कोणालाही गुरु म्हणू नये .
लेख आवडला. आणि आधी वाचला असता तर नसता पटला पण नुकतंच माझंही असंच काहीसं झाल्याने पटला.
जर्सी सिटीमध्येही गणपती असतो हे मी नुसतं ऐकलं होतं. असुन असुन काय असणार असंही वाटलं. पण ज्या दिवशी कळालं की आज विसर्जन आहे तेव्हा का कोण जाणे आटापिटा करुन गेलोही.
पोहचलो तेव्हा गणपतीचीच गाणी लावलेली होती. त्यात तेव्हा जे चालु होतं ते नेमकी ढोल ताशांचा रिदम असलेलं. ढोल ताशे आणि समोर गणपतीची अत्यंत सुंदर १५ फुटी मुर्ती. मी कधी मनापासुन नमस्कार करत नाही. म्हणजे घडतच नाही. बाकी लोक करतात, आपण नुसतेच टक लावुन मुर्ती बघत बसलो तर विचित्र दिसतं म्हणुन लोकलज्जेस्तव मी नमस्काराचं नाटक करते. पण आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडुन ह्या मुर्तीला नमस्कार केला गेला. आणि फार फार रडायला आलं... देवासमोर कधी नमस्कार करुन मी रडेन असं मलाही वाटलं नव्हतं..
आपल्याला वाटत असतं पण कितीही नास्तिक असलो तरी आजुबाजुच्या लोकांचा प्रचंड आस्तिकपणा आपल्यावर कुठे तरी आदळलेला असतोच. आणि आयुष्यातल्या खुप सार्या आठवणींच्या खुणा म्हणुन तो आपल्या आतच रहातो.
मी कितीही गणपती नाकारायचा म्हणलं तरी ढोल-ताशा-भगवा झेंडा-गणपती म्हणलं की मला पुणंच आठवतं. आणि मग गणपती पाहुन आपोआप भरुन येतं.
चालला गजर, जाहलो अधीर, लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन, आता पाहिन, पांडुरंगाला
म्हणलं की मला भारतच आठवतो.. आणि विठ्ठल मला विलक्षण आवडायला लागतो. घडवणार्यांनी मुर्तीच तशा आर्त बनवल्यात की पर्याय उरत नाही.
मला महालक्ष्म्यासुद्धा अशाच निरर्थक वाटायच्या. पण यंदाचे महालक्ष्म्यांचे नुसते फोटो पाहिले अन आठ्वलं की लहानपणापासुन दरवर्षी आमची मराठवाड्यातली सगळी मंडळी आमच्याकडे पुण्याला यायची. तोच सगळा १५ लोकांचा गोंधळ, तीच ठरलेली कामं आणि तरीही जेवायला दुपारचे चार वाजणार.. दरवर्षी!
पुजा झाली की बाबा नैवेद्य दाखवायचे. आम्ही पोरांनी खपुन समजवलेल्या लक्ष्म्या.. आजीने लावलेल्या समया-काडवातींनी उजळलेल्या लक्ष्म्या.. वस्त्रमाळा आणि निर्गुडीच्या हारांमधुन शांतपणे आपल्याकडे बघणार्या लक्ष्म्या..
आणि त्यांच्या समोर कद घालुन मनापासुन काही तरी मंत्र म्हणणारे बाबा..
त्याक्षणी सगळे शांतपणे मागे उभे.. कुणी काही बोलायचं नाही.. आणि एक क्षणात अचानक "सुखकर्ता दुखहर्ता.." सुरु, सगळ्यांची पहिली टाळी सुद्धा एकत्र वाजायची.. सगळी मंडळी कितीही वेगवेगळी असली तरी त्या धाग्याने एकत्र बांधलेली होती. आमच्या मायबापांनी महालक्ष्म्याच नाकारल्या असत्या तर मला माझी चुलत भावंड नुसती नावानीच माहिती असती. पण आज महालक्ष्म्या म्हणलं की मला मराठवाडा आठवतो..
मला वास्तविक गणपती, महालक्ष्म्या किंवा पांडुरंगाशी काही घेणं देणं नाही. पण त्यांच्याशी ज्या माझ्या घराच्या आठवणी बांधल्या गेल्या आहेत, त्यांच्याशी माझं सख्य आहे.
उत्तम लेख वर काढल्याबद्दल धन्यवाद.
मी स्वतः नास्तिक आहे पण आस्तिकांचा राग येत नाही. प्रत्येकाने आस्तिकपणा किंवा नास्तिकपणा त्याच्या त्याच्या अनुभवावरून किंवा मनाप्रमाणे ठरवलेला असतो. समस्यां तेव्हा निर्माण होते जेव्हा आस्तिक लोक नास्तिकांना आस्तिक बनवायचा किंवा नास्तिक लोक आस्तिकांना नास्तिक बनवायचा प्रयत्न करतात तेव्हा. माणूस आस्तिक किंवा नास्तिक असण्यापेक्षा प्रामाणिक, गरजेच्या वेळी हाकेला धावून येणार असणे जास्त मह्त्वाचे असे मी मानतो.
हे एक मुक्तचिंतन दिसते आहे, छान , प्रामाणिकपणे लिहिल्यासारखे वाटते पण तुमचा गोंधळ होतो आहे. आजकाल नास्तिकतेला असलेले वलय कदाचित स्वतःला मी नास्तिकच असे म्हणायची पटवायची घाई करत असेल . घाई करू नका स्वतःला नास्तिक म्हणून घायची बहुदा तुम्ही फेन्स वर बसलेले अज्ञेयवादी आहात (Agnostic)...कदाचित आस्तिकतेकडे झुकलेले नास्तिकतेकडे झुकू पाहणारे अज्ञेयवादी. खरे तर निष्कर्षाला यायची घाई न करता विचार चालू ठेवा, तरच रस्ता सापडेल नाहीतर तळ्यात-मळ्यात करत राहाल.
मी अजूनही एक पूर्ण नास्तिक मनुष्य आहे....
पण मित्रहो, या गजाननाचा मी एक स्नेही म्हणून स्वीकार केला आहे.......
माणसाचे विचार इव्हॉल्व होत असतात. पण आठवणी या आत्ताच्या विचारांशी जुळणार्या असतीलच असे नाही. पूर्वायुष्यात आयुष्यावर कुटुंब, समाज यांच्या प्रभावाने जे घडत गेले त्यानुसार आठवणी रहातातच .. आणि आठवणी नेहेमीच प्रिय असतात.. तेव्हाचा तसा मी होतो.. आत्ताचा असा मी आहे.. तेव्हा गणपती देव वाटत होता.. आता जे मानवाच्या बुद्धी पलिकडे आहे त्याला मी देव मानतो. त्याला मानवरूप देण्याची व भक्ती/पूजा करण्याची गरज वाटत नाही.. त्यामुळे आठवणींशी निगडीत असल्याने व आत्ताच्या विचारांनी गजानन देव वाटत नसल्याने गजाननाचा स्नेही म्हणून स्वीकार वगैरे अट्टाहास करायची गरज नाही.
ते चित्र अथवा शिल्प म्हणून आवडते किंवा स्त्रोत्र आरत्या यांचा अर्थ नसला तरी सूर भावतो किंवा मोदक फार आवडतो हे सत्य म्हणून स्वीकारता येउ शकते..
तेव्हाचा तसा मी होतो.. आत्ताचा असा मी आहे.. तेव्हा गणपती देव वाटत होता.. आता जे मानवाच्या बुद्धी पलिकडे आहे त्याला मी देव मानतो. त्याला मानवरूप देण्याची व भक्ती/पूजा करण्याची गरज वाटत नाही.. त्यामुळे आठवणींशी निगडीत असल्याने व आत्ताच्या विचारांनी गजानन देव वाटत नसल्याने गजाननाचा स्नेही म्हणून स्वीकार वगैरे अट्टाहास करायची गरज नाही.
+१
मोदक फार आवडतो हे सत्य म्हणून स्वीकारता येउ शकते..
मी पूजा करतो,गणपती बसवतो, घरात जिवत्या, गौरी हरतालिका सर्व चालू असते. दिवाळीला लक्ष्मी पूजन असते. सात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे. असे असूनही मी हार्ड कोटेट नास्तिक आहे. कारण या कशातही देव नाही याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. देव जर जगात असेलच समजा तर तो निगोशिअबल नाही. सबब देव भक्ती, नामस्मरण यांचा उपयोग झालाच तर प्लासिबो म्हणून होईल कृपा वगैरे सब झूट. मग आमच्या नास्तिकांच्या आयुष्यात देव वारंवार का येतो. कारण एकच .जेंव्हा कशाचेच उत्तर कार्यकारण भावासह सापडत नाही त्यावेळी योगायोग हेच उत्तर असते व योगायोग हा तर विज्ञानात बसत नाही म्हणून नास्तिक ही म्हणतो देवाची कृपा ....दुसरं काय ? "
तुमच्या म्हणण्याप्रमाणे योगायोगाने देव तुमच्या आयुष्यात येतो. ते पटत नाही. तुम्ही हार्ड्कोर नास्तिक समजता तरीही गणपती बसवता, पूजा करता. कारण आपल्या विचाराला आचारात आणण्याची इच्छा अथवा धैर्य नाही म्हणून.
तुम्ही दुसर्यांना थांबवू शकत नाही किंबहुना थांबवू नकाच.. त्यांना त्यांचा विचार करू दे. पण स्वतःला न पटणारं स्वतःच वागण्यापासून कोण अडवतय ?? ते जमवणं इतकं कठीण नक्कीच नाही. थोडासा निर्धार लागतो पण इथे योगायोग वगैरे कारणं अजिबात पटत नाहीत.
आणि योगायोगाने देव आयुष्यात येणे आणि ही देवाची कृपा वगैरे मनापासून वाटत असेल तर तुम्ही नास्तिक असल्याचे म्हणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे.
एक ,हे सर्व मी एकटा समाजात नाही . माझे कुटुंब ही आहे म्हणून करतो. माझ्यात धैर्य वगरे नाही हा तर्क चुकीचा. अगदी थेरॉट्कली पाहिलेत तर योगायोग असाही काही नसतो पण प्रॅक्टीकल आयुष्य जगताना आपल्या मनाचे समाधान तूर्तास तरी का होईना हे करून घेण्यासाठी नाईलाजाने देवाची इच्छा असे आपण म्हणतो. उदा आपल्या परिचयात जेंव्हा अकाली मृत्यू होतो त्यावेळी नास्तिकही इश्वरेछ्हा बलीयसी म्हणतो कारण तुझ्या बापाने दारू पिली बेसुमार ,म्हणून तो मेला हे सत्य त्या नातेवाईकाला सांगण्याचे धैर्य आपल्यात नसते. नास्तिकातही नसते व अस्तिकातही. धैर्याचा प्रश्न तेथे येतो. आपण म्हणता तेथे नाही.काही वेळा सत्य सांगण्याचे धैर्य आपल्यात नसते किंवा काही वेळा ते ऐकण्याचे धैर्य॑ दुसर्यात नसते.
कुटुंबातही आपापल्या श्रद्धे/अश्रद्धेप्रमाणे वागण्याची मुभा असावीच.
पण तुमच्याकडे धैर्य नाही हे म्हणणे जर चूक असेल तर कुटुंबात तुमच्या नास्तिक असण्यावर खुलेपणाने चर्चा झाली नसावी.
असे असते तर तुमच्या नास्तिकतेला न पटणार्या बर्याच गोष्टी करण्याची इच्छा / आग्रह/ सक्ती झाली नसती.
माणसं जपण्यासाठी जसे नास्तिक आस्तिकांच्या सर्व गोष्टींना घरात विरोध करत नाहीत तसे आस्तिकही घरातल्या नास्तिकांकडून हे सगळं करण्याची अपेक्षा ठेवत नाहीत.
माझी श्रद्धा आहे तर मी पूजा करेन, मुलाकडून ती इच्छा अपेक्षा ठेवणार नाही. आणि तो नास्तिक आहे याची पूर्ण कल्पना असेल तर माझ्यासाठी म्हणून पूजा वगैरे करण्यापासून नक्कीच परावृत्त करेन.
धैर्य शब्दाऐवजी विचाराप्रमाणे आचार करण्याचा स्वतःचा निग्रह नसणे असे म्हणणे जास्त योग्य ठरले असते.
प्रतिसाद कर्त्यांना अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान हा सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या मनात या पुस्तकातील लेख वाचावा अशी आग्रहवजा सूचना आहे. श्रद्धा अश्रद्धा अंधश्रद्धा चे ठिकाण मेंदु आहे. मी माझ्या सोयी वा गरजेनुसार अस्तिक नास्तिक वा अज्ञेयवादी आहे. मानसिक आरोग्य जपण्यासाठी आपला मेंदु केवळ अमुर्तच नव्हे तर अनेक वेडगळ वाटणार्या सुद्धा कल्पनांचा आधार घेतो. प्रत्येक वेळी आपले त्यावर नियंत्रण असतेच असे नाही. ते त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. ईश्वराचे निर्गुण निराकार, सगुण साकार, भक्तवत्सल करुणाघन अशी रुपे हे त्याच्या मेंदुचे अविष्कार असतात.
असाच सेम असाच विचार व्यक्त करणारा मेघश्याम पुंडलिक रेगेंचा एक लेख आठवला.
एक कुतुहल नरहर कुरुंदकरांना मुलाची "मुंज" करावीशी वाटण्या संदर्भात व एक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी
लुप्त जुन्या प्राचीन विधीने जी त्यांना माहीत होती असे काहीतरी "त्र्यंबकेश्वर" मंदीरातील प्राण प्रतिष्ठे ची जबाबदारी स्वीकारली होती त्याचेही कुतुहल वाटते
एकुण पण बहुधा तेव्हा त्यांनी इथे सर्वांना काही तरी प्रवेश द्यावा अशी काहीतरी अट टाकलेली होती असे
अंधुक अंधुक वाचलेले स्मरते.
माणुस एक इंटरेस्टींग क्रीएचर आहे व तो विसंगतच आहे मुळात त्याला सुसंगती अपेक्षीत केल्यावर वांधे होतात.
सॅम हॅरीस सारखे लोकही आहेत नीरक्षीर विवेक करतात शेणातुन शेंगदाणा बाहेर काढतात
असो.
प्रतिक्रिया