✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा दंगल भाम्बुर्डा(पुणे) वृत्तान्त

ध
धमाल बाळ यांनी
Fri, 06/27/2008 - 10:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8614 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

भ
भडकमकर मास्तर Fri, 06/27/2008 - 10:22 नवीन

नाट्यभैरव...

यावर्षीचा मिपा जीवन गौरव नाट्यभैरव पुरस्कार हा एकमताने "भडकमकर मास्तर" याना देण्यात आला. धन्यवाद धन्यवाद... माझे आभाराचे भाषण घरी विसरल्याने सध्या इतकेच पुरे... आपला (नाट्यभैरव) भडकमकर मास्तर... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 06/29/2008 - 21:36 नवीन

गंमत ( ! ) आणि ग्रुपिझम ( ? )

अंमळ संताप येण्याइतका हा पोस्ट सीरियसली घ्यायचा आहे ही कल्पना नसल्यामुळे आम्ही गमतीत हा पुरस्कार स्वीकारला... चूक झाली... प्रथम वाचनात खरंच विनोदी वगैरे काय तो वाटला होता हा लेख.... सर्व उत्तरे वाचल्यावर कळाले की एकूण खूप जणांना दु:खात पाडणारा , ग्रुपिझम वाढवणारा हा लेख आहे... कोणाला काय विनोदी वाटेल काय सीरियस वाटेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे , पण प्रत्येकाने फक्त आपल्या पवित्र्याशी कन्सिस्टंट रहावे इतकीच अपेक्षा... . .... आता यापुढे असलं सगळं ग्रुपिझम करणारं साहित्य सीरियसली घेऊन त्याला अजिबात रिप्लाय न लिहिण्याची काळजी घेईन... दुर्लक्ष करण्याच्या यादीत अजून एक भर... ( ग्रुपिझम तोडणार्‍या कन्सिस्टन्सीच्या प्रतीक्षेत) भडकमकर मास्तर _______________________ गंमतीत लिहिलेला पहिला प्रतिसाद माझाच असल्याने " आपणच ग्रुपिझम करणारे आहोत " या विचाराने आमच्या डोक्याला भरपूर कटकट झालेली आहे... मला ग्रुपिझम वगैरे करायची गरज नाहीये असं मला प्रामाणिकपणे वाटते... मिपा वरील व्यक्तिरेखा घेऊन काल्पनिक गोष्ट लिहिणार्‍या सार्‍यांनाच माझी विनंती आहे की त्यांनी आमचे नाव त्या गोष्टीत गुंफू नये... बाकी कोणीही कोणालाही नामांकने देऊन / न देऊन , पुरस्कार देऊन / न देऊन त्याच्या लेखनाचा साहित्यिक दर्जा सुधारत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे ... मला असल्या पुरस्काराच्या लेखांनी काहीही फरक पडत नाही ... ज्यांना असले लेख टाकायचे त्यांनी टाकत राहावेत, माझा त्यात उल्लेख करू नये ही पुन्हा विनंती... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
व
विसोबा खेचर Fri, 06/27/2008 - 10:42 नवीन

चला!

अहवाल मस्तच आहे! पण चला, एकंदरीत झालं ते बरं झालं..! आम्हाला एकही पुरस्कार नाही. म्हणजे आमचं कुठलंच लेखन परिक्षक मंडळाला आवडलेलं दिसत नाही! आता आम्हाला मिपाकरांकरता जीव तोडून काहीही लिहायची गरज नाही! :) परिक्षक मंडळाचे आभार व सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...! आपला, (निवृत्त व्हायच्या विचारात!) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/27/2008 - 10:46 नवीन

नामांकनही नाही..

गाबीत मास्तर, अब्दुलखान, राजे :प्रवास, माझे बालपण यांच्यात आमच्या रौशनीला, पाटणकर आजोबांना, काही व्यक्तिचित्र-काही आत्मचरित्र, यांना साधं नामांकनही मिळू नये याचं वाईट वाटतं! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
धमाल बाळ Fri, 06/27/2008 - 10:50 नवीन

तसे नाही हो.......

आता आम्हाला मिपाकरांकरता जीव तोडून काहीही लिहायची गरज नाही! तसे नाही हो.......तुम्ही लिहिले नाहीत त॑र त्यापासुन नवोदिताना प्रोत्साहन कसे मिळणार.....तुम्ही लिहिलेच पाहिजे तुमचे लिखाण वरील सर्व कॅटेगरीसाठीविचारात घेतली होते...पण नवोदितांस प्राधान्य द्यावे असे सर्वानुमते ठरले. कृपया ह घ्या :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/27/2008 - 11:02 नवीन

हा काय धंदा?

तुमचे लिखाण वरील सर्व कॅटेगरीसाठीविचारात घेतली होते...पण नवोदितांस प्राधान्य द्यावे असे सर्वानुमते ठरले. साला नवोदितांना लेखनकरता प्रोत्साहन मात्र आम्ही द्यायचं आणि बक्षिस मात्र ते पटकावणार! हा काय धंदा? हां, एक वेळ बक्षिस देऊ नका पण साला, आमच्या लेखनाचा साधा उल्लेखसुद्धा नाही? कोण कोण मंडळी होती परिक्षक मंडळांवर? जरा त्यांची नावे जाहीर करा म्हणजे आम्हालाही कळेल! कृपया यापुढेही कुठल्याही स्पर्धेत आमच्या साहित्याचा विचार होऊ नये हीच विनंती..! आम्ही तो अधिकार कुणालाही देऊ इच्छित नाही! च्यामारी, तात्याच्या लेखनाचं परिक्षण करायला निघालेत! गेलात लेको बा XXX....! :) आपला, (एक्स मॅनेजर) झमझम बार. फोरास रोड, मुंबई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल बाळ
स
सखाराम_गटणे™ Fri, 06/27/2008 - 11:10 नवीन

मला वाटते,

मला वाटते, पुरस्कार वैगरे च्या भानडीत आपण पडु नये. मिपा या पसुन दुर राहील तर चांगले. कदाचीत त्यामुळे groupisim वैगरे वाढु शकतो. त्यामुळे मिपाचे वातावरण खराब होउ शकते. ज्यांनी पुरस्कार मिळाला नाही, ते कदाचीत लेखन थांबवतील. माझा ह्या पुरस्कार वाटपाला विरोध आहे. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 06/27/2008 - 11:25 नवीन

काहीतरीच हां ...

काय रे, कसला पुरस्कार आणि कसलं ग्रुपीझम ??? च्यायला सगळं "मज्जा" म्हणून चाललेलं आहे, आजुन कही तरी वेगळे काढू नका ... आम्ही मनापस्सुन "मिपाकर" आहोत , आमच्या हातुन "वातावरण बिघडावयाची" असली घाणेरडी गोष्ट कधीही होणार नाही . कॄपया हा विषय वाढवू नये. >>ज्यांनी पुरस्कार मिळाला नाही, ते कदाचीत लेखन थांबवतील. त्याचा काय संबंध ? आपण कोण दुसर्‍याचे लेखन परिक्षणारे आणि त्याला पुरस्कार देणारे ? सगळं हे विनोदाच्या भावनेत आहे ... तात्यासाहेब, अगदी मनापासनं सांगतो की सगळं आहे ते कृपया " विनोद" म्हणून घ्यावे ... आमच्या "सरळपणा" बद्दल शंका नसावी ... कुठल्याही कट्ट्यात ग्रुपीझम वगैरे करुन कुनाच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याचे व कुणाला दाबण्याचे वगैरे धंदे होत नाहीत. जे काही लिहलं त्यात फक्त आणि फक्त विनोद होता ... अवांतर : आता माझा हा प्रतिसाद म्हणजे "पुरस्कार देणार्‍या मंडळाचे स्पष्तीकरण" समजण्यात येऊ नये. कारण अशी कुठलीही गोष्त अस्तित्वात नाही. त्यावेळी ह्या विषयावर कसलीही चर्चा झालेली नाही. हा फक्त विनोद आहे. जे चालले आहे तो फक्त गैरसमज माझ्या मते फक्त गैरसमज आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
व
विसोबा खेचर Fri, 06/27/2008 - 11:30 नवीन

डॉन,

डॉन, आता माझा हा प्रतिसाद म्हणजे "पुरस्कार देणार्‍या मंडळाचे स्पष्तीकरण" समजण्यात येऊ नये. कारण अशी कुठलीही गोष्त अस्तित्वात नाही. त्यावेळी ह्या विषयावर कसलीही चर्चा झालेली नाही. जर या विषयावर कोणतीही चर्चाच झालेली नाही तर धमाल बाळाने कुठल्या अधिकारात ही बक्षिसं देऊ केली आहेत?? इथे प्रत्येक जण येतो ते मनापासून, ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार लिहायला. प्रत्येकाचं लेखन हे त्याच्या त्याच्या जागी चांगलंच असतं! असं असताना कुणाला कुठला पुरस्कार द्यायचा, द्यायचा नाही हे ठरवणारा हा धमाल बाळ कोण? असलीच तर ही त्याची वैयक्तिक मतं असतील आणि ती त्याने त्याच्याजवळ ठेवावीत. मिपा प्रशासनाचा या बक्षिस वितरणाच्या कल्पित नाट्याशी काहीही संबंध नाही. इथे लिहिणारा प्रत्येकजण हा मिपा प्रशासनाकरता महत्वाचा अन् मोलाचा आहे. व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं तर माझं लेखन काय आहे, कसं आहे हे सगळ्यांना माहित्ये! ते कुणी धमाल बाळाने ठरवायची गरज नाही परंतु अशी बक्षिसं वगैरे वाटल्याने एखादा नवोदित जो मनापासून लिहितो आहे तो खट्टू होऊ शकेल/शकतो. तसेच या प्रकारामुळे गटणे म्हणतात तसं ग्रुपिझमही वाढू शकतं. ही सगळी त्याचीच बीजं आहेत! आपला, (संतप्त) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सखाराम_गटणे™ Fri, 06/27/2008 - 14:58 नवीन

>>काय रे,

>>काय रे, कसला पुरस्कार आणि कसलं ग्रुपीझम ??? >>सर्व विनोद आहे हे पण लक्षात घेत नाही का ? सगळा विनोद आहे, हे मला समजले रे, पण सगळे लोक समजुन घेतील असे नाही. वात्रट लिखाण पुरस्काराची अडचण नाही. पण जेव्हा तुम्ही गंभीर विषयावर(नाट्यभैरव वै.) पुरस्कार देउ लागता, तेव्हा गडबड होउ शकते. ती गोष्ट लोक गंभीर पणे घेतात. मग त्याला का, मला का नाही, अशा गोष्टी सुरु होतात. उगाच स्पर्धा चालु होते. पुरस्कार द्या, पण वात्रट लिखाणा वर. हे वाच http://www.misalpav.com/node/2180 मी पण ह्या मताचा आहे. आपण लोकांच्यावर सोडायला हवे, त्यांना काय आवडते. >>आपण कोण दुसर्‍याचे लेखन परिक्षणारे आणि त्याला पुरस्कार देणारे ? >>सगळं हे विनोदाच्या भावनेत आहे ... आम्हाला तुमच्या बद्दल कसलीच शंका नाही. पण सगळे जग तर तुमच्या सारखे नाही. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
इ
इनोबा म्हणे Fri, 06/27/2008 - 16:14 नवीन

groupisim

कदाचीत त्यामुळे groupisim वैगरे वाढु शकतो. त्यामुळे मिपाचे वातावरण खराब होउ शकते. (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला ) आता याला काय म्हणावे बरे:? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 06/27/2008 - 16:47 नवीन

:)

सही रे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
अ
अघळ पघळ Sat, 06/28/2008 - 21:43 नवीन

हा हा हा

सही रे इनोबा! गटण्या, दे आता उत्तर! आता का पळून गेलास? -अघळ पघळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
अ
अवलिया Fri, 06/27/2008 - 11:15 नवीन

आमच्या

आमच्या नावाचा विचार न केल्याब्द्द्ल आभारी आहोत :) :) :) (अमीरखान) नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Fri, 06/27/2008 - 11:20 नवीन

"हेच एक

"हेच एक सत्य..बाकी जग मिथ्य " जबरा !! पण बाकी गोष्टीसाठी गटणे साहबांशी सहमत. माझ्या तर्फे "नो कमेंटस" राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
  • Log in or register to post comments
ध
धमाल नावाचा बैल Fri, 06/27/2008 - 11:40 नवीन

तात्या आणि गटण्याशी सहमत

अरे काय हे? च्यायला १००० च्या वर संख्या असलेल्या मिपावर खच्चून ४-५ लोक जमता आणि त्यावर वृत्तांत काय ल्हिता??? ह्यो कट्टा जरासा फ्लॉप वाटला राव आणि बक्शिस वितरण विषयी गटण्या आणि तात्याशी १००% सहमत. -बैलोबा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/28/2008 - 00:17 नवीन

कारणं!

गटण्या आणि तात्याशी १००% सहमत. अहो आम्ही अंमळ संतापलो त्याची कारणं आहेत! त्या स्वाती दिनेशने जपानवर इतकी सुंदर लेखमाला लिहिली आहे त्याचा उल्लेख आहे? रामदासभाऊ इतकं सुरेख लिहितात त्यांचा उल्लेख आहे? कशावरून हे लेखन हेतूपुरस्सर टाळलं गेलं नाही?? मग बक्षिसांचा हा कुठला पोरखेळ सुरू आहे? तेही मिपाच्या नावाखाली? प्रत्येक गोष्ट 'ह घ्या' या सदरात मोडत नसते! निदान मी तरी या गोष्टी ह घ्या या सदरात घेऊ शकत नाही. प्रत्येक मिपाकर येथे वेळात वेळ काढून आपापल्या कुवतीनुसार, लेखनशैलीनुसार लिहितो त्या प्रत्येकाबद्दल मिपाला आदर आहे. हां, एखाद्याचं लेखन अगदीच सरस असेल, एखाद्याचं नसेल! पण प्रतिसादाच्या माध्यमातून मायबाप वाचक मिपाकर ते दाखवून देतच असतात! त्याकरता कट्टे करून मिपाच्या नावाखाली बक्षिसं वगैरे ठरवण्याचे प्रकार योग्य नव्हेत. कट्टा जरूर करावा, धमाल मजा करावी इतपत ठीक आहे. असो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल नावाचा बैल
अ
अघळ पघळ Sun, 06/29/2008 - 00:01 नवीन

तात्या

तात्या उगीच कशाला स्वाती दिनेश आणि रामदास बुवांना पुढे करताय तुमच्या 'अंमळ संतापा'चे खरे कारण तुम्हाला नामांकन देखिल हे मान्य करा ना! (वरच्या दोन उत्स्फुर्त प्रतिसादां सारखे१ ;) ) -अघळ पघळ अवांतर : तात्या, असं आपल्यावर थोडीशी टिका करणारे प्रतिसाद लगेच उडवायचे नाहीत लोक बघत असतात..त्यांना काय वाटेल? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
इ
इनोबा म्हणे Sat, 06/28/2008 - 15:07 नवीन

१०००

अरे काय हे? च्यायला १००० च्या वर संख्या असलेल्या मिपावर खच्चून ४-५ लोक जमता आणि त्यावर वृत्तांत काय ल्हिता??? या १००० जणांमधील १०० जणांचा तरी कट्टा आता तुम्हीच भरवून दाखवा. ह्यो कट्टा जरासा फ्लॉप वाटला राव हे बाकी खरं आहे हा....लागोपाठ दोन पुणे कट्टे फ्लॉप गेले मिपाचे. का बरं झाल असेल असे...? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल नावाचा बैल
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 06/29/2008 - 09:43 नवीन

थांब रे इनोबा.

अरे हळू हळू येतील रे लोक. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Sun, 06/29/2008 - 21:14 नवीन

अहो पेशवे...

अरे हळू हळू येतील रे लोक. जेवढे येतील त्यातच समाधान आहे आम्हाला!पण उगाच त्याच्या नावाने बोटे मोडू नये कोणी,एवढीच इच्छा आहे!! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
श
शैलेन्द्र Sat, 06/28/2008 - 16:33 नवीन

लइ तापलाय

लइ तापलाय जणु, पावुस पड्णा झाला काय? पण ते ईनाम नगा वाटु बॉ, जहागीरदारीन पेशवाई बुडवली...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा