✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तारीफ करू का त्याची

श — श्रीकृष्ण सामंत, गुरुवार, 06/26/2008 - 22:26

प्रतिक्रिया द्या
3183 वाचन

💬 प्रतिसाद (7)
क
कौस्तुभ Fri, 06/27/2008 - 10:31 नवीन

वाह

मस्तच आहे कवीता!
  • Log in or register to post comments
ध
धमाल बाळ Fri, 06/27/2008 - 10:36 नवीन

तारीफ करु क्या उसकी

तारीफ करु क्या उसकी जिसने तुम्ही बनाया ये चांदसा रौशन चेहेरा जुल्फोंका रंग सुनहरा ये झील सी नीली आंखे कोई राज है इनमे गहरा तारीफ करु क्या उसकी जिसने तुम्ही बनाया:)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 06/27/2008 - 19:46 नवीन

तारिफ करू

अगदी बरोबर www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल बाळ
व
विसोबा खेचर Sat, 06/28/2008 - 08:43 नवीन

:)

उगाच मराठीकरण करून चांगल्या चांगल्या हिंदी गाण्यांची पार वाट लावणारे आमचे गोळेकाका अठवले! :) सामंतसाहेब, प्रामाणिक मत! राग नसावा... बाकी चालू द्या... :) आपला, (हिंदी) तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 06/28/2008 - 11:00 नवीन

आपल्या प्रामाणिक मताचा आदर करून

हिंदी तात्याको सलाम, "पसंत अपनी अपनी ख्याल अपना अपना" कविता ऐसिच होनी चाहिये ऐसा अपने कवितापर बंधन होना नही मांगता कविता ऐसि नहीच होनी चाहिये ऐसा भी अपने कवितापर बंधन होना नही मांगता जब अपना दील करता है लिखनेको हम लिखते जाते है आखिर ये तो खुदा की देन है कविता फूटपट्टीसे मापनेको नही आता कविता किसीको "शापनेको" नही आता कविता चमचम चांदी जैसी हरी हरी फांदी जैसी अपनी कविता अपुनच लिखनी चाहिये अपनी कवितापे अपुनच प्रेम करना चाहिये (हिंदीत अनुवाद. कवी-अनामिक मराठी) आपल्या प्रामाणिक मताचा मी मनापासून आदर करतो.शे शंभर लोकानी कविता खूप आवडली म्हणूनही अन्य ठिकाणावरून पण कळवलं आहे. शेवटी काय "पसंत अपनी अपनी ख्याल अपना अपना" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/28/2008 - 11:54 नवीन

सामंत साहेब,

शे शंभर लोकानी कविता खूप आवडली म्हणूनही अन्य ठिकाणावरून पण कळवलं आहे. मीही त्या शे-शंभर लोकांचा आदर करतो... शेवटी काय "पसंत अपनी अपनी ख्याल अपना अपना" अगदी खरे! मला स्वत:ला मात्र एका चांगल्या, लोकांच्या तोंडी असलेल्या गाण्याचा असा अन्य भाषेत केलेला अनुवाद रुचत नाही. मूळ चाल ज्या भाषेला लावली असेल त्याच भाषेत ते गाणं गुणगुणायला मजा येते. त्या त्या भाषेतल्या त्या त्या शब्दांनीच ती चाल अधिकाधिक रुजत असते/रुजलेली असते. त्या चालीत अन्य भाषेतले शब्द वाचताना, गुणगुणताना दाताखाली खडा आल्यासारखे वाटते, दुसर्‍याच्या ताजला कुणी आपली वीट जोडली आहे असे वाटते. गीतरामायणाचेदेखील असेच झाले. मूळ मराठीतल्या गीत रामायणाचे नंतर अनेक भाषांतून भाषांतर झाले परंतु ती कोणतीच गाणी रुजली नाहीत! त्याचे कारणही बहुदा हेच असावे...! मूळ भाषा मराठी असो, हिंदी असो, वा इतर कुठलीही असो, उदाहरणच द्यायचं झालं तर, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा! या ओळी अन्य भाषेत कुणीही कितीही उत्तमरित्या भाषांतरीत केल्या तरी त्या चालीत ऐकायला रुचणार नाहीत, किंवा पर्दा नही जब कोई खुदासे, बंदो से पर्दा करना क्या? या ओळी अन्य भाषेत कुणीही कितीही उत्तमरित्या भाषांतरीत केल्या तरी त्या चालीत ऐकायला रुचणार नाहीत! निदान मला तरी नाहीत. मला ते हास्यास्पदच वाटेल... स्वरांमुळे शब्दांना झळाळी येते परंतु नंतर ते शब्द त्या स्वरात इतके छान मुरतात की पुढे पुढे त्या शब्दांमुळेही मूळ स्वर अधिकाधिक तेजस्वी बनत जातात. असं हे शब्द-स्वरांचं अद्वैत! शब्दस्वरांच्या त्या ताजला कुणी स्वत:ची नवी वीट लावू नये असे मला वाटते! असो, मला गीतसंगीताची फारशी समज नाही. आपले काव्य आवडणार्‍या त्या शेशंभर लोकांइतकी तर नक्कीच नाही! :) तरीही वरील सर्व ही माझी वैयक्तिक मतं आहेत आणि माझ्यापुरती ठाम आहेत! कळावे, लोभ असावा. पुढील लेखनाकरता शुभेच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 06/29/2008 - 11:24 नवीन

तात्याराव

तात्याराव नमस्कार, अभ्यासू वृत्तिने आपण केलेल्या विधानांची मी कदर करतो. आपल्या मताचा आदर ठेवून मला जमेल तसं आपल्या सर्वांना आनंद देण्याचा मी माझ्या लेखनातून प्रयत्न करीन आपल्या शुभेच्छा बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा